Difference between revisions of "PhET/C3/Natural-Selection/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
m
Line 65: Line 65:
 
|-
 
|-
 
||01:25
 
||01:25
|| डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
+
|| सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
  
 
|-
 
|-

Revision as of 21:19, 11 December 2019

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Natural Selection या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात, Natural Selection, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:17 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04


00:26 जावा वर्जन 1.8.0,


00:30 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.
00:35 हा पाठ समजण्यासाठी, जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राचे ज्ञान असावे.
00:41 हे सिम्युलेशन वापरून, पुढील गोष्टींचा सशांच्या लोकसंख्येवरील परिणाम बघणार आहोत जसे की,

म्युटेशन्स (उत्परिवर्तन) आणि सिलेक्शन(निवड) घटक,

00:52 पर्यावरण,

पेडिग्री(वंशावळ).

00:55 आता सुरूवात करू या.
00:58 Mutations-

म्युटेशन्स हे जेनेटिक घटकांमधील nucleotide sequence चे बदल होत.

ते संततीमधे संक्रमित केले जातात.

01:11 म्युटेशन्स हे सजीवाच्या दृश्य गुणधर्मात किंवा phenotype मधे बदल घडवतात किंवा घडवत नाहीत.
01:18 म्युटेशन्सची आनुवांशिकता डॉमिनंट (प्रभावी) किंवा रिसेसिव्ह (अप्रभावी) असू शकते.
01:25 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
01:30 मी डाउनलोड्स फोल्डरमधे Natural Selection सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
01:37 jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा. टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
01:48 java space hyphen jar space natural-selection_en.jar टाईप करून एंटर दाबा.
02:03 बाउजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल.
02:08 Natural Selection सिम्युलेशनचा हा इंटरफेस आहे.
02:13 सिम्युलेशन पॅनेलमधे ससा उड्या मारत असल्याचे दिसेल.

इंटरफेस खालील भागात असलेल्या Pause बटणावर क्लिक करा.

02:22 आता इंटरफेस समजून घेऊया.
02:25 इंटरफेसमधे सिम्युलेशन पॅनेल आहे.
02:29 डावीकडे, Add Mutation आणि

Edit Genes,

02:35 मध्यभागात आलेख,

Time until next generation हा प्रोग्रेस बार,

02:42 Play/Pause बटण, Step बटण,
02:46 उजवीकडे, Selection Factor,

Environment, आणि

Chart आहेत.

02:54 Reset All button बटणावर क्लिक केल्यावर हे तुम्हाला परत मूळ बिंदूवर घेऊन जाईल.
02:59 येथे डिफॉल्ट सेटिंग्ज ठेऊया: Selection Factor साठी None,

Environment साठी Equator,

Chart साठी Population .

03:11 Population विरूध्द Time या आलेखाचे निरीक्षण करा.
03:15 हा y अक्षावर सशांची संख्या आणि x अक्षावर time दाखवतो.
03:22 इंटरफेसच्या तळाशी असलेल्या Play बटणावर क्लिक करा.
03:26 आलेखात काळ्या रंगाची रेष उजवीकडे कशाप्रकारे सरकत आहे याचे निरीक्षण करा.
03:31 सिम्युलेशन अधिक वेगाने चालवण्यासाठी Step बटणावर क्लिक करत रहा.
03:37 एकही ससा शिल्लक न राहिल्यास 'Game Over असा पॉप अप बॉक्स दिसेल.

ज्यामधे “All of the bunnies died!” असा मेसेज दिसेल.

03:48 सिम्युलेशन पुन्हा सुरू करण्यासाठी Play Again बटणावर क्लिक करा.
03:53 सिम्युलेशनमधे आणखी एक ससा समाविष्ट करण्यासाठी Add a Friend बटणावर क्लिक करा.
03:58 इंटरफेसच्या खालील भागातील Pause बटणावर क्लिक करा.
04:03 Generations of Progeny (संततींच्या पिढ्या)..
04:06 प्रत्येक ओळीत उजवीकडील लेबल्स आणि डावीकडील रोमन अंकांचे निरीक्षण करा.

P ही पिढी पहिल्या ओळीत दाखवली आहे.

04:17 F1 ही पिढी दुसऱ्या ओळीत आहे जी P या पिढीच्या संततीपासून बनली आहे.

आणि अशाप्रकारे हे पाचव्या ओळीपर्यंत आहे.

04:30 F3 पर्यंत संख्येतील वाढ होऊ देणार आहोत. जोडीच्या मेटिंगनंतर या तीन पायऱ्या आहेत.
04:41 इंटरफेसच्या खालील भागातील Play बटणावर क्लिक करा.
04:45 जेव्हा नवी पिढी सुरू होते तेव्हा प्रोग्रेस बार पूर्ण भरलेला दिसेल.
04:52 नव्या पिढीची वाढ होण्यास सुरूवात होताच प्रोग्रेसबार डावीकडे सरकू लागेल.
04:58 Pause बटणावर क्लिक करा.
05:01 झूम आऊट करण्यासाठी आलेखाच्या डाव्या कोपऱ्यात वरती असलेल्या दुसऱ्या बटणावर क्लिक करा.
05:08 पुढच्या पायरीची उंची आपण पाहू शकतो.
05:12 काळ्या रंगाची रेष आलेखात सशांची एकूण संख्या दर्शवते.
05:17 Selection Factor खालील 'Food रेडिओ बटणावर क्लिक करा.
05:22 Add Mutation खालील Long Teeth बटणावर क्लिक करा.
05:27 सिम्युलेशन पॅनेलच्या खालील भागात Mutation coming असा टेक्स्ट बॉक्स उघडेल.
05:33 चमकणाऱ्या विजेचे चित्र असलेला पिवळ्या रंगाचा त्रिकोण दिसेल.
05:37 हे म्युटेशन दर्शवते. टेक्स्ट बॉक्समधे आपल्याला लांब दात असलेले चित्र दिसेल.
05:45 Edit Genes खालील Teeth या लेबलच्या पुढील ओळी सक्रिय झालेल्या आहेत.
05:52 तेथे आता रेडिओ बटणांवर क्लिक करता येईल.
05:56 प्रत्येक ओळीसाठी Dominant आणि Recessive या स्तंभांखाली दोन पर्याय दिसतील.
06:03 प्रत्येक ओळीच्या डावीकडे लांब आणि आखूड दातांची चित्रे आहेत.
06:09 डिफॉल्ट रूपात dominant म्युटेशनसाठी लांब दात आणि recessive साठी आखूड दात निवडलेला आहे.
06:17 म्युटेशन समाविष्ट केल्यावर प्रोग्रेसबार आणि आलेखाचे निरीक्षण करा.
06:22 म्युटेशननंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या.

Step बटणावर क्लिक करत रहा.

06:33 आलेखातील दोन अरूंद स्टेप्समधील अंतर हे एका पिढीशी संबंधित आहे.
06:41 जोपर्यंत स्टेप्स दिसत नाहीत तोपर्यंत आलेखामधील दुसऱ्या Zoom Out बटणावर क्लिक करा.
06:47 म्युटेशन आणि फुड निवडल्यावर आलेखामधे वेगवेगळ्या रंगाच्या रेषा कशा दिसतात ते बघा.
06:56 म्युटेशन्स आणि सिलेक्शन घटक यांच्या घडण्याच्या वेळा लोकसंख्या वाढीवर परिणाम करतील.
07:03 आलेखाखालील संकेत सूची विविध रंग आणि त्यांचे अर्थ दर्शवते.
07:09 आपण लांब दातांसाठी डॉमिनंट म्युटेशन समाविष्ट केलेले आहे.
07:14 लांब दातांसाठी मॅजेंटा रंगाची आणि आखूड दातांसाठी ऑलिव्ह रंगाची रेष दिसेल.
07:23 सुरूवातीला ऑलिव्ह रंगाची रेष मॅजेंटा रंगाच्या रेषेच्या वर आहे.

आखूड दातांच्या सशांची संख्या लांब दातांच्या सशांच्या संख्येपेक्षा अधिक आहे.

07:36 नंतर मॅजेंटा रंगाची रेषा ऑलिव्ह रंगाच्या रेषेच्या वर आहे.
07:41 आखूड दात असलेल्या सशांच्या तुलनेत लांब दातांच्या सशांची संख्या वाढली आहे.
07:49 याचा अर्थ उपलब्ध अन्न खाऊन जगण्यासाठी सशांना लांब दात मदत करतात.
07:57 Fur Mutation: सशांच्या जगण्यावर फर म्युटेशनचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी कंडिशन्स सेट करा.
08:06 dominant म्युटेशन म्हणून तपकिरी फर आणि recessive म्युटेशनसाठी पांढरी फर ठेवा.
08:13 selection factor मधे wolves (लांडगे) पर्याय निवडा.
08:17 म्युटेशन नंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या.
08:25 लांडगे कशाप्रकारे आत बाहेर करत आहेत, सशांना मारत आहेत याचे निरीक्षण करा.
08:31 म्युटेशन समाविष्ट केल्यावर तपकिरी रंगाचे ससे दिसायला लागले.
08:37 लक्षात घ्या, तपकिरी फर व्यतिरिक्त डॉमिनंट लांब दाताच्या म्युटेशनचा परिणाम अजूनही दिसत आहे.
08:46 आलेख आणि सिम्युलेशन पॅनेलमधे पांढऱ्या आणि तपकिरी फर असलेल्या सशांच्या संख्येची तुलना करा.
08:55 सुरूवातील तपकिरी सशांपेक्षा पांढरे ससे अधिक आहेत.
09:02 नंतर पांढऱ्यांच्या तुलनेत तपकिरी रंगांच्या सशांची संख्या वाढली आहे.
09:10 लांडगे सशांना मारत असल्यामुळे विषुववृत्तावर तपकिरी फर ही जगण्यासाठी फायदेशीर ठरते.
09:18 पर्यावरणाशी रंग जुळवून घेण्याच्या धोरणाला camouflage असे नाव आहे.
09:24 लांब आणि आखूड दातांच्या सशांच्या संख्येविषयी तुम्ही काय सांगाल?
09:31 कधीकधी म्युटेशन हे सर्व सशांचे phenotype बदलतात.
09:37 असे झाल्यास आलेख म्युटेशन झालेले आणि म्युटेशन न झालेले (जंगली) फेनोटाईप्समधे फरक दाखवणार नाही.
09:45 येथे लहान दाताच्या सशांपेक्षा लांब दातांचे ससे अधिक आहेत.
09:53 Tail Mutation-

सशांच्या जगण्यावर टेल म्युटेशनचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी कंडिशन्स सेट करा.

10:02 dominant म्युटेशन म्हणून लांब शेपटी आणि recessive म्युटेशन म्हणून आखूड शेपटी निवडा.
10:09 selection factor मधे wolves पर्याय निवडा.
10:13 म्युटेशननंतर आणखी तीन पिढ्यांसाठी लोकसंख्या वाढू द्या.
10:20 सिम्युलेशन अधिक वेगाने चालवण्यासाठी Step बटणावर क्लिक करत रहा.
10:28 दुसऱ्या झुम आऊट बटणावर क्लिक करा.
10:31 तपकिरी रंगाची फर, लांब दात आणि लहान शेपटी असलेल्या सशांच्या संख्यांची नोंद करा.
10:38 ही संख्या पांढऱ्या रंगाची फर, आखूड दात आणि लांब शेपूट असलेल्या सशांपेक्षा अधिक आहे.
10:49 तपकिरी फर आणि आखूड शेपूट लांडग्यांपासून वाचण्यास मदत करतात.
10:55 लांब दात वनस्पती खाण्याची क्रिया सोपी करून जगण्यास मदत करतात.
11:01 Chart खालील Pedigree वर क्लिक करा.
11:04 वरच्या भागात “Click a Bunny” हे टेक्स्ट दिसेल.
11:08 सिम्युलेशन पॅनेलच्या डाव्या कोपऱ्यात खाली असलेल्या सशावर क्लिक करा.
11:16 निवडलेला ससा निळ्या आयतांच्या आत कशाप्रकारे चौकटीबध्द केला आहे ते बघा.
11:22 निळ्या आयतात चौकटीबध्द केलेल्या सशासाठी pedigree chart दिसेल.
11:28 Pedigree विंडोमधे उजव्या कोपऱ्यात वरती असलेल्या बटणावर क्लिक करा.
11:33 Pedigree विंडो वेगळी होईल आणि त्याच्या मागे Population चार्ट उघडेल.
11:41 आता Pedigree विंडोचा आकार बदलू शकतो.
11:46 निवडलेल्या सशाच्या आधीच्या चार पिढ्यांच्या सशांचा रंग लक्षात घ्या.
11:54 सशांवरील लाल रंगाच्या फुल्या ते ससे मृत झाल्याचे दाखवतात.
11:59 चमकणाऱ्या विजेचे चिन्ह असलेला पिवळा त्रिकोण म्युटेशन दाखवतो.
12:06 हे त्या सशाचे म्युटेशन झाल्याचे दर्शवत असल्यामुळे त्याचा genotype आणि phenotype बदलला आहे.
12:14 Pedigree विश्लेषण, फेनोटाईप्सच्या डेटाच्या आधारे जीनच्या वारश्याचा अभ्यास करण्यास मदत करते.
12:23 Step बटणावर क्लिक करत रहा.

पृथ्वीवरील सर्व खंडांमधील ससे आपल्याला बघता येतील.

12:33 Bunnies have taken over the world!” हा मेसेज दिसेल.
12:38 हे या परिस्थितीत केलेल्या सिम्युलेशनचे दीर्घकालीन परिणाम आहेत.
12:44 या ट्युटोरियलमधे दिलेली अतिरिक्त माहिती बघा.
12:50 थोडक्यात,
12:52 या पाठात Natural Selection PhET सिम्युलेशन कसे वापरायचे याचे प्रात्यक्षिक बघितले.
13:00 हे सिम्युलेशन वापरून, पुढील गोष्टींचा सशांच्या लोकसंख्येवरील परिणाम बघितला:

म्युटेशन्स आणि सिलेक्शन घटक पर्यावरण पेडिग्री (वंशावळ).

13:13 असाईनमेंट म्हणून -

Arctic वातावरणात म्युटेशन्स आणि सिलेक्शन फॅक्टर्सचा परिणाम बघण्यासाठी सशांचे निरीक्षण करा.

13:23 dominant आणि recessive म्युटेशन्सची अदलाबदल केल्यानंतर भिन्न परिस्थितींमधे,

pedigree मधील बदलांचे निरीक्षण करा.

13:34 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

13:43 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

13:55 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
13:59 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


14:08 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


14:21 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali