Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc/C2/Basic-Data-Manipulation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 1: Line 1:
  =Resources for recording=
+
  '''Resources for recording'''
 
[[Media:Basicmanipulation.zip |Basic Data Manipulation]]
 
[[Media:Basicmanipulation.zip |Basic Data Manipulation]]
  

Revision as of 16:15, 8 March 2013

Resources for recording

Basic Data Manipulation


VISUAL CUE NARRATION
00:00 Calc च्या Basic Data Manipulation वरील Tutorial मध्ये आपले स्वागत.
00:07 या Tutorial मध्ये आपण शिकणार आहोत:
00:09 Formula वापरण्यासंबंधी प्राथमिक परिचय.
00:12 Column Sort करणे.
00:15 Data Filter बद्दलची प्राथमिक माहिती.
00:17 येथे आपण उबंटू लिनक्स व्हर्जन 10.04 ही ऑपरेटिंग सिस्टिम आणि लिबर ऑफिस 3.3.4 वापरणार आहोत.
00:27 कॅल्कमध्ये वापरल्या जाणा-या प्राथमिक सूत्रांच्या माहितीने ट्युटोरियलला सुरूवात करू.
00:35 सूत्रे, फॉर्म्युला म्हणजे समीकरणे. ह्यात संख्या आणि व्हेरिएबल्सचा वापर करतात.
00:41 येथे सेल्स व्हेरिएबल प्रमाणे वापरतात. त्यात समीकरणास आवश्यक डेटा ठेवला जातो.
00:47 मूलभूत गणिती क्रियांमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचा समावेश होतो.
00:56 आता आपण प्रथम 'Personal Finance Tracker.ods' ही फाईल उघडू.
01:02 वरील फाईलमधील "Cost" या हेडिंग खाली असलेल्या सर्व खर्चांची बेरीज कशी करता येते ते पाहू.
01:13 'Miscellaneous' या हेडिंगखाली 'SUM TOTAL' या नावाने अजून एक हेडिंग बनवा.
01:19 आता A8 सेलवर क्लिक करा आणि त्यात सिरियल नंबर '७' लिहा.
01:25 आता सेल C8 वर क्लिक करा जिथे आपण सर्व खर्चांची बेरीज मांडणार आहोत.
01:32 सर्व खर्चांची बेरीज करण्यासाठी टाईप करा. 'Is Equal to SUM' आणि गोल कंसात ज्या सेल रेंजची आपल्याला बेरीज करायची आहे ती रेंज म्हणजेच '(C3 colon C7)'.
01:44 आता एंटर दाबा.
01:47 तुम्हाला "Cost" खाली असलेल्या सर्व खर्चाची बेरीज झालेली दिसेल.
01:51 आत आपण कॅल्कमध्ये वजाबाकी कशी करायची ते पाहू.
01:55 जर आपल्याला "House Rent" आणि "Electricity Bill" यांची वजाबाकी करून आलेले उत्तर A9 मध्ये दाखवायचे असेल तर प्रथम A9 वर क्लिक करा.
02:06 या सेलमध्ये टाईप करा 'Is Equal to' आणि संबंधित सेल रेफरन्स म्हणजे 'C3 - C4'.
02:17 आता Enter दाबा.
02:20 आपल्याला दिसेल की दोन सेल रेफरन्स मधील खर्चांची वजाबाकी होऊन उत्तर A9 मध्ये आलेले असेल.
02:29 आपण केलेले बदल Undo करा.
02:32 अशाच पध्दतीने आपण भागाकार किंवा गुणाकारही करू शकतो.
02:37 स्प्रेडशीटमध्ये असलेली अजून एक प्राथमिक क्रिया म्हणजे सरासरी.
02:43 आता ती कशा पध्दतीने करतात ते पाहू.
02:45 Sum Total सेलच्या खाली Average या नावाने नवीन हेडिंग बनवा.
02:50 येथे आपण सर्व खर्चाची सरासरी काढणार आहोत.
02:55 आता C9 सेल वर क्लिक करा.
02:58 आणि टाईप करा 'Is Equal to Average' आणि कंसात '(Cost)'.
03:04 कीबोर्डवरील एंटर दाबा.
03:07 या सेलमध्ये तुम्हाला Cost या कॉलमची सरासरी दिसेल.
03:11 आपण केलेले बदल पुन्हा Undo करू या.
03:15 असेच आपण Row मधील सेल्सची सरासरी काढू शकतो.
03:20 Formula आणि Operators बद्दल Advance Tutorial मध्ये शिकू.
03:25 आता Calc मध्ये Data Sort कसा करतात ते पाहू.
03:30 सॉर्टद्वारे दृश्य सेल्सची क्रमवारी आपण इच्छेनुसार बदलू शकतो.
03:35 इथे आपल्याला एकापुढे एक असे तीनपर्यंत निकष वापरून Data Sort करता येतो.
03:43 डेटा मधील विशिष्ट Item शोधण्यासाठी Sorting व Filter उपयोगी होतात.
03:51 आपल्याला "Cost" खालील डेटा चढत्या क्रमाने सॉर्ट करायचा आहे.
03:57 सॉर्ट करायचे सेल्स सिलेक्ट करण्यासाठी "Cost" या सेलवर क्लिक करू.
04:03 आता माऊसचे लेफ्ट बटण दाबून ते "2000" लिहिलेल्या सेलपर्यंत Drag करू.
04:12 सॉर्ट करायचा कॉलम सिलेक्ट होईल.
04:15 मेनूबार मधील "Data Option" वर क्लिक करून मग "Sort" निवडा.
04:21 आता "Current Selection" या Option ची निवड करा.
04:24 तुम्हाला "Sort Criteria" आणि "Options" नावाचे दोन टॅब्स डायलॉग बॉक्समध्ये दिसतील.
04:31 "Sort Criteria" टॅबमध्ये "Sort By" या फिल्डमध्ये "Cost" ची निवड करा.
04:37 कॉस्ट चढत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी त्याच्या शेजारी असलेल्या "Ascending" Option वर क्लिक करा.
04:44 आता "OK" या बटणवर क्लिक करा.
04:47 तुम्हाला दिसेल की कॉलम चढत्या क्रमाने सॉर्ट झालेला आहे.
04:51 उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी "Descending" वर क्लिक करा. व नंतर "OK" क्लिक करा.
04:59 आता Spreadsheet मध्ये केलेले बदल Undo करा.
05:02 सर्व कॉलम एकदम सिलेक्ट करून ते सॉर्ट केल्यास एकावेळी अनेक कॉलम सॉर्ट होऊ शकतात.
05:09 समजा सिरियल नंबर आणि कॉस्ट हे कॉलम्स सॉर्ट करायचे आहेत.
05:14 आता पूर्वी केल्याप्रमाणे हे दोन्ही कॉलम सिलेक्ट करून घ्या.
05:18 आता मेनूबार मधील "Data" Option वर क्लिक करा आणि मग "Sort" वर क्लिक करा.
05:24 डायलॉग बॉक्समधील "Sort By" Field मध्ये पहिल्यांदा "Cost" निवडा
05:30 नंतर "Then By" Field मध्ये "SN" निवडा.
05:35 दोन्ही Option मध्ये "Descending" वर क्लिक करा आणि मग "OK" बटण दाबा.
05:43 ही दोन्ही हेडिंग उतरत्या क्रमात सॉर्ट झाली आहेत.
05:47 केलेले बदल पुन्हा Undo करू.
05:49 आता Data Filter कसा करायचा ते पाहू.
05:53 स्प्रेडशीट मधील फिल्टर म्हणजे एक किंवा अनेक कसोटींवर खरे ठरणारे Data items screen वर दाखवणे.
06:00 Spreadsheet मध्ये Filter सुरू करण्यासाठी "Item" नावाच्या सेलवर क्लिक करा.
06:07 आता मेनूबार मधील "Data" Option वर क्लिक करा आणि मग "Filter" वर क्लिक करा.
06:12 Pop-Up मेनूमध्ये "Auto Filter" Option वर क्लिक करा.
06:16 तुम्हाला हेडिंगवर बाणाचे चिन्ह आलेले दिसेल.
06:20 आता "Item" नामक सेलवरील down arrow वर क्लिक करा.
06:24 जर आपल्याला फक्त Electricity Bill संबंधित Data बघायचा असेल,
06:29 तर "Electricity Bill" Option वर क्लिक करा.
06:34 आपल्याला फक्त Electricity Bill संबंधित Data येथे दिसेल.
06:40 बाकीचे सर्व Options Filter झाले आहेत.
06:43 सर्व Data बघण्यासाठी "Item" नामक सेलवरील down arrow वर क्लिक करा आणि मग "All" वर क्लिक करा.
06:52 अशा पध्दतीने तुम्हाला पूर्ण Data बघता येईल.
06:59 Auto Filter शिवाय अजून दोन Filter Options आहेत "Standard Filter" आणि "Advanced Filter".
07:11 आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
07:15 आपण जे शिकलो ते थोडक्यात पाहू या.
07:18 Formula संबंधी प्राथमिक परिचय.
07:21 Column Sort करणे.
07:23 Data Filters बद्दलची प्राथमिक माहिती.
07:26 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
07:30 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:33 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
07:40 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:43 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते..
07:47 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:53 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:58 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD,Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:06 यासंबंधी माहिती
08:08 पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:16 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha