Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C2/Create-queries-using-Query-Wizard/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Create Queries using Query Wizard''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> !…') |
Pravin1389 (Talk | contribs) |
(No difference)
|
Revision as of 18:59, 2 December 2012
Title of script: Create Queries using Query Wizard
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:02 | बेसच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत. Query wizard च्या सहाय्याने simple query बनवणे, फिल्डस सिलेक्ट करणे, फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि query द्वारे माहिती शोधण्यासाठी निकष प्रदान करणे. |
00:24 | प्रथम query म्हणजे काय हे जाणून घेऊ. |
00:29 | database मधून विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी queryचा वापर करता येतो. |
00:36 | दुस-या शब्दात सांगायचे तर आपणdatabase ला प्रश्न विचारून आपल्या निकषांशी जुळणारी माहिती काढून घेता येते. |
00:48 | आपण आपल्या लायब्ररी databaseच्या उदाहरणाचा विचार करू. |
00:56 | आपल्या लायब्ररी databaseमध्ये आपण पुस्तके आणि सभासदांची माहिती संचित केली आहे. |
01:04 | आता आपण लायब्ररीच्या सर्व सभासदांच्या सूचीसाठी लायब्ररी databaseला query करू शकतो. |
01:12 | किंवा आपण लायब्ररीमध्ये सध्या नसलेल्या, म्हणजेच सभासदांना दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांच्या सूचीसाठी databaseला query करू शकतो. |
01:21 | बेसच्या सहाय्याने simple query कशी बनवायची ते पाहू. |
01:30 | आपल्या उदाहरणात सर्व सभासदांच्या नावांची सूची, त्यांच्या फोन नंबरसहित दाखवणार आहोत. |
01:44 | आपण Library database मध्ये आहोत. आत्तापर्यंत तुम्हाला तो कसा उघडायचा हे माहित झाले असेलच. |
01:51 | डाव्या पॅनेलवरील Queries च्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:57 | उजव्या पॅनेलमध्ये आपल्याला तीन पर्याय दिसतील. |
02:03 | आपण प्रथम simple query बनवत असल्यामुळे आपण सोप्या आणि जलद पध्दतीची निवड करू या. |
02:11 | आणि ती म्हणजे Query Wizardचा वापर. |
02:17 | complex queries बनवण्यासाठी बेसने काही सोपे पर्याय प्रदान केले आहेत. जसे की Create Query in Design View |
02:28 | आणि Create Query in SQL view. याबद्दल आपण नंतर शिकणार आहोत. |
02:36 | आता Use Wizard to Create Query वर क्लिक करा. |
02:43 | आता वरती Query Wizard असे लिहिलेली popup विंडो उघडेल. |
02:50 | डावीकडे आपल्याला 8 steps दिसतील ज्यातून आपण जाणार आहोत. |
02:57 | आपण Step 1. Field Selectionवर आहोत. |
03:03 | उजवीकडे आपल्याला टेबल्स या लेबलखाली drop down दिसेल. |
03:11 | query द्वारे मिळणा-या माहितीचा source आपण येथे निवडणार आहोत. |
03:21 | आपल्या queryच्या उदाहरणात लायब्ररीमधील सर्व सभासदांची माहिती मिळवायची असल्यामुळे आपण drop down मधीलTables: Members वर क्लिक करू या. |
03:35 | आता डावीकडील Available fields च्या यादीतील नेम फिल्डवर क्लिक करून ते उजवीकडील सूचीत स्थलांतरित करा. |
03:50 | पुढे डावीकडील फोन हे फिल्ड उजवीकडे स्थलांतरित करा. |
04:00 | लक्षात ठेवा की सर्व फिल्डस उजवीकडे स्थलांतरित करण्यासाठी, उजवीकडे दाखवल्या जाणा-या double arrow बटणाचा वापर करू शकतो. |
04:09 | आता खाली Next बटणावर क्लिक करा. |
04:15 | आता आपण Step 2 . Sorting Order वर आहोत. |
04:20 | आपल्याquery च्या रिझल्टमध्ये सभासदांची यादी आणि फोन नंबर असल्यामुळे आपण ते तसेच ठेवू शकतो. |
04:30 | किंवा आपण सभासदांच्या नावांच्या यादीप्रमाणे सॉर्ट करू शकतो. |
04:36 | Base Wizard आपल्याला एकावेळी रिझल्टची सूची चार फिल्डस पर्यंत सॉर्ट करण्याची परवानगी देते. |
04:45 | आता सगळ्यात वरच्या drop down वर क्लिक करा. |
04:51 | आणि Members.Name वर क्लिक करा. |
04:55 | आपल्याला हवे असल्यास नावे सॉर्ट करण्यासाठी आपण चढता किंवा उतरता क्रम निवडू शकतो. |
05:03 | Ascending या पर्यायावर क्लिक करा. |
05:07 | आणि पुढील Stepवर जा. |
05:11 | Step 3. Search Conditions. |
05:16 | काही निकषांवर आपला रिझल्ट मर्यादित ठेवण्यासाठी ह्या step ची मदत होईल. |
05:22 | उदाहरणार्थ आपण आपल्या रिझल्टमध्ये केवळ R या अक्षराने सुरूवात होणा-या मेंबर्सची नावे दाखवू शकतो. |
05:34 | त्यासाठी Fields drop down बॉक्सवर क्लिक करा. नंतर Members.Name वर क्लिक करा. |
05:45 | आता Condition drop down वर क्लिक करा. |
05:51 | येथे विविध conditions दिसतील. |
05:58 | Like वर क्लिक करा. |
06:02 | Valueच्या text box मध्ये capital Rआणि percentage चे चिन्ह टाईप करा. |
06:13 | अशा प्रकारे query मध्ये simple आणि complex conditions समाविष्ट करू शकतो. |
06:22 | सर्व सभासदांची यादी मिळवण्यासाठी Valueच्या text boxमधून R% डिलिट करा आणि Next वर क्लिक करा. |
06:37 | आपण मधल्या Steps सोडून Step 7 वर आलो आहोत. |
06:43 | कारण आपण एका टेबलपासून simple query बनवत आहोत. |
06:51 | आणि आपली query तपशीलवार माहिती देणारी आहे. सारांश देणारी नाही. |
06:57 | सारांशाने माहिती देणा-या query मध्ये aggregate functionsवापरून आणि गट बनवून माहिती दिली जाते. |
07:05 | उदाहरणार्थ सर्व सभासदांची संख्या किंवा सर्व पुस्तकांच्या किंमतींची बेरीज. |
07:13 | या पर्यायाबद्दल आपण नंतर जाणून घेऊ. |
07:17 | आता येथे आपण aliases बनवू या. |
07:23 | म्हणजेच रिझल्टच्या सूचीत ओळखीची आणि अर्थपूर्ण labels किंवा headers बनवू या. |
07:32 | आपण Name फिल्डला Member Name आणि Phone fieldला Phone Number असे alias देऊ शकतो. |
07:46 | या टेक्स्ट बॉक्समध्ये हे दोन नवे aliases टाईप करा. आणि Next चे बटण दाबा. |
07:57 | आता आपण शेवटच्या म्हणजे Step 8 वर आहोत. |
08:03 | येथे आपण आपल्या simple query ला अर्थपूर्ण नाव देऊ. |
08:09 | Name of the Query या लेबलसमोर List of all members and their phone numbers असे टाईप करा. |
08:20 | wizard मध्ये आपण निवडलेले घटक overview मध्ये आपल्याला दिसतील. |
08:27 | आणि आता येथून पुढे जाण्यासाठी आपण काय करू शकतो? |
08:31 | वरती उजवीकडे असलेल्या Display Query वर क्लिक करा आणि Finish बटणावर क्लिक करा. |
08:41 | wizard window बंद होऊन ती List of all members and their phone numbers नामक नवी विंडो उघडेल. |
08:52 | आपण सुरूवातीला Members table मध्ये एंटर केलेल्या चारही मेंबर्सची नावे त्यांच्या फोन नंबर सहित आपल्याला दिसतील. |
09:04 | तसेच ही सूचीची मांडणी अक्षरांनुसार चढत्या क्रमाने केलेली दिसेल. |
09:13 | अशा प्रकारे ही आपली simple query आहे. |
09:18 | आता assignment करू. |
09:21 | सर्व पुस्तकांची सूची चढत्या क्रमाने दर्शविणारी query बनवा. |
09:28 | सर्व fields चा समावेश करा. |
09:31 | query ला List of all books in the Library असे नाव द्या. |
09:38 | अशा प्रकारे आपण Creating Queries using Wizard वरील स्पोकन ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:45 | आपण जे शिकलो ते थोडक्यात. Query wizard च्या सहाय्याने simple query बनवणे, फिल्डस सिलेक्ट करणे, फिल्डसाठी सॉर्टिंग ऑर्डर ठरवणे आणि query साठी निकष प्रदान करणे. |
10:00 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
10:12 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
10:17 | यासंबंधी अधिक माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
10:22 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |