Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Nipple-conditions/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with "{|border=1 | <center> '''Time'''</center> | <center> '''Narration'''</center> |- | 00:01 | स्तनदा मातेच्या 'स्तनाग्रांची...") |
|||
Line 301: | Line 301: | ||
|- | |- | ||
| 07:26 | | 07:26 | ||
− | | | + | |आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. |
+ | सहभागासाठी धन्यवाद. | ||
|- | |- | ||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
− | |||
|} | |} |
Latest revision as of 13:31, 14 August 2020
|
|
00:01 | स्तनदा मातेच्या 'स्तनाग्रांची स्थिती' (निप्पल) यावरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:06 | या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू - वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे(निप्पल) आणि |
00:11 | सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे.(निप्पल) |
00:15 | पहिली स्तनाग्रांची स्थिती आहे - वेदनादायक आणि चिरा पडलेली स्तनाग्रे(निप्पल). |
00:20 | हि एक अशी स्थिती आहे जिथे आईच्या स्तनाग्रांवर(निप्पल) चिरा पडतात आणि रक्त निघते.(रक्तस्त्राव होतो) |
00:26 | यामुळे स्तनाग्रांवर खाज येते आणि ती कोरडी होते. |
00:30 | आता आपण वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या विविध कारणांवर चर्चा करूया. |
00:36 | स्तनाग्राशी स्तनपान करणे, |
00:38 | बुरशी किंवा जिवाणूंचे संसर्ग, |
00:41 | प्रत्येक स्तनपानानंतर स्तनाग्रांना साफ करण्याची सवयी आणि, |
00:45 | बाळाची चिटकलेली जीभ. |
00:47 | आपण स्तनाग्राशी स्तनपान करण्यासह सुरवात करू. |
00:50 | स्तनाग्राशी स्तनपान करणे, वेदनादायक आणि चिरा पडलेल्या स्तनाग्रांसाठी हे पहिले आणि सर्वात महत्वाचे कारण आहे. |
00:56 | स्तनाग्राशी स्तनपानादरम्यान - बाळाच्या तोंडातल्या कडक टाळूवर स्तनाग्र घासतो. |
01:03 | बाळ कडक टाळू आणि जिभेच्या मध्ये या स्तनाग्राला दाबून ठेवतो. |
01:08 | आणि त्यामुळे स्तनपान खूप वेदनादायी बनते आणि स्तनाग्रावर चिरा पड्तात. |
01:17 | स्तनाग्राशी स्तनपान हे बाळाची व्यवस्थित पकड नसल्याचे परिणाम आहे. |
01:20 | म्हणूनच स्तनाग्राशी स्तनपान केल्यामुळे जे वेदनादायी आणि चिरा पडलेली स्तनाग्रे होतात ते टाळण्यासाठी योग्य पकड खूप महत्वाची आहे. |
01:29 | लक्षात घ्या, आम्ही याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये 'स्तनावर बाळाने घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धतींची' चर्चा केली आहे. |
01:37 | लक्षात ठेवा, वेदनादायी किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांमुळे योग्य पकड केली असली तरी दुखापत होईल. |
01:43 | आईच्या स्तनावर बाळाची पकड योग्यरीत्या सतत तशीच असेल तर हळू हळू दुखणे थांबेल. |
01:51 | पुढे आहे बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग. |
01:56 | जर आईला बुरशी किंवा जीवाणूंचे संसर्ग झाले तर तिने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. |
02:03 | पुढे, काही मातांना प्रत्येक स्तनपानापूर्वी स्तनाग्रे साफ करण्याची सवय असते. |
02:09 | या कारणामुळे स्तनाग्रे कोरडी होतात. |
02:13 | त्यामुळे, ही सवय टाळली पाहिजे. |
02:16 | लक्षात ठेवा, आई अंघोळीच्या वेळेच एकदा स्तनाग्रे साफ करू शकते. |
02:21 | स्तनाग्रांवर चिरा पडल्याकि, प्रत्येक स्तनपानानंतर आईने तिचे स्तनाग्रे साफ केले पाहिजे. |
02:28 | साफ केल्यानंतर, आईने जखमेवर तिचे मागील घट्ट दूध लावावे. |
02:32 | मागील घट्ट दुधात असे काही पदार्थ असतात कि ते जखम बरे करण्यास आणि संसर्गास लढण्यासाठी सहाय्य करतात. |
02:39 | अशा प्रकारे, बाळाच्या तोंडातले जिवाणू स्तनाग्रांच्या चिरांमध्ये पसरण्यापासून रोखतात. |
02:46 | नंतर आहे बाळाची चिटकलेली (चिपकलेली) जिभेची समस्या. |
02:50 | चिटकलेली जीभ (टंग टाय) हि एक अशी स्थिती - जिथे बाळाच्या जिभेचा टोक तोंडाच्या आतल्या खालच्या बाजूशी जुडलेला असतो. |
02:58 | अशी स्थिती खूप कमी बघायला मिळते. |
03:01 | ज्या बाळाची जीभ चिटकलेली असते सामान्यपणे ते बाळ स्तनाग्रातून स्तनपान करतांना पाहायला मिळतात. |
03:06 | बाळाची जीभ चिटकलेली असेल तर- फक्त योग्य पकड पुरेशी नसून शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. |
03:16 | त्यामुळे अशा बाबतीत, आईने नेहमी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. |
03:22 | आता वेदनादायक किंवा चिरा पडलेल्या स्तनाग्रांच्या उपचारांबद्दल चर्चा करू. |
03:27 | जर आईच्या स्तनाग्रांवर वेदनादायी किंवा चिरा पडल्या असतील तर, आरोग्य कार्यकर्त्याने आईची छाती आणि स्तनाग्रे तपासली पाहिजे. |
03:37 | आईला स्तनपानापूर्वी तिच्या हाताने स्तनातून थोडे दूध काढायला सांगावे. |
03:42 | त्याने स्तन नरम होतील आणि बाळ सहजपणे पकड करेल. |
03:47 | या व्यतिरिक्त हाताने दूध काढल्याने संसर्ग, स्तनाग्रांवर चिरा आणि स्तनदाह होण्याचा धोका कमी होतो. |
03:55 | नंतर, आईने तिच्या बाळाला स्तनाशी योग्यरीतीने पकड करण्यास (स्तनपान) मार्गदर्शन करा. |
04:01 | लक्षात ठेवा, वारंवार स्तनपान करण्याची प्रक्रिया हे स्तनातील दुधाचा पुरवठा ठरवते. |
04:09 | म्हणून, आईने स्तनपान करणे बंद केले नाही पाहिजे. |
04:13 | स्तनपानादरम्यान- आईने कमी वेदनादायी स्तनाच्या बाजूने स्तनपान करायला सुरवात केले पाहिजे. |
04:20 | जर अजूनही स्तनपान करणे वेदनादायक असेल तर- आई तिच्या हाताने स्तनातील दूध काढू शकते आणि ते बाळाला चमचा किंवा कपने पाजू शकता. |
04:32 | तसेच, आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक स्तनपानानंतर मागील घट्ट दुधाचे काही थेंब बाधित जागेवर लावा. |
04:42 | लक्षात ठेवा, खालील गोष्टी वेदनादायक आणि चिरा पडलेल्या व स्वस्थ स्तनाग्रांवर देखील करू नका- |
04:49 | साबण, तेल, लोशन, बाम आणि सुगंधी द्रव्य(परफ्यूम्स) |
04:54 | त्यात जळण होण्यासारखे (त्रासदायक)पदार्थ असू शकतात. |
04:57 | जर आईला वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे असतील तर तिची स्थिती आणखी बिघडेल. |
05:03 | गंभीर परिस्थिती मध्ये, आईने डॉक्टर किंवा आरोग्य कार्यकर्त्याची सल्ला घ्यावी. |
05:09 | वेदनादायक किंवा चिरा पडलेली स्तनाग्रे रोखण्यासाठी, प्रसूतीनंतर लगेच स्तनपानास सुरवात करा. |
05:15 | नेहमी स्तनपान करतांना, बाळाने व्यवस्थित पकड केली असल्याची खात्री करा. |
05:22 | आपण पुढे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे यावर चर्चा करणार आहोत. |
05:28 | सपाट स्तनाग्रे एरिओलाच्या स्तरापासून बाहेर आलेले नसतात. |
05:33 | तर आतमध्ये वळलेले स्तनाग्रे सहसा आतल्या बाजूला वळलेले असतात. |
05:38 | आईसाठी खरं काय ते समजून घेणे फार महत्वाचे आहे- स्तनपानाकरिता सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे हे अडथळा नाही. |
05:48 | जसे कि, स्तनावर योग्य पकड दरम्यान बाळ एरिओलाशी पकड करतो न कि स्तनाग्रेशी.(निप्पल) |
05:56 | लक्ष द्या, सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रेच्या बाबतीत- प्रसूतीच्या पहिल्या आठवड्यात आईला मदतीची गरज आहे. |
06:03 | या दरम्यान - आरोग्य कार्यकर्त्याने आईला योग्य पकड करण्याबद्दल मार्गदर्शन केले पाहिजे. |
06:08 | यामुळे तिचा आत्मविश्वास वाढेल. |
06:11 | लक्षात ठेवा, जर आईचे सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असेल तर व्यवस्थित आणि चांगल्या पकडसाठी सर्वात महत्वाचे पकड म्हणजे - क्रॉस क्रेडल होल्ड |
06:22 | फुटबॉल पकड (होल्ड) आणि अर्ध-टेकलेली (टेकून बसलेली)स्थिती. |
06:26 | पूर्वीच्या ट्यूटोरियल मध्ये सांगितल्या प्रमाणे, कोणत्याही पकड मध्ये, हे अत्यंत महत्वाचे आहे की - आईने स्तन योग्य पद्धतीने पकडले पाहिजे. |
06:37 | जिथे बाळाचे ओठ आणि आईची बोटे एकाच दिशेने असतील. |
06:42 | लक्षात ठेवा, अयोग्य पकडमुळे वेदनादायी स्तनाग्रांची समस्या होईल. |
06:47 | लक्षात ठेवा - दुधाची बाटली किंवा स्तनाग्रे कवच (निप्पल शिल्ड) वापरू नये. |
06:52 | यामुळे बाळाला सपाट किंवा आतमध्ये वळलेले स्तनाग्रे असलेल्या स्तनातून स्तनपान करणे खूप अवघड जाईल. |
07:00 | आईने बाळाशी जास्तीत जास्त त्वचेशी स्पर्श केला पाहिजे. |
07:04 | यामुळे मातांमध्ये ऑक्सिटोसिन रेफ्लेक्स (प्रतिक्रिया) तयार होतो आणि स्तनातील दूध सहजपणे बाहेर येते. |
07:12 | नेहमी लक्षात घ्या कि, या सर्व स्तनाग्रांची स्थितींना टाळण्यासाठी स्तनपान करण्याची योग्य पकड हीच महत्वाची गोष्ट आहे. |
07:19 | आपण स्तनदा मातेच्या 'स्तनाग्रांची स्थिती' यावरील ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
07:26 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |