Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Introduction-to-GeoGebra/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{|border=1 | Time | Marathi Narration |- | 0:01 | Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आह...") |
|||
Line 565: | Line 565: | ||
|- | |- | ||
| 12:44 | | 12:44 | ||
− | | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन | + | | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा. |
− | + | ||
|- | |- |
Revision as of 13:14, 27 September 2019
Time | Marathi Narration |
0:01 | Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
0:05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि geometric टूल्सविषयी, |
0:12 | parallel आणि perpendicular lines काढण्याविषयी, line चे ऑब्जेक्ट properties बदलण्याविषयी |
0:16 | Graphics view च्या properties विषयी. |
0:22 | येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04 |
0:28 | GeoGebra version 5.0.438.0-d |
0:33 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणाऱ्याला मूलभूत गणिताची माहिती असावी. |
0:40 | Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा. |
0:46 | search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल. |
0:52 | GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा. |
0:57 | Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू. |
1:04 | Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा. |
1:09 | GeoGebra यादीमध्ये दिसते. |
1:12 | GeoGebra application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
1:17 | हा GeoGebra इंटरफेस आहे. |
1:20 | त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे,त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help आहेत. |
1:37 | menu bar च्या खाली, विविध geometric tools सह एक टूल बार आहे. |
1:43 | tool bar च्या उजवीकडे आपल्याकडे Undo, Redo, Help आणि Preferences options आहेत. |
1:53 | tool bar च्या खाली आपल्याकडे Algebra view आणि Graphics view आहे. |
1:58 | जिओजेब्रामध्ये, geometry आणि algebra एकत्र काम करतात. |
2:03 | toolbar वरील tools वापरून geometric आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो. |
2:09 | Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित algebraic expressions दर्शवितात . |
2:15 | View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो. |
2:25 | window च्या तळाशी आपल्याकडे input bar आहे. |
2:29 | Input bar वापरुन आपण थेट algebraic कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो. |
2:36 | डीफॉल्टनुसार ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय enable केले जातात. |
2:42 | आपण context menu वापरून axes किंवा grid disable करू शकता. |
2:47 | Graphics व्यू वर राईट क्लिक करा.Graphics मेनू उघडेल. |
2:53 | या मेनूमध्ये आपल्याकडे Axes आणि Grid चेक आणि अनचेक करण्याचे पर्याय आहेत. |
3:00 | axes आणि grid enable किंवा disable करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते. |
3:05 | ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा. |
3:12 | ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा. |
3:16 | येथे आपल्याला axes आणि grid check आणि अनचेक करण्याचे पर्याय दिसतील. |
3:22 | पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ. |
3:26 | toolbar च्या उजव्या टोकावरील Move Graphics View टूलवर क्लिक करा. |
3:31 | लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल.हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे. |
3:38 | टूलवर कर्सर फिरवा. त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते. |
3:45 | हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो.आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
3:53 | प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे. |
3:58 | जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते. |
4:03 | टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते. |
4:10 | ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू. |
4:13 | Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा पॉईंट A काढला आहे. |
4:20 | पुन्हा एकदा दुसरा B पॉईंट काढण्यासाठी क्लिक करा. |
4:24 | लक्षात घ्या की पॉईंटचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत. |
4:29 | आता line काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. |
4:36 | येथे आपण विविध प्रकारच्या line काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता. |
4:42 | Line टूल वापरुन आपण पॉईंट A आणि B मधून line काढू. |
4:47 | Line टूल वर क्लिक करा आणि पॉईंट A आणि B वर क्लिक करा. |
4:53 | line f, A आणि B मधून जाते. |
4:57 | Graphics view वरील सर्व objects डिलिट करू. |
5:01 | सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा. |
5:08 | आता AB ही line पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
5:17 | line AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा. |
5:22 | पुढे मी line AB ला perpendicular line काढेन . |
5:27 | त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा. |
5:31 | point C काढण्यासाठी line AB च्या वरील भागावर क्लिक करा, नंतर line AB वर क्लिक करा. |
5:38 | C ला ओलांडत जाणारी line g line AB ला perpendicular आहे. |
5:43 | आता line AB च्या parallel line काढू. |
5:47 | Parallel Line टूलवर क्लिक करा. |
5:50 | point D काढण्यासाठी AB च्या खाली क्लिक करा, नंतर line AB वर क्लिक करा. |
5:57 | ABच्या parallel आणि point D मधून जाणारी एक line h काढली जाईल. |
6:02 | आता आपण दोन linesसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू. |
6:06 | पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा. |
6:10 | F आणि g linesच्या छेदनबिंदूवर क्लिक करा. |
6:15 | नंतर g आणि h या linesच्या छेदनबिंदूवर क्लिक करा. |
6:20 | आता आपण आपले रेखाचित्र थोडे इंटरैक्टिव बनवू . |
6:24 | मूव्ह टूल वर क्लिक करा. |
6:27 | point A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
6:30 | लक्षात घ्या की point E आणि F आणि सर्व lines point A बरोबर हलतात. |
6:36 | त्याचप्रमाणे आपण point बी आणि डी हलवू. |
6:40 | point E, F आणि lines point B बरोबर हलतात. |
6:45 | point डी बरोबर फक्त point एफ आणि लाइन h हलतात. |
6:50 | पॉइंट्स A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत. |
6:56 | आता मी point E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन.आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही. |
7:03 | हे सूचित करते की, point E किंवा F हे dependent objects आहेत. |
7:09 | आता lines चे properties बदलू. |
7:13 | लाइन AB वर राईट क्लिक करा.line च्या सर्व propertiesसह एक context menu उघडेल. |
7:21 | Object Properties निवडा.Preferences विंडो उघडते. |
7:27 | Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला. |
7:33 | मी Preferences विंडो मधील काही मूलभूत properties समजावून सांगते. |
7:38 | नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी मध्ये नाव बदलू शकतो. |
7:43 | आणि Caption म्हणून Original line लिहू शकता. |
7:46 | line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा. |
7:51 | शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे. |
7:55 | मी Name आणि value निवडेन. ते name आणि value line च्या खाली दिसेल. |
8:03 | नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे आपल्याकडे लाइन कलर करण्यासाठी कलर बॉक्स आहे. |
8:10 | कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे. |
8:15 | मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.लाइन एबीचा रंग हिरवा झाला आहे. |
8:22 | स्टाईल टॅबवर क्लिक करा. |
8:25 | येथे आपण Line Thickness,Line Opacity आणि Line Style बदलू शकता. |
8:33 | Preferences विंडो बंद करा. |
8:36 | बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह लाइन एबी पहा. |
8:41 | मी लाइन h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन. |
8:45 | ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी लाईन h वर राईट क्लिक करा.Preferences विंडो उघडली. |
8:53 | येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन. |
9:00 | Preferences विंडो बंद करा. |
9:03 | आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा. |
9:10 | सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल. |
9:13 | मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन. |
9:17 | आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता. |
9:22 | फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा |
9:29 | आपली फाईल .ggb extensionने सेव्ह झाली आहे. |
9:34 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra विंडो उघडा. |
9:40 | सेगमेंट टूल वापरुन एक lineसेगमेंट एबी काढा. |
9:44 | सेगमेंट एबी करण्यासाठी perpendicular दुभाजक काढा. |
9:48 | lineचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला |
9:52 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
9:57 | आता नवीन विंडो उघडू. |
10:00 | File menuवर क्लिक करा आणि New Window निवडा. |
10:05 | आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीजबद्दल स्पष्टीकरण देईन.येथे मी Algebra व्यू बंद करेन |
10:13 | Graphics विंडो वर राइट क्लिक करा. |
10:16 | कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल. |
10:20 | Graphics पर्याय निवडा. |
10:23 | Preferences विंडो उघडते. |
10:26 | Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid टॅब पाहू. |
10:36 | Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास सोबत ठेवा. |
10:43 | आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू. |
10:48 | bold चेक बॉक्स वर क्लिक करा.हे अॅक्सेस बोल्ड करते. |
10:54 | Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा |
11:00 | आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता. |
11:05 | त्यानुसार axes चा रंग बदलतो. |
11:09 | पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन. |
11:17 | आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ. |
11:21 | चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू. |
11:25 | बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा.कलर बॉक्स मधील एक कलर निवडा. |
11:31 | मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन. |
11:36 | लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे.आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. |
11:40 | डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला. |
11:47 | ग्रीडचा रंग बदलू.कलर बटणावर क्लिक करा |
11:53 | कलर बॉक्स मधील एक कलर निवडा. |
11:56 | मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन. |
12:02 | ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा. |
12:07 | Preferences विंडो बंद करा |
12:10 | बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा. |
12:15 | असाईनमेंट एक्सप्लोर म्हणून, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब |
12:25 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
12:28 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि geometric tools विषयी |
12:35 | parallel आणि perpendicular lines काढण्याविषयी lineचे ऑब्जेक्ट properties बदलण्याविषयी |
12:41 | ग्राफिक्स व्ह्यूच्या properties विषयी |
12:44 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा. |
12:52 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
13:01 | या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे प्रश्न आहेत का? कृपया या साइटला भेट द्या. |
13:07 | आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा.आपला प्रश्न थोडक्यात सांगा. |
13:14 | आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. |
13:18 | स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
13:23 | कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. |
13:31 | कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो. |
13:36 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती या link वर उपलब्ध आहे. |
13:47 | माधुरी गणपती आयआयटी बॉम्बे निरोप घेते. धन्यवाद. |