Difference between revisions of "PERL/C2/Variables-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 8: Line 8:
  
 
{| border=1
 
{| border=1
| '''Visual Cue'''
+
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
  

Revision as of 17:19, 1 July 2014

Title of script: Variables-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:01 व्हेरिएबल्स इन पर्लवरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात पर्लमधील व्हेरिएबल्स बद्दल जाणून घेऊ.
00:12 येथे उबंटु लिनक्स12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि
00:18 पर्ल5.14.2 म्हणजेच पर्ल रिव्हीजन 5 वर्जन 14 आणि सबवर्जन 2 तसेच
00:26 gedit हा टेक्स्ट एडिटर वापरू.
00:30 तुम्ही कुठलाही टेक्स्ट एडिटर निवडू शकता.
00:34 पर्लमधील व्हेरिएबल्सः
00:37 व्हेरिएबल्सचा उपयोग टेक्स्ट स्ट्रिंग्ज, नंबर्स किंवा ऍरे संचित करण्यासाठी केला जातो.
00:44 एकदा व्हेरिएबल घोषित केल्यावर ते स्क्रिप्टमधे वारंवार वापरता येतात.
00:50 स्केलर व्हेरिएबलमधे एकच व्हॅल्यू संचित करता येते जी स्केलर असते.
00:56 स्केलर व्हेरिएबल $ (डॉलर) चिन्हा द्वारे घोषित करता येतात.
01:00 व्हेरिएबल घोषित कसे करायचे ते पाहू.
01:03 जसे कीः dollar priority semicolon .
01:09 पर्लमधे व्हेरिएबलच्या नावाचे अनेक प्रकार आहेत. व्हेरिएबल्सची सुरूवात अक्षर किंवा अंडरस्कोरने व्हायला हवी.
01:18 आणि त्यात अक्षरे, अंक, अंडरस्कोर किंवा ह्या तिन्हींचे मिश्रण ह्यांचा समावेश असू शकतो.
01:24 कॅपिटल अक्षरात घोषित केलेल्या व्हेरिएबल्सला पर्लमधे विशिष्ट अर्थ असतो.
01:30 त्यामुळे कॅपिटल अक्षरात व्हेरिएबल्स घोषित करणे टाळा.
01:34 आता टर्मिनल उघडा आणि टाईप करा gedit variables dot pl ampersand
01:44 Ampersand (&) मुळे टर्मिनलवरील कमांड प्रॉम्प्ट अनलॉक केला जातो. एंटर दाबा.
01:50 ह्यामुळे variables.pl ही फाईलgedit ह्या टेक्स्ट एडिटरमधे उघडेल.
01:56 dot pl हे पर्ल फाईलचे डिफॉल्ट एक्स्टेन्शन आहे.
02:01 फाईलमधे टाईप करा dollar priority semicolon आणि एंटर दाबा.
02:10 अशाप्रकारे priority हे व्हेरिएबल घोषित केले आहे.
02:13 वापर करण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करण्याची गरज नाही.
02:18 तुम्ही कोडमधे ते थेट वापरू शकता.
02:21 आता priority ह्या व्हेरिएबलला न्युमरीकल व्हॅल्यू देऊ.
02:25 त्यासाठी टाईप करा dollar priority space equal to space one semicolon
02:32 आणि एंटर दाबा.
02:34 पुढे टाईप करा
02:36 print space double quote Value of variable is: dollar priority slash n double quote पूर्ण करा semicolon आणि एंटर दाबा.
02:50 slash n हे न्यू लाईन कॅरॅक्टर आहे.
02:53 आता variables.pl ही फाईल सेव्ह करा.
03:02 येथे ही फाईल home/amol ह्या डिरेक्टरीत सेव्ह होणार आहे. फाईल सेव्ह करा.
03:10 आपण बनवलेल्या variables.pl ह्या फाईल्सच्या परमिशन बदलू.
03:18 हे करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा chmod 755 variables dot pl
03:27 हे फाईल रीड, राईट आणि एक्झिक्यूट करण्याचे हक्क देईल.
03:32 ही पर्ल स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर
03:36 टाईप करा perl hyphen c variables dot pl
03:42 Hyphen c स्विचमुळे दिलेला पर्ल प्रोग्रॅम कंपाईल होतो. सिंटॅक्स एररसाठी तपासला जातो.
03:49 एंटर दाबा.
03:51 हे स्क्रिप्टमधे सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते.
03:56 आता पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा.
04:06 हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दिसेल.
04:10 आपण घोषित केलेल्या व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देखील प्रदान करू शकतो.
04:15 टेक्स्ट एडिटर विंडोवर जा.
04:18 dollar priority equal to oneऐवजी टाईप करा
04:22 dollar priority equal to एकेरी अवतरण चिन्हात high
04:28 लक्षात घ्या, असाईनमेंट उजवीकडून डावीकडे इव्हॅल्युएट केले जाते.
04:34 स्केलर कुठल्याही प्रकारचा डेटा संचित करू शकतो. स्ट्रिंग किंवा संख्या.
04:38 ही फाईल सेव्ह करा. पुन्हा एकदा स्क्रिप्ट कंपाईल करण्यासाठी टाईप करा
04:45 perl hyphen c variables dot pl आणि एंटर दाबा.
04:51 हे कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्याचे आपल्याला सांगते.
04:55 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl variables dot pl आणि एंटर दाबा.
05:03 आपल्याला अशाप्रकारे आऊटपुट मिळेल.
05:07 पुन्हा टेक्स्ट एडिटर विंडोवर जा.
05:10 तुम्ही स्केलर्स दुहेरी अवतरण चिन्हातील स्ट्रिंगमधे असेही वापरू शकता.
05:15 dollar priority = दुहेरी अवतरण चिन्हातString
05:19 फाईल सेव्ह करून बंद करा.
05:22 आता अनेक व्हेरिएबल्स कशी घोषित करायची ते पाहू.
05:27 त्यासाठी टेक्स्ट एडिटरमधे नवी फाईल उघडू.
05:31 टर्मिनलवर टाईप करा - gedit multivar dot pl space ampersand आणि एंटर दाबा.
05:42 हे multivar dot pl ही फाईल टेक्स्ट एडिटरमधे उघडेल.
05:48 आता टाईप करा -
05:50 dollar firstVar comma dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा.
06:00 dollar firstVar ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू dollar secondVarमधे कॉपी करण्यासाठी टाईप करा
06:07 dollar firstVar space equal to space dollar secondVar semicolon आणि एंटर दाबा.
06:19 ह्या व्हेरिएबल्सवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ह्या गणिती क्रिया करता येऊ शकतात.
06:30 हे पर्लद्वारे कसे करू शकतो ते पाहू.
06:34 टेक्स्ट एडिटरवर जा.
06:36 ह्या दोन्ही व्हेरिएबल्सला 10 ही व्हॅल्यू देण्यासाठी टाईप करा,
06:41 dollar firstVar equal to dollar secondVar equal to ten semicolon आणि एंटर दाबा.
06:51 आता व्हॅल्यूज दाखवण्यासाठी टाईप करा.
06:55 print double quote firstVar: dollar firstVar and secondVar: dollar secondVar slash n double quote पूर्ण करा semicolon आणि एंटर दाबा.
07:17 ही फाईल सेव्ह करा.
07:19 दोन व्हेरिएबल्स मधील व्हॅल्यूची बेरीज करू.
07:23 त्यासाठी टाईप करा.
07:25 dollar addition space equal to space dollar firstVar plus space dollar secondVar semicolonआणि एंटर दाबा.
07:43 आपण addition हे व्हेरिएबल आधी घोषित केलेले नाही.
07:47 पुन्हा एकदा additionह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी टाईप करा
07:53 print double quote Addition is dollar addition slash n double quote पूर्ण करा semicolon
08:05 ही फाईल सेव्ह करा.
08:07 फाईल पुन्हा कंपाईल करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा
08:12 perl hyphen c multivar dot pl
08:18 कुठलीही सिंटॅक्स एरर नसल्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करू शकतो.
08:24 त्यासाठी टाईप करा. perl multivar dot pl
08:30 हे हायलाईट केल्याप्रमाणे आऊटपुट दाखवेल.
08:34 अशाप्रकारे वजाबाकी, गुणाकार व भागाकार करून बघा.
08:38 मी येथे कोड लिहीला आहे.
08:41 ही फाईल सेव्ह करून बंद करू.
08:46 फाईल कंपाईल करण्यासाठी टाईप करा.
08:48 perl hyphen c multivar dot pl
08:54 कोणतीही सिंटॅक्स एरर नाही.
08:55 त्यामुळे स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी perl multivar dot pl
09:01 कार्यान्वित केल्यावर असे आऊटपुट मिळेल.
09:06 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:11 ह्यात आपण शिकलो,
09:14 पर्लमधे स्केलर व्हेरिएबल्स घोषित करून त्यांचा वापर करणे.
09:18 असाईनमेंट.
09:20 नंबर व्हेरिएबल घोषित करा.
09:22 त्याला 10 व्हॅल्यू द्या.
09:24 घोषित केलेले व्हेरिएबल दाखवा.
09:26 दोन स्ट्रिंग व्हेरिएबल्स घोषित करा.
09:29 त्यांना “Namaste ” आणि “India” या व्हॅल्यूज द्या.
09:34 दोन्ही व्हेरिएबल्स एकापुढे एक दाखवा.
09:38 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:42 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:45 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
09:50 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:53 स्पोकन ट्युटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:56 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:01 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:08 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:13 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
10:23 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:34 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana