Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C2/Create-a-simple-form/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 6: Line 6:
  
  
{{| border = 1
+
{| border = 1
 
|'''Time'''
 
|'''Time'''
 
|'''Narration'''
 
|'''Narration'''

Latest revision as of 15:15, 20 April 2017

Title of script: Create a simple forms

Author: Manali Ranade

Keywords: Base


Time Narration
00:00 LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:03 या ट्युटोरियलमध्ये आपण Simple Forms बद्दल जाणून घेणार आहोत.
00:09 येथे आपण शिकणार आहोत,
00:12 form म्हणजे काय?
00:14 Wizard च्या सहाय्याने form कसा तयार करायचा?
00:17 आत्तापर्यंत आपण शिकलो की LibreOffice Base च्या सहाय्याने database बनवणे आणि आपण ज्यात data संचित करतो ते टेबल बनवणे.
00:27 परंतु databaseच्या टेबलमध्ये data कसा भरायचा?
00:33 एक पध्दत म्हणजे टेबल्सच्या सेल्समध्ये data टाईप करणे जे आपण मागील ट्युटोरियलमध्ये केले.
00:42 data भरण्याची अजून एक जलद आणि कमीतकमी चुका होणारी अशी पध्दत आहे.
00:49 आणि ती म्हणजे Forms चा वापर. Form हा data भरण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी असलेला front end किंवा user interface आहे.
01:00 उदाहरणार्थ simple form हा टेबलमधील fields पासून बनलेला असू शकतो.
01:06 आपण मागील ट्युटोरियलमध्ये बनवलेल्या Library databaseचा उदाहणादाखल वापर करणार आहोत.
01:15 simple form मध्ये Books table मधील fields चा समावेश असू शकतो.
01:21 ह्या form चा वापर Books table मध्ये data भरण्यासाठी करता येतो.
01:27 आता आपण form कसा बनवायचा ते शिकू या.
01:33 प्रथम आपण LibreOffice Base हा प्रोग्रॅम सुरू करू या.
01:38 बेस प्रोग्रॅम चालू नसेल तर स्क्रीनवर डावीकडे खाली असलेल्या Start button वर क्लिक करा आणि नंतर All programs वर क्लिक करा. नंतर LibreOffice Suite मधील LibreOffice Base वर क्लिक करा.
01:57 आता open an existing database file या पर्यायावर क्लिक करा.
02:04 Recently Used या ड्रॉपडाऊन बॉक्समध्ये आपला Library database दिसेल.
02:11 तो सिलेक्ट करून Finish या बटणावर क्लिक करा.
02:17 LibreOffice Base आधीपासूनच सुरू असल्यास,
02:21 Library databaseची Library.odb ही फाईल उघडण्यासाठी File menu वर क्लिक करा आणि मग Openवर क्लिक करा.
02:36 किंवा फाईल मेनूमधील Recent Documents वर क्लिक करा आणि Library.odb निवडा.
02:48 आता आपण Library databaseमध्ये आहोत.
02:52 डावीकडील Database ह्या सूचीच्या पॅनेलमधील Forms या आयकॉनवर क्लिक करा.
03:01 लक्षात घ्या, नवीन Form बनवण्याच्या दोन पध्दती आहेत. Create Form in Design View and Use Wizard to create form.
03:12 Use Wizard to create form या दुस-या पर्यायावर क्लिक करा.
03:19 आता आपल्याला LibreOffice Writer window सारखी एक नवी विंडो दिसेल.
03:26 आणि त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला Form Wizard नामक एक popup window दिसेल.
03:33 Books table वर आधारित असलेला आपला पहिला Form बनवण्यासाठी Wizard वर जाऊ या.
03:40 आपण डावीकडे दिसत असलेल्या आठ steps मधून जाणार आहोत.
03:46 सध्या आपण Field Selection या पहिल्या stepवर आहोत.
03:53 आणि उजव्या बाजूला असलेल्या Tables or Queries नामक drop down मधील Books हे टेबल निवडू या.
04:03 त्याच्या खाली डावीकडे आपण उपलब्ध fields ची सूची बघू शकतो.
04:09 उजव्या बाजूला आपल्याला fields on the form दिसेल.
04:14 केवळ form मध्ये आवश्यक असलेली fields आपण स्थलांतरित करू.
04:21 यासाठी double arrow चे चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करू या.
04:27 लक्षात घ्या की आपण डावीकडे असलेली सर्व fields उजवीकडे स्थलांतरित केली आहेत.
04:35 BookId field मधील numbers हे autogenerate होणार असल्यामुळे, आपल्याला ते form वर नको आहे.
04:46 मग आपण हे फिल्ड परत डाव्या बाजूला स्थलांतरित करू या.
04:51 उजव्या बाजूला असलेल्या BookId वर क्लिक करा आणि Less than चे एक चिन्ह असलेल्या बटणावर क्लिक करा.
05:02 आता आपण पुढील step वर जाण्यासाठी खालील Next या बटणावर क्लिक करू.
05:10 Step 2. आपण simple form बनवत असल्यामुळे ही Step आपण सध्या सोडून देऊ. त्यासाठी Next या बटणावर क्लिक करू.
05:21 आता आपण Step 5 म्हणजेचArrange controlsवर आहोत .
05:26 background window कडे लक्ष द्या. आपले Books table, Orange background मध्ये दिसेल.
05:35 Arrangement of the Main form ह्या लेबल खालील 4 आयकॉन्सवर एकेक करून क्लिक करा.
05:44 क्लिक केल्यावर असे दिसेल की background window तसेच title, author इत्यादी लेबल्स आणि त्यांच्या टेक्स्ट बॉक्सच्या रचनेत बदल होत आहे.
05:57 पहिल्या Columnar - Labels left या रचनेचा वापर करू या.
06:08 येथे लेबल्स डाव्या बाजूला आणि टेक्स्ट बॉक्स उजव्या बाजूला आहेत, जसे सर्वसाधारण फॉर्ममध्ये असते.
06:17 आता आपण पुढे जाण्यासाठी Next बटणावर क्लिक करू.
06:22 आपण Set Data Entry नावाच्या 6 व्या Stepवर आहोत.
06:28 आत्ता आपण ही Step सोडून देणार आहोत आणि पुढे जाणार आहोत.
06:33 7 वी Step आहे Apply Styles .
06:36 लक्ष द्या की आपण लिस्ट बॉक्समधील प्रत्येक रंगावर क्लिक केल्यावर विंडोचा background colour बदलत आहोत.
06:45 Ice Blue हा रंग निवडण्यासाठी त्यावर क्लिक करू.
06:50 आता आपण अंतिम Step वर जाऊ.
06:53 आठव्या Stepवर आपल्या form ला नाव देऊ या.
06:59 आपण आपल्या मनाप्रमाणे नाव देऊ शकतो.
07:03 Name of the form खालील text box मध्ये Books Data Entry Form असे नाव टाईप करू या.
07:16 आता how do we want to proceed after creating the form? वर जाऊ.
07:20 प्रथम Work with the form निवडू या.
07:23 याचा अर्थ आपण data भरण्यासाठी form वापरायला सुरूवात करणार आहोत.
07:29 form चे डिझाईन बदलण्यासाठी आपण Modify the form निवडू शकतो. ज्याबद्दल आपण नंतर जाणून घेणार आहोत.
07:37 आता खालील finish या बटणावर क्लिक करू.
07:44 अशा प्रकारे आपण विंडोवर Books Data Entry Form असे शीर्षक असलेला simple form बनवला आहे.
07:54 लक्ष द्या की टेक्स्ट बॉक्समध्ये काही values दिसत आहेत. जसे की An autobiography', 'Jawaharlal Nehru' इत्यादी.
08:05 या values कुठून आल्या?
08:08 Base ट्युटोरियलच्या मागील भागात आपण Books table मध्ये ह्या values टाईप केल्या होत्या.
08:17 आता हा form वापरण्यासाठी तयार आहे.
08:22 प्रत्येक value वर जाण्यासाठी आपण टॅब हे बटण दाबू या.
08:27 form मध्ये आपल्याला Conquest of self हे शीर्षक असलेल्या दुस-या पुस्तकाची माहिती दिसेल.
08:37 खालील Forms Navigation toolbar मधे उजवीकडे टोक असलेल्या काळ्या त्रिकोणी आयकॉन वर क्लिक करून, आपण प्रत्येक पुस्तकाची माहिती बघू शकतो. ज्यास record असेही म्हणतात.
08:54 लक्षात घ्या की 5 पैकी तिसरे record येथे दर्शवले जात आहे.
09:01 जेव्हा आपण कर्सर ह्या black arrowच्या आयकॉनजवळ नेऊ तेव्हा Base आपल्याला tool tips दर्शवेल.
09:09 First Record, Previous Record, Next Record, आणि Last Record.
09:16 आपण याचा उपयोग करून recordsमध्ये पुढे मागे जाऊ शकतो.
09:22 अशा प्रकारे आपण LibreOffice Base च्या Simple Forms वरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:27 थोडक्यात आपण Form म्हणजे काय आणि Wizard च्या सहाय्याने Form कसा बनवायचा ते शिकलो.
09:35 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
09:47 सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे.
09:52 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
09:56 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Sneha