Difference between revisions of "Drupal/C3/Table-of-Fields-with-Views/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 427: | Line 427: | ||
| 12:20 | | 12:20 | ||
| याचबरोबर आपण Table View पूर्ण केला. | | याचबरोबर आपण Table View पूर्ण केला. | ||
+ | |||
|- | |- | ||
|12:24 | |12:24 | ||
Line 434: | Line 435: | ||
| 12:26 | | 12:26 | ||
| या पाठात शिकलो, | | या पाठात शिकलो, | ||
− | + | फिल्डसची टेबल्स बनवणे. | |
+ | |||
|- | |- | ||
| 12:41 | | 12:41 |
Revision as of 11:19, 7 September 2016
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Table of Fields with Views वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात आपण शिकणार आहोत: फिल्डसची टेबल्स बनवणे. |
00:12 | या पाठासाठी आपण वापरणार आहोत,
|
00:23 | तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता. |
00:27 | आता आपण फिल्डसची टेबल म्हणजे काय ते पाहू. |
00:31 | समजा, भविष्यात आपल्याला इवेंट्सची सूची या प्रकारे टेबलरूपात दाखवायची आहे. |
00:38 | येथे युजर, इवेंट्सची काही माहिती आणि संबंधित तारखा पाहू शकेल. |
00:45 | येथे दाखवलेली फिल्डस, तिथे Events' Content type मधे आहेत. |
00:50 | येथे आपण फक्त काही इवेंट्स ची काही फिल्डसच दाखवत आहोत. |
00:55 | विशेषत:, आपण फक्त अशा इवेंट्स दाखवत आहोत की ज्यांची तारीख आजच्या नंतर आहे. |
01:02 | या त-हेच्या कंटेंट्सच्या सूचीला इतर प्रोग्राममधे Reports किंवा Query Results सुध्दा म्हटले जाते. |
01:11 | आता fields च्या table साठी view बनवू. |
01:16 | आधी तयार केलेली वेबसाईट उघडू. |
01:21 | Shortcuts वर जाऊन नंतर Views क्लिक करा. आणि नंतर Add new view क्लिक करा. |
01:28 | आपण याला Upcoming Events नाव देऊ. आता Content of type ला "All" वरून "Events" मधे बदलू. |
01:37 | हे आपण कुठल्याही Content type साठी करू शकतो – Log entries, Files, Content revisions, Taxonomy terms, Users, Custom blocks इत्यादी. |
01:50 | आत्तासाठी sorted by ला Newest first च ठेवू. |
01:55 | Create a page चेक करू आणि Display format मधे Table of fields निवडू. |
02:03 | आपण Items to display मधे डिफॉल्ट व्हॅल्यू 10 हीच ठेवू. |
02:09 | आता Use a pager आणि Create a menu link वर चेक करू. |
02:17 | मेनूमधे आपण Main navigation निवडू आणि Link text मधे Upcoming Events निवडू. |
02:28 | आपले मेनू अजून चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज्ड नाहीत. परंतु लवकरच आपण ते करू. |
02:34 | Save and edit क्लिक करा. |
02:37 | आपले 5 प्रश्न पाहू.
Display हे पेज आहे. |
02:42 | FORMAT हे table आहे. |
02:45 | FIELDS मधे आपल्याकडे Title आहे. |
02:48 | FILTER CRITERIA मधे फक्त Upcoming events हव्या आहेत. म्हणून तो बदलण्याची गरज आहे. |
02:55 | SORT CRITERIA चुकीचा आहे कारण हा Event date च्या क्रमाने ठेवायला हवा, Published date नुसार नको. |
03:03 | सुरू करण्यासाठी Save क्लिक करा. |
03:06 | येथे मधे, आपल्याकडे PAGE SETTINGS आहेत. |
03:10 | आपल्याकडे Path, Menu, Access Permission आहे. आता प्रत्येकजण लँडिग पेज एक्सेस करेल. |
03:20 | येथे आपण Add बटन क्लिक करून HEADER किंवा FOOTER समाविष्ट करू शकतो. |
03:27 | कोणतेही रिझल्ट्स न मिळाल्यास काय करायचे ते येथे सांगू शकतो. |
03:31 | एका पानावर किती आयटम्स दाखवायचे, |
03:36 | आणि येथे खाली View च्या तळाशी Read More लिंक सह pager आहे वा नाही ते ही येथे सांगू शकतो. |
03:44 | ADVANCED टॅबमधे येथे आणखीही खूप गोष्टी आहेत ज्या आपण या पाठात पाहणार नाही. |
03:50 | आपण आधीच Events आणि User Groups ला जोडलेले आहोत. |
03:54 | त्याद्वारे आपली Events प्रायोजित करत असलेल्या User Groups बद्दलची माहिती घेऊन नंतर त्यांनाही या View मधे ठेवू. |
04:03 | हे आपण तयार केलेल्या RELATIONSHIPS आणि CONTEXT चा उपयोग करून केले जाते. |
04:10 | आता पुढे जाऊ आणि टेबलमधे हवी असलेली fields समाविष्ट करू. |
04:15 | Add क्लिक करा. आणि Event Date field येईपर्यंत खाली स्क्रोल करा. |
04:21 | Content type name वापरून आपण fields ना काळजीपूर्वक label दिली आहेत. |
04:27 | म्हणजे Views मधे ती आपण सहजपणे मिळवू शकू. |
04:32 | Event Date चेक करा आणि Apply क्लिक करा. |
04:37 | येथे आपण काही सेटिंग्स निवडू. |
04:41 | आतासाठी, Create a label आणि Place a colon पर्याय चेक केलेले आहेत. |
04:47 | Date format डिफॉल्ट राहू द्या म्हणजेच medium date. |
04:53 | आत्ता याची काळजी करू नका. |
04:57 | आणि शेवटी Apply all displays बटनावर क्लिक करा. |
05:02 | आपल्याजवळ दोन कॉलम्स - TITLE आणि EVENT DATE आहेत. |
05:08 | आपले पुढचे field समाविष्ट करू. Add क्लिक करा. आणि यावेळी Event Logo वर जाईपर्यंत खाली स्क्रोल करा. |
05:17 | हे निवडा आणि Apply क्लिक करा. |
05:21 | यावेळी Create a label पर्याय अनचेक करा. |
05:25 | Thumbnail ची Image style निवडू. |
05:30 | नंतर, Link image to ड्रॉपडाउन मधे Content निवडू. |
05:36 | पुढच्या पाठांत या लेआऊटसाठी आपण नवीन Image style बनवायला शिकू. परंतु आत्तासाठी Thumbnail निवडू. |
05:45 | Apply क्लिक करा. आता आपल्याला preview मधे thumbnails दिसले पाहिजेत. जे devel ने प्रत्येक Event साठी तयार केले आहेत. |
05:55 | परत जाऊ आणि पुन्हा Add क्लिक करू. यावेळी खाली स्क्रोल करा आणि एकापेक्षा अधिक फिल्डस निवडू. |
06:04 | Event Topics आणि Event Website निवडू. आणि नंतर Apply all displays बटनावर क्लिक करू. |
06:13 | पुढच्या पानावर सर्व आहे असेच राहू द्या आणि Apply क्लिक करा. |
06:18 | लक्षात घ्या, आता आपण Views मधे एकावेळी दोन फिल्डस सेट करू शकतो. आणि प्रत्येकाचा स्वतःचा Settings स्क्रीन असेल. |
06:27 | परत Apply all displays' क्लिक करा. |
06:32 | आता आपल्याकडे EVENT TOPICS आणि EVENT WEBSITE आहेत. |
06:37 | आपल्याकडे आपली title, date, topics आणि website आहे. Save क्लिक करा. |
06:45 | आपले काम नियमित सेव्ह करणे ही चांगली सवय आहे. |
06:49 | पहा. आपला Display एक Page आहे. |
06:53 | आपला FORMAT एक Table आहे. |
06:56 | आपली FIELDS सेट आहेत. |
06:59 | FILTER CRITERIA आणि SORT CRITERIA अजूनही चुकीचे आहेत. |
07:04 | FILTER CRITERIA, समाविष्ट करण्यासाठी Add बटनावर क्लिक करा. |
07:08 | Event Date येईपर्यंत खाली स्क्रोल करा. नंतर Event Date निवडा आणि Apply क्लिक करा. |
07:17 | हा स्क्रीन अतिशय महत्वपूर्ण आहे. |
07:20 | Operator ड्रॉपडाउन मधे आपण "Is greater than or equal to" निवडू. |
07:26 | Value type मधे आपण आजची तारीख घातल्यास हे गैरसोयीचे होईल. |
07:32 | आपल्याला प्रत्येक दिवशी नवीन तारीख टाकावी लागेल. परंतु आपण "An offset of the current time..." निवडू शकतो. |
07:40 | आणि Value फिल्डमधे “now” टाईप करू. |
07:45 | याचा अर्थ, फक्त चालू वेळेच्या नंतरच्या इवेंट्स दाखवल्या जातील. |
07:51 | सध्याची वेळ म्हणजे हे बनवण्याची वेळ नव्हे. ती वेळ, जेव्हा युजर हे पहात असेल. |
07:59 | म्हणजेच युजर फक्त भविष्यातल्या इवेंट्स पाहू शकेल. |
08:03 | Apply क्लिक करा. |
08:05 | आपल्याला दिसेल की, devel ने बनवलेले डमी कंटेंट आपल्याला भविष्यातील तारखा दाखवत नाही. |
08:13 | आपला View योग्य प्रकारे कार्य करत आहे ह्याची खात्री करण्यासाठी, आपणच काही इवेंट्स अपडेट करू. |
08:20 | काही इवेंट्स शोधून त्यांच्या Event Date मधे भविष्यातील कुठलीही तारीख टाकू. |
08:25 | Content वर जा. Events Type वर Filter करा. |
08:31 | कोणतीही इवेंट निवडून Edit क्लिक करा. नंतर, तारखेस भविष्यातील एखाद्या तारखेने बदला. |
08:39 | Save क्लिक करा. |
08:42 | पाठ पॉझ करून अंदाजे 6 किंवा 7 इवेंट्स update करू. |
08:49 | पाठाकडे परत जाऊ. |
08:53 | Shortcuts वर जा. Views क्लिक करा. Upcoming Events शोधा. Edit क्लिक करा. |
09:01 | आता view एडिट करण्यासाठी जिथे त्यास सोडले होते तिथे परत जाऊ. |
09:06 | प्रिव्ह्यू पाहण्यासाठी खाली स्क्रोल करू. |
09:10 | आता आपण greater than or equal to now वापरून Event Date वर योग्य फिल्टरिंग करत आहोत. |
09:17 | आपण पुन्हा SORT CRITERIA चेक करू. |
09:22 | डिफॉल्ट रूपात, ड्रुपल लिखाणाच्या तारखेनुसार उतरत्या क्रमाने कंटेंट सॉर्ट करतो. |
09:30 | Events साठी, सॉर्टिंग Event Date वर चढत्या क्रमाने असणे उपयोगी आहे. |
09:37 | हे बदलण्यासाठी Authored on वर क्लिक करा, आणि Remove क्लिक करा. |
09:44 | Add क्लिक करा. आणि परत Event Date मिळेपर्यंत खाली स्क्रोल करा. |
09:51 | Apply क्लिक करा. |
09:53 | आता Order मधे, Sort ascending निवडू. ज्याद्वारे इवेंट्स आजपासून सॉर्ट केल्या जातील. |
10:03 | Apply क्लिक करा. |
10:05 | आता आपण Events अपडेट केल्या आहेत आणि योग्य Sort Criteria सेट केला आहे. |
10:11 | आता आपल्याला आपली सूची काहीशी अशाप्रकारे दिसेल. |
10:16 | भविष्यातील सर्व आगामी इवेंट्स EVENT DATE च्या क्रमाने सूचीबद्ध आहेत. |
10:23 | पुढे जाण्यापूर्वी आपण Save वर क्लिक केल्याची खात्री करा. |
10:27 | या विशेष View साठी आपण आणखी एक गोष्ट करणार आहोत. |
10:32 | TITLE आणि Logo कॉलम्स समाविष्ट करून परत TITLE आणि EVENT DATE ला सॉर्ट करण्यायोग्य बनवू. |
10:41 | आपण हे करत असताना, युजर TITLE वर क्लिक करू शकतो आणि हे त्या फीचरवर सॉर्ट होईल. |
10:48 | वरती स्क्रोल करा. FORMAT, Table वर जा आणि नंतर, Settings वर क्लिक करा. |
10:57 | Content Event Logo, मधे, COLUMN ड्रॉपडाउन मधून Title निवडू. |
11:03 | येथे SEPARATOR साठी, फक्त सिम्पल लाइन ब्रेक समाविष्ट करा. |
11:08 | Title आणि Event Date कॉलम्सना चढत्या क्रमाने SORTABLE करा आणि परत Apply क्लिक करा. |
11:17 | आता आपले Title आणि logo एकाच कॉलम मधे आहेत आणि दोन्ही, TITLE आणि EVENT DATE आता सॉर्टेबल आहेत. |
11:26 | Title ला Event Name मधे बदलू. |
11:31 | "Title" क्लिक करा. आणि Label मधे "Title" ला "Event Name" मधे बदला. नंतर Apply क्लिक करा. |
11:40 | प्रिव्ह्यू एरिया मधे स्क्रोल करा. आपले Event Name, logo आणि date सर्व सेट आहेत. |
11:48 | नंतरच्या पाठामधे आपण आपला लोगो चांगला बनवण्यासाठी त्याचा साइज बदलण्यास शिकू. |
11:55 | Save क्लिक करा, आणि View टेस्ट करा. |
11:59 | Homepage वर जाण्यासाठी Back to site क्लिक करा. |
12:03 | Upcoming Events क्लिक करा. |
12:06 | आपल्याला आगामी इवेंट्सचे table व्यवस्थित दिसले पाहिजे. |
12:13 | आपल्याला हेही पाहता येईल की Event Name आणि Event Date वर आपण सॉर्ट करू शकतो. |
12:20 | याचबरोबर आपण Table View पूर्ण केला. |
12:24 | थोडक्यात, |
12:26 | या पाठात शिकलो,
फिल्डसची टेबल्स बनवणे. |
12:41 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
12:51 | या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. |
12:58 | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:19 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |