Difference between revisions of "Arduino/C2/Electronic-components-and-connections/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | '''Electronic components and connections''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्य...")
 
 
Line 257: Line 257:
 
| 06:52
 
| 06:52
 
| ही इमेज पहा.
 
| ही इमेज पहा.
'''push button''' चे पाय '''A ''' आणि '''C ''' ने, '''LED ''' चा '''anode '''  २ ऱ्या '''power rail''' शी जोडलेला आहे.
+
'''push button''' चे पाय '''A ''' आणि '''C ''' ने, '''LED ''' चा '''anode '''  २ ऱ्या '''power rail''' शी जोडलेला आहे.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:51, 30 November 2018

Time Narration
00:01 Electronic components and connections वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत: Breadboard आणि त्याचे अंतर्गत कनेक्शन कसे वापरायचे.
00:14 ब्रॅडबोर्ड वर LED , PushButton आणि breadboard वर Seven Segment Display.
00:23 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी तुम्हाला इलेक्ट्रॉनिक घटक जसे resistors, push-button, LED इत्यादीचे ज्ञान असले पाहिजे.
00:34 ओपन सर्किट,

क्लोज्ड सर्किट,

00:38 सिरीयल आणि समांतर कनेक्शन,
00:41 बॅटरीज, पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह वोल्टेज.
00:47 खालील घटकांचा वापर करून हे ट्युटोरिअल रेकॉर्ड केले आहे: Breadboard,
00:54 LED किंवा Tri Colour LED, Push Button,
01:00 Resistor आणि Seven Segment Display.
01:06 breadboard असे दिसते.
01:11 breadboard हे सर्किटच्या घटकांना धरून त्यांना एकत्र करण्याचे एक साधन आहे.
01:18 आपण कोणत्याही सोल्डरिंगशिवाय (डाक न लावणे) breadboard वर इलेक्ट्रॉनिक सर्किट तयार करू शकतो.
01:25 वरील दोन रैल्स आणि खालील दोन रैल्सना power rails म्हटले जाते.
01:31 वरच्या रांगेत सर्व छिद्र (होल्स) एकत्र जुडलेले आहेत आणि ते लाल बिंदू आणि निळ्या बिंदूंसह चिन्हांकित केलेले आहेत.
01:41 लक्षात घ्या की कनेक्शन breadboard च्या मध्यभागी तुटते.
01:46 मध्यभागी, तारांचे(वायर) स्तंभ एकत्र जोडले जातात.
01:51 उदाहरणासाठी, चिन्हांकित सर्व हिरवे छिद्र (होल) एकत्र जोडलेले आहेत.

परंतु ते पिवळ्या छिद्रांशी जोडलेले नाहीत.

02:02 पुढे आपण LED बद्दल शिकू.

LED याचा अर्थ light emitting diode आहे.

02:11 जेव्हा वर्तमान प्रवाह चालू असतो तेव्हा तो रंगीत प्रकाश सोडतो.
02:16 LED चे दोन leads म्हणजे anode आणि cathode आहेत.
02:22 anode ही मोठी lead आहे. हे positive voltage शी जोडलेले असावे.
02:29 cathode ही लहान lead आहे. हे ground शी जोडलेले असावे.
02:35 Tri-color LED हे LED ची प्रगत व्हर्जन आहे जे तीन भिन्न रंग सोडते.
02:43 यात 4 pins आहेत. सर्वात मोठा lead याला common lead म्हणतात.
02:50 उर्वरित तीन पिन्स 'लाल', हिरव्या आणि निळ्या रंगाचे LEDs साठी असतात.
02:57 दोन प्रकारचे tri-color LEDs आहेत: common anode आणि common cathode.
03:07 common anode व्हर्जन, common lead positive voltage शी जोडली पाहिजे.
03:14 common cathode व्हर्जन, common lead ground शी जोडली पाहिजे.
03:21 पुढे आपण Resistor बद्दल शिकू.
03:25 resistor हे सर्किटमध्ये वर्तमान प्रवाह मर्यादित करण्यासाठी वापरला जातो.
03:30 आता आपण LED, resistor आणि breadboard वापरुन साधे सर्किट तयार करूया.
03:37 इमेज (प्रतिमा) योग्य कनेक्शन दर्शवते.
03:41 9 volt battery चे Positive दुसऱ्या rail शी जोडले गेले आहे.
03:46 9 volt battery चे Negative प्रथम rail शी जोडला आहे.
03:51 LED चे Anode (म्हणजे उजवा lead),breadboard च्या दुसर्या रेलला resistor द्वारे जोडलेले आहे.
04:00 LED चे Cathode (म्हणजे डावा lead), breadboard च्या पहिल्या रेलला जोडलेले आहे.
04:08 हे LED कनेक्शनचे थेट सेटअप आहे.
04:13 आपण पाहू शकतो की "LED" चमकत आहे, कारण आपण वापरलेले कनेक्शन योग्य आहेत.
04:21 आता, कनेक्शन बनविण्यासाठी breadboard वापरताना लोक करत असलेली सामान्य चूक आपण पाहू.
04:29 या कनेक्शनमध्ये, "LED"' चमकत नाही कारण कनेक्शन योग्य नाहीत.
04:36 resistor आणि LED एकमेकांच्या बाजूला ठेवल्या जातात.
04:41 power rails वगळता breadboard मधील छिद्र स्तंभानुसार जोडले जातात.
04:47 तर LED चे anode आणि resistor lead मधील कोणतेही कनेक्शन नाही.

यामुळेLED वेगळे होते.

04:57 दुसऱ्या कनेक्शनमध्ये, LED चे cathode दुसऱ्या rail शी जोडलेले आहे.
05:04 LED चा anode resistor च्या माध्यमातून प्रथम रेलला जोडलेला आहे.
05:10 या सर्किटमधील कनेक्शन हे काय असावे याच्या उलट आहेत.

म्हणूनच LED चमकत नाही.

05:18 पुढे आपण push button बद्दल शिकू.
05:23 push button एक switch यंत्रणा आहे जी दाबल्यावर सर्किटमध्ये दोन पॉईंट्सना जोडते.
05:31 Push button सहसा चार पायांसह येते.
05:35 switch च्या स्थितीची पर्वा न करता, पाय A आणि C नेहमीच जोडलेले असतात.
05:43 त्याचप्रमाणे पाय B आणि D नेहमीच जोडलेले असतात.
05:48 जेव्हा switch दाबले जाते तेव्हा सर्व चार पाय एकमेकांशी जोडलेले असतात.
05:53 आता पूर्वीच्या सर्किटमध्ये push button जोडा आणि LED ची स्थिती(स्टेट) बदलण्यासाठी ते वापरा.
06:02 इमेज योग्य कनेक्शन दर्शवते.

LED anode २ ऱ्या power rail शी जोडला जातो म्हणजे resistor आणि push button द्वारे पॉसिटीव्ह वोल्टेज .

06:15 आता थेट सेटअप कनेक्शन पाहू.
06:19 जेव्हा push button दाबले जाते तेव्हा LED अपेक्षेप्रमाणे चमकते.
06:25 जसे कि push button मध्ये 4 पाय आहेत, सर्किट दुसर्या पद्धतीने देखील तयार केले जाऊ शकते.
06:32 push button चे पाय B वापरण्याऐवजी आपण पाय D वापरत आहोत.
06:38 ते एकमेकांशी आंतरिकरित्या जोडलेले असल्याने, push button दाबल्यानंतर LED चमकते.
06:45 पुढे, push buttons वापरताना लोक करत असलेली सामान्य चूक आपण पाहू.
06:52 ही इमेज पहा.

push button चे पाय A आणि C ने, LED चा anode २ ऱ्या power rail शी जोडलेला आहे.

07:03 लक्षात ठेवा की push button चे A आणि C पाय आंतरिकपणे जोडलेले आहेत.
07:10 म्हणूनच LED चे anode नेहमी 2 ऱ्या power rail शी push button चा वापर न करता जोडलेला असतो.
07:19 push button OFF असेल तर LED नेहमी या सर्किटमध्ये चमकते.
07:26 आता seven-segment display वर जाऊ.
07:31 seven-segment display चे सात LEDs आठव्या क्रमांकाच्या आकारात समायोजित आहेत.
07:38 दोन प्रकारचे seven-segment displays आहेत: common anode आणि common cathode seven segment display.
07:49 common cathode seven-segment display मध्ये, pins a, b, c, d, e, f, g आणि dot हे +5Volts शी कनेक्ट केले पाहिजे.
08:02 दोन COM pins हे ground (GND) ला कनेक्ट केले पाहिजे.
08:07 common anode display हा अगदी उलट आहे.
08:11 येथे pins a, b, c, d, e, f, g आणि dot हे ground शी कनेक्ट केले पाहिजे.

आणि दोन COM pins हे +5Volts शी कनेक्ट केले पाहिजे.

08:26 आता breadboard वर seven-segment display कसे जोडायचे आणि सर्व LEDs कसे चमकू हे पाहू.
08:35 seven-segment display इमेज मध्ये वापरली जाणारी एक common anode आहे.
08:41 म्हणून common anode 2 ऱ्या power rail च्या resistor द्वारे जोडलेले आहे.
08:48 LED pins a, b, c, d, e, f, g, dot पहिल्या power rail शी जोडले गेले आहेत.
08:56 जर कनेक्शन योग्य असेल तर आपल्याला दिसेल की सर्व LEDs चमकत आहेत.
09:02 आता थेट सेटअप कनेक्शन पाहू.
09:05 आपण seven segment display मधील सर्व सेगमेंट्स चमकत आहे पाहू शकतो.
09:11 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:17 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: Breadboard आणि त्याचे अंतर्गत कनेक्शन.
09:24 ब्रॅडबोर्ड वर LED , PushButton आणि breadboard वर Seven Segment Display.
09:33 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
09:41 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:51 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

कृपया या साईटला भेट द्या.

09:57 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा.

10:04 आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.
10:07 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.

कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.

10:17 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
10:26 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

10:37 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana