Difference between revisions of "PERL/C2/Functions-in-Perl/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 450: Line 450:
 
|-
 
|-
 
| 10.43  
 
| 10.43  
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
  
 
|-
 
|-

Revision as of 10:42, 26 June 2014

Title of script: Functions-in-Perl

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration


00.01 पर्लमधील Functions वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत-
00.10 पर्ल फंक्शन्स,
00.11 अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन,
00.13 रिटर्न व्हॅल्यूज देणारे फंक्शन.
00.16 या पाठात मी
00.18 उबंटु लिनक्स 12.04 ही ऑपरेटिंग सिस्टीम
00.22 पर्ल 5.14.2 आणि
00.24 gedit हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे.
00.27 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00.31 पर्लमधील व्हेरिएबल्स, कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आपल्याला असावे.
00.41 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या.
00.47 प्रथम पर्लची सोपी फंक्शन्स पाहू.
00.51 पर्लमधे फंक्शन्सला subroutines असेही म्हणतात जी sub कीवर्डद्वारे घोषित केली जातात.
00.57 घोषित फंक्शनची डेफिनीशन (definition )महिरपी कंसात लिहिली जाते.
01.03 हे फंक्शन कोणतेही अर्ग्युमेंटस घेत नाही.
01.07 आणि काहीही परत करत नाही.
01.10 टीप: फंक्शन हे स्क्रिप्ट मधे कुठेही किंवा दुस-या moduleमधेही घोषित करता येते.
01.17 असे फंक्शन वापरण्यासाठी module स्क्रिप्टमधे समाविष्ट करणे आवश्यक आहे .
01.24 module फाईल स्क्रिप्टमधे समाविष्ट करण्यासाठी पुढील सिंटॅक्स आहे.
01.31 use ModuleFileName semicolon
01.35 हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
01.39 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला simpleFunction dot pl हे नाव द्या.
01.46 येथे gedit मधे माझी simpleFunction dot pl ही फाईल आहे .
01.51 स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
01.55 आपण घोषित केलेले फंक्शन आता कॉल करत आहोत.
02.00 यामुळे कार्याचा कंट्रोल त्या फंक्शनकडे दिला जातो.
02.06 येथे हे फंक्शन घोषित केले आहे व ही त्याची डेफिनीशन आहे.
02.10 हे फंक्शन, दिलेले टेक्स्ट प्रिंट करेल.
02.14 फाईल सेव्ह करा .
02.17 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02.24 perl simpleFunction dot pl
02.28 आणि एंटर दाबा.
02.30 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
02.38 आता अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू.
02.44 हे फंक्शन सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
02.48 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला functionWithArgs dot pl हे नाव द्या.
02.57 geditमधे माझी functionWithArgs ही स्क्रिप्ट आहे.
03.02 स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा
03.07 येथे 10 आणि 20 ही अर्ग्युमेंटस देऊन फंक्शन कॉल करत आहोत.
03.13 पास केलेली अर्ग्युमेंटस $var1 आणि $var2मधे संचित होतील.
03.20 @_ हा विशेष पर्ल व्हेरिएबल आहे ज्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ.
03.29 हे फंक्शन2 व्हेरिएबल्सची बेरीज करून त्याचे उत्तर प्रिंट करेल.
03.37 फाईल सेव्ह करा .
03.42 @_ हा विशेष पर्ल ऍरे आहे.
03.46 पास केलेली अर्ग्युमेंटस संचित करण्यासाठी हा ऍरे वापरला जातो.
03.51 तसेच व्हेरिएबल्समधे पास केलेली अर्ग्युमेंटस अशी संचित करू शकतो.
03.56 $var1 space = space shift @_ semicolon
04.04 $var2 space = space shift @_ semicolon
04.12 shift @_ हे @_ ऍरेमधील पहिल्या स्थानावरील एलिमेंट काढून टाकेल.
04.21 आणि ते व्हेरिएबलला प्रदान करेल.
04.24 दुसरी पध्दत म्हणजे $var1 space = space dollar underscrore चौकटी कंसात zero चौकटी कंस पूर्ण semicolon
04.38 $var2 space = space dollar underscrore चौकटी कंसात 1 चौकटी कंस पूर्ण semicolon
04.49 वरील पध्दत ही इंडेक्स वापरून @_ ऍरेचे घटक मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे.
04.59 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा -
05.06 perl functionWithArgs dot pl आणि एंटर दाबा.
05.14 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
05.23 आता आपण एक व्हॅल्यू परत करणारी फंक्शन्स पाहू.
05.32 सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ.
05.35 मी gedit मधे funcWithSingleRtrnVal dot pl स्क्रिप्टवर जात आहे .
05.46 तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून दाखवलेला कोड त्यात टाईप करा.
05.52 येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स देऊन addVariables फंक्शन कॉल करत आहोत.
06.01 फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू $addition ह्या व्हेरिएबलमधे संचित होईल.
06.09 हे फंक्शन आपण पास केलेल्या पॅरॅमीटर्सची बेरीज करून त्याचे उत्तर परत देईल.
06.15 फाईल सेव्ह करा .
06.17 आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06.20 त्यासाठी टर्मिनलवर जाऊन टाईप करा
06.24 perl funcWithSingleRtrnVal dot pl आणि एंटर दाबा.
06.35 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
06.43 आता अनेक व्हॅल्यूज रिटर्न करणारे फंक्शन पाहू.
06.48 सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
06.53 geditमधे मी फाईल उघडून त्याला funcWithMultipleRtrnVals dot pl असे नाव दिले आहे.
07.04 असेच तुम्ही तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे करा.
07.08 आता स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा.
07.13 येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स असलेले addVariables फंक्शन कॉल करत आहोत.
07.21 ह्या फंक्शनच्या रिटर्न व्हॅल्यूज $var1, $var2 आणि $addition ह्या व्हेरिएबल्समधे संचित होतील.
07.31 हे फंक्शन बेरीज करून आपण पास केलेली पॅरॅमीटर्स आणि त्याचे उत्तर देईल.
07.42 एखादे फंक्शन आपल्याला ऍरे कसा परत करेल हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होते.
07.53 तसेच hash परत करणा-या फंक्शनचे हे उदाहरण आहे .
08.00 फाईल सेव्ह करा.
08.03 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
08.10 perl funcWithMultipleRtrnVals dot pl
08.18 आणि एंटर दाबा.
08.20 टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल.
08.32 पर्ल अनेक इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते.
08.36 त्यापैकी काही आपण आधीच्या पाठांत शिकलो. उदाहरणार्थ ऍरेज, हॅश, सॉर्ट, स्केलर, इच, कीज इत्यादी.
08.49 आपण घोषित केलेली फंक्शन्स कॉल करण्याप्रमाणेच इनबिल्ट फंक्शन्सही कॉल करता येतात.
08.57 उदाहरणार्थ sort कंसात @arrayName कंस पूर्ण semicolon
09.04 आपण वापरत असलेल्या सँपल प्रोग्रॅममधे काही इनबिल्ट फंक्शन्स समाविष्ट करा.
09.10 आणि त्यांची आऊटपुटस बघा.
09.13 थोडक्यात,
09.15 या पाठात
09.17 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो,
09.19 पर्ल मधील अर्ग्युमेंटस असलेली फंक्शन्स
09.22 आणि रिटर्न व्हॅल्यू देणारी फंक्शन्स.
09.27 आता असाईनमेंट.
09.29 3 अर्ग्युमेंटस घेणारे फंक्शन लिहा.
09.33 दिलेली अर्ग्युमेंटस वापरून काही कार्य करा.
09.37 अर्ग्युमेंटस वर कार्य करून मिळवलेले उत्तर परत करा तसेच प्रिंट करा.
09.43 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09.47 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09.51 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09.56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10.02 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10.07 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10.14 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10.19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10.28 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10.40 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10.43 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10.46 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, PoojaMoolya, Ranjana