Difference between revisions of "Ruby/C2/Hello-Ruby/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 546: | Line 546: | ||
|- | |- | ||
| 09.45 | | 09.45 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
|- | |- |
Revision as of 10:43, 26 June 2014
Title of script: Hello-Ruby
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00.00 | Hello Rubyवरील पाठात आपले स्वागत. |
00.04 | पाठात आपण शिकणार आहोत, |
00.06 | रुबी म्हणजे काय? |
00.08 | त्याची वैशिष्ट्ये, |
00.09 | RubyGems आणि रुबी वरील मदत. |
00.12 | त्याचे इन्स्टॉलेशन. |
00.13 | रुबी कोड कार्यान्वित करणे. |
00.15 | कॉमेंटस समाविष्ट करणे. |
00.16 | puts आणि print मधील फरक. |
00.19 | येथे उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि Ruby 1.9.3 वापरणार आहोत. |
00.27 | ह्या पाठासाठी इंटरनेटची जोडणी आवश्यक आहे. |
00.30 | तुम्हाला लिनक्समधील टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00.37 | रुबी म्हणजे काय ते जाणून घेऊ. |
00.40 | रुबी ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड, इंटरप्रिटेड स्क्रिप्टींग लँग्वेज आहे. |
00.44 | ही डायनॅमिक, ओपन सोर्स प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. |
00.48 | ह्याचा सिंटॅक्स सुटसुटीत असून वाचायला आणि लिहायला सोपा आहे. |
00.54 | आता रुबीची वैशिष्ट्ये पाहू. |
00.57 | रुबी ही पोर्टेबल आहे. |
00.59 | रुबी कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यान्वित होते. |
01.04 | Smalltalk, BASIC किंवा Pythonप्रमाणे रुबीमधील व्हेरिएबलना डेटाटाईप नसतो. |
01.11 | ह्यातील मेमरी व्यवस्थापन आपोआप होत असते. |
01.14 | रुबी ही फ्री फॉरमॅट (free format) लॅग्वेज आहे. |
01.17 | प्रोग्रॅमची सुरूवात कोणत्याही ओळीत किंवा कॉलममधे करता येते. |
01.21 | रुबी इंटरनेट किंवा इंट्रानेट ऍप्लिकेशन्स लिहिण्यासाठी वापरली जाते. |
01.26 | रुबीच्या सर्वात महत्वाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे RubyGems. |
01.31 | RubyGems हे रुबी प्रोग्रॅमिंग लँग्वेजसाठीचे पॅकेज मॅनेजर आहे. |
01.36 | हे रुबीचे प्रोग्रॅम आणि लायब्ररीज वितरीत करण्यासाठी प्रमाणित फॉरमॅट प्रदान करते. |
01.42 | तुम्ही तुमचे gems बनवू आणि प्रकाशित करू शकता. |
01.46 | RubyGems वरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकला भेट द्या. |
01.51 | रुबी संदर्भातील अधिक माहितीसाठी ह्या लिंकसना भेट द्या. |
01.55 | तुम्ही उबंटु सॉफ्टवेअर सेंटरद्वारे रुबी इन्स्टॉल करू शकता. |
01.59 | त्यावरील अधिक माहितीसाठी ह्या लिंकवर उपलब्ध असलेला उबंटु लिनक्स हा पाठ पहा. |
02.07 | रुबी इन्स्टॉल करण्याच्या इतर पध्दती ह्या स्लाईडवर दाखवल्या आहेत. |
02.12 | रुबी कोड 3 पध्दतीनी कार्यान्वित करता येतो. |
02.16 | कमांड लाईनद्वारे, |
02.17 | इंटरऍक्टीव्ह रुबी द्वारे, |
02.19 | फाईल म्हणून. |
02.20 | कार्यान्वित करण्याच्या सर्व पध्दती बघूया. |
02.23 | प्रथम Hello World कोड कमांड लाईनद्वारे कार्यान्वित करू. |
02.28 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा. |
02.33 | तुमच्या स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल. |
02.37 | ही कमांड टाईप करा. |
02.38 | ruby space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space नंतर डबल कोटसमधे Hello World आणि |
02.50 | एंटर दाबा. |
02.53 | Hello World असे आऊटपुट मिळेल. |
02.56 | टर्मिनलवर आऊटपुट प्रिंट करण्यासाठी puts कमांड वापरतात. |
03.00 | hyphen e फ्लॅग एका ओळीचा कोड कार्यान्वित करण्याची परवानगी देते. |
03.06 | अनेक ओळींच्या कमांडस देण्यासाठी अनेक hyphen e फ्लॅग्ज वापरता येतात. |
03.11 | हे करून पाहू. |
03.13 | मागील कमांड मिळवण्यासाठी अप ऍरो की दाबा. |
03.18 | आणि टाईप करा space hyphen e space सिंगल कोटसमधे puts space 1+2 आणि |
03.30 | एंटर दाबा. |
03.32 | Hello World आणि 3 असे आऊटपुट मिळेल. |
03.36 | स्लाईडवर परत जाऊ. |
03.38 | इंटरऍक्टीव्ह रुबीबद्दल जाणून घेऊ. |
03.42 | इंटरऍक्टीव्ह रुबीद्वारे दिलेल्या कमांडसना त्वरित प्रतिसाद मिळतो. |
03.48 | रुबी स्टेटमेंटस दिल्यावर रिटर्न केलेल्या व्हॅल्यूज आणि आऊटपुट बघता येतो. |
03.53 | रुबीच्या जुन्या वर्जनसाठी irb वेगळे इन्स्टॉल करा. |
03.57 | आता रुबी कोड irb मधून कार्यान्वित करू. टर्मिनलवर जा. |
04.03 | टाईप करा irb आणि एंटर दाबा. |
04.06 | हे इंटरऍक्टीव्ह रुबी उघडेल. |
04.09 | टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World आणि एंटर दाबा. |
04.19 | Hello World असे आऊटपुट मिळेल. |
04.22 | आणि nil ही रिटर्न व्हॅल्यू मिळेल. |
04.25 | irb मधून बाहेर पडण्यासाठी exit टाईप करून एंटर दाबा. |
04.31 | फाईलमधूनही रुबी प्रोग्रॅम कार्यान्वित करता येतो. |
04.34 | कोड लिहिण्यासाठी तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
04.39 | मी gedit टेक्स्ट एडिटर वापरत आहे. gedit टेक्स्ट एडिटरवर जाऊ. |
04.45 | टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello World |
04.54 | मल्टिपल लाईन किंवा ब्लॉक कॉमेंटस कशा समाविष्ट करायच्या ते पाहू. |
04.59 | puts कमांडच्या आधी |
05.01 | टाईप करा equal to begin आणि एंटर दाबा. |
05.06 | 'Equal to begin ने कॉमेंटची सुरूवात केली जाते. |
05.10 | तुम्हाला हवी ती कॉमेंट टाईप करा. |
05.13 | मी My first Ruby program टाईप करत आहे. |
05.20 | एंटर दाबा. |
05.22 | टाईप करा This code will print Hello world आणि एंटर दाबा. |
05.30 | आता टाईप करा equal to end |
05.32 | मल्टिपल लाईन कॉमेंटस संपवण्यासाठी equal to end चा वापर होतो. |
05.37 | कॉमेंटसचा उपयोग प्रोग्रॅमचे कार्य जाणून घेण्यास होतो. |
05.41 | डॉक्युमेंटेशनसाठी हे उपयोगी पडते. |
05.45 | सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा. |
05.50 | फाईल वारंवार सेव्ह करणे हा चांगला सराव आहे. |
05.53 | सेव्ह ऍजचा डायलॉग बॉक्स तुमच्या स्क्रीनवर उघडेल. |
05.57 | तुम्हाला जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशनवर जा. |
06.01 | डेस्कटॉपवर मी rubyprogramनावाने फोल्डर बनवत आहे. |
06.06 | फाईल या फोल्डरमधे सेव्ह करू. |
06.10 | नेम टेक्स्ट बॉक्समधे तुमच्या आवडीचे नाव टाईप करा. |
06.14 | मी hello.rb टाईप करत आहे. |
06.17 | रुबी फाईलला Dot rb हे एक्सटेन्शन दिले जाते. |
06.21 | सेव्हवर क्लिक करून फाईल सेव्ह करा. फाईल सेव्ह झाली आहे. |
06.28 | कोड कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जा. |
06.32 | प्रथम टर्मिनल क्लियर करा. |
06.35 | रुबी फाईल उपलब्ध असलेल्या डिरेक्टरीमधे असल्याची खात्री करा. |
06.39 | आपण home डिरेक्टरीत आहोत हे लक्षात घ्या. rubyprogramह्या सबडिरेक्टरीत जाणे आवश्यक आहे. |
06.47 | त्यासाठी टाईप करा cd space Desktop/rubyprogram आणि एंटर दाबा. |
07.00 | फाईल कार्यान्वित करू. टाईप करा ruby space hello dot rb आणि एंटर दाबा. |
07.10 | HelloWorld हे आऊटपुट मिळेल. |
07.13 | आता puts आणि print स्टेटमेंटमधील फरक पाहू. |
07.18 | हे irb द्वारे करून पाहू. |
07.22 | त्यापूर्वी होम डिरेक्टरीवर जाणे आवश्यक आहे. टाईप करा cd आणि एंटर दाबा. |
07.31 | इंटरऍक्टिव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा . |
07.39 | टाईप करा puts space डबल कोटसमधे Hello comma डबल कोटसमधे World |
07.50 | येथे दोन puts कमांड एकत्र जोडण्यासाठी कॉमा वापरला आहे. |
07.55 | एंटर दाबा. |
07.57 | HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु वेगवेगळ्या ओळींवर. |
08.03 | आता हेच print स्टेटमेंटद्वारे करून पाहू . |
08.06 | मागील कमांड परत मिळवण्यासाठी अप ऍरोची की दाबा. |
08.09 | puts च्या जागी print टाईप करून एंटर दाबा. |
08.14 | HelloWorld हे आऊटपुट मिळेल, परंतु एकाच ओळीवर. |
08.19 | puts कीवर्ड आऊटपुटच्या शेवटी नवी ओळ समाविष्ट करतो. print कीवर्ड तसे करत नाही. |
08.27 | print जेवढे प्रदान केले आहे तेच आऊटपुट देतो. |
08.31 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. स्लाईडस वर जाऊ. |
08.37 | ह्यात आपण |
08.39 | रुबी बद्दल शिकलो. |
08.41 | रुबीचे इन्स्टॉलेशन, |
08.42 | रुबी कोड कार्यान्वित करणे. |
08.44 | =begin आणि =end वापरून मल्टिपल कॉमेंटस समाविष्ट करणे. |
08.50 | puts आणि print मधील फरक. |
08.53 | असाईनमेंट. |
08.55 | तुमचे नाव आणि वय प्रिंट करणारा प्रोग्रॅम लिहा. |
08.58 | ह्या पाठात आपण मल्टिपल लाईन कॉमेंटस वापरल्या. |
09.01 | तुम्ही सिंगल लाईन कॉमेंट देण्याचा प्रयत्न करा. |
09.04 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09.07 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09.10 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09.15 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
09.17 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09.20 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09.24 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
09.30 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
09.34 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
09.41 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
09.45 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
09.50 | सहभागासाठी धन्यवाद. |