Difference between revisions of "Biogas-Plant/C2/Generation-of-Biogas/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
 
{| Border =1
 
{| Border =1
| <center>'''Time'''</center>
+
|'''Time'''
| <center>'''Narration'''</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 278: Line 278:
 
| 10:54
 
| 10:54
 
|  थोडक्यात
 
|  थोडक्यात
 +
 
|-
 
|-
 
| 10:56
 
| 10:56

Latest revision as of 11:59, 11 April 2017

Time Narration
00:01 नमस्कार. "बायोगॅसची निर्मिती कशी करायची" या पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात आपण शिकणार आहोतः बायोगॅस संयंत्रात कच्चा माल केव्हा समाविष्ट करायचा.
00:15 बायोगॅस संयंत्रात कच्चा माल समाविष्ट करण्याचे प्रमाण
00:24 बायोगॅस संयंत्रातून तयार झालेल्या मळीचा वापर करण्याच्या पध्दती
00:31 बायोगॅस शेगडी आणि त्याची जोडणी पध्दत.
00:35 तसेच आपण बायोगॅसच्या वापरकर्त्यांचे प्रशंसापत्र देखील बघणार आहोत.
00:42 बायोगॅस संयंत्रात कोणता कच्चा माल समाविष्ट करायचा याबाबत आधीच्या पाठात पाहिले होते. तो म्हणजे,
00:53 घरगुती अन्नकचरा आणि गाईचे शेण
00:58 बायोगॅससाठी आवश्यक अनऍरोबीक म्हणजे मुक्त प्राणवायू नसलेल्या वातावरण निर्मितीस शेण मदत करते.
01:07 मग बायोगॅस संयंत्रात कच्चा माल केव्हा समाविष्ट केला पाहिजे?
01:12 बांधकाम संपल्यावर ते पक्के होण्यासाठी १७ दिवस तसेच ठेवले जाते.
01:20 अठराव्या दिवशी संयंत्रात पहिल्यांदा कच्चा माल भरला जाऊ शकतो.
01:27 चित्रात दाखवल्याप्रमाणे मिश्रणाच्या टॅंक मध्ये आतल्या पाइपातून कच्चा माल भरला गेला पाहिजे.
01:37 या टप्प्यावर बायोगॅस संयंत्रात किती कच्चा माल समाविष्ट केला पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे.
01:50 बायोगॅसची पहिल्यांदा निर्मिती करण्यासाठी अंदाजे ६०० किलो गाईचे शेण घालून चार दिवस फसफसण्याची क्रिया होण्यासाठी ठेवून देणे हे त्याचे उत्तर.
02:08 चार दिवसानंतर संयंत्रात दररोज कमीत कमी २५ किलो कच्चा माल समाविष्ट करा.
02:17 त्याच्याबरोबर समप्रमाणात पाणी समाविष्ट करा.
02:24 याचाच अर्थ त्याचे १:१ हे प्रमाण राखले गेले पाहिजे.
02:31 उदाहरणार्थ २५ किलो कच्चा माल आणि २५ लिटर पाणी समाविष्ट केले गेले पाहिजे.
02:43 आता पुढे मिश्रण टॅंकमध्ये कच्चा माल कसा भरायचा ते जाणून घेऊ.
02:51 मिश्रण टॅंकमध्ये कच्चा माल भरण्यासाठी- प्रथम १:१ प्रमाणात कच्चा माल आणि पाणी योग्य पध्दतीने एकत्रित करा.
03:09 आणि नंतर हे मिश्रण पुरवठा टॅंकमध्ये टाका जी डायजेस्टरला जोडलेली आहे.
03:19 एकदा डायजेस्टर मिश्रणाने पूर्ण भरला गेला की संयंत्र फसफसण्याची क्रिया घडून येण्यासाठी ठेवा.
03:29 लक्षात घ्या, फसफसण्याच्या क्रियेसाठी लागणारा वेळ हा बायोगॅस संयंत्र प्रस्थापित केलेल्या भागातील हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असतो.
03:48 उदाहरणार्थ उबदार प्रदेशांमधे फसफसण्याची प्रक्रिया थंड प्रदेशांपेक्षा अधिक लवकर होते.
04:00 म्हणून उबदार प्रदेशांमधे विघटन करणा-या टॅंकमध्ये कच्चा माल ४-५ दिवसांसाठी ठेवून द्या.
04:12 एकदा फसफसण्याची क्रिया पूर्ण झाली की एकाचवेळी दोन गोष्टी होतात.
04:22 गॅस हलका असल्याने घुमटाच्या वरच्या भागात तो जमा होण्यास सुरूवात होईल आणि गॅसमुळे निर्माण झालेला दाब मळीला बाहेरच्या बाजूला ढकलेल.
04:40 ही मळी वापरण्याच्या विविध पध्दती खालील प्रकारे आहेत.
04:48 मळी नलिकेद्वारे थेट शेतामधे सोडली जाऊ शकते.
04:55 जवळपासच्या शेतात आपण स्वतः देखील ती नेऊन ओतू शकतो.
05:04 आणि कोरडे खत म्हणून वापरण्यासाठी ही त्यासाठी तयार केलेल्या खड्ड्यात वाळवता देखील येऊ शकते.
05:14 पुढे बायोगॅस वापरण्यासाठी योग्य बर्नरची निवड करण्याबाबत बोलणार आहोत.
05:24 संयंत्रामधे निर्माण झालेला गॅस मुख्य वायुनलिकेद्वारे नेला जातो.
05:32 ही मुख्य वायुनलिका पुढे योग्य बर्नरला जोडणे आवश्यक आहे.
05:42 मग कोणते बर्नर वापरणे आवश्यक आहे?
05:47 पुढील दोन प्रकारचे बर्नर उपलब्ध असतात- बायोगॅस बर्नर, एलपीजी बर्नर
05:58 कृपया लक्षात ठेवा की एलपीजी बर्नर बायोगॅससाठी वापरू नये.
06:07 कारण LPG बर्नर्स हे विशेषकरून उच्च दाबाच्या LPG साठी वापरले जातात.
06:18 त्यामुळे बायोगॅस वापरासाठी एलपीजी बर्नर योग्य नाहीत.
06:26 बायोगॅससाठी, कास्ट आयर्न म्हणजेच बिडाचे बर्नर विकत घेणे टिकाऊपणासाठी योग्य ठरतात.
06:38 एलपीजीच्या शेगड्यांप्रमाणेच बायोगॅसच्या शेगड्या देखील एक किंवा दोन बर्नरमधे उपलब्ध आहेत याची नोंद घ्यावी.
06:49 एका बर्नरची शेगडी ८ घनफूट आकाराची असते. आणि
06:56 दोन बर्नरची शेगडी १६ घनफूट आकाराची असते.
07:03 बायोगॅस शेगड्या कुठे खरेदी करता येतात?
07:08 बायोगॅस शेगडी खरेदी करण्यासाठी खादी ग्रामोद्योग आयोगाच्या संबंधित जिल्हा कार्यालयाशी संपर्क करू शकता जे KVIC नावानेही ओळखले जाते.
07:26 डाऊनलोड विभागात तुम्हाला पुढील संपर्काचा तपशील मिळू शकेल.
07:33 बायोगॅसच्या निर्मितीची खात्री करण्यासाठी हे करा-
07:39 बर्नर पेटवा आणि बायोगॅसची ज्योत तपासा.
07:44 तयार झालेला गॅस हा ४-५ लोकांच्या कुटुंबासाठी आवश्यक असलेले अन्न शिजवण्यासाठी पुरेसा असेल.
07:56 बायोगॅस संयंत्र चालविताना काय करावे आणि करू नये ते पाहू.-
08:03 दररोज मिश्रणाच्या टॅंकपासून डायजेस्टर टॅंकमध्ये जाणारा कच-याचा प्रवाह तपासा.
08:13 मळीच्या टॅंकमधून मळी बाहेर वाहत असल्याची खात्री करा.
08:19 मिश्रणाची टॅंक आणि मळी असलेली टॅंक उघडी ठेवू नका.
08:26 बायोगॅस बर्नर वापरताना काही सुरक्षेच्या उपयोजनांचा अवलंब करणे आवश्यक आहेः
08:32 प्रत्येक ४-५ दिवसांनंतर पाणी साचले असल्यास ते सोडून द्या.
08:42 खूप काळासाठी गॅसचा वापर होणार नसल्यास सुरक्षित व्हॉल्व बंद करून ठेवा.
08:50 यामुळे मळीबरोबरच गॅसही नलिकेतून बाहेर जाण्याची खात्री होईल.
09:00 आता आपण काही सुखी उपयोगकर्त्यांचे प्रशंसापत्र पाहू. स्वयंपाकासाठी बायोगॅस वापरणे किती सोयीचे आहे आणि त्यामुळे वेळ आणि पैशाची बचत होते ह्याबद्दल ते सांगत आहेत. शिवाय यामुळे स्वच्छता आणि आरोग्य यासाठी मदत होते हे त्यांच्याकडून कळेल.
09:22 नमस्कार, माझे नाव सुरेश सहदेव मांजरेकर आणि ही माझी पत्नी सुप्रिया सुरेश मांजरेकर.
09:34 आमचे पाच जणांचे कुटुंब असून आमच्याकडे दोन गायी आहेत.
09:44 बायोगॅस संयंत्राच्या टॅंकमध्ये दररोज मी गाईचे २५ किलो शेण आणि पाणी समप्रमाणात मिसळून ठेवतो.
10:00 तसेच बायोगॅस संयंत्राला माझ्याकडे शौचालय जोडलेले आहे. तुम्ही माझ्यामागे हे शौचालय बघू शकता.
10:10 बायोगॅस वापरणे अगदी सोपे आहे. ते वेळ आणि पैसा वाचवते.
10:18 पूर्वी मला जळणाचे लाकूड गोळा करण्यासाठी २५ मिनिटे चालावे लागे, आता ते गोळा करण्यासाठी कुठेही जावे लागत नाही.
10:30 तसेच संयंत्रातून बाहेर पडणारी मळी ही अडीच फूट खोल खड्ड्यात गोळा केली जाते.
10:42 नंतर मळीचा निचरा करण्यासाठी ती शेतात सोडली जाते.
10:50 बायोगॅसचा वापर करून मी अतिशय आनंदी आहे.
10:54 थोडक्यात
10:56 या पाठात आपण शिकलोः बायोगॅस संयंत्रात कच्चा माल केव्हा समाविष्ट करायचा
11:05 बायोगॅस संयंत्रात कच्चा माल समाविष्ट करण्याचे प्रमाण
11:11 मळीचा वापर करण्याच्या विविध पध्दती
11:15 बायोगॅस शेगड्यांचे विविध प्रकार
11:19 तसेच आपण बायोगॅसच्या वापरकर्त्यांचे प्रशंसापत्र देखील पाहिले.
11:25 हा व्हिडिओ IIT बॉम्बे, मधील Rural-ICT संघ व स्पोकन ट्युटोरियल संघाच्या सूक्ताने तयार केले आहे.
11:36 या प्रकल्पाच्या अधिक माहिती साठी या लिंकवर जाऊ शकता.
11:42 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana