Difference between revisions of "LaTeX-Old-Version/C2/What-is-Compiling/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 249: Line 249:
 
|-
 
|-
 
|9:05
 
|9:05
|याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी चैत्राली सी-डीप आयआयटी मुंबई आपली रजा घेते.  
+
|याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते.  
 
|}
 
|}

Revision as of 11:14, 21 April 2014

Time Narration
0:00 लेटेक वापरून साधे डॉक्युमेंट कसे निर्माण करावे हे समजावून देणाऱ्या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:08 मी ही क्रिया मॅक ओ एस एक्स मधे कशी करावी हे समजावणार आहे.
0:13 लिनक्स आणि विंडोज या इतर ऑपरेटिंग सिस्टिम्स मधे अशाच पद्धती उपलब्ध आहेत.
0:19 सर्व प्रथम तुमचा संपादक वापरून तुम्ही सोर्स फाइल बनविणे आवश्यक आहे.
0:24 ईमॅक्स हा माझा आवडता संपादक आहे. मी या फाइल चे नाव हॅलो डॉट टेक ठेवले. फाइल चे एक्स्टेंशन टेक आहे. याचे स्पेलिंग टी-ई-एक्स असले तरी उच्चार टेक आहे. हे लेटेक करता सामान्य आहे.
0:40 पहिली गोष्ट म्हणजे लेटेक ला सांगणे की आपल्याला कोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट बनवायचे आहे.
0:46 मी खालील बाबी ठरविते.
1:01 सेव्ह करते.
1:03 या शिवाय इतर अनेक प्रकार आहेत.
1:06 इतर ट्युटोरियलमध्ये ते आपण बघणार आहोत.
1:10 मी बारा हे अक्षराचे आकारमान वापरले आहे.
1:14 लेटेक मधे अकरा आणि दहा हे दोन लहान आकारही लोकप्रिय आहेत.
1:23 मी डॉक्युमेंट ची सुरुवात करते.
1:29 मी हॅलो वर्ल्ड हे टाईप करते.
1:34 डॉक्युमेंट संपवते.
1:36 सेव्ह करते.
1:39 बिगिन आणि एण्ड या आज्ञांच्या मधे जे काही येईल तेच अखेरच्या निर्मितीत दिसेल.
1:47 याला सोर्स फाइल असे म्हणतात. मी हॅलो डॉट टेक हे नाव दिले.
1:51 पी डी एफ लेटेक ही आज्ञा वापरून आपण हे कंपाइल करू.
1:55 आपण इथे येऊन पी डी एफ लेटेक हॅलो डॉट टेक ही आज्ञा देऊ.
2:08 आपण जुळणी करण्यासाठी पी डी एफ लेटेक हॅलो ही आज्ञा टेक या एक्स्टेंशन शिवाय ही वापरु शकतो.
2:23 अशा वेळी टेक हे सामान्य एक्स्टेंशन वापरले जाईल.
2:28 पी डी एफ लेटेक ही आज्ञा लेटेक सोर्स फाइल पासून पी डी एफ फाइल निर्माण करण्यासाठी वापरतात.
2:35 या आज्ञेनंतर लेटेक काही माहिती दर्शविते, हे संदेश हॅलो.लॉग या फाइल मधे नंतर पाहता यावेत म्हणून साठविले जातात.
2:48 आतापर्यंत निर्माण केलेल्या सर्व फाइल्स मध्ये हॅलो हा शब्द आहे हे लक्षात घ्या.
2:53 आता आपण हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडू.
2:57 माझ्या मॅक सिस्टिम मधे मी हे स्किम हॅलो.पीडीएफ अशी आज्ञा देऊन करते.
3:12 स्किम हा मॅक ओएसएक्स मधील विनामूल्य पीडीएफ वाचक आहे.
3:18 ही आज्ञा दिल्यावर स्किम हॅलो.पीडीएफ ही फाइल उघडते.
3:22 त्यात अपेक्षेप्रमाणे फक्त एक ओळ आहे. मी ही फाइल मोठी करते.
3:33 स्किम उघडलेल्या फाइलची नवीनतम आवृत्ती दाखवतो.
3:37 उदाहरणादाखल मी यात बदल करते, मी अजून एक हॅलो वर्ल्ड इथे लिहिते.
3:48 मी हे सेव्ह करते आणि संकलित करते.
3:56 मी हे मान्य करते. फाईल अद्ययावत झाली.
4:01 मी हे खोडते, पुन्हा सेव्ह करते आणि संकलित करते. आता पुन्हा मूळ फाइल दिसू लागली.
4:14 लक्षात घ्या की मी दरवेळी संकलित करण्याआधी ती सेव्ह केली.
4:21 तुम्ही आधी सेव्ह करता आणि मग संकलित करता. तुम्ही सेव्ह केले नाहीतर अगोदर सेव्ह केल्यानंतर तुम्ही केलेले कोणतेही बदल संकलित आवृत्तीत दिसणार नाहीत.
4:30 या ट्युटोरियल करता मी तीन चौकटींमधे हे दाखवत आहे.
4:36 डॉक्युमेन्टस तयार करण्यास अशीच रचना करावी असे नाही. लक्षात घ्या, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही संपादक आणि pdf रीडर वापरू शकता.
4:45 लेटेक वापरताना या पायऱ्या आवश्यक आहेत ः सोर्स बनविणे, संकलन आणि पीडीएफ फाइल पहाणे.
5:08 मी तुम्हाला प्रोत्साहित करते कि, सोर्स फाईल परिवर्तीत करून या पायऱ्यांन वरून नजर टाका.



5:12 तुम्ही सुरवात आणि शेवटच्या डॉक्युमेन्ट मध्ये आणखी काही ओळ जाडू शकता.
5:20 हॅलो.लॉग ही फाइल पहाण्याची तुम्हाला इच्छा असेल.
5:24 मी आता हे ट्युटोरियल एका सादरीकरणा सहित पुढे नेते.
5:28 अगोदर , मला हे डिलीट करू द्या.
5:38 मी लेटेक च्या फायद्यांनी सुरूवात करते.
5:42 लेटेक हे अक्षरजुळणीचे उत्कृष्ट साधन आहे.
5:47 लेटेक वापरून बनवलेल्या डॉक्युमेंटची गुणवत्ता अतुलनीय असते.
5:51 हे विनामूल्य आणि खुले आहे.
5:53 हे  विन्डोज़ आणि युनिक्स सिस्टम्स, तसेच  मॉक आणि लिनक्स वर उपलब्ध आहे.
6:00 लेटेक चे उत्कृष्ट वैशिष्ट आहे, जसे, समीकरण, धडे, विभाग, अंक, टेबल्स, यांना आपोआप अंकित करते.
6:08 डॉक्युमेन्टस सह, अनेक गणिती समीकरणे लेटेक मध्ये सहज निर्माण करू शकता.
6:13 ग्रंथसूची चे विविध प्रकार बनविणे यात खूपच सोपे आहे.
6:19 लेटेक संरचनेची काळजी घेत असल्याने लेखकाला आपले लक्ष मुद्देसूदपणा आणि ज्ञानसाधनांची निर्मिती या महत्वाच्या गोष्टींकडे केंद्रित करता येते.
6:31 लेटेक करिता अधिक ट्युटोरियल उपलब्ध आहे. लेटेक च्या अशा प्रकाराच्या खालील ट्युटोरियलकरिता moudgalya.org या संकेतस्थळाला भेट द्या ः संकलन म्हणजे काय, पत्रलेखन, वार्तालेखन, गणिती अक्षरजुळणी, समीकरणे, तालिका व आकृत्या, ग्रंथसूची कशी बनवाल, आणि ग्रंथसूची बनवण्याच्या युक्त्या.
6:53 चांगल्या परिणामांसाठी हा क्रम योग्य आहे.
6:57 ही ट्युटोरियल्स बनवण्यासाठी वापरलेल्या सोर्स फाइल्स सुद्धा या संकेतस्थळावर आहेत.
7:03 लेटेक विंडोज मधे कसे बसवावे यासाठी एक ट्युटोरियल बनवायची आमची योजना आहे.
7:09 भविष्यात इतर  ट्युटोरियलस हि जोडले जातील जसे, बीमर चे स्लाईड  प्रेज़ेंटेशन.
7:15 हे सादरीकरण लेटेक वापरून बीमर मध्ये बनवले आहे.
7:21 काही टिपा ः शक्य तितकी अधिक ट्युटोरियल्स पहा.
7:26 सोबत त्यांचा सराव करा.
7:28 लेटेक ची चालू फाइल वापरून सुरूवात करा.
7:31 एका वेळी एक बदल करा, सेव करा,संकलित करा, आणि पुढील बदलांपुर्वी केलेले काम व्यवस्तीत आहे, खात्री करा.
7:40 संकलना पूर्वी सोर्स फाइल सेव्ह करा.
7:45 लेटेक वरती अनेक पुस्तके आहेत.आम्ही दोन सुचवतो.
7:48 पहिले लेटेक चे निर्माते लेस्ली लॅम्पर्ट यांचे.
7:53 हे पुस्तक भारतीय स्वस्त आवृत्ती स्वरूपात उपलब्ध आहे.
7:57 प्रगत मार्गदर्शनासाठी लेटेक कंपॅनिअन हे पुस्तक वापरू शकता.
8:03 इंटरनेट आणि पुस्तक सामान्यतः अनेक कामांसाठी पुरेसे आहे, परंतु, लेटेक संबंधी माहिती साठी ctan.org साईट आहे.
8:15 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT द्वारे मिळाले आहे. हि योजना

MHRD, Government of India. ने चालविली जाते.

8:24 याची साईट sakshat.ac.in. आहे. स्पोकन ट्युटोरियल "टॉक-टू-अ-टीचर” या प्रोजेक्ट चा भाग असून, तो सीड़ीप, आईआईटी मुंबई, द्वारे चालतो. cdeep.iitb.ac.in.


8:39 संगणक कार्यक्रमांच्या विकासासाठी आणि वापरासाठी सहयोग fossee.in करत आहे.
8:47 Fossee म्हणजे फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेअर इन सायन्स अँड इंजिनिअरिंग एज्युकेशन हे आहे.
8:52 हा प्रॉजेक्ट राष्ट्रीय शिक्षण योजनेच्या सहाय्याने चालतो.
8:57 या संकेतस्थळांना अधिक ट्युटोरियल्स व त्यांच्या विविध भाषांमधील अनुवादासाठी नियमित भेट देत रहा.
9:05 याचबरोबर आपले हे ट्युटोरियल संपले. पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी रंजना भांबळे आयआयटी मुंबई आपली रजा घेते.

Contributors and Content Editors

Gaurav, Nancyvarkey, PoojaMoolya, Ranjana, Sneha