Difference between revisions of "BASH/C3/Using-File-Descriptors/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
Line 395: Line 395:
 
|-
 
|-
 
|  08.28
 
|  08.28
| हे स्क्रिप्ट FOSSEE and spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
+
| हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
  
 
|-
 
|-
 
|  08.33
 
|  08.33
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते.  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.  
  
 
|-
 
|-

Revision as of 12:44, 19 December 2014

Title of script: Using file descriptors Author: Manali Ranade Keywords: video tutorial, Bash shell, file descriptors

Visual Cue Narration
00.01 नमस्कार. Using file descriptors वरील पाठात आपले स्वागत.


00.08 या पाठात शिकणार आहोत.
00.11 * आऊटपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे
00.14 * इनपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे
00.17 * फाईल डिस्क्रीप्टर (fd)संपवणे
00.19 * ह्यांची संबंधित उदाहरणे.


00.23 ह्या पाठासाठी BASH मधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.


00.29 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.35 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00.38 * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00.43 * GNU BASH वर्जन 4.2
00.46 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00.54 सुरूवातीला प्राथमिक ओळख करून घेऊ.
00.56 आपण मागील पाठात फाईल डिस्क्रीप्टर्स बद्दल आधीच जाणून घेतले होते.
01.02 * stdin, stdout आणि stderrसाठी 0, 1 आणि 2 ही स्टँडर्ड फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत.
01.15 * फाईल डिस्क्रीप्टर्स i/o redirectionसाठी वापरली जातात.
01.20 आऊटपुट फाईलला फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करण्याचा सिंटॅक्स असा आहे:
01.25 exec [ फाईल डिस्क्रीप्टर] greater than symbol filename
01.31 त्याचे उदाहरण पाहू.
01.33 मी fdassign dot shनावाच्या फाईलमधे कोड लिहिला आहे.
01.43 पहिली ओळ ही shebang lineआहे.
01.49 exec कमांड चालू shell processमधे बदल करते.
01.56 नवीन प्रोसेस सुरू करण्याऐवजी चालू shell च्या जागी कार्यान्वित केले जाते.
02.04 आपल्याला माहित आहे की 0, 1 आणि 2 ही स्टँडर्ड फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत.
02.09 कुठल्याही नव्या उघडलेल्या फाईलसाठी आपल्याकडे 3 ते 9 हे अतिरिक्त फाईल डिस्क्रीप्टर्स आहेत.
02.19 येथे 3 हा फाईल डिस्क्रीप्टर आहे.
02.22 यामुळे आऊटपुट, output dot txt ह्या फाईलमधे लिहिला जाईल.
02.30 "Welcome to BASH learning" ही स्ट्रिंग output dot txt ह्या फाईलकडे पाठवली जाईल.
02.36 हे 3 ह्या फाईल डिस्क्रीप्टरद्वारे केले जाईल.
02.42 हे स्ट्रिंग फाईलकडे रिडायरेक्ट करण्यासारखे आहे.
02.49 प्रत्येक नवी स्ट्रिंग फाईलमधे जोडली जाईल.
02.52 उदाहरणार्थ,
02.54 आपण output dot txt फाईलमधे सिस्टीमची तारीख जोडणार आहोत.
03.00 सिंटॅक्स असा आहे: date SPACE greater-than symbol ampersand sign 3
03.13 येथे फाईल डिस्क्रीप्टर संपवू.
03.16 या ओळीनंतर डिस्क्रीप्टर output dot txt या फाईलमधे काही लिहू शकणार नाही.
03.23 कोड कार्यान्वित करून आऊटपुट पहा.
03.26 CTRL+ALT+T ह्या बटणांच्या सहाय्याने टर्मिनल उघडा.
03.34 टाईप करा: chmod space plus x space fdassign dot sh
03.41 टाईप करा: dot slash fdassign dot sh
03.46 cat space output dot txtटाईप करून आऊटपुट तपासा.
03.56 आपण Welcome to BASH learning ही स्ट्रिंग आणि सिस्टीमची चालू तारीख बघू शकतो.
04.05 एडिटरवर जा.
04.11 आता डिस्क्रीप्टर संपल्यानंतर शेवटी echo कमांड टाईप करा.
04.17 टाईप करा: echo डबल कोटसमधे Hi, कोटस नंतर space greater than symbol ampersand sign 3
04.31 Save क्लिक करा.
04.35 आता पुन्हा एकदा स्क्रिप्ट कार्यान्वित करून काय होते ते पाहू.
04.38 टर्मिनलवर जाऊन दोन वेळा अप ऍरो दाबून dot slash fdassign dot sh कमांड मिळवा.
04.50 एंटर दाबा.
04.52 एरर मेसेज दिसेल.
04.55 Bad file descriptor
04.58 एरर दुरूस्त करू.
05.00 एडिटरवर जा.
05.03 कोडची शेवटची ओळ कट करून date कमांड खाली पेस्ट करा.
05.11 Save क्लिक करा.
05.13 कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा.
05.19 मागील dot slash fdassign.sh कमांडवर जा.
05.24 एंटर दाबा.
05.26 आता output dot txt ही फाईल उघडू.
05.29 टाईप करा: cat space output dot txt
05.41 आपण आऊटपुट बघू शकतो.
05.43 शेवटी Hi ही स्ट्रिंग दाखवली गेली आहे.
05.49 आता आपण इनपुट फाईलला फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करू.
05.54 त्याचे उदाहरण पाहू.
05.56 आपल्याकडे fdread dot sh नावाची फाईल आहे.
06.03 त्यातील कोड समजून घेऊ.
06.07 ही exec कमांड आहे.
06.13 येथे output dot txt ही फाईल वाचू.
06.19 exec 3 greater than symbol output dot txt ह्या ओळीमुळे फाईल वाचण्यासाठी उघडली जाईल.
06.30 cat कमांड फाईलमधील घटक दाखवेल.
06.35 आणि शेवटी आपण फाईल डिस्क्रीप्टर पूर्ण केला आहे.
06.39 आता ही shell स्क्रिप्ट कार्यान्वित करू.
06.42 टर्मिनलवर प्रॉम्प्ट क्लियर करून घ्या.
06.47 टाईप करा: chmod space plus x space fdread dot sh
06.55 टाईप करा dot slash fdread dot sh
07.01 आपण टर्मिनलवर आऊटपुट बघू शकतो.
07.05 output dot txt ह्या फाईलमधले घटक दाखवले आहेत.
07.10 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07.13 स्लाईडसवर जा .
07.16 थोडक्यात,
07.17 पाठात शिकलो,
07.19 * आऊटपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे
07.22 * इनपुट फाईल डिस्क्रीप्टर प्रदान करणे
07.26 * फाईल डिस्क्रीप्टर संपवणे.
07.28 असाईनमेंट म्हणून,
07.30 test dot txt फाईलमधे फाईल डिस्क्रीप्टर्सच्या सहाय्याने काही ओळी एकापुढे एक जोडा.
07.36 फाईल डिस्क्रीप्टर्सच्या सहाय्याने फाईलमधील घटक दाखवा.
07.41 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07.45 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07.48 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07.53 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.


07.58 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08.02 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
08.10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08.14 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08.22 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.


08.28 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
08.33 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
08.37 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana