Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Simple-Visitor-Counter/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 7: Line 7:
  
  
{| style="border-spacing:0;"
+
{| border=1
! <center>Visual Clue</center>
+
|'''Time'''
! <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-

Revision as of 17:44, 21 July 2014

Title of script: Simple-Visitor-Counter

Author: Manali Ranade

Keywords: PHP-and-MySQL


Time Narration
0:00 page counter वरील ह्या ट्युटोरियलमधे स्वागत.
0:02 हे प्रत्येक रिफ्रेशनंतर पेज किती व्यक्तींनी पाहिले आहे ते मोजेल.
0:07 प्रत्येक वेळी कोणी त्या पेजवर गेल्यावर, व्हॅल्यू वाढून ती टेक्स्ट फाईलमधे संचित होईल व युजरला दर्शविली जाईल.
0:15 ती दाखवायची की तुमच्यापुरती ठेवायची ते तुम्ही ठरवू शकता.
0:19 हे करण्याची ही सर्वात सोपी पध्दत आहे.
0:21 हे unique visitors मोजत नाही.
0:23 मी unique visitors हा पाठ लवकरच बनवणार आहे.
0:27 तो लवकरच उपलब्ध होईल.
0:30 तो पहा. तो अधिक तपशीलवार असेल.
0:33 तो IP addresses हाताळतो.
0:35 आत्ता basic counter चा पाठ पाहू जो डेटाबेस स्टोअरेज ऐवजी file-storageवापरतो .
0:42 त्यासाठी प्रथम आपल्या व्हॅल्यूज संचित करण्यासाठी फाईल बनवणे आवश्यक आहे.
0:48 हे करण्याच्या दोन पध्दती आहेत.
0:50 राईट क्लिक करून नवे text document बनवणे.
0:53 किंवा 'fopen' फंक्शन द्वारे फाईल तयार करणे.
0:59 आपण ती फाईल, व्हेरिएबलमधे संचित करणार आहोत. परंतु हे बंधनकारक नाही.
1:05 येथे parameter मधे टाईप करा count.php. आणि दुसरा पॅरामीटर, जो लिहिणे, वाचणे किंवा जोडण्यासाठी आहे. उदाहरणार्थ,
1:22 आपण लिहिण्यासाठी निवडू.
1:26 आता 'fwrite' लिहू आणि file वर लिहू. आणि शून्य ची व्हॅल्यू बनवू.
1:36 आता पेज उघडू. रिफ्रेश करू.
1:41 आपल्याला counter.php मिळाली आहे. त्यावर क्लिक करा. पुन्हा मागे जाऊन count.php पहा.
1:49 म्हणजे .txt
1:51 रिफ्रेश करू.
1:54 आता .txt file मिळाली आहे.
2:00 आपण count.php काढून टाकू.
2:05 आता हे करून झाले. ह्या कोडची गरज नाही.
2:08 म्हणून हा भाग डिलिट करू. पण मी तसाच ठेवतो. समजा फाईल वाचायची आहे.
2:14 हे टाईप देखील करू शकतो. आपल्याला लिहिण्याऐवजी वाचण्यासाठी फाईल बनवायची आहे.
2:22 फाईल मिळाली आहे. त्यात शून्य व्हॅल्यू आहे.
2:26 ती उघडून पाहू.
2:28 हो, आपल्याकडे count.txt मधे शून्य आहे जे वाचून येथे ठेवू.
2:34 आता फाईलमधील contents मिळवण्याची गरज आहे.
2:37 त्यासाठी 'fopen' ऐवजी 'file_get_contents' वापरू.
2:42 टाईप करा 'file_get_contents'.
2:44 यामुळे 'count.txt' मधील contents मिळतील.
2:48 मी 'echo' टाइप करेल आणि व्हेरियेबल चा उपयोग करेल आणि मी टाइप करेल , 'echo file' .
2:52 आता हे file_get_contents आपल्या 'count.txt' मधील contents, फाईल व्हेरिएबल मधे संचित करेल.
3:02 आणि हे फाईल मधील contentsएको करेल.
3:05 पेजवर परत जाऊन रिफ्रेश करू.
3:07 counter क्लिक केल्यावर शून्य मिळाले.
3:10 रिफ्रेश करू. अजूनही शून्यच दाखवत आहे.
3:14 'count.txt' मधे 'hello' टाईप करून पेज रिफ्रेश केल्यास आपल्याला 'hello' दिसेल.
3:20 म्हणजे 'count.txt' मधे जे काही आहे ते एको करत आहोत.
3:25 आता येथे शून्य ही integer व्हॅल्यू आहे.
3:30 हे एको करण्यासाठी टाईप करा 'You've had file visitors'.
3:37 यामुळे असे काहीसे दिसेल.
3:40 आता 'visitors' नावाचे व्हेरिएबल बनवू.
3:46 त्याची व्हॅल्यू 'file' असेल.
3:50 हे येथे वर ठेवू. ते वाचण्यास सोपे आणि कार्यक्षम असेल.
3:55 येथे 'visitors' एको करू.
4:00 पुढे टाईप करा visitors.
4:05 Visitors - new equals हा vistors अधिक 1.
4:14 अशाप्रकारे ही आपली नवीन व्हॅल्यू आहे.
4:17 पुढे टाईप करा 'filenew', आपण नवीन फाईल बनवत आहोत.
4:22 ती count.txt म्हणून उघडणार आहोत.
4:27 आणि ह्या फाईलमधे लिहिणार आहोत.
4:30 जर हे 'a+' असेल तर त्याचा अर्थ 'append' - म्हणजे ह्या फाईलमधे आपण काहीतरी जोडत आहोत.
4:38 परंतु त्या फाईलवरच लिहायचे आहे. येथे टाईप करा 'w'.
4:42 नंतर टाईप करा 'fwrite' कंसात 'filenew' स्वल्पविराम.
4:47 म्हणजे लिहायची व्हॅल्यू, 'visitorsnew'.
4:50 हे कार्य करेल. कार्यान्वित करण्यापूर्वी पुन्हा हा कोड पाहू.
4:55 आपली मुख्य फाईल मिळाली आहे जी count.txt मधील contents देईल, जे ह्याक्षणी शून्य आहे.
5:04 'visitors' मधे फाईल व्हेरिएबलचे contents आहेत.
5:07 युजरला येथे किती 'visitors' आहेत ते एको करत आहोत.
5:11 visitors new ह्या नव्या व्हेरिएबलची व्हॅल्यू 'visitors + 1' आहे. म्हणजे ती व्यक्ती ह्याक्षणी हे पेज बघत आहे.
5:20 हे महत्त्वाचे आहे. या व्यक्तीमुळे येथे 1 ने वाढ होत आहे.
5:24 पाठाच्या सुरूवातीला पाहिल्याप्रमाणे आपण नवी फाईल उघडत आहोत. येथे लिहिण्यासाठी 'w' घेतला आहे.
5:32 नव्या फाईलमधे 1 ने वाढलेली नवी व्हॅल्यू लिहित आहोत.
5:37 आता रिफ्रेश करू. आपण बघू शकतो.
5:41 हे कार्य करत नाही.
5:42 कोड तपासू.
5:44 आपणvisitors चे तसेच - Visit-ors new. चे स्पेलिंग तपासू. Visit-ors.
6:01 येथे चुकून mटाईप झाले आहे. तिथे 'n' टाईप करा.
6:06 म्हणजेचcount.txt.
6:07 आता प्रत्येक रिफ्रेशनंतर हे 1 ने वाढत आहे.
6:12 ही व्हॅल्यू वाढताना आपण बघू शकतो.
6:16 आता रिसेट करण्यासाठी हे करावे लागेल.
6:19 येथे 'count.txt' has been changed ही वॉर्निंग मिळाली, कारण ती एडिट केली होती.
6:24 'reload from disk' करा.
6:27 'count.txt' मधे 19 तर पेजवर 18 आहे.
6:30 कारण नवी व्हॅल्यू देण्यापूर्वी आपणechoकरत आहोत.
6:35 अधिक कार्यक्षमतेसाठी आणि खरी योग्य व्हॅल्यू दिसण्यासाठी हा कोड येथे लिहू.
6:41 आता रिफ्रेश करू. ह्या पेजवर 25 visitors दिसत आहेत आणि 'count.txt' वर26दिसत आहे.
6:51 हे थोडे अव्यवस्थित झाले आहे.
6:55 हे करण्याची कोणतीही ठराविक पध्दत नाही.
6:57 हे नेहमी 'visitors' एको करेल.
6:59 येथे 'visitors_new' एको करू.
7:07 ही योग्य तीच व्हॅल्यू दाखवेल.
7:11 visitors new- पुन्हा स्पेलिंग चुकले आहे.
7:16 आता बरोबर झाले. व्हॅल्यू वाढवून 35 करू आणि 'count.txt' मधेही व्हॅल्यू 35 आहे.
7:24 यासारखा सोपा कोड लिहिताना पोझिशनला फार महत्त्व नसले तरी त्याने फरक पडतो.
7:30 अशाप्रकारे हे बेसिक tutorial आहे.
7:32 काही मदत हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा.
7:35 हे करून बघा.
7:37 तसेच IP addresses वर आधारित असलेले advanced counter वरील इतर ट्युटोरियलही पहा.
7:43 हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे.धन्यवाद.

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana