Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C2/How-to-create-a-library/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border =1 | <center>'''Time'''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 | '''How to create a Library in Koha''' वरील स्पोकन ट्यु...")
 
 
Line 198: Line 198:
 
|-
 
|-
 
|  04:55
 
|  04:55
| तरीही, जर केवळ एक '''email id''' प्रदान केला असेल तर, डिफॉल्ट रूपात,  '''Koha''' सर्व तिन्ही'''fields''' साठी तेच वापरेल.  
+
| तरीही, जर केवळ एक '''email id''' प्रदान केला असेल तर, डिफॉल्ट रूपात,  '''Koha''' सर्व तिन्ही '''fields''' साठी तेच वापरेल.  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:31, 18 February 2019

Time
Narration
00:01 How to create a Library in Koha वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरियलमध्ये आपण library तयार करणे आणि ग्रुप तयार करणे शिकणार आहोत:
00:16 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे Ubuntu Linux Operating System 16.04
00:24 आणि Koha version 16.05.
00:29 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, विद्यार्थ्यांना Library Science चे ज्ञान असावे.
00:35 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुमच्या सिस्टमवर Koha इन्स्टॉल असले पाहिजे.
00:41 आणि तुम्हाला Koha मध्ये Admin एक्सेस देखील असले पाहिजे.
00:46 अधिक माहितीसाठी, कृपया या वेबसाइटवरील Koha Spoken Tutorial ची सिरीज पहा.
00:53 आता सुरुवात करू. मी आधीच माझ्या सिस्टिमवर Koha इन्स्टॉल केले आहे.
00:59 मी Koha इंटरफेस वर जाते.
01:03 इंस्टॉलेशनच्या वेळी दिलेले username आणि password वापरून Koha मध्ये लॉग इन करा.
01:10 माझ्या सिस्टिमवर, मी Username ला koha underscore library म्हणून दिले आहे.
01:17 आता Password टाईप करा ज्याला conf.xml फाईलमधून दिले होते.
01:25 Koha चे मुख्य पृष्ठ उघडते.
01:27 लक्षात ठेवा की Koha सेट करताना, आपल्याला प्रत्येक Branch library ची माहिती टाकावी लागेल, जी आपण Koha मध्ये तयार करू.
01:38 ह्या डेटाचा वापर नंतर Koha च्या बर्याच भागात वापरला जातो.
01:43 आता, एक नवीन library तयार करूया.
01:47 Koha इंटरफेस वर परत जा.
01:50 Home वर जा आणि Koha Administration वर क्लिक करा.
01:56 Basic parameters सेक्शनवर जा.
02:00 Libraries and groups वर क्लिक करा.
02:04 एक नवीन लायब्ररी जोडण्यासाठी, '+ New Library' टॅबवर क्लिक करा.
02:10 आपण आतासाठी groups सेकशन वगळू.
02:15 या पृष्ठामध्ये, लक्षात ठेवा की सर्व fields लाल रंगात चिन्हांकित केलेली आहे.
02:21 आपल्या लायब्ररीसाठी फील्ड Library code आणि Name भरा, जसे कि मी येथे केले आहे.
02:29 लक्षात घेण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत- Library code मध्ये स्पेस नसले पाहिजे.
02:36 आणि ते 10 वर्णांपेक्षा कमी असावे.
02:40 या कोडचा वापर database मध्ये एक वेगळी ओळखकरताच्या रूपात केले जाईल.
02:46 पुढील सेकशन म्हणजे आपल्याला आपल्या लायब्ररीचा संपर्क तपशील भरावा लागेल जसे की-

पत्ता, फोन नंबर इत्यादी.

02:58 मी येथे दाखविल्याप्रमाणे तपशील भरला आहे.
03:01 जर तुमच्याकडे येथे सूचीबद्ध कोणत्याही field साठी माहिती नसेल, तर हे रिक्त सोडा.
03:08 त्याचप्रमाणे, या पृष्ठावर तुमच्या लायब्ररीचा तपशील भरा.
03:13 address आणि phone तपशीलांचा वापर तुमच्या लायब्ररीसाठी नंतर कस्टम नोटीस बनविण्यासाठी केला जाऊ शकतो.
03:20 जेव्हा त्यांना लायब्ररीशी संपर्क साधायचा असेल तेव्हा सदस्यांद्वारा या तपशीलांचा वापर देखील केला जाऊ शकतो.
03:26 Email id फील्ड अनिवार्य नाही, जसे कि तुम्ही पाहू शकता.
03:31 तथापि, तुमच्या द्वारे तयार केलेल्या लायब्ररीसाठी email id असणे अत्यंत महत्वाचे आहे.
03:38 हा email id आहे ज्यामधून सदस्यांना नोटीस (अधिसूचना) दिल्या जातात आणि येतात.
03:45 Gmail id हे अधिक चांगले आहे कारण ते मेल पाठविण्यासाठी आणि / किंवा मेल प्राप्त करण्यासाठी सहजपणे कॉन्फिगर केले जाऊ शकते.
03:54 Email id फील्डच्या खाली, आपल्याकडे Reply-To आणि Return-Path फिल्ड्स आहेत.
04:01 Reply-To - तुम्ही नोटिसांच्या सर्व उत्तरांसाठी आणखी एक email address निर्दिष्ट करू इच्छित असल्यास, तुम्ही ते येथे करू शकता.
04:11 मी Reply-To email id मध्ये stlibreoffice@gmail.com प्रविष्ट करेल.
04:20 हे रिक्त सोडल्यास, सर्व उत्तरे उपरोक्त दिलेल्या Email id वर जातील.
04:27 Return-Path वर या- हा email address आहे जेथे सर्व बाऊन्स झालेले संदेश जातील.
04:34 हे रिक्त सोडल्यास, सर्व बाऊन्स झालेले संदेश उपरोक्त दिलेल्या Email id वर जातील.
04:42 तर, मूलत: तीन वेगवेगळ्याemail ids वापरल्या जाऊ शकतात.
04:48 Email id ,
04:50 Reply-To आणि
04:52 Return-Path.
04:55 तरीही, जर केवळ एक email id प्रदान केला असेल तर, डिफॉल्ट रूपात, Koha सर्व तिन्ही fields साठी तेच वापरेल.
05:04 पुढे, field मध्ये तुमच्या लायब्ररीचा URL प्रविष्ट करा, जसे मी येथे केले आहे.
05:10 URL field भरल्यावर, विशिष्ट लायब्ररीचे नाव OPAC वर holdings table मध्ये जोडले जाईल.
05:18 यानंतर, आपल्याला OPAC info भरायचा आहे.
05:23 येथे आपल्याला आपल्या लायब्ररीविषयी माहिती द्यायची आहे.
05:28 मी येथे माझ्या लायब्ररीबद्दल काही माहिती प्रविष्ट केली आहे.
05:33 ही माहिती OPAC मध्ये दिसेल जेव्हा आपण holdings table मध्ये लायब्ररीच्या नावावर कर्सर नेतो.
05:41 जर एखाद्या विशिष्ट branch साठी URL ह्या फिल्डमध्ये ठेवली असेल तर, OPAC आपल्याला branch लायब्ररी सांगेल जिथे पुस्तक उपलब्ध आहे.
05:52 hyper-link address माहिती मिळविण्यास, माऊसला लिंकवर फिरवा.
05:58 हे विशिष्ट branch लायब्ररीचा पत्ता देईल जिथे पुस्तक जारी केले जाऊ शकते.
06:05 Koha interface वर परत जाऊ.
06:09 पुढे आपल्याकडे IP address आहे.
06:12 जर तुम्ही Koha admin access एका विशिष्ट IP address वर प्रतिबंधित करू इच्छित असाल तर तुम्ही येथे IP निर्दिष्ट करू शकता.
06:22 अन्यथा, तुम्ही त्यास रिक्त सोडू शकता.
06:25 मी ते रिक्त सोडेन
06:28 शेवटी, आपल्याकडे Notes field आहे.
06:32 येथेच आपण भविष्यातील संदर्भासाठी कोणत्याही नोट्स भरू शकता.
06:37 हे OPAC मध्ये प्रदर्शित होणार नाहीत.
06:40 सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, Submit बटणावर क्लिक करा.
06:46 नवीन लायब्ररीचे नाव Libraries पृष्ठावर दिसते.
06:51 आमच्या बाबतीत, Spoken Tutorial Library
06:55 आता आपण Group Library पर्यायाचा वापर कसा करावा ते पाहू या.
07:00 जर तुम्हाला एक नवीन group जोडायचे असे, तर '+ New Group' टॅबवर क्लिक करा.
07:07 समजा तुमच्याकडे काही branch लिब्ररीज आहेत, उदाहरणार्थ - Chemistry Library, Physics Library आणि Biology Library आणि तुम्हाला त्यांचा group बनवायचा आहे.
07:19 अशा परिस्थितीत Group Library पर्याय वापरा.
07:24 या ग्रुपला Science library असे नाव द्या जे मुख्य लायब्ररीच्या अंतर्गत येते.
07:31 ग्रुपिंग समानता आणि / किंवा समान वैशिष्ट्ये इत्यादींच्या आधारावर केले जाऊ शकते.
07:40 Database administrative user म्हणून तुमच्या वर्तमान सत्रातून लॉगआउट करा.
07:45 असे करण्यासाठी, वर उजव्या कोपर्यात जा आणि No Library Set वर क्लिक करा.
07:52 ड्रॉप-डाउन मधून, Logout वर क्लिक करा.
07:57 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
08:01 थोडक्यात
08:03 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकलो-

library तयार करणे आणि नवीन Group तयार करणे.

08:11 असाइन्मेंट म्हणून- एक नवीन लायब्ररी तयार करा आणि एक नवीन group तयार करा.
08:17 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
08:25 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

08:35 संबंधित प्रश्नांसाठी फोरम:

या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

08:42 कृपया या साईटला भेट द्या. तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
08:49 तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.
08:51 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
08:55 संबंधित प्रश्नांसाठी फोरम:
08:58 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
09:03 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
09:08 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल.
09:11 फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
09:17 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:23 या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
09:28 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana