Difference between revisions of "QGIS/C3/Table-Joins-and-Spatial-Joins/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 231: | Line 231: | ||
|- | |- | ||
||07:02 | ||07:02 | ||
− | ||" | + | ||"Apply बटणावर क्लिक करा, नंतर OK बटणावर क्लिक करा." |
− | Apply बटणावर क्लिक करा, नंतर OK बटणावर क्लिक करा." | + | |
|- | |- | ||
||07:06 | ||07:06 |
Latest revision as of 12:27, 11 February 2022
Time | Narration |
00:01 | QGIS मधील Table Joins आणि Spatial Joins वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:08 | या ट्युटोरियलमध्ये, आपण कॉमन फील्ड आणि समान spatial data असलेल्या दोन data-sets ना attribute tables मध्ये जॉईन करायला शिकू , |
00:19 | येथे मी वापरत आहे.Ubuntu Linux OS आवृत्ती. १६.०४ |
00:26 | QGIS आवृत्ती 2.18 |
00:30 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी शिकणाऱ्याला QGIS इंटरफेसशी परिचित असले पाहिजे. |
00:36 | पूर्वआवश्यक QGIS ट्यूटोरियलसाठी, कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
00:42 | प्लेअरच्या खाली असलेल्या Code files लिंकमध्ये दिलेले फोल्डर डाउनलोड करा. |
00:48 | डाउनलोड केलेल्या झिप फाईलमधील कंटेंट एक्सट्रॅक्ट आणि फोल्डरमध्ये जतन करा. |
00:54 | मी आधीच Code files डाउनलोड , एक्सट्रॅक्ट आणि डेस्कटॉपवरील फोल्डरमध्ये सेव्ह केल्या आहेत. |
01:01 | फोल्डर उघडण्यासाठी त्यावर डबल-क्लिक करा. |
01:04 | एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरमध्ये Stations.shp फाइल शोधा. |
01:09 | Stations.shp फाइल भारतातील हवामान केंद्रे किंवा एअर स्टेशनची ठिकाणे दाखवते. |
01:17 | या ट्यूटोरियलचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर फाईल्स देखील येथे आहेत. |
01:23 | attribute tables जॉईन करणे म्हणजे ,दोन data-sets मधील attribute data एकत्र करणे. |
01:30 | टेबल जॉईन करण्याचे दोन मार्ग आहेत,टेबल जॉईन म्हणजे, एक किंवा अधिक कॉमन कॉलम डेटा असलेले टेबल्स जॉईन करणे. |
01:40 | Spatial Join म्हणजे समान spatial data असलेल्या tables जॉईन करणे. |
01:46 | या ट्युटोरियलमध्ये आपण दोन्ही पद्धती दाखवणार आहोत. |
01:50 | अधिक माहितीसाठी कृपया या वेबसाइटला भेट द्या. |
01:54 | QGIS इंटरफेस उघडा. |
01:57 | प्रथम, आपण कॉमन फील्ड असलेल्या attribute tables जॉईन करू. |
02:02 | डावीकडील टूलबारमधून Add Vector Layer टूलवर क्लिक करा. |
02:07 | Add Vector Layer डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:10 | डेटासेट फील्डच्या पुढील ब्राउझ बटणावर क्लिक करा. एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
02:17 | डेस्कटॉपवरील Code files फोल्डरमधून Stations.shp फाइलवर नेव्हिगेट करा. |
02:22 | Open बटणावर क्लिक करा. |
02:25 | Add vector layer डायलॉग बॉक्समध्ये, Open बटणावर क्लिक करा. |
02:30 | Stations.shp लेयर्स पॅनेलमध्ये जोडला जाईल. |
02:35 | कॅनव्हासवर संबंधित नकाशा दिसतो. |
02:39 | हा नकाशा भारतातील विविध राज्यांमध्ये असलेल्या हवामान केंद्रांशी संबंधित पॉइंट फीचरस दर्शवितो. |
02:47 | या लेयरसाठी attribute table उघडू या. |
02:51 | Layers Panel मध्ये, Stations.shp वर राइट -क्लिक करा. |
02:56 | कॉन्टैक्स्ट मेनूमधून Open Attribute Table पर्याय निवडा. |
03:01 | attribute table उघडतो. |
03:03 | लक्षात घ्या की फक्त एका attribute District चा data उपलब्ध आहे. |
03:10 | attribute table मिनिमाइज करा. |
03:13 | आता आपण Layers Panel मध्ये स्प्रेडशीट असलेला दुसरा data-set जोडू. हा डेटा सेट CSV format मध्ये आहे. |
03:23 | मेन्यू बारवरील Layer मेनूवर क्लिक करा. Add layer वर क्लिक करा. |
03:30 | सब-मेनूमधून Add Delimited Text Layer पर्यायावर क्लिक करा. |
03:35 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
03:38 | File Name फील्डच्या शेजारी असलेल्या Browse बटणावर क्लिक करा. |
03:43 | एक डायलॉग बॉक्स उघडतो. |
03:46 | डेस्कटॉपवरील Code files फोल्डरमधून Rainfall.csv फाइलवर नेव्हिगेट करा. Open बटणावर क्लिक करा. |
03:54 | Delimited Text File डायलॉग बॉक्समध्ये, File Format म्हणून CSV निवडा. |
04:01 | No geometry म्हणून Geometry definition निवडा. इतर सर्व फील्ड असेच सोडा. |
04:09 | OK बटणावर क्लिक करा. |
04:12 | QGIS कॅनव्हासवर, Layers Panel मध्ये Rainfall layer जोडला जाईल. |
04:18 | Rainfall layer वर राइट -क्लिक करा. |
04:21 | कॉन्टैक्स्ट मेनूमधून Open Attribute Table वर क्लिक करा. |
04:26 | attribute table उघडतो. attribute table मध्ये विविध जिल्ह्यांसाठी January ते December या कालावधीतील पावसाचा डेटा आहे. |
04:37 | Stations attribute table मैक्सिमाइज करा आणि दोन्ही tables ची तुलना करा. |
04:43 | कृपया लक्षात ठेवा, District फील्ड Rainfall आणि Stations layers दोन्ही मध्ये कॉमन आहे. |
04:50 | आता आपण Rainfall layer पासून Stations layer मध्ये attribute data जोडू. |
04:56 | Stations attribute table मध्ये District नावाचा एकच कॉलम आहे. |
05:02 | आपण Stations attribute table मध्ये Rainfall data जोडू. |
05:07 | attribute tables बंद करा. |
05:10 | Layers Panel मध्ये Stations layer निवडा. |
05:14 | या layer ला Rainfall layer मधून नवीन data प्राप्त होईल. |
05:19 | Stations layer वर राइट -क्लिक करा. |
05:22 | कॉन्टैक्स्ट मेनूमधील Properties पर्यायावर क्लिक करा. |
05:26 | Layer Properties डायलॉग बॉक्स उघडतो. डाव्या पॅनलमधून Joins वर क्लिक करा. |
05:33 | नवीन विंडोमध्ये, खाली-डाव्या कोपर्यात असलेल्या plus चिन्हावर क्लिक करा. |
05:39 | Add vector join डायलॉग बॉक्स उघडेल. |
05:43 | येथे आपल्याकडे Join layer, Join field आणि Target field निवडण्यासाठी पर्याय आहेत. |
05:51 | Join layer हा Rainfall layer असेल, ज्यामधून Stations attribute table मध्ये data जोडला जाईल. |
05:59 | येथे Rainfall layer आधीच निवडलेला आहे. |
06:03 | Join field हे Rainfall table मध्ये जोडणारे फील्ड किंवा attribute आहे. |
06:10 | Join field मध्ये, ड्रॉप-डाउनमधून District निवडा. |
06:15 | Target field हे Stations table मध्ये जोडले जाणारे फील्ड आहे. |
06:20 | Target field मध्ये, District आधीच निवडलेला आहे. |
06:25 | हे फील्ड दोन्ही tables साठी कॉमन आहे. |
06:29 | Choose which fields are joined यासाठी चेक-बॉक्स चेक करा. |
06:34 | खालील टेक्स्ट-बॉक्स आता सर्व कॉलम आणि चेक-बॉक्सने भरलेला आहे. |
06:41 | टेक्स्ट बॉक्स मध्ये January ते Annual Average या कॉलम्ससाठी बॉक्स चेक करा. |
06:48 | Add vector join डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी ओके बटणावर क्लिक करा. |
06:53 | Layer Properties डायलॉग बॉक्समध्ये, लेयर आणि जोडलेल्या कॉलम्सची माहिती शीर्षस्थानी दर्शविली आहे. |
07:02 | "Apply बटणावर क्लिक करा, नंतर OK बटणावर क्लिक करा." |
07:06 | QGIS इंटरफेसवर,आधी दर्शविल्याप्रमाणे Stations layer साठी attribute table उघडा . |
07:14 | हे table सर्व स्थानकांसाठी Rainfall data दाखवते हे पहा. |
07:20 | attribute table बंद करा. |
07:23 | पुढे आपण, स्थानानुसार दोन data-sets चे attribute table join कसे करायचे ते शिकू. |
07:30 | Layers Panel मध्ये दुसरा layer जोडूया. |
07:34 | यासाठी Add Vector Layer टूलवर क्लिक करा. |
07:38 | Add Vector Layer डायलॉग बॉक्समध्ये, ब्राउझ बटणावर क्लिक करा. |
07:43 | डेस्कटॉपवरील Code files फोल्डरमधून Admin.shp वर नेव्हिगेट करा. |
07:49 | Open बटणावर क्लिक करा. |
07:51 | Add Vector Layer डायलॉग बॉक्समधील Open बटणावर पुन्हा क्लिक करा. |
07:56 | Admin layer आता Layers Panel मध्ये जोडला आहे. |
08:00 | Admin layer नकाशा उघडतो जो भारताच्या प्रशासकीय राज्याच्या सीमा दर्शवतो. |
08:07 | Layers panel मधील Admin layer वर क्लिक करा. |
08:11 | ड्रॅग करा आणि Stations layer च्या खाली आणा. |
08:15 | आता आपण वेगवेगळ्या राज्यांमधील पॉइंट फीचरस पाहू शकतो. |
08:20 | Admin layer साठी attribute table उघडा. |
08:24 | attribute table राज्यांशी संबंधित माहिती दाखवते. |
08:29 | Admin attribute table मिनिमाइज करा. पुन्हा Stations attribute table उघडा. |
08:36 | आता आपण Stations layer आणि Admin layer साठी स्थानानुसार attributes मध्ये जॉईन करू. |
08:43 | दोन्ही attribute tables बंद करा. |
08:47 | Vector मेनूवर क्लिक करा. |
08:48 | मेनू खाली स्क्रोल करा आणि Data Management Tools वर क्लिक करा. |
08:53 | सब-मेनूमधून Join attributes by location निवडा. |
08:58 | Join attributes by location डायलॉग बॉक्स उघडतो. |
09:02 | Target vector layer साठी ड्रॉप-डाउन वर क्लिक करा. |
09:05 | येथे आपल्याला attribute table मध्ये जॉईन होण्यासाठी Target vector layer निर्दिष्ट करणे आवश्यक आहे. |
09:12 | आपल्या बाबतीत, आपल्याला Stations layer वर नवीन data जोडण्याची आवश्यकता आहे. |
09:17 | म्हणून Stations layer हा Target Layer आहे. |
09:21 | त्यामुळे आपण target layer म्हणून ड्रॉप-डाउनमधून Stations [EPSG: 4326] निवडू. |
09:29 | Join vector layer ड्रॉप-डाउनवर क्लिक करा. |
09:33 | येथे आपल्याला तो layer निवडावा लागेल जो आपल्याला target layer मध्ये जॉईन व्हायचा आहे. |
09:40 | ड्रॉप-डाउनमधून Admin [EPSG: 4326] निवडा. |
09:45 | येथे आपल्याकडे attributes मध्ये joining होण्यासाठी अनेक पर्याय आहेत. |
09:50 | आपल्याला विविध राज्यांमध्ये असलेली हवामान केंद्रे शोधण्यात रस आहे. |
09:56 | त्यामुळे Geometric predicate अंतर्गत, आपण within चेक-बॉक्स निवडू. खाली स्क्रोल कर. |
10:04 | Open output file after running algorithm चेक-बॉक्स तपासा. |
10:10 | उर्वरित सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा. Run बटणावर क्लिक करा. |
10:17 | तळाशी स्टेटस बार प्रोसेसिंग अल्गोरिदमची प्रगती दर्शवते. प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा करा. |
10:25 | कॅनव्हासवर, Layers Panel मध्ये एक नवीन layer, Joined layer जोडला जातो. |
10:32 | Joined layer वर राइट -क्लिक करा आणि attribute table उघडा. |
10:37 | या table मध्ये Stations layer वरील प्रत्येक पॉइंटसाठी Admin layer वरील सर्व attributes समाविष्ट आहेत. |
10:45 | प्रत्येक पॉइंट फीचरमध्ये राज्याची माहिती असते. |
10:49 | attribute table बंद करा. |
10:52 | प्रोजेक्ट सेव्ह करण्यासाठी, मेन्यू बारमधून Project मेनूवर क्लिक करा. Save As पर्याय निवडा. |
11:01 | योग्य नाव द्या आणि सोयीचे ठिकाण निवडा. |
11:06 | Save बटणावर क्लिक करा. |
11:10 | चला थोडक्यात बघू. |
11:12 | या ट्युटोरियलमध्ये, आपण कॉमन फील्ड आणि समान spatial data असलेल्या दोन data-sets ना attribute tables मध्ये जॉईन करायला शिकलो, |
11:22 | असाइनमेंट म्हणून, stations data जून ते डिसेंबरपर्यंतच्या rainfall data शी जॉईन करा. |
11:30 | Code files फोल्डरमध्ये दिलेल्या Rainfall.csv आणि Stations.shp फाइल वापरा. |
11:37 | पूर्ण केलेले असाइनमेंट असे दिसले पाहिजे. |
11:41 | हा व्हिडिओ स्पोकन ट्युटोरियल प्रकल्पाचा सारांश देतो. कृपया डाउनलोड करून पहा. |
11:48 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्रे देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:58 | कृपया या फोरमवर तुमच्या वेळेनुसार प्रश्न पोस्ट करा. |
12:02 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला NMEICT, MHRD सरकार ऑफ इंडिया द्वारे निधी दिला जातो. |
12:10 | या ट्यूटोरियलचे अनुवाद राधिका हुद्दार यांनी केले असून आवाज मैत्रेय बापट यांनी दिला आहे.सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.
|