Difference between revisions of "PHP-and-MySQL/C2/Common-Errors-Part-3/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 104: | Line 104: | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:47 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हेडरच्या आधी html आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| हेडरच्या आधी html आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते. | ||
Latest revision as of 11:56, 24 July 2014
Time | Narration |
00:00 | या ट्युटोरियलमध्ये समाविष्ट केलेल्या शेवटच्या दोन common errors बघणार आहोत. |
00:05 | आपण अवघड गोष्टी पासून सुरूवात करू या. |
00:09 | हे php header आहे. हव्या त्या लोकेशनवर जाण्यासाठी "header" function वापरू. |
00:14 | येथे आपल्याकडे काही html code आहेत. |
00:18 | हा header tagआहे. जेथे "Welcome!" लिहिले आहे. |
00:21 | तसेच "google dot com" ही आपल्या "goto" व्हेरिएबलची व्हॅल्यू आहे. |
00:26 | जर "goto" ही कमांड दिली असेल, तर आपण आपले पेज "google dot com" या u-r-l वर रिडायरेक्ट करणार आहोत. |
00:35 | आता हे आपल्याला एरर देईल. |
00:37 | ह्या एररला कारण आहे "o b start" हे फंक्शन |
00:50 | आपण हे काढून टाकू या. हे येथे असायला नको. हा code आपली एरर दुरूस्त करण्यासाठी आहे. |
00:56 | माफ करा. आपण "php header" या फाईलवर जाऊ या. आपल्याला "Welcome!" - असा html code दिसेल. |
01:03 | पुढे "Cannot modify header information – headers already sent by..." अशी वॉर्निंग मिळेल. |
01:10 | म्हणजे आपला हेडर आधीच पाठवला गेला आहे. तसेच हे ओळीचा क्रमांक दाखवत आहे. |
01:16 | 1, 2, 3. आपल्याला "phpheader dot php" colon 3 अशा प्रकारची एरर मिळाली आहे. म्हणजेच एरर line no. 3 वर आहे. |
01:26 | एरर line no. 3 वर आहे. |
01:32 | आणि ती आपल्याला line 9 मुळे मिळाली आहे. येथे हे आपले हेडर फंक्शन आहे. |
01:39 | याचे कारण म्हणजे आपला html code आधी पाठवला गेला आहे. |
01:47 | आता हे टाळण्यासाठी याला comment करा. रिफ्रेश केल्यावर आपल्याला हे google वर रिडायरेक्ट झालेले दिसेल. |
01:54 | परंतु आपल्याला येथे हा welcome हेडर हवा आहे. |
01:59 | आणि खरेतर आपण हेडर फंक्शन लोकेशन आणि या फंक्शनच्या इतर फीचरच्या आधी html code ठेवू शकत नाही. |
02:10 | तसे तुम्ही करू शकत नाही. |
02:15 | आपण काही वेळापूर्वी "ob underscore start" पाहिले होते. |
02:20 | हे आपली समस्या दूर करणार आहे. |
02:25 | आता आपण "phpheader" वर जाऊ या. हे कार्य करत आहे. जरी येथे आपल्या हेडरच्या आधी आपला html code echoकरत आहे. |
02:37 | म्हणजे "ob underscore start" हे फंक्शन नसेल तर आपल्याला एरर मिळेल आणि ते असेल तर आपले हेडर नीट काम करेल. |
02:47 | हेडरच्या आधी html आऊटपुट असू नये हा नियम असूनही असे होते. |
02:53 | आता तुम्हाला हे ब-यापैकी समजले असेल. |
02:55 | आता शेवटची एरर ही समजण्यासाठी सोपी आहे. |
02:58 | खरे तर हे समजवण्याची खास आवश्यकता नाही. |
03:02 | आता "idontexist dot php" नामक फाईल समाविष्ट करू या. ही अस्तित्वातच नाही. |
03:08 | आता हे बघू या. माफ करा मी चुकीची फाईल उघडली आहे. |
03:13 | "open dot php" ही फाईल उघडू या. |
03:16 | आपल्याला include "idontexist dot php" failed to open stream; no such file or directory in that name here. अशा प्रकारची एरर मिळेल. |
03:25 | आपल्या फाईलचे नाव आणि डिरेक्टरी line 3 वर आहे. |
03:27 | आता आपण line 3 वर जाऊ या. |
03:30 | या फाईलमध्ये केवळ याच ओळीवर महत्त्वाचा code आहे. |
03:35 | तसेच येथे आपल्याला Failed to open "idontexist dot php" for inclusion and all of this. अशा प्रकारची अजून एक वॉर्निंग मिळाली आहे. म्हणजे आपल्याला एकूण दोन एरर मिळाल्या आहेत. |
03:43 | "include a header file" असे पेजवर असताना हे त्रासदायक होते. |
03:50 | हे काही योग्य दिसत नाही. हेडर दिसायच्या आधीच तुम्ही वेबसाईट मध्ये पोहोचलेले असता. |
03:57 | हे आकर्षक दिसण्यासाठी हा"@ (at)" symbol समाविष्ट करून रिफ्रेश करू या. |
04:02 | आता आपल्याला एरर दिसणार नाही. |
04:06 | परंतु ही फाईल उपलब्ध नसल्यामुळे ती कार्यान्वित होणार नाही. |
04:10 | त्यामुळे उपलब्ध नसलेल्या फाईलमधील घटक समाविष्ट होणार नाहीत. |
04:14 | अर्थातच आपल्याला लक्षात येईल की हे self explanatory आहे. |
04:23 | अशा प्रकारे php मध्ये प्रोग्रॅमिंग करतानाआपल्याला येणा-या काही errors चा हा संच आहे. |
04:30 | जर तुम्हाला यापेक्षा काही वेगळ्या errors मिळाल्या तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आम्हाला आपली मदत करायला नक्की आवडेल. |
04:39 | या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.सहभागासाठी धन्यवाद. |