Difference between revisions of "LibreOffice-Suite-Impress/C2/Printing-a-Presentation-Document/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 277: Line 277:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:50
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06:50
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.  
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.  
  
 
|-
 
|-

Revision as of 12:55, 2 February 2015

Title of script: Printing a Presentation

Author: Manali Ranade

Keywords: Impress


Visual Clue
Narration
00.00 इम्प्रेसच्या 'Printing a Presentation' वरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.06 यात कागदावर प्रेझेंटेशन प्रिंट करण्याचे पर्याय जाणून घेऊ.
00.11 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'.
00.16 येथे आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Libre Office Suite 3.3.4 वापरणार आहोत.
00.25 अनेकदा प्रेझेंटेशनची हार्ड कॉपी कागदावर लागते.
00.29 उदाहरणार्थ प्रेझेंटेशनची कॉपी श्रोत्यांना पुढील संदर्भास द्यायची असते.
00.35 प्रथम 'Sample Impress' प्रेझेंटेशन फाईल वर डबल क्लिक करून उघडू.
00.41 स्लाईडची प्रिंट घेण्यासाठी 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा. किंवा Ctrl आणि P कीबोर्डवरील बटणे एकत्र दाबा.
00.50 'General' आणि 'Options' टॅबखालील सेटींग्जबद्दल जाणून घेण्यास,
00.55 लिबर ऑफिस रायटरमधील 'Viewing and printing documents' ट्युटोरियची मदत घ्या.
01:02 'General' टॅब मधल्या 'Print' खालील 'Document' फिल्डमध्ये इम्प्रेससाठी काही विशिष्ठ पर्याय उपलब्ध असतात.
01:09 यामुळे सोयीच्या फॉरमॅटमध्ये स्लाईडची प्रिंट घेता येते.
01:15 'Slides', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline' पैकी आपण 'Slides' पर्याय निवडू.
01:22 'लिबर ऑफिस इम्प्रेस' टॅबवर क्लिक करा.
01:26 येथे आपण स्लाईडचा रंग आणि आकार व जो भाग प्रिंट करायचा आहे तो निवडू शकतो.
01.34 कंटेट्स खाली 'Slide Name', 'Date and Time' आणि 'Hidden Pages' हे निवडूया .
01:41 पर्यायांच्या नावाप्रमाणेच आपण स्लाईडचे नाव, तारीख व वेळ आणि एखादे न दाखवले जाणारे पान प्रिंट करू शकता.
01:49 नंतर कलर खालील 'Greyscale' पर्याय निवडा.
01:53 नावाप्रमाणेच स्लाईड तिच्या मूळ किंवा कृष्णधवल रंगात प्रिंट करता येते.
02:00 आणि Size खाली 'Fit to printable page' पर्याय निवडा. लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील इतर पर्याय कशाप्रकारे काम करतात ते तुम्ही स्वतः करून पाहू शकता.
02:10 तुम्हाला ज्या उद्देशाने प्रिंट घ्यायची आहे त्यानुसार 'pane layout' टॅबमध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
02:18 समजा एकाच पानावर अनेक स्लाईडस् छापायच्या आहेत.
02:23 त्यासाठी 'pages per sheet' पर्याय निवडा. Default रूपात प्रत्येक पानावर एकच स्लाईड प्रिंट होते.
02:29 येथे पानाचा छोटा preview दिसत आहे.
02:33 ड्रॉप डाऊन ऍरोवर क्लिक करून पानावरील स्लाईडस्ची संख्या निवडा.
02:39 दोन संख्या निवडल्यास preview मध्ये आपल्याला दोन स्लाईडस् दिसतील. सहा निवडल्यास सहा दिसतील.
02:48 'Draw a border around each page' पर्याय निवडल्यावर प्रिंट करताना प्रत्येक पानाला काळ्या रंगाची बॉर्डर दिसेल.
02:56 त्यामुळे पान आकर्षक दिसेल.
02:59 'Brochure' पर्यायामुळे स्लाईड, पुस्तक रूपात प्रिंट करता येतात. त्यामुळे बाईंडिंग करणे सोपे जाते.
03:06 सध्या आपण हा पर्याय निवडणार नाही. ह्या पर्याया चे कार्य तुम्ही नंतर स्वतः जाणून घ्या.
03:14 'Option' टॅबमधील कुठलाही चेक बॉक्स निवडलेला नाही ही खात्री करा.
03:19 हे चेक बॉक्स विशिष्ट कारणांसाठी दिले आहेत. याची चर्चा पुढे कधीतरी.
03:25 आता 'Print' बटणावर क्लिक करा.
03:28 तुमचे प्रिंटर योग्य पध्दतीने configure केला असेल तर प्रिंटर प्रिंट करण्यास सुरूवात करेल.
03:36 पुढे 'Handouts' पर्यायाबद्दल जाणून घेऊ या. 'File' वर जाऊन 'Print' वर क्लिक करा.
03:41 आणि 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट फिल्डमधून 'Handouts' पर्याय निवडा.
03:47 'Default' रूपात एका पानावर चार स्लाईड असतात व त्यांचा क्रम ठरलेला असतो. या प्रेझेंटेशनसाठी यात बदल करू नये.
03:58 लिबर ऑफिस इम्प्रेस टॅबमधील 'Size' हा टॅब डिसेबल्ड म्हणजेच निष्क्रीय आहे.
04:05 ह्याचे कारण प्रिंटचा आकार हा स्लाईडस् ची संख्या आणि शीटचा आकार यावर अवलंबून असतो.
04:12 आता 'Print' बटणावर क्लिक करा.
04:15 प्रिंटर 'configure' केला असल्यास छापण्यास सुरूवात होईल.
04:20 आता पहिल्या स्लाईडवर जाऊन 'Note' टॅबवर क्लिक करा.
04:25 येथे आपण 'This is a sample note' ही तळटीप टाईप करू या.
04:30 स्लाईडसच्या तळटीपा प्रिंट करण्यास फाईलवर जाऊन 'Print' निवडा.
04:35 'General' टॅबमधील 'Print' खालील डॉक्युमेंट फिल्डवर जाऊन 'Notes' पर्याय निवडा.
04:42 'preview' पेज पहा. खालील भागात तुमची तळटीप दिसत आहे.
04:48 आता 'Libre Office Impress' टॅब वर क्लिक करा.
04:52 लक्षात घ्या 'Notes' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो.
04:57 आता 'Print' या बटणावर क्लिक करा. प्रिंटर 'configure' केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल.
05:05 प्रेझेंटेशन करताना संदर्भ म्हणून स्लाईडसची रूपरेखा छापण्यासाठी File वर क्लिक करून Print निवडा.
05:13 'General' टॅबमधील 'Print' खालील 'Document' फिल्डवर जाऊन 'Outline पर्याय निवडा.
05:19 डावीकडील 'Preview' पेज पहा
05:28 आता'Libre Office Impress' टॅबवर क्लिक करा.
05:32 लक्षात घ्या 'Outline ' प्रिंट करताना 'Size' हा पर्याय उपलब्ध नसतो.
05:38 आता 'Print' बटणावर क्लिक करा. प्रिंटर 'configure' केलेला असल्यास छापण्यास सुरूवात होईल.
05:47 या पाठात आपण प्रिंटचे विविध पर्याय जाणून घेतले.
05:52 'Slide', 'Handouts', 'Notes' आणि 'Outline'
05:57 COMPREHENSION TEST ASSIGNMENT. नवीन प्रेझेंटेशन तयार करा.
06:02 फक्त दुसरी स्लाईड प्रिंट करा. 'Handout' रूपात पहिल्या चार स्लाईडस् प्रिंट करा.
06:10 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
06:16 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:21 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:27 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:31 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:38 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:42 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
06:50 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:01 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी कविता साळवे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha