Difference between revisions of "Drupal/C3/Modifying-the-Page-Layout/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 95: Line 95:
 
|-
 
|-
 
| 02:48
 
| 02:48
| येथे वरती 'Demonstrate Block Regions' आहे.
+
| येथे वरती 'Demonstrate Block Regions' आहे.त्यावर क्लिक करा.
 
+
|-
+
| 02:52
+
| त्यावर क्लिक करा.
+
 
+
 
|-
 
|-
 
| 02:53
 
| 02:53

Revision as of 18:46, 17 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या 'Modifying the Page Layout' वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोतः 'Layouts', 'Block Configuration', 'Permissions' आणि 'blocks' काढून टाकणे आणि क्रमाने लावणे.
00:16 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम, 'Drupal 8' आणि 'Firefox' वेब ब्राउजर.
00:26 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:30 प्रथम 'layout' बद्दल जाणून घेऊ.
00:33 येथे 'Themes' आणि 'Blocks' ची ओळख करून घेऊ.
00:37 'Themes' आपल्या साईटला एक सामान्य लेआउट आणि चेहरामोहरा देते.
00:42 'Themes' बद्दल थोड्या वेळाने जाणून घेऊ.
00:47 कंटेंट बदलल्याशिवाय ड्रुपल साईटवर 'Theme' लागू करता येतात हे लक्षात घ्या.
00:54 आणि हे ब्लॉक्सची कलर स्कीम आणि लोकेशन तसेच टेक्स्ट आणि इमेजेस साठीचे सर्व फॉरमॅटिंग दाखवते.
01:03 याआधी ब्लॉकस ही एकप्रकारची माहिती असते जी साईटच्या विविध भागात ठेवू शकतो हे आपण शिकलो.
01:10 'Blocks हे Block regions' मधे असून 'Block regions' ला 'Theme' द्वारे निर्धारित केले जाते.
01:15 डिजाइनिंगच्या विश्वात, आपल्याजवळ 'Blocks', 'Themes' आणि 'Menus' आहेत.
01:23 पूर्वी आपण 'Themes' बद्दल आणि त्या लागू करण्याबद्दल जाणून घेतलेले नाही.
01:29 साईट तयार करत असताना 'Theme' कधीही लागू करू शकतो हे दाखवण्यासाठी असे करण्यात आले.
01:36 हे करण्यासाठी आपण आत्तापर्यंत थांबलो कारण 'Theme' लागू करण्यासाठी शेवटपर्यंत थांबू शकतो हे दाखवायचे होते.
01:42 परंतु माझी 'Theme' तयार होताच ती लागू करणे मी पसंत करते.
01:49 आधी तयार केलेली वेबसाईट उघडू.
01:52 'Blocks' आणि 'Block regions' असलेल्या 'layout' मधे जाऊ.
01:58 'Blocks' आपणास माहिती कुठल्याही ठिकाणी ठेवायला सक्षम करतात.
02:03 'Structure' खालील 'Block layout' वर जा.
02:06 चालू 'theme' मधे उपलब्ध असलेले सर्व ब्लॉक्स येथे आहेत.
02:11 उदाहरणार्थ : 'Header, Primary Menu, Secondary Menu' इत्यादी.
02:18 आपण त्यापैकी काही आधीच स्थानबध्द केले आहेत.
02:22 आपण साईडबारमधे 'Welcome To Drupalville हा custom block' स्थानबध्द केल्याचे आठवत असेल.
02:28 ह्या विशिष्ट 'theme' मधे डावीकडील साईडबारमधे हे दिसत आहे.
02:33 आपण डावीकडील साईडबारमधे 'Recent Events Added' हा 'view' देखील समाविष्ट केला आहे.
02:39 आता ब्लॉक्स कसे कॉनफिगर करायचे आणि परमिशन्स कशा द्यायच्या हे जाणून घेऊ.
02:44 प्रथम कोणता ब्लॉक कशासाठी आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे.
02:48 येथे वरती 'Demonstrate Block Regions' आहे.त्यावर क्लिक करा.
02:53 जिथे ब्लॉक्सचा भाग असतो तिथे ड्रुपलमधील प्रत्येक 'theme' अशाप्रकारचे चित्र दाखवते.
03:00 'Block' हा भाग 'themes' वर अवलंबून असतो.
03:04 'Bartik' मधे हे पर्याय आहेत.
03:07 'Secondary Menu, Header',
03:09 'Primary Menu, Highlighted, Featured top, Breadcrumb, Sidebar first, Content'
03:16 'Sidebar second'
03:18 आपण कोणताही ब्लॉक कुठल्याही भागात ठेवू शकतो.
03:21 जसे की 'Content' हा ब्लॉक कंटेंट भागात डावीकडे असला पाहिजे.
03:27 'Exit' क्लिक करा.
03:30 'Breadcrumbs' ब्लॉक्स 'Breadcrumb' भागातच राहू द्या.
03:34 परंतु इतर काही गोष्टींचे स्थान आपण इतर ठिकाणी हलवू शकतो.
03:38 'Search' हा ब्लॉक हलवण्यासाठी त्यावर क्लिक करून तो ड्रॅग करा किंवा
03:43 ड्रॉपडाउन क्लिक करून 'Header' हा पर्याय निवडा. ते वरच्या बाजूला स्थानांतरित होईल.
03:49 अशाप्रकारे 'Welcome to Drupalville हे Sidebar first' च्या वरच्या भागात ठेवा.
03:55 'Save' बटनावर क्लिक करून केलेले बदल सेव्ह करा.
03:59 केलेले बदल बघण्यासाठी 'Homepage' वर जा.
04:03 येथे 'header' मधे वरती आपला सर्चबार आहे.
04:06 आणि 'Welcome to Drupalville' हा ब्लॉक सर्वात वरच्या बाजूला आहे.
04:11 अशाप्रकारे आपण ब्लॉक्सची जागा आणि क्रम ठरवू शकतो.
04:15 आता 'Blocks' च्या 'configurations' आणि 'permissions' बद्दल जाणून घेऊ.
04:20 'Structure' खालील 'Block layout' वर क्लिक करा.
04:24 आणि 'Recent Events Added' ब्लॉक शोधा.
04:27 सध्या हे 'Sidebar first' या ब्लॉकमधे असून ते प्रत्येक पेजवर दिसत आहे.
04:33 'Configure' क्लिक करा.
04:35 सध्या 'Recent Events Added' ब्लॉक प्रत्येक ठिकाणी दिसत आहे.
04:40 परंतु आपल्याला ते केवळ 'event page' वर बघायचे आहे.
04:44 'Events' या चेकबॉक्सवर क्लिक करून 'Save Block' क्लिक करा.
04:49 पुन्हा खाली स्क्रोल करा. आणि 'Save Block' वर क्लिक करा.
04:54 'Back to site' क्लिक करा.
04:56 आता 'Recent Events Added' ब्लॉक तेथे उपलब्ध नाही.
05:00 परंतु 'event' वर गेल्यावर आपण 'Recent Events Added' बघू शकतो.
05:05 आता येथे 'Welcome to Drupalville' ब्लॉकखाली आपण वेलकम मेसेज बघू शकतो जो एकदा लॉगिन केल्यावर पुन्हा त्याची आवश्यकता नाही.
05:15 हे लपवूया.
05:17 येथे या छोट्या 'pencil' वर क्लिक करून 'Configure block' निवडा.
05:22 ड्रुपलमधली महत्वाची गोष्ट म्हणजे, पेन्सिल किंवा गियरचा उपयोग करून 'front end' एडिट करू शकतो.
05:29 'Content type' द्वारे मर्यादा घालण्याऐवजी, यास एका पेजपुरते मर्यादित ठेवू.
05:35 येथे पहा, ’Specify pages by using their paths..’.
05:40 फ्रंट पेजवर काही दाखवण्यासाठी किंवा काही लपवण्यासाठी 'angle bracket- front- angle bracket' चा उपयोग करा.
05:47 'Copy' करून 'paste' करा. आता "Show for the listed page" पर्याय निवडा.
05:52 आपला 'welcome block' केवळ 'Homepage' वर असेल.
05:58 आता एक टप्पा पुढे जाऊ.
06:00 'Roles' वर क्लिक करून 'Anonymous user' पर्याय निवडा.
06:05 आणि 'Save block' क्लिक करा.
06:07 आता तुम्ही जेव्हा लॉगिन केलेले नसेल केवळ तेव्हा हे दिसेल.
06:12 आता आपल्याला हा मेसेज दिसत नाही कारण आपण लॉगिन केलेले आहे.
06:16 लॉगआउट करा 'Welcome to Drupalville' block पुन्हा दिसत आहे.
06:21 परंतु लॉगिन करून जेव्हा 'Home' वर क्लिक करतो, ते येथे दिसत नाही.
06:27 अशाप्रकारे 'Block' मधे कॉनफिगर करणे, त्यांचे स्थान बदलणे आणि पर्मिशन्स देणे खूपच सोपे आहे.
06:34 याचा आणखी सराव करा.
06:36 'Structure' क्लिक करून 'Blocks' वर क्लिक करा.
06:40 'Primary menu', block मधे 'Main navigation' आहे.
06:44 आपण त्याचे स्थान बदलल्यास, 'Main navigation' पूर्णपणे वेगळ्या स्थानी गेलेले असेल.
06:51 येथे खाली आपल्याकडे 'Featured bottom first, second' आणि 'third' तसेच,
06:58 'Footer first, second, third, fourth' आणि 'fifth' हे ब्लॉक्स आहेत.
07:03 'Footer fifth' मधे 'Powered by Drupal' आणि 'Footer' मेनू आहेत.
07:08 येथे एकही डिसेबल केलेले 'blocks' नाहीत.
07:12 'Footer first' या 'block' मधे आपला एखादा मेनू समाविष्ट करू.
07:17 वरच्या बाजूला स्क्रोल करा.
07:19 आपले 'User account menu' शोधून ते 'Footer first' मधे समाविष्ट करा.
07:25 ते लगेच खालच्या बाजूला जाईल.
07:28 आता 'Save blocks' वर क्लिक करा.
07:31 साईट वर परत जाऊ.
07:33 खाली स्क्रोल करा. दिसेल की 'user account' वरती असण्याऐवजी खाली 'footer' मधे आले आहे.
07:40 म्हणजेच कोणत्याही 'block' ला कोणत्याही हेतूने कोठेही ठेवता येते.
07:45 'Structure' खालील 'Block layout' वर परत जा.
07:49 आता 'block' काढून टाका.
07:52 'Footer fifth block' मधून 'Powered by Drupal' काढून टाका.
07:57 केवळ ड्रॉप-डाउनवर क्लिक करा आणि None निवडा. नंतर 'Save blocks' क्लिक करा.
08:04 खाली स्क्रोल करा.
08:06 'Powered by Drupal' हा 'block' आता 'disabled' या भागात बघायला मिळेल.
08:12 हे पूर्णपणे काढून टाकले गेले आहे हे पाहण्यासाठी 'Back to site' क्लिक करा.
08:16 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
08:19 थोडक्यात,
08:21 या पाठात शिकलो, 'Layouts', 'Block Configuration', 'Permissions' आणि 'blocks' काढून टाकणे आणि क्रमाने लावणे.
08:42 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉमबेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे
08:50 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
08:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
09:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:15 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana