Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Cradle-Hold-for-Breastfeeding/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{|border=1 |<center>Time</center> |<center>Narration</center> |- |00:01 |नमस्कार मित्रानो, स्तनपानासाठी '''क्र...")
 
 
(2 intermediate revisions by 2 users not shown)
Line 27: Line 27:
 
|-
 
|-
 
|00:39
 
|00:39
| आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा कालावधी आरामदायक आहे.
+
| आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक आहे.
  
 
|-
 
|-
Line 34: Line 34:
 
|-
 
|-
 
|00:50
 
|00:50
| आणि बाळाला पुरेसे दूध मिळते.
+
| आणि त्याला भरपूर दूध मिळते.
 
|-
 
|-
 
|00:54
 
|00:54
Line 107: Line 107:
 
|-
 
|-
 
|03:10
 
|03:10
| जर बाळाला उचलण्यासाठी आईला अतिरिक्त आधार हवा असेल तर ती तिच्या मांडीवर किंवा बाळाखाली उशी ठेवू शकते.
+
| जर बाळाला उचलण्यासाठी आईला अतिरिक्त आधार हवा असेल तर ती तिच्या बाळाखाली व मांडीवर उशी ठेवू शकते.
 
|-
 
|-
 
|03:19
 
|03:19
Line 190: Line 190:
 
|-
 
|-
 
|05:55
 
|05:55
| अंगठा आणि बोटांच्या योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी, आईच्या उजव्या स्तनावरील निप्पल हे घड्याळाचे केंद्र आहे अशी कल्पना करा.
+
| अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी, आईच्या उजव्या स्तनावरील निप्पल हे घड्याळाचे केंद्र आहे अशी कल्पना करा.
 
|-
 
|-
 
|06:04
 
|06:04
Line 211: Line 211:
 
|-
 
|-
 
|06:40
 
|06:40
| येथे, अंगठा आणि बोटे ओठांच्या दिशेने ठेवलेले आहेत.
+
| इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
 
|-
 
|-
 
|06:46
 
|06:46
Line 227: Line 227:
 
|-
 
|-
 
|07:13
 
|07:13
| बाळाच्या ओठांच्या दिशेने असण्याव्यतिरिक्त, आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.  
+
| बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत, आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.  
 
|-
 
|-
 
|07:23
 
|07:23
Line 319: Line 319:
 
| आता आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
| आता आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
 
|-
 
|-
|10:29
+
|10:28
 
| आय. आय. टी. बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते.
 
| आय. आय. टी. बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते.
 
सहभागासाठी धन्यवाद.
 
सहभागासाठी धन्यवाद.
 +
|-
 
|}
 
|}

Latest revision as of 13:04, 14 August 2020

Time
Narration
00:01 नमस्कार मित्रानो, स्तनपानासाठी क्रेडल स्थिती या स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-
00:09 आई व बाळासाठी योग्य स्तनपानाची स्थिती निवडणे,
00:15 स्तनपानापूर्वी आईची तयारी आणि.
00:18 क्रेडल स्थितीची संपूर्ण कार्यपद्धती
00:22 चला सुरवात करू.

जगभरात सर्व आई त्यांच्या बाळाला स्तनपान करत असताना विविध पद्धतीच्या स्थितींचा वापर करतात. पूर्वीच्या ट्युटोरिलमध्ये चर्चा केल्याप्रमाणे - आई आणि तिच्या बाळासाठी सर्वोत्कृष्ठ स्थिती तीच आहे, ज्यामध्ये

00:39 आई आणि बाळ दोघांसाठीही स्तनपान पूर्ण होई पर्यंतचा काळ आरामदायक आहे.
00:45 बाळाची आईच्या स्तनाशी घट्ट पकड आहे.
00:50 आणि त्याला भरपूर दूध मिळते.
00:54 आता आपण एका स्थिती बद्दल शिकू ज्याचे नाव आहे क्रेडल स्थिती
00:59 स्तनपान करण्यापूर्वी आईने स्वतःचे हात साबण आणि पाण्याने धुवावेत
01:05 आणि हात व्यवस्थित कोरडे करावेत.
01:10 मग तिने उकळून थंड केलेले पेलाभर पाणी प्यावे.
01:15 स्तनपान करणाऱ्या मातांच्या स्तनांमध्ये दररोज सरासरी ७५०-८५० मिलिलिटर दूध बनते.
01:22 म्हणून त्यांनी पाण्याचे सेवन जास्तीत जास्त प्रमाणात करणे गरजेचे आहे.
01:27 पुढे, आईची स्थिती ह्यावर चर्चा करू.
01:31 आईने जमीनीवर किंवा पलंगावर मांडी घालून बसणे आवश्यक आहे.
01:36 किंवा खुर्चीवर बसावे पण तिचे पाय जमिनीला टेकलेले असावेत.
01:41 जर खुर्ची खूप उंच असेल आणि तिचे पाय जमिनीवर पोहोचले नाहीत-
01:47 तर ती जमिनीवर छोटा स्टूल किंवा उश्या ठेवून त्यावर तिचे पाय टेकवू शकते.
01:53 बसताना, तिने हे सुनिश्चित केले पाहिजे कि

तिची पाठ ताठ आहे जेणे करून पाठदुखी टाळता येईल.

02:00 तिचे खांदे सरळ असावेत आणि उंचावलेले किंवा झुकलेले नसावेत.
02:05 ही निश्चिंत स्थिती स्तनपानाच्या सत्रात कायम राखली जाते.
02:12 आता, आईला ज्या बाजूने बाळाला पाजायचे आहे ते स्तन उघडे करावे.
02:18 तिने तिच्या ब्रा किंवा ब्लाऊजचा दाब स्तनावर पडणार नाही ह्याची खात्री करून घ्यावी.
02:25 आरामशीर बसल्यानंतर बाळाला आईकडे आणा.
02:29 आईने तिच्या बाळाला ज्या बाजूने दूध पाजायचे आहे त्या स्तनाच्या बाजूला हाताने धरून ठेवावे.
02:37 त्या हाताच्या कोपऱ्याच्या आतल्या भागामध्ये बाळाचे डोके आरामात असावे.
02:44 त्याच हाताने आईने तिच्या बाळाचे डोके, मान आणि शरीर ह्यांना आधार दिला पाहिजे.
02:51 ह्या चित्रातील आई, बाळाला तिच्या उजव्या स्तनातून पाजेल.
02:56 म्हणूनच, ती बाळाचे डोके, मान आणि शरीर यांना आधार देण्यासाठी तिच्या उजव्या हाताचा वापर करीत आहे आणि
03:04 बाळाचे डोके तिच्या उजव्या कोपऱ्यातल्या आतील भागामध्ये आरामात ठेवलेले आहे.
03:10 जर बाळाला उचलण्यासाठी आईला अतिरिक्त आधार हवा असेल तर ती तिच्या बाळाखाली व मांडीवर उशी ठेवू शकते.
03:19 लक्षात ठेवा, आईने कधीही तिची पाठ वाकवून स्तनाला बाळाजवळ आणू नये.
03:25 हे तिला अस्वस्थ करेल आणि तिच्यासाठी पाठदुखीचे कारण ठरेल.
03:30 तिने नेहमी तिची पाठ ताठ ठेवावी आणि बाळाला तिच्या स्तनापर्यंत आणावे.
03:36 पुढे, आपण बाळाचे शरीर योग्य स्थितीत कसे ठेवावे हे शिकू.
03:42 बाळाचे पोट आईच्या शरीराने हळूवारपणे दाबले गेले पाहिजे.
03:47 जेवढे त्या दोघांच्या शरीरातील अंतर कमी असेल तेवढे बाळाचे आईच्या स्तनापर्यंत जाण्याचे कष्ट कमी होतील.
03:54 आणि आणि बाळाला योग्यप्रकारे घट्ट पकड करण्यास सोपे जाईल.
04:00 बाळाला ठेवण्याच्या स्थिती मध्ये दुसरा मुद्दा आहे, बाळाच्या शरीराची संरेखना.
04:08 आपण हे लक्षात घेतले असेल की -

आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपले डोके, मान आणि शरीर नेहमी एकाच दिशेत असतात.

04:16 पण स्तनपान करणाऱ्या बऱ्याच आई बाळाला त्यांच्या पाठीवर झोपवून फक्त बाळाचे डोके स्तनांच्या बाजूस फिरवितात.
04:23 यामुळे स्तनपान करताना बाळाला त्रास होईल.
04:28 म्हणून स्तनपान करताना बाळाचे डोके, मान आणि शरीर नेहमी एका सरळ रेषेत असावेत.
04:35 यामुळे बाळाला दूध पिणे सोपे जाईल.
04:41 आता आपण तिसऱ्या मुद्द्यावर आलो आहोत - बाळाच्या शरीराची स्थिती.
04:46 आईने तिच्या बाळाचे डोके, मान आणि शरीर ह्यांना आधार दिला पाहिजे.
04:51 नाहीतर बाळाला आईच्या स्तनाशी पकड घट्ट करण्यास खूप मेहनत घ्यावी लागेल.
04:58 पुढे आपण बाळाचे नाक आणि हनुवटी च्या स्थिती बद्दल बोलू.
05:03 बाळाचे नाक आणि आईचे निप्पल एका रेषेत असावेत.
05:07 त्याची हनुवटी पुढे आणि छातीच्या खूप जवळ असावी
05:13 यामुळे बाळ स्तनांशी पकड करत असताना एरिओलाचा खालचा भाग जास्तीत जास्त तोंडात घेईल.
05:19 आणि बाळ दूध पिण्यासाठी खालच्या जबड्याचा वापर करेल.
05:26 कृपया लक्षात घ्या, एरिओला हा निप्पलच्या आजूबाजूचा गडद भाग आहे.
05:32 आता बाळाला योग्य स्थितीत ठेवल्यानंतर,
05:35 चला आपण शिकूया, स्तनाला कसे पकडावे.
05:39 मोकळ्या हाताच्या बोटांच्या सहाय्याने, आईने तिचे स्तन वरून यू आकारात धरावे.
05:48 ह्या चित्रातील आई उजवे स्तन धरण्यासाठी तिचा डावा हात वापरेल.
05:55 अंगठा आणि बोटांची योग्य स्थिती जाणून घेण्यासाठी, आईच्या उजव्या स्तनावरील निप्पल हे घड्याळाचे केंद्र आहे अशी कल्पना करा.
06:04 ह्या घड्याळावर आईने तिचा डावा अंगठा ३ वाजल्याच्या स्थितीत ठेवावा.
06:10 दरम्यान तिचे डावे दर्शनी बोट आणि मधले बोट ९ वाजल्याच्या स्थितीत असावे.
06:18 आईची बोटे आणि बाळाचे ओठ नेहमी एका दिशेत असावेत.
06:25 असे का, हे समजून घेण्यासाठी आपण एक सोपे उदाहरण बघुयात,
06:30 जेव्हा आपण वडापाव किंवा बर्गर खातो, तेव्हा आपले ओठ आडवे उघडतात.
06:35 मोठा घास घेण्यासाठी आपण वडापाव किंवा बर्गर आडवा धरतो.
06:40 इथे आपली बोटे आणि ओठ एकाच दिशेत आहेत.
06:46 जर आपण वडापाव किंवा बर्गर उभा धरला तर आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.
06:53 त्याचप्रमाणे, बाळाच्या ओठांच्या दिशेचे निरीक्षण करा.

इथे त्याचे ओठ लंबकार उघडलेले आहेत.

07:00 म्हणून आईच्या बोटांना स्तनावर लंबकार ठेवणे गरजेचे आहे.
07:06 यामुळे बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेण्यास मदत मिळेल.
07:13 बाळाच्या ओठांच्या दिशेला असण्यासोबत, आईचा अंगठा आणि बोटे नेहमी निप्पलपासून ३ बोटे अंतरावर असावीत.
07:23 पुन्हा, वडापाव किंवा बर्गर खाताना,

आपण खूप जवळ पकडले तर बोटांचा अडथळा येऊन आपण मोठा घास घेऊ शकणार नाही.

07:34 आणि जर आपण खूप दूर पकडले तर त्याचा आकार आपल्या तोंडात जाण्यासाठी अयोग्य असेल.
07:41 म्हणून आपण मोठा घास घेण्यासाठी ते योग्य अंतरावर पकडतो.
07:47 तसेच या चित्रात दाखविल्याप्रमाणे बाळासाठी स्तनाला निप्पल पासून ३ बोटे अंतरावर पकडावे.
07:55 हे अंतर सुनिश्चित करेल कि, आईची बोटे अडथळा न आणून बाळाला एरिओलाचा मोठा भाग तोंडात घेता येईल.
08:05 आई फक्त निप्पलला दाबणार नाही ज्यापासून खूप कमी दूध मिळते.
08:11 आई एरिओलाच्या खालील मोठ्या दुग्धनलिकांवर दबाव देते आणि अधिक दूध बाहेर येते.
08:17 आणि स्तनाला योग्य आकार मिळून बाळाला घट्ट पकड करण्यास मदत मिळते.
08:23 लक्षात ठेवा-

आईचा अंगठा स्तनाच्या त्या बाजूस असावा आणि जेथे बाळाची हुनवटी आहे.

08:30 आणि तिची दोन्ही बोटे स्तनाच्या त्या बाजूस असावी जेथे बाळाचे नाक आहे.
08:36 आता आपण वडापाव किंवा बर्गरच्या उदाहरणाकडे परत जाऊ.
08:41 वडापाव किंवा बर्गर व्यवस्थित ठेवल्यानंतर, मोठा घास घेण्याकरिता आपण नेहमीच तो दाबतो.
08:48 तशाचप्रकारे, आईने तिचे स्तन वरच्या बाजूने U आकारात पकडून हलकेसे पकडून दाबावे.
08:54 हे बाळाला त्याच्या तोंडात एरिओलाचा मोठा भाग घेण्यास मदत करेल.
09:01 पण लक्षात ठेवा, आईने तिचे स्तन V आकारात पकडून दाबू नये.
09:07 v आकाराच्या दबावामुळे आईला वेदना होतील आणि बाळाला फक्त निप्पल मधून दूध मिळेल.
09:14 हे सुद्धा सुनिश्चित करा कि अंगठा आणि बोटांमुळे स्तनावर एकसमान दबाव यावा.
09:21 नाहीतर निप्पल उजव्या किंवा डाव्या बाजूस सरकून
09:27 बाळाची पकड अयोग्यरीत्या होईल.
09:32 लक्षात ठेवा,

कधीही स्तनावर दबाव पडून स्तनाला बाळाकडे आणू नये.

09:39 नेहमी बाळाला स्तनाकडे आणावे.
09:43 आता बाळ क्रेडल स्थिती मध्ये आहे आणि बाळ स्तनपानासाठी स्तन तोंडात घेण्यास तयार आहे.
09:49 स्तनाशी पकड करण्याची योग्य पद्धत याच सिरीज मधील दुसऱ्या ट्युटोरिअल मध्ये सांगितली आहे.
09:58 एकदा बाळाची आईच्या स्तनाशी योग्यरीत्या पकड झाली आणि स्तन खूप जड नसतील,
10:05 तेव्हा आईने स्तनावरील तिचे हात काढावेत
10:09 आणि बाळाच्या शरीराखाली आधार देण्यासाठी आणावेत.
10:14 या स्थितीमध्ये आईने तिचे दोन्ही हात तिच्या शरीराच्या खूप जवळ आणावेत,
10:21 यामुळे तिला स्तनपान करताना आराम मिळेल.
10:24 आता आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:28 आय. आय. टी. बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Rajani st