Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Properties-of-Quadrilaterals/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 22: | Line 22: | ||
|- | |- | ||
| 00:38 | | 00:38 | ||
− | | संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी | + | | नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
|- | |- |
Revision as of 17:07, 17 October 2019
Time | Marathi Narration |
00:01 | जिओजेब्रा मधील Properties of Quadrilaterals वरील ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत, चतुर्भुज तयार करणे आणि जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे. |
00:19 | मी येथे वापरत आहे: उबंटू लिनक्स ओएस, version 14.04 जिओजेब्रा version 5.0.438.0-डी |
00:31 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्यास जिओजेब्रा इंटरफेससची माहिती असावी . |
00:38 | नसल्यास संबंधित जिओजेब्रा ट्यूटोरियलसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. |
00:44 | आपण आपले प्रात्यक्षिक सुरू करूया. |
00:47 | मी जिओजेबरा इंटरफेस आधीच उघडला आहे. |
00:51 | या ट्यूटोरियल साठी मी प्रथम Axes अनचेक करेन. |
00:55 | ते करण्यासाठी ग्राफिक्स व्यू वर राईट क्लिक करा. ग्राफिक्स मेनू उघडेल. |
01:01 | Axes चेक बॉक्सवर क्लिक करा. |
01:04 | अधिक चांगले दिसण्यासाठी मी फाँटचा आकार वाढवेन . |
01:08 | ऑप्शन्स मेनूवर जा, फॉन्ट साईज निवडा. |
01:13 | सब-मेनूमधून, 18 pt रेडिओ बटण निवडा. |
01:17 | आता समांतरभुज चौकोन बनवू. |
01:20 | Segment with Given Length टूलवर क्लिक करा. |
01:24 | ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
01:27 | Segment with Given Length text बॉक्स उघडेल. |
01:31 | Length field मध्ये 5 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. |
01:37 | 5 सेमी लांबीचा रेषाखंड AB काढला आहे ज्याला f नाव दिले आहे |
01:44 | चुकून काढलेला बिंदू हटवू. |
01:48 | रेखांकनासाठी हा बिंदू आवश्यक नाही. |
01:52 | बिंदूवर राइट-क्लिक करा. सब मेनू मधून डिलीट पर्याय निवडा. |
01:59 | Parallel Line टूल वर क्लिक करा. |
02:02 | बिंदू C काढण्यासाठी AB रेषे खाली क्लिक करा आणि नंतर रेषा AB वर क्लिक करा. |
02:09 | C मधून जाणार्या रेषाखंड ABला समांतर रेषा काढली आहे. |
02:14 | सेगमेंट टूल वापरुन, A आणि C बिंदू जोडा. |
02:21 | पॅरलल लाइन टूलवर पुन्हा क्लिक करा, रेषाखंड AC वर क्लिक करा आणि नंतर बिंदू B वर क्लिक करा. |
02:31 | दोन समांतर रेषा g आणि i एका बिंदूत छेदतात. |
02:36 | Intersect टूल वर क्लिक करा आणि छेदनबिंदू म्हणून बिंदू D वर क्लिक करा. |
02:43 | आता सेगमेंट टूल वापरुन बिंदू C, D आणि D, B जोडा. |
02:53 | आता समांतरभुज चौकोन ABDC पूर्ण झाले आहे. |
02:57 | आपण रेषा g आणि i लपवू जेणेकरुन समांतरभुज चौकोन स्पष्ट दिसेल. |
03:04 | रेषा g वर राइट-क्लिक करा, सबमेनू मधून शो ऑब्जेक्ट चेक बॉक्स वर क्लिक करा. त्याचप्रमाणे मी रेषा i देखील लपवेन. |
03:15 | आता आपण समांतरभुज चौकोन ABDC चे गुणधर्म पाहू. |
03:20 | आपण Algebra view मधून रेषाखंड f आणि j समान आहेत आणि रेषाखंड h आणि k समान आहेत ते पाहू शकतो. |
03:31 | लक्षात घ्या की, विरुद्ध बाजू समांतर आणि समान आहेत. |
03:36 | आता समांतरभुज चौकोनाचे कोन मोजू. |
03:40 | एंगल टूल वर क्लिक करा. बिंदू D C A |
03:50 | C A B |
03:55 | A B D |
04:01 | B D C वर क्लिक करा. |
04:07 | लक्षात घ्या की विरुद्ध कोन समान आहेत. |
04:11 | आता समांतरभुज चौकोन ABDC आयत मध्ये रुपांतरित करू. |
04:16 | मूव्ह टूल वर क्लिक करा. आपल्याला 90 अंश कोन दिसेपर्यंत बिंदू C वर क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
04:25 | ते स्पष्टपणे दिसण्यासाठी लेबल ड्रॅग करा. |
04:30 | लक्षात घ्या की सर्व कोन 90 अंशांवर बदलले आहेत. |
04:34 | आता पतंगाकृति तयार करण्यास शिकू. |
04:37 | यासाठी मी एक नवीन जिओजेब्रा विंडो उघडेल. |
04:41 | फाईलवर क्लिक करा आणि New Window निवडा. |
04:46 | पतंगाकृति तयार करण्यासाठी आपण दोन वर्तुळे काढू जी दोन बिंदूंना छेदतील. |
04:52 | Circle with Centre through point tool वर क्लिक करा. |
04:55 | नंतर ग्राफिक्स व्ह्यू वर क्लिक करा. |
04:58 | बिंदू A काढला गेला आहे, हे वर्तुळाचे केंद्र आहे. |
05:03 | बिंदू A पासून काही अंतरावर पुन्हा क्लिक करा. |
05:07 | बिंदू B दिसेल. हे c वर्तुळ पूर्ण करते . |
05:13 | त्याचप्रमाणे आपण C मध्यबिंदू असणारा आणि D मधून जाणारे आणखी एक वर्तुळ काढू. |
05:21 | लक्ष द्या की वर्तुळ c आणि d हे दोन बिंदूंवर छेदतात. |
05:26 | इंटरसेक्ट टूल वर क्लिक करा आणि वर्तुळ c आणि d वर क्लिक करा. |
05:33 | E आणि F हे वर्तुळांचे छेदनबिंदू आहेत. |
05:37 | आता ही वर्तुळे वापरून आवश्यक चतुर्भुज काढू. |
05:42 | पॉलीगॉन टूल वर क्लिक करा. |
05:44 | चतुर्भुज पूर्ण करण्यासाठी बिंदू A, E, C, F आणि पुन्हा A वर क्लिक करा. |
05:57 | Algebra view मध्ये संलग्न बाजूंच्या दोन जोड्या समान असल्याचे पहा. काढलेला चतुर्भुज हा पतंगाकृती आहे. |
06:06 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा. |
06:10 | पतंगाकृतीचे कोन मोजा आणि काय होते ते तपासा. |
06:14 | कर्ण काढा आणि कर्णांचे छेदनबिंदू शोधा. |
06:19 | कर्णांच्या छेदनबिंदूवरील कोन मोजा. |
06:23 | कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत की नाही ते तपासा. |
06:27 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
06:32 | सर्व ऑब्जेक्ट्स हटविण्यासाठी, Ctrl + A दाबा आणि नंतर कीबोर्डवरील delete बटन दाबा. |
06:40 | आता एक रोमबस बनवू. |
06:43 | Segment with Given Length टूलवर क्लिक करा. ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
06:49 | Segment with Given Length text box उघडेल. |
06:53 | Legnth फील्डमध्ये 4 टाइप करा आणि ओके बटणावर क्लिक करा. 4 युनिटसह रेषाखंड केला आहे. |
07:03 | A मध्यबिंदू असणारा आणि B मधून जाणारा वर्तुळ काढू. |
07:08 | Circle with Centre through Point टूल वर क्लिक करा. |
07:11 | वर्तुळ पूर्ण करण्यासाठी बिंदू A आणि B वर क्लिक करा. |
07:17 | पॉईंट टूल वापरुन वर्तुळाच्या परिघावर बिंदू C चिन्हांकित करा. |
07:23 | सेगमेंट टूल वर क्लिक करा आणि नंतर बिंदू A आणि C वर क्लिक करा. |
07:29 | हे बिंदू A आणि C जोडेल. |
07:32 | पॅरलल लाइन टूलवर क्लिक करा आणि रेषा AB वर क्लिक करा आणि नंतर बिंदू C वर क्लिक करा. |
07:41 | आपल्याला ABच्या समांतर रेषा C मधून जाताना दिसते. |
07:46 | त्याचप्रमाणे B मधून जाणारी रेषाखंड AC ला समांतर रेषा काढा. |
07:53 | लक्षात घ्या की रेषा i आणि h एका बिंदूत छेदतात. |
07:58 | इंटरसेक्ट टूल वापरुन आपण छेदनबिंदू D म्हणून चिन्हांकित करू. |
08:05 | सेगमेंट टूल वापरुन, बिंदूं A, D आणि B, C जोडा . |
08:13 | चतुर्भुज ABDC, AD आणि BC कर्णा सोबत काढलेले आहे. |
08:19 | कर्ण एका बिंदूवर छेदतात. इंटरसेक्ट टूल वापरुन, छेदनबिंदूला E म्हणून चिन्हांकित करा. |
08:30 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा. |
08:34 | चतुर्भुज ABDC चे कर्ण एकमेकांना दुभाजक आहेत का ते तपासा. |
08:40 | कर्ण लंब दुभाजक आहेत की नाही हे देखील तपासा. |
08:45 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
08:49 | आता आपण चक्रीय चतुर्भुज तयार करू. |
08:53 | त्यासाठी ग्राफिक्स २ व्ह्यू उघडू. |
08:57 | View मेनूवर जा आणि ग्राफिक्स 2 चेक बॉक्स निवडा |
09:03 | अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्यू च्या पुढे ग्राफिक्स २ व्ह्यू विंडो उघडेल. |
09:08 | ग्राफिक 2 व्ह्यू पाहण्यासाठी अस्तित्त्वात असलेल्या ग्राफिक्स व्ह्यूची border ड्रॅग करा. |
09:13 | आता Regular Polygon tool निवडा. ग्राफिक्स 2 view वर दोनदा क्लिक करा. |
09:20 | Regular Polygon text बॉक्स डिफॉल्ट value 4 सह उघडेल. |
09:25 | ओके बटणावर क्लिक करा. |
09:28 | ग्राफिक्स 2 व्यू मध्ये एक चौरस FGHI काढला आहे. |
09:33 | FG आणि GH रेषाखंडांना लंब दुभाजक काढूया. |
09:39 | टूल बार मधून Perpendicular Bisector tool निवडा. |
09:43 | बिंदू F,G आणि G,H वर क्लिक करा. |
09:50 | लंब दुभाजक एका बिंदूत छेदतात हे पहा. |
09:55 | इंटरसेक्ट टूल वापरुन आपण हा बिंदू J म्हणून चिन्हांकित करू. |
10:01 | आता J मध्यबिंदू असणारा आणि F मधून जाणारे वर्तुळ तयार करू. |
10:07 | Circle with center through Point टूल्स वर क्लिक करा, बिंदू J वर क्लिक करा नंतर बिंदू F वर क्लिक करा. |
10:16 | एक चक्रीय चतुर्भुज FGHI काढलेला आहे. |
10:21 | आता आपण त्याचे क्षेत्रफळ दाखवू. |
10:24 | एएंगल टूल ड्रॉप डाउन मधून एरिया टूलवर क्लिक करा. |
10:28 | नंतर त्याचे क्षेत्र दाखविण्यासाठी चतुर्भुज FGHI वर क्लिक करा. |
10:35 | असाईनमेंट म्हणून, ट्रेपेझियम काढा |
10:40 | त्याची परिमिती आणि क्षेत्र मोजा. |
10:44 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
10:49 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
10:52 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत, जिओजेब्रा च्या सहाय्याने चतुर्भुज रचना आणि चतुर्भुजांचे गुणधर्म समजून घेणे. |
11:03 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते. कृपया डाउनलोड करुन पहा. |
11:11 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
11:21 | कृपया आपले प्रश्न या फोरममध्ये पोस्ट करा. |
11:25 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:36 | मी राधिका आपला निरोप घेते. धन्यवाद |