Difference between revisions of "Ruby/C2/Variables-in-Ruby/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 330: Line 330:
 
|-
 
|-
 
| 06.37  
 
| 06.37  
| ह्यासांबधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.  
+
| ह्यासंबंधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.  
  
 
|-
 
|-

Revision as of 17:04, 24 June 2014

Title of script: Veriables-in-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.02 रुबीमधील व्हेरिएबल्सवरील पाठात आपले स्वागत.
00.06 यात शिकणार आहोत,
00.09 व्हेरिएबल म्हणजे काय?
00.10 रुबीतील डायनॅमिक टाइपींग.
00.13 व्हेरिएबल घोषित करणे.
00.15 व्हेरिएबलचा टाईप बदलणे.
00.18 व्हेरिएबलचा स्कोप म्हणजे काय?
00.20 व्हेरिएबलचे प्रकार.
00.23 त्यासाठी उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00.32 ह्या पाठासाठी लिनक्स मधील टर्मिनल वापरण्याचे ज्ञान असावे.
00.38 तुम्हाला irb चा परिचय असावा.
00.41 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.47 आता व्हेरिएबल म्हणजे काय ते पाहू.
00.50 व्हेरिएबलचा वापर व्हॅल्यू संचित करण्यासाठी होतो.
00.54 व्हेरिएबल हा एक संदर्भ आहे जो असाईन केला जातो.
00.58 रुबी व्हेरिएबल्स केस सेन्सेटिव्ह आहेत हे लक्षात ठेवा.
01.04 व्हेरिएबलचे नाव अर्थपूर्ण असले पाहिजे.
01.07 व्हेरिएबलच्या नावात केवळ लोअर केसमधील अक्षरे, अंक, अंडरस्कोर असू शकतात. उदाहरणार्थ first_name
01.20 डायनॅमिक टाइपिंग म्हणजे काय ते पाहू.
01.23 रुबी ही डायनॅमिक टाईप लँग्वेज आहे.
01.27 म्हणजेच व्हेरिएबल बनवताना डेटा टाईप घोषित करण्याची गरज नाही.
01.34 असाईनमेंट करताना रुबी इंटरप्रिटर (interpreter) डेटा टाईप निश्चित करतो.
01.39 आता रुबीमधे व्हेरिएबल कसे घोषित करतात ते पाहू .
01.45 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
01.51 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल .
01.55 टाईप करा irb
01.57 एंटर दाबा. इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल.
02.02 आता टाईप करा var1 equal to 10 आणि एंटर दाबा.
02.09 येथे व्हेरिएबलvar1 घोषित करून त्याला 10 ही व्हॅल्यू दिली आहे.
02.15 आता इंटरप्रीटरने दिलेला डेटा टाईप हा इंटिजर आहे की नाही ते तपासू.
02.21 टाईप करा var1 dot kind_(underscore)of (?)question mark Integer आणि एंटर दाबा.
02.37 true हे आऊटपुट मिळेल.
02.39 रुबीमधे तुम्ही व्हेरिएबल टाईप डायनॅमिकली बदलू शकता.
02.44 त्यासाठी फक्त त्याला नवी व्हॅल्यू द्या.
02.47 आपण हे var1व्हेरिएबलला स्ट्रिंग व्हॅल्यू देऊन करूया.
02.53 टाईप करा var1 equal to डबल कोटसमधे helloआणि एंटर दाबा.
03.02 दिलेला व्हेरिएबल टाईप तपासून बघू.
03.06 टाईप करा var1 dot class
03.12 Class मेथड आपल्याला व्हेरिएबलचा क्लास सांगेल. आता एंटर दाबा.
03.20 स्ट्रिंग असे आऊटपुट मिळेल.
03.23 रुबीने आपोआप इंटिजर डेटा टाईप बदलून तो स्ट्रिंग केला.
03.29 आता व्हेरिएबलची व्हॅल्यू वेगवेगळ्या टाईपमधे कशी बदलायची ते पाहू.
03.35 स्लाईडस वर जाऊया.
03.38 रुबी व्हेरिएबल क्लासेस मधे त्याची व्हॅल्यू दुस-या टाईपमधे बदलण्याच्या मेथडस आहेत.
03.45 व्हेरिएबल इंटिजरमधे बदलण्यासाठी to_i ही मेथड
03.51 व्हेरिएबल फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलण्यासाठी to_f ही मेथड
03.57 व्हेरिएबल स्ट्रिंगमधे बदलण्यासाठी to_s ही मेथड वापरली जाते.
04.03 to _s ही मेथड नंबर बेस हे अर्ग्युमेंट घेते.
04.08 हा बदल नंबर बेसवर अवलंबून असतो.
04.12 आता ह्या पध्दती वापरून बघू.
04.15 टर्मिनलवर जाऊन प्रथम तो क्लियर करून घेऊ.
04.21 irb कन्सोल क्लियर करण्यासाठी Ctrl Lदाबा.
04.25 आता टाईप करा y equal to 20 आणि एंटर दाबा.
04.32 येथे yहे व्हेरिएबल घोषित करून त्याला 20 ही व्हॅल्यू प्रदान केली आहे.
04.39 to अंडरस्कोर f मेथड वापरून y फ्लोटिंग पॉईंट व्हॅल्यूमधे बदलणार आहोत.
04.47 टाईप करा y dot to underscore f आणि एंटर दाबा.
04.55 आपल्याला float रुपात व्हॅल्यू मिळेल.
04.57 आता टाईप करा y dot to underscore s आणि एंटर दाबा.
05.06 आपल्याला 20 हे आऊटपुट डबल कोटसमधे मिळेल.
05.10 व्हेरिएबलy बायनरी फॉर्ममधे बदलण्यासाठी to_s मेथडमधे नंबर बेस म्हणून 2 द्या.
05.18 मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
05.22 येथे कंसात 2 टाईप करा आणि एंटर दाबा.
05.29 आपल्याला बायनरी रुपात आऊटपुट मिळेल.
05.33 तसेच नंबर बेस 8 किंवा 16 करून
05.39 yव्हेरिएबल octal किंवा hexadecimal मधे बदलता येऊ शकतो.
05.44 पुन्हा स्लाईडसवर जाऊ.
05.47 आता व्हेरिएबल स्कोप म्हणजे काय ते पाहू.
05.51 स्कोप म्हणजे प्रोग्रॅममधील कुठल्या भागात व्हेरिएबल ऍक्सेस करता येतो .
05.56 रुबीमधे चार प्रकारचे व्हेरिएबल स्कोप आहेत.
06.00 लोकल
06.01 ग्लोबल
06.02 इन्स्टन्स आणि
06.04 क्लास
06.06 प्रत्येक व्हेरिएबलचा प्रकार व्हेरिएबलच्या नावाच्या सुरूवातीला स्पेशल कॅरॅक्टर वापरून घोषित केला जातो.
06.14 $ डॉलर हे ग्लोबल व्हेरिएबल दाखवते.
06.18 लोअर केसमधील अक्षरे आणि अंडरस्कोर हे लोकल व्हेरिएबल दाखवते.
06.25 @ हे इन्स्टन्स व्हेरिएबल दाखवते.
06.29 @@ ही दोन चिन्हे क्लास व्हेरिएबल दाखवते.
06.33 अप्पर केसमधील अक्षरे कॉन्स्टंट दाखवतात.
06.37 ह्यासंबंधी अधिक माहिती दुस-या पाठांत घेऊ.
06.42 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहेत. थोडक्यात
06.48 आपण शिकलो,
06.51 व्हेरिएबल घोषित करणे. उदाहरणार्थ var1=10
06.56 to_f, to_s मेथडस वापरून व्हेरिएबल टाईप बदलणे
07.04 व्हेरिएबलचे वेगवेगळे स्कोप.
07.06 असाईनमेंट.
07.08 व्हेरिएबल घोषित करून ते octal आणि hexadecimal रुपात बदला.
07.14 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.17 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.20 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07.27 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07.30 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07.34 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07.41 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07.45 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07.51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07.57 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana