Difference between revisions of "Firefox/C3/Popups/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
'''Title of script''': Popups
 
  
'''Author: Manali Ranade'''
 
  
'''Keywords: Firefox'''
 
  
 
+
{| Border=1
 
+
! <center>'''Time'''</center>
{| style="border-spacing:0;"
+
! <center>'''Narration'''</center>
! <center>Visual Clue</center>
+
! <center>Narration</center>
+
  
 
|-
 
|-

Revision as of 11:43, 11 July 2014


Time
Narration
0:00 मोझिला फायरफॉक्समधे Pop-up आणि Image optionsसेट करण्याच्या पाठात स्वागत.
0:07 या पाठात शिकूया Pop up आणि image preferences सेट करणे,
0:13 आणि टूलबार Customize करणे.
0:15 Pop-up विंडोज, किंवा pop-ups या विंडोज, आपल्या परवानगीशिवाय उघडतात.
0:21 त्या विविध आकारात असतात परंतु त्या संपूर्ण स्क्रीन व्यापत नाहीत.
0:27 काही pop-ups करंट फायरफॉक्स विंडोच्या वर तर काही खाली उघडल्या जातात. म्हणजेच (pop-unders)
0:37 Pop-ups हे काही वेळा त्रासदायक ठरतात. आणि ह्याच मुख्य कारणाने आपल्याला त्यास अक्षम करायचे आहे.
0:42 या पाठात आपण Ubuntu 10.04 वर Firefox version 7.0 वापरणार आहोत.
0:50 आता Firefox ब्राउजर उघडू.
0:53 URL बार मध्ये टाईप करा ‘w w w dot pop up test dot com’
1:01 एंटर दाबा.
1:03 ही साईट pop up म्हणजे काय हे दाखवेल.
1:07 ‘multi-popup test’ ह्या लिंकवर क्लिक करा.
1:12 तुम्हाला सहा pop ups दिसतील.
1:20 Back वर क्लिक करा.
1:22 आणखी दोन pop-ups उघडतील. ते कसे तापदायक आहे ते पहा?
1:28 फायरफॉक्स आपणास pop-ups आणि pop-unders हे दोन्ही नियंत्रित करण्याची परवानगी देते. हे Edit मेनूतील Preferences द्वारे केले जाते.
1:37 विंडोजच्या युजर्सनी Tools मेनूतील Options वर क्लिक करा.
1:43 Preferences विंडोमधे Content टॅबवर क्लिक करा.
1:48 Block pop-up windows पर्याय डिफॉल्ट रूपात आधीच सुरू केलेला असतो.
1:53 नसल्यास तो निवडावा .
1:56 आता तुम्हाला pop-upsचा त्रास होणार नाही.
2:02 तुम्ही Firefox Preference विंडो Close वर क्लिक करून बंद करू शकता.
2:09 तुम्ही exceptions ही निवडू शकता.
2:12 Exceptions म्हणजे अशा साईटस ज्यातील pop-ups ला आपली संमती असते.
2:17 Editमधील Preferences वर क्लिक करा.
2:20 विंडोजच्या युजर्सनी प्रथम Tools आणि नंतर Options वर क्लिक करावे.
2:26 exceptions समाविष्ट करण्यासाठी, Block pop-up windows फिल्डच्या पुढील Exceptionsबटणावर क्लिक करा.
2:34 एक dialog box उघडेल.
2:37 Address of website फिल्डमधे टाईप करा, ‘w w w dot google dot com’
2:44 Allow बटणावर क्लिक करा.
2:46 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
2:50 preferencesचा डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close क्लिक करा.
2:55 google.com शिवाय इतर सर्व साईटसचे pop-ups रोखले जातील.
3:01 URL बार मध्ये ‘w w w dot pop up test dot com’ टाईप करून एंटर दाबा.
3:09 ‘multi-popup’ test लिंकवर क्लिक करा.
3:12 एकही popup दिसणार नाही.
3:15 आपला popup blocker व्यवस्थित काम करीत आहे.
3:20 Imagesडाऊनलोड करण्यासाठी वेळ आणि bandwidth लागते.
3:24 फायरफॉक्समधे निवडकimagesचे डाऊनलोड रोखता येण्याची सोय आहे.
3:30 Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा.
3:33 Windows युजर कृपया प्रथमTools आणि नंतर Options वर क्लिक करा.
3:39 Preferences च्या डायलॉग बॉक्समधे Content टॅब निवडा.
3:44 Load images automatically चेक बॉक्स अक्षम करा.
3:49 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close वर क्लिक करा.
3:53 Search बार मध्ये Flowers टाईप करून एंटर दाबा.
4:00 google होम पेजवरील 'Images' वर क्लिक करा.
4:04 दिसणाऱ्या पहिल्या image link वर क्लिक करा.
4:08 image load झाली नाही.
4:12 Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक पर्याय प्रदान करते.
4:18 आपल्याला एखादा टूलबार hide करायचा आहे. उदाहरणार्थ Menu bar.
4:23 Menu bar च्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा.
4:27 आणि ते अनचेक करा. झाले!
4:30 Menu bar परत आणण्यासाठी टूलबारच्या रिकाम्या भागावर पुन्हा राईट क्लिक करा.
4:36 Menu bar पर्याय निवडा.
4:40 Firefox, टूलबार customize करण्यासाठी अनेक advancedपर्याय देते. त्यापैकी काही पाहू.
4:46 आता टूलबारवर एक आयकॉन समाविष्ट करू. जो एका क्लिकने वेब पेज प्रिंट करेल.
4:54 टूलबारच्या रिकाम्या भागावर राईट क्लिक करा.
4:58 Customize वर क्लिक करा.
5:00 Customize Toolbar डायलॉग बॉक्स उघडेल.
5:04 आपण डायलॉग बॉक्समधे Print icon बघू शकतो.
5:09 तो icon टूलबारवर ड्रॅग करा.
5:12 Doneवर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
5:17 टूलबारवरील Print icon वर क्लिक करा.
5:21 हे , Print dialog box उघडेल.
5:25 आत्ता print करायचे नसल्याने,
5:28 Cancel वर क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा.
5:32 तुम्ही टूलबार्सना समाविष्ट तसेच काढून टाकु शकता.
5:35 त्यासाठी टूलबारवर राईट क्लिक करून Customize निवडा.
5:40 Add new toolbar बटणावर क्लिक करा.
5:44 नव्या टूलबारला नाव द्या. जसे की, Sample Toolbar.
5:50 OK वर क्लिक करा.
5:53 Downloadsहा आयकॉन ड्रॅग करून Sample Toolbarवर ड्रॉप करा.
6:01 browser मधील नव्या टूलबारकडे लक्ष द्या.
6:04 टूलबार काढून टाकण्यासाठी Restore Default set बटणावर क्लिक करा.
6:10 कंटेट एरिया वाढवण्यासाठी आपण आयकॉनचा आकार छोटा करू शकतो.
6:16 Use Small icons नावाचा चेक बॉक्स निवडा.
6:22 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Done वर क्लिक करा.
6:27 आयकॉनचा आकार कमी झाल्याचा दिसेल.
6:32 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
6:36 ह्या पाठात शिकलो, Pop-up आणि Image preferences सेट करणे,
6:41 Toolbar Customize करणे.
6:43 आता असाईनमेंट.
6:46 Mozilla Firefox ची नवी विंडो उघडा. www.yahoo.com व्यतिरिक्त इतर सर्व popups ब्लॉक करा. bookmarks टूलबार समाविष्ट करा.
6:59 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
7:02 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
7:05 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
7:10 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
7:15 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
7:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
7:25 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
7:29 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
7:38 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
7:48 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana