Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C3/Polygons-and-Curves/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 290: | Line 290: | ||
|- | |- | ||
|11:14 | |11:14 | ||
− | |हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून | + | |हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |
|- | |- | ||
|} | |} |
Latest revision as of 12:14, 8 October 2015
Time | Narration |
00:01 | लिबर ऑफिस ड्रॉच्या Creating Curves and Polygons वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात पॉलिगॉन आणि कर्व्हज याबद्दल शिकणार आहोत. |
00:14 | यासाठी तुम्हाला लिबर ऑफिस ड्रॉचे प्राथमिक ज्ञान असावे. नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:25 | येथे आपण उबंटु लिनक्स वर्जन 10.04 आणि लिबर ऑफिस सुट वर्जन 3.3.4 वापरू. |
00:34 | पॉलिगॉन्स म्हणजे काय? पॉली म्हणजे अनेक. अनेक बाजू असलेली आकृती म्हणजे पॉलिगॉन. |
00:43 | या स्लाईडवर दाखवल्याप्रमाणे नकाशा कसा काढायचा ते शिकू. हा नकाशा घरापासून शाळेपर्यंतचा रस्ता दाखवत आहे. |
00:53 | या पाठाच्या शेवटी तुम्ही अशीच दुसरी आकृती काढू शकाल. |
01:00 | आता ड्रॉ वर जाऊ. मी ही फाईल RouteMap नावाने डेस्कटॉपवर सेव्ह केली आहे. |
01:09 | प्रथम Grid view सुरू करू. त्यासाठी View वर क्लिक करून Grid खालील Display Grid हा पर्याय निवडा. |
01:19 | आकृती काढायला सुरूवात करण्यापूर्वी पानाचा समास आणि ओरिएंटेशन सेट करून घेऊ. |
01:26 | ड्रॉच्या पेजवर कर्सर नेऊन कंटेक्स्ट (Context) मेनूसाठी त्यावर राईट क्लिक करा. |
01:33 | Page मधील Page Setup पर्याय निवडा. |
01:36 | Page Setup चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
01:40 | Format च्या ड्रॉप डाऊन मधून A4 सिलेक्ट करा आणि Portrait हे ओरिएंटेशन निवडा. |
01:49 | Left, Right, Top आणि Bottom margins 1 वर सेट करून OK क्लिक करा. |
01:57 | डिफॉल्ट फाँट साईज 24 वर सेट करा. |
02:02 | मुख्य मेनूतील Format खालील Character पर्याय निवडा. |
02:06 | Character चा डायलॉग बॉक्स उघडेल. |
02:10 | Fonts टॅबवर क्लिक करा. Size फिल्डमधे खाली स्क्रॉल करून 24 हा पर्याय निवडून OK
क्लिक करा. |
02:18 | ह्यामुळे विविध आकृत्यांमधे लिहिलेला मजकूर स्पष्टपणे दिसेल. |
02:24 | आता घराचे चित्र काढायला सुरूवात करू. |
02:28 | घर दाखवण्यासाठी एक चौरस काढून त्यात Home असे टाईप करा. |
02:37 | पुढे घराच्या उजवीकडे बाग काढू. |
02:42 | ही विषम आकाराची आयताकृती बाग आहे. डावी बाजू ही उजव्या बाजूपेक्षा अधिक रुंद आहे. |
02:51 | हे दाखवण्यासाठी पॉलिगॉन म्हणजेच बहुभुजाकृती वापरू. त्यासाठी Drawing टूलबारवर जाऊ. |
02:58 | Curve वर क्लिक करून आयकॉनच्या पुढे असलेल्या छोट्या काळ्या रंगाच्या बाणावर क्लिक करा. |
03:04 | Polygon filled पर्याय निवडा. |
03:08 | माऊसचा कर्सर ड्रॉ पेजवर न्या. त्याचे डावे बटण दाबून ठेवा आणि कर्सर खालच्या बाजूला ड्रॅग करून बटण सोडून द्या. |
03:18 | आपण सरळ रेषा काढली आहे. काटकोन त्रिकोण तयार होईपर्यंत माऊस उजवीकडे ड्रॅग करा. |
03:26 | माऊसचे डावे बटण दाबून माऊस वरच्या बाजूला ड्रॅग करा. आता माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा. |
03:35 | अशाप्रकारे पॉलिगॉन तयार झाला आहे. त्यात Park असे टाईप करा. |
03:41 | Park च्या पुढे Commercial Complex आहे. ही देखील विचित्र आकाराची बहुभुजाकृती आहे. चला काढू या. |
03:50 | Drawing टूलबारवर जाऊन Curve आयकॉनच्या पुढील छोट्या काळ्या बटणावर क्लिक करा आणि Polygon filled पर्यायावर क्लिक करा. |
04:00 | कर्सर ड्रॉ पेपरवर नेऊन ठेवा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवा आणि खाली ड्रॅग करा. |
04:07 | आता माऊसचे बटण सोडा. एक सरळ रेषा दिसेल. आता त्रिकोण तयार होईपर्यंत माऊस पॉईंटर डावीकडे ड्रॅग करा. |
04:19 | माऊसच्या डाव्या बटणावर क्लिक करून तो वरच्या दिशेला ड्रॅग करा. आता शिफ्टचे बटण दाबून ठेवा आणि कर्सर आतील बाजूला ड्रॅग करा. |
04:31 | माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा. |
04:35 | अशाप्रकारे आणखी एक पॉलिगॉन तयार झाला. त्यामधे Commercial Complex असे टाईप करा. |
04:45 | याचप्रकारे पार्किंग लॉट देखील काढून घेऊ. ड्रॉईंग टूलबारमधून Polygon filled निवडा. नंतर कर्सर ड्रॉ पेजवर नेऊन पॉलिगॉन काढा. |
05:02 | त्याच्या आत Parking Lot असे टाईप करा. |
05:08 | लक्षात घ्या की तुम्ही हव्या तेवढ्या बाजू असलेली बहुभुजाकृती काढू शकता. |
05:14 | पाठ पॉज करून ही असाईनमेंट करा. पाच बाजू, सहा बाजू आणि दहा बाजू असलेली बहुभुजाकृती काढा. |
05:23 | घराच्या उजव्या बाजूला Residential Complex आहे जो आयताकृती आहे. |
05:30 | ड्रॉईंग टूलबारवरून Rectangle निवडा. |
05:35 | ड्रॉ पेजवर माऊसचा कर्सर ठेवा आणि आयत काढण्यासाठी कर्सर ड्रॅग करा. |
05:41 | त्याला Residential Complex असे नाव देऊ. |
05:45 | या परिसरात Play Ground देखील आहे. हे लांबट आयताकृती आहे. |
05:53 | ड्रॉईंग टूलबारवरून Polygon 45 degree Filled हा पर्याय निवडा. |
05:59 | ड्रॉ पेजवर कर्सर न्या. माऊसचे डावे बटण क्लिक करून खाली ड्रॅग करा आणि सोडून द्या. |
06:07 | माऊसचे बटण क्लिक करून ते उजवीकडे ड्रॅग करा आणि सोडून द्या. आता आयत पूर्ण करण्यासाठी माऊस क्लिक करून तो वरच्या बाजूला ड्रॅग करा. |
06:17 | माऊसचे डावे बटण दोनदा क्लिक करा. |
06:21 | आणखी एक पॉलिगॉन तयार झाला आहे. |
06:25 | आतमधे Play Ground असे टाईप करा. |
06:30 | आता Play Ground च्या पुढे Lake काढू. |
06:35 | ड्रॉईंग टूलबारवरील Freeform Line filled पर्याय निवडा. |
06:40 | ड्रॉ पेजवर जाऊन माऊसचे डावे बटण दाबा. माऊस घड्याळाच्या काट्याच्या विरूध्द दिशेने फिरवून माऊसचे डावे बटण सोडून द्या. |
06:52 | आपला तलाव काढून झाला आहे त्यात Lake असे टाईप करा. |
06:58 | या परिसरातील शेवटची बिल्डींग म्हणजे शाळा. School campus देखील बहुभुजाकृती आकारात आहे. |
07:07 | आता हे आपल्या नकाशावर काढू. पुन्हा ड्राईंग टूलबारवरील Polygon 45 degree filled पर्याय निवडा. |
07:17 | पुढे ड्रॉ पेजवर कर्सर न्या आणि बहुभुजाकृती काढा. ती काढून पूर्ण झाल्यावर माऊस दोनदा क्लिक करा. |
07:28 | त्याच्या आत School Campus असे टाईप करा. |
07:34 | आता एक टेक्स्ट बॉक्स समाविष्ट करून त्यात School Main Gates असे टाईप करा. |
07:44 | टेक्स्ट बॉक्स योग्यप्रकारे फिरवून तो योग्य जागेवर नेऊन ठेवा. |
07:48 | आता मुख्य मेनूतील Modify खालील Rotate पर्याय निवडा. |
07:54 | हँडल्सचा रंग बदलून तो लाल झालेला लक्षात येईल. याचा अर्थ आपण रोटेट मोडवर आहोत. |
08:02 | हा बाण असलेला छोटा कंस तुम्हाला दिसला का? ह्याचा उपयोग बॉक्स फिरवण्यासाठी करू. |
08:09 | आता कर्सर टेक्स्ट बॉक्सच्या उजवीकडील वरच्या बाजूला शेवटच्या हँडलवर न्या. |
08:17 | रोटेशन कर्व्ह आलेला दिसेल. |
08:21 | माउसचे डावे बटण दाबा. बॉक्सने अपेक्षित असलेली जागा घेईपर्यंत, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवा. |
08:30 | रोटेट मोड मधून बाहेर पडण्यासाठी ड्रॉ पेजवर कुठेही क्लिक करा. |
08:36 | शाळेचा बाजूचा एंट्रन्स देखील दाखवू. |
08:41 | मागील स्टेपप्रमाणे एक टेक्स्ट बॉक्स काढून त्यात School Side Entrance असे टेक्स्ट टाईप करा. |
08:50 | आता दिशा दाखवणारे बाण दाखवू. घराकडून आपल्याला उजवीकडे वळायचे आहे. |
08:57 | ड्रॉईंग टूलबारवरील Line Ends with Arrow हा पर्याय निवडा. |
09:02 | ड्रॉ पेजवर जाऊन एक रेष काढा. |
09:08 | नंतर Residential Complex ओलांडल्यावर डावीकडे वळा. |
09:14 | हा रस्ता दाखवण्यासाठी आणखी एक रेष काढू. |
09:19 | नंतर प्ले ग्राउंडजवळ उजवीकडे वळा आणि खालच्या दिशेला चाला. |
09:25 | शाळेच्या मुख्य गेटजवळ पोहोचण्यासाठी पुन्हा उजवीकडे वळा. |
09:32 | आपण पहिला मार्ग येथे दाखवला आहे. येथे दोन प्रकारे कर्व्हस आणि पॉलिगॉन्स काढू शकतो हे तुमच्या लक्षात आले असेल. |
09:41 | पहिला Filled हा पर्याय वापरून तर दुसरा Fill पर्याय न वापरता. जेव्हा Filled पर्याय वापरतो तेव्हा कर्व्ह रंगवलेला असतो. |
09:52 | तुमच्या हेही लक्षात आले असेल की, कर्व्ह टूलबारमधील प्रत्येक पर्याय कर्व्ह काढण्यासाठी माऊस ऑपरेशनची वेगळी पध्दत वापरतो. |
10:02 | असाईनमेंट. कर्व्ह टूलबारमधील सर्व पर्याय वापरून कर्व्ह आणि पॉलिगॉन काढा. |
10:10 | कर्व्ह किंवा पॉलिगॉनच्या निवडीनुसार कर्सरचा आकार आणि माऊसचे ऑपरेशन बदलते याकडे लक्ष द्या. |
10:20 | Filled या पर्यायात भरला जाणारा रंग तुम्हाला बदलता येतो का ते बघा. |
10:25 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10:31 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
10:45 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
10:51 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:04 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
11:14 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |