Difference between revisions of "Ruby/C3/while-and-until-Looping-Statements/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 538: Line 538:
 
|-
 
|-
 
| 08:19  
 
| 08:19  
| अधिक माहितीसाठी कृपया <nowiki>contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
+
| अधिक माहितीसाठी कृपया contact @ spoken hyphen tutorial dot org वर लिहा
  
 
|-
 
|-

Revision as of 16:00, 7 July 2014

Title of script: while-and-until-Looping-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबी मधीलwhile आणि until loops वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:09 while लूप
00:10 until लूप
00:11 redo
00:12 आणि break.
00:13 आपण,
00:14 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि
00:17 रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:20 या पाठासाठी इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
00:25 तसेच लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:29 संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 तुम्हाला आठवत असेल की आपण ttt डिरेक्टरी बनवली होती.
00:38 त्या डिरेक्टरीत जाऊ.
00:41 नंतर ruby hyphen tutorial आणि looping hyphen statementsह्या डिरेक्टरीत जाऊ.
00:46 आता ह्या फोल्डरमधे आहोत. पुढे जाऊ.
00:50 रुबी मधील while लूपचा सिंटॅक्स असा आहे :
00:54 while “boolean expression”
00:56 रुबी कोड
00:57 end
00:58 त्याचे उदाहरण पाहू.
01:01 सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे geditमधे नवी फाईल बनवा.
01:05 त्याला while hyphen loop dot rb हे नाव द्या.
01:09 माझ्याकडे while लूपचे एक उदाहरण आहे.
01:13 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा gedit space while hyphen loop dot rb space & (ampersand)
01:24 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
01:28 ह्या उदाहरणात while लूप घोषित केले आहे.
01:32 प्रथम i हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली .
01:38 नंतर while लूप घोषित केले आहे.
01:41 हे लूप व्हेरिएबल i ची व्हॅल्यू -10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल.
01:46 while लूपमधे घोषित केलेली puts मेथड आऊटपुट दाखवेल.
01:51 आऊटपुट दाखवल्यानंतर iची व्हॅल्यू 1 ने कमी करू.
01:56 पुढच्या आयटरेशन पर्यंत i ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल .
02:01 प्रत्येक आयटरेशनला i ची व्हॅल्यू कमी होत जाईल.
02:04 i ची व्हॅल्यू -10वर पोहोचेपर्यंत हे असे चालू राहिल.
02:09 या टप्प्यावर while च्या कंडिशनची पूर्तता होणार नाही.
02:12 त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल.
02:16 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा ruby space while hyphen loop dot rb आणि आऊटपुट पहा.
02:30 आऊटपुट म्हणून 0 पासून -9 पर्यंतचे अंक दिसतील.
02:35 आता तुम्ही रुबीमधे while लूप बनवू शकाल .
02:40 आता until लूपबद्दल जाणून घेऊ.
02:43 रुबीतील until लूपचा सिंटॅक्स असा आहे -
02:45 until “boolean expression”
02:47 रुबी कोड
02:48 end
02:50 आता उदाहरण पाहू.
02:52 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space until hyphen loop dot rb space & (ampersand)
03:03 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
03:07 या उदाहरणात until लूप घोषित केले आहे.
03:12 प्रथम i हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे.
03:16 नंतर until loop घोषित केले.
03:18 हे लूप व्हेरिएबल i ची व्हॅल्यू -10 पेक्षा मोठी असेपर्यंत कार्यान्वित राहिल.
03:23 puts मेथड आऊटपुट दाखवेल.
03:27 आऊटपुट दाखवल्यानंतर iची व्हॅल्यू 1 ने कमी होईल.
03:32 पुढच्या आयटरेशन पर्यंत i ची ही कमी झालेली व्हॅल्यू वापरली जाईल .
03:36 प्रत्येक आयटरेशनला i ची व्हॅल्यू कमी होत जाईल.
03:40 i ची व्हॅल्यू -11 वर जाईपर्यंत हे असे चालू राहिल.
03:43 या टप्प्यावर until कंडिशनची पूर्तता होणार नाही.
03:46 त्यानंतर लूप थांबेल आणि त्यामुळे आऊटपुट प्रिंट होणेही थांबेल.
03:51 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा ruby space until hyphen loop dot rb आणि आऊटपुट पहा.
04:03 आऊटपुट मधे 0 पासून -10 पर्यंतचे अंक दिसतील.
04:08 आता रुबीमधे until लूप लिहू शकता .
04:13 आता redo ची रचना पाहू.
04:16 रुबीतील redoचा सिंटॅक्स असा आहे:
04:20 a collection of objects.each do item
04:25 कंडिशनल स्टेटमेंट
04:27 रुबी कोड
04:28 redo
04:29 end कंडिशनल
04:30 end लूप
04:32 माझ्याकडे हे redo लूपचे एक उदाहरण आहे.
04:35 आता टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space redo hyphen loop dot rb space &(ampersand )
04:48 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता .
04:52 ह्या उदाहरणात each लूप घोषित आहे.
04:55 10 ते 20 या अंकांमधून आयटरेट करण्यासाठी each लूप घोषित केले .
05:00 नंतर if कंडिशनल स्टेटमेंट घोषित केले.
05:04 हे लूप 10 ते 20 मधील प्रत्येक अंकासाठी कार्यान्वित होईल.
05:08 i ची किंमत 20 असेल तरच आतील कंडिशनलif च्या कंडिशनल ब्लॉकमधे प्रवेश करेल.
05:15 each लूपमधे घोषित केलेली puts मेथड आऊटपुट दाखवेल.
05:20 एकदा प्रोग्रॅम if ह्या कंडिशनल ब्लॉकमधे गेला की प्रथम तो आऊटपुट प्रिंट करेल.
05:24 नंतर redo कार्यान्वित करेल.
05:28 सर्वात आतल्या लूपचे आयटरेशन redo कार्यान्वित करेल.
05:31 हे तो लूपची कंडिशन न तपासताच करेल.
05:34 if i == 20 ही आपली कंडिशन आहे.
05:38 ह्याचे आऊटपुट अमर्यादित लूप असेल कारण i ची 20 ही व्हॅल्यू बदलत नाही .
05:43 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा ruby space redo hyphen loop dot rb
05:52 आणि आऊटपुट पहा.
05:53 कधीही न संपणारा असा अमर्यादित लूप हे आऊटपुट असेल.
05:58 अमर्यादित लूप थांबवण्यासाठी Ctrl + C दाबा.
06:03 आता break स्टेटमेंट पाहू.
06:06 रुबी मधील break स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे -
06:10 लूपिंग स्टेटमेंट
06:12 कंडिशनल स्टेटमेंट
06:13 break
06:14 end कंडिशनल
06:16 रुबी कोड
06:17 end लूप
06:18 याचे उदाहरण पाहू.
06:21 टर्मिनल वर जाऊन टाईप करा gedit space break hyphen loop dot rb space ampersand.
06:33 पाठ थांबवून कोड टाईप करू आणि समजूनही घेऊ.
06:38 या उदाहरणात each लूप घोषित केले आहे.
06:41 आपण हे आधी वापरले तसेच आहे.
06:43 येथे puts मेथड 11 ते 19 अंकांसाठी आऊटपुट दाखवेल.
06:49 एकदा ही व्हॅल्यू 20झाली की प्रोग्रॅम कंडिशनलif ब्लॉकमधे जाईल.
06:54 या टप्प्यावर break स्टेटमेंट कार्यान्वित होऊन लूप कार्यान्वित होणे थांबेल .
06:59 आता टर्मिनल उघडून टाईप करा.
07:02 ruby space break hyphen loop dot rb
07:05 आणि आऊटपुट पहा.
07:08 आऊटपुट मधे 10 पासून 19 पर्यंत अंक दिसतील.
07:13 आता तुम्ही break ची रचना लिहू शकता.
07:17 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत.
07:20 थोडक्यात,
07:22 या पाठात शिकलो,
07:24 while लूप
07:25 until ची रचना
07:26 redo
07:27 break ची रचना
07:29 आता असाईनमेंट.
07:31 फॅरनहीट म्हणून दाखवल्या जाणा-या 100 पासून 115 पर्यंत समाविष्ट असलेल्या अंकांची रेंज घ्या.
07:38 योग्य लूपची निवड करून
07:40 रुबी प्रोग्रॅम लिहा.
07:42 जो फॅरनहीटचे सेल्सिअस मधे सूत्र वापरून रूपांतर करेल.
07:46 त्यासाठी दिलेल्या अंकांची रेंज वापरेल.
07:49 सेल्सिअसमधील तापमान 32 डिग्रीपेक्षा वर गेल्यावर पुढील आऊटपुट दाखवेल
07:55 The temperature has reached a certain degree Celcius and has become unbearable”
08:00 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:03 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:07 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
08:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
08:13 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
08:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:19 अधिक माहितीसाठी कृपया contact @ spoken hyphen tutorial dot org वर लिहा
08:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:35 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:44 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Pratik kamble, Ranjana