Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Admin-dashboard/Marathi"
(Created page with "{| border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' Moodle''' मधील '''Admin’s dashboard ''' वरील स्पोकन ट्युटोरिअलम...") |
|||
Line 333: | Line 333: | ||
| स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. | ||
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. | ||
− | + | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | |
− | + | ||
|- | |- |
Latest revision as of 13:20, 10 March 2019
Time | Narration |
00:01 | Moodle मधील Admin’s dashboard वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:
Admin’s dashboard वर विविध blocks Admin’s profile page आणि preferences कशी एडिट करावी. |
00:22 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:
Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, Ma riaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर. |
00:46 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता. |
00:50 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:59 | या ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांच्या सिस्टमवर Moodle 3.3 इन्स्टॉल असले पाहिजे.
नसल्यास, कृपया या वेबसाइटवरील संबंधित Moodle ट्यूटोरियल पहा. |
01:13 | ब्राउजरवर जा आणि तुमचे moodle site उघडा. XAMPP service रन करीत आहे याची खात्री करा. |
01:21 | आपण केवळ शीर्षलेखांसह एक रिक्त पेज पाहू शकता. याचे कारण असे की आपण आपल्या इंस्टॉलेशनसाठी कोणतेही front page सेट केले नाही. |
01:33 | विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्यात Log in लिंकवर क्लिक करा. |
01:39 | तुमचे admin username आणि password वापरून लॉगइन करा जे तुम्ही Moodle इन्स्टॉल कर्त्यावेळी दिले होते. |
01:47 | मी username म्हणून admin आणि password म्हणून Spokentutorial1@ प्रविष्ट करेल. नंतर Log in बटणवर क्लिक करा. |
01:59 | आता आपण ज्या पेजवर पाहतो त्याला dashboard म्हणतात. |
02:04 | आपण पाहु शकतो की dashboard 2 कॉलम्समध्ये विभागलेले आहे. |
02:08 | डाव्या बाजूला एक विस्तृत, मुख्य Content column आहे. |
02:13 | उजव्या बाजूला एक Blocks column आहे. |
02:17 | Blocks या columns मधील आयटम आहेत, जे विशिष्ट हेतू किंवा माहिती पुरवतात. |
02:25 | Blocks Moodle च्या सर्व पेजेसवर आढळतात.
तुम्ही त्यांच्या कोर्सच्या महत्त्वपूर्ण भागांकरिता शॉर्टकट म्हणून विचार करू शकता. |
02:35 | उदाहरणार्थ Private Files, Online Users, Cou rse Overview इत्यादी माझ्या dashboard वर blocks आहेत. |
02:46 | लक्षात घ्या की येथे कोणतीही क्रियाकलाप किंवा कोर्सेस नाहीत. |
02:50 | याचे कारण असे की आम्ही अद्याप कोणताही कोर्स तयार केलेला नाही. |
02:56 | सर्व कोर्सेस ची यादी पाहिली जाईल - जर यूजर(म्हणजे शिक्षक किंवा विद्यार्थी किंवा ऍडमिन(प्रशासक)) कोर्सेसमध्ये नाव नोंदवेल किंवा नियुक्त असेल. |
03:08 | हे देखील लक्षात घ्या की Online Users block Admin User दर्शवितो, जे आपले वर्तमान लॉगइन आहे. |
03:17 | हा block सर्व लॉग इन यूजर्सना कोणत्याही दिलेल्या वेळी दर्शवितो. |
03:23 | Moodle मधील प्रत्येक block कडे एक विशिष्ट हेतू असतो. आपण blocks ना Moodle मध्ये कोणत्याही column मध्ये कोणत्याही पेज मध्ये जोडू शकतो. |
03:34 | आता पेजच्या header कडे पाहू. |
03:38 | वर डाव्या कोपऱ्यात, आपण Navigation Drawer किंवा Navigation menu पाहू शकता. हे आपल्याला Calendar आणि इतर Administration लिंकम ध्ये ऍक्सेस करण्यास मदत करते. हा toggle menu आहे. |
03:55 | याचा अर्थ जेव्हा क्लिक केले तेव्हा ते आपले status open ते close आणि close ते open मध्ये बदलते. |
04:04 | आपल्याकडे logo साठी placeholder (जागा) आहे. |
04:08 | डिफॉल्टनुसार हा short site name आहे. यावर क्लिक केल्याने, आपण कोणत्याही पेजमधून dashboard वर येऊ. |
04:18 | वर उजवीकडे, notifications आणि messages साठी त्वरित ऍक्सेस आयकॉन्स आहेत. |
04:26 | त्यानंतर user menu ड्रॉप-डाउन आहे. याला quick access user menu देखील म्हटले जाते. |
04:35 | या ट्युटोरियलमध्ये थोडक्यात आपण Profile आणि Preferences page वर चर्चा करू. |
04:41 | हे सर्व menu items देखील toggle menus आहेत, तसेच डाव्या बाजूला स्थित आहे. |
04:48 | पुढे, Profile लिंकवर क्लिक करा. |
04:52 | Moodle मधील प्रत्येक यूजरसाठी profile page आहे. |
04:57 | त्यांच्याकडे users नी त्यांची प्रोफाइल माहिती एडिट करण्यास, त्यांचे forum किंवा blog posts पहाण्याची परवानगी देण्यासाठी लिंक्स आहेत. |
05:07 | त्यांच्याकडे ऍक्सेस असल्याचे कोणतेही reports तपासा आणि त्यांचे access logs आणि IP address जे शेवटच्या वेळी लॉग इन करण्यास वापरण्यात आले होते. |
05:18 | आता Edit Profile लिंकवर क्लिक करूया. Edit Profile page उघडेल. |
05:26 | हे पेज 5 विभागांमध्ये विभागलेले आहे:
General User Picture Additional Names Interests Optional |
05:39 | डिफॉल्ट रूपात General section विस्तृत केला जातो. |
05:43 | कोणत्याही section नावावर क्लिक केल्याने ते विस्तृत किंवा कोसळते.(collapses). |
05:49 | उजवीकडील ‘Expand all’ लिंक, सर्व sections विस्तृत करते. |
05:55 | येथे सर्व फील्ड एडिट करू शकतो. |
05:59 | City / Town जोडू. मी Mumbai टाईप करेन. |
06:04 | Select a country ड्रॉपडाउन मध्ये India निवडलेले आहे आणि timezone मध्ये Asia/Kolkata सेट केले आहे याची खात्री करा. |
06:13 | या प्रोफाइल पेजमधून केवळ Admins, password बदलू शकतात. |
06:18 | मी Optional विभागात काही फील्ड जोडते. |
06:22 | मी Institution फील्डमध्ये IIT Bombay प्रविष्ट करेल. तसेच Department मध्ये Mathematics आणि Phone number फील्डमध्ये वैध फोन नंबर. |
06:36 | नंतर पेज सेव्ह करण्यासाठी Update Profile बटणवर क्लिक करा. |
06:42 | आता वरच्या उजव्या बाजूला quick access user menu वर क्लिक करा.
Preferences लिंकवर क्लिक करा. |
06:51 | प्रेफरेन्सेस पेज यूजर्सना विविध सेटिंग्स एडिट करण्यासाठी त्वरित ऍक्सेस देते. |
06:59 | Preferences पेज admin account साठी 4 sections मध्ये विभागलेले आहे:
User account, Roles, Blogs, आणि Badges |
07:12 | User Account section यूजरला Edit Profile आणि Change Password ची परवानगी देते. |
07:19 | हे Language, Forum, Calendar, Message, Notification, इत्यादीसाठी preferences देखील सेट करते. |
07:30 | Calendar preferences वर क्लिक करा. |
07:34 | आपण 24 तासांच्या स्वरूपात वेळ प्रदर्शित करण्यासाठी calendar सेट करू. |
07:40 | तसेच, आपण 2 आठवड्यांपर्यंत Upcoming events look-ahead सेट करू. |
07:46 | याचा अर्थ आपण कॅलेंडरवरील पुढील 2 आठवड्यांमध्ये होणार्या सर्व कार्यक्रमां साठी अधिसूचना पाहू. |
07:55 | मी सर्व फील्डच्या पुढील help आयकॉन हायलाइट करू इच्छिते. |
08:00 | यावर क्लिक केल्याने, एक help box उघडेल, ज्यात field म्हणजे काय याचे थोडक्यात तपशील असेल. |
08:08 | कोणत्याही field बद्दल संशयास्पद असताना, नेहमीच त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी help आयकॉनवर क्लिक करा. |
08:16 | इतर सर्व पर्याय त्याप्रमाणे राहू द्या. Save Changes बटणवर क्लिक करा. |
08:23 | जेव्हा आपण या सिरीज मध्ये त्या वैशिष्ट्यांवर चर्चा करू तेव्हा उर्वरित प्रेफरेन्सेस जाणून घेऊ. |
08:30 | येथे माहिती लक्षात घ्या. |
08:33 | हे breadcrumb navigation आहे. हे एक व्हिज्युअल मदत आहे जे आपण Moodle sites’ च्या पदानुक्रमाच्या आत कोणत्या पेजवर आहोत हे सूचित करते. |
08:45 | हे आपल्याला एका क्लिक सह उच्च-स्तरीय पेजवर परत जाण्यात मदत करते. |
08:51 | dashboard वर जाण्यासाठी breadcrumbs मधील Dashboard लिंकवर क्लिक करा. |
08:57 | या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
09:03 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:
admin’s dashboard वर विविध blocks Admin’s profile page आणि preferences कशी एडिट करावी. |
09:16 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.
Message Preferences वर क्लिक करा. Users Moodle मध्ये एकमेकांना खाजगी मेसेज पाठवू शकतात. |
09:27 | जेव्हा मी ऑफलाईन असेल तेव्ह माझे मेसेजेस ईमेल म्हणून वितरीत केले नाही पाहिजे. |
09:33 | ऑनलाइन आणि ऑफलाइन हेल्प बॉक्सकडे पहा आणि सेटिंग्ज योग्य असल्याची खात्री करा. |
09:40 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाउनलोड करून पहा. |
09:48 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
09:57 | कृपया या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
10:01 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:15 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
10:24 | सहभागासाठी धन्यवाद. |