Difference between revisions of "Drupal/C2/Creating-Basic-Content/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 365: Line 365:
 
|-
 
|-
 
| 10:15
 
| 10:15
| या व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
+
| या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
  
 
|-
 
|-
 
| 10:22
 
| 10:22
| प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
| स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 14:19, 17 October 2016

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Creating Basic Content वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात आपण शिकणार आहोत: कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे.
00:15 या पाठासाठी आपण वापरणार आहोत, उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम Drupal 8 आणि फायरफॉक्स वेब ब्राऊजर
00:25 तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता.
00:29 प्रथम Content type बद्दल जाणून घेऊ. ड्रुपलमधे Content type हा content management system चा मुख्य गाभा आहे.
00:39 हा साईटच्या आधारस्तंभाप्रमाणे असतो.
00:42 ही गोष्ट जी ड्रुपलला इतर CMS पासून वेगळे करते.
00:48 बहुतांश CMS मधे फक्त शीर्षक आणि बॉडी असे दोनच भाग असतात जे खूप अपुरे असतात असे लक्षात आले आहे.
00:57 ड्रुपलमधे प्रत्येक कंटेंट आयटमला node म्हणतात. प्रत्येक नोड एका कंटेंट टाईपशी संबंधित असतो.
01:06 पुढे कंटेंट टाईपचे महत्व जाणून घेऊ. Content type त्या प्रकारच्या नोडससाठी विविध डिफॉल्ट सेटिंग निश्चित करतो. जसे की-
01:17 नोड आपोआप पब्लिश करायचे का? comments ची परवानगी आहे का?
01:23 आपल्या साईटवर कंटेंट कसे समाविष्ट होतात. प्रत्येक कंटेंट टाईपला फिल्डस असतात.
01:30 समाविष्ट होत असलेल्या कंटेंटच्या प्रकारानुसार माहिती देण्यासाठी आपल्याकडे आवश्यकतेनुसार फिल्डस आहेत.
01:38 आपण हे अशाप्रकारे समजून घेऊ. IMDb.Com ही ड्रुपलची एक साईट असू शकते. ही Red या चित्रपटाशी संबंधित आहे.
01:49 स्क्रीनवर आपण पाहू शकतो - पोस्टर,शीर्षक,प्रदर्शित झाल्याची तारीख,
01:55 पेरेंटल रेटींग,चित्रपटाचा कालावधी,चित्रपटाचा प्रकार,
01:59 बॉडी किंवा चित्रपटाचे वर्णन.
02:04 आपल्याकडे People fields, जोडीला इतर लिंक्स, बटन्स तसेच अन्य काही गोष्टींचा संच असेल.
02:09 इतर CMS मधे, CSS द्वारा हा लेआऊट बनवण्यासाठी Dreamweaver वापरू शकतो.
02:16 जर आपल्याला असे हवे असेल तर काय होईल- 2010 मधील सर्व चित्रपटांसाठी लँडिग पेज,अभिनेता Bruce Willis, पेरेंटल रेटिंग PG 13.
02:28 तुम्ही दुसरे CMS वापरणार असल्यास हे करणे कठीण आहे परंतु ड्रुपलमधे हे सहजपणे करता येते.
02:37 हा Content types चा खरा फायदा आहे. आता आपण काही बिल्ट-इन Content types वापरून बघू.
02:46 नंतर नवे Content types बनवायला शिकू. आधी तयार केलेली ड्रुपल साईट उघडा.
02:54 प्रथम Article Content type बद्दल जाणून घेऊ. Content क्लिक करून Add content क्लिक करा.
03:04 आपण आधीच एक आर्टिकल बनवले होते. आता सर्व एलिमेंटस असणारे दुसरे आर्टिकल बनवू.
03:13 Article वर क्लिक करा. आर्टिकलमधे केवळ Title हे एकच अनिवार्य फिल्ड आहे.
03:21 बॉडीमधे काहीही न लिहिल्यास आपल्याकडे काहीच नसेल. Article Content type हा Summary सह येतो.
03:28 आपण Summary मधे काही लिहिले नाही तर ड्रुपल पहिली काही अक्षरे घेऊन ते तयार करेल. ह्याला Teaser mode म्हणतात.
03:38 पुढे जाऊ. येथे टेक्स्टच्या काही ओळी टाईप करू.
03:43 तुम्ही तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करू शकता.
03:45 हे माझे टेक्स्ट आहे.
03:50 येथे Text format सुचवतो की आपण HTML मधे कोणती एलिमेंट्स ठेवू शकतो.
03:56 येथे Basic, Restricted आणि Full HTML हे पर्याय आहेत. आपण सुपर युजर असल्यामुळे सर्व काही पाहू शकतो.
04:05 सामान्यतः, युजरने editor किंवा publisher म्हणून लॉगिन केल्यास येथे केवळ Text format हा पर्याय असतो. त्यांना केवळ Text format वापरण्याची परवानगी असते.
04:17 अधिक माहितीसाठी About text formats लिंकवर क्लिक करा.
04:22 सध्या Basic HTML पर्याय निवडू.
04:26 Basic HTML सोर्स कोड बघण्याची आणि काही basic HTML elements एलिमेंटस वापरण्याची परवानगी देते. जसे की-
04:33 पॅराग्राफ टॅग, स्ट्राँग इटॅलिक,
04:36 unordered list, ordered list आणि इतर काही.
04:41 Full HTML आपल्याला JavaScript आणि iframes सह कोणतेही HTML एम्बेड करू देते.
04:48 Restricted HTML मधे आपण केवळ पॅराग्राफ टॅग किंवा लाईन ब्रेक्ससारख्या गोष्टी समाविष्ट करू शकतो.
04:57 WYSIWYG एडिटर हा CKEditor आहे. त्याबद्दल आपण नंतर जाणून घेऊ.
05:03 येथे आपण बोल्ड, इटॅलिक्स, लिंकींग, unordered आणि ordered लिस्टस, ब्लॉक कोट आणि इमेज बघू शकतो.
05:11 वेगवेगळे H टॅग्ज निवडण्यासाठी फॉरमॅटचा ड्रॉपडाऊन आहे. शेवटी व्ह्यू सोर्स आहे.
05:18 टेक्स्ट फॉरमॅट बदलल्यावर अधिक बटणे उपलब्ध होतील. त्याबद्दल नंतर जाणून घेऊ.
05:25 सध्या Basic HTML पर्याय तसाच ठेवून Continue वर क्लिक करा.
05:32 आपले आर्टिकल पूर्ण करू. "introduction" आणि "drupal" हे टॅग्ज पुन्हा वापरू.
05:40 सध्या इमेजचा भाग रिकामा ठेवणार आहोत. हे कसे कार्य करते ते आपण पाहिले आहे.
05:47 उजव्या बाजूला व्हिजिबलिटी आणि पब्लिकेशन संदर्भातील सेटिंग्ज आहेत.
05:52 या विशिष्ट आर्टिकलचे वर्जन कंट्रोल सुरू करण्यासाठी Create new revision या चेकबॉक्सवर क्लिक करा.
05:59 तुम्हाला आर्टिकल मेनू लिंकमधे समाविष्ट करायचे असल्यास Provide a menu link चा चेकबॉक्स क्लिक करा. ड्रुपल मुख्य नेव्हिगेशनमधे हा मेनू आयटम समाविष्ट करेल.
06:11 असे केल्यास आपल्याला शेकडोंनी मेल्स येतील म्हणून हा चेकमार्क काढून टाका.
06:17 आपण विशिष्ट नोडवरील Comments ऑन किंवा ऑफ करू शकतो.
06:22 येथे आपण URL alias देऊ शकतो.
06:26 हे रिकामे ठेवल्यास ड्रुपल आपल्यासाठी alias तयार करेल.
06:30 AUTHORING INFORMATION, खाली आपण हा नोड कोणी आणि कधी बनवला हे बघू शकतो.
06:37 PROMOTION OPTIONS खाली व्ह्यू सेटींग्ज सेट करू शकतो. जसे की- हा नोड पहिल्या पेजवर प्रमोट करायचा आहे का? हे सूचीमधे सगळ्यात वर असले पाहिजे का?
06:50 आपण आपला Content type बनवतो आणि editor ला हे बदलायचे नसते त्यावेळी हा सेट-अप असतो.
06:56 परंतु आपण आपल्या पसंतीनुसार त्यात बदल करू शकतो.
07:00 शेवटी नोड सेव्ह करण्यासाठी Save and publish क्लिक करा.
07:04 नोड लगेचच साईटवर कार्यान्वित होईल. आपण हा येथे बघू शकतो.
07:10 Home पेजवर क्लिक करा.
07:12 आपल्याकडे Welcome to Drupalville आणि Drupalville's Second Article आहे.
07:17 Teaser mode मधे हे प्रकाशित झालेल्या तारखेनुसार दाखवले आहे.
07:23 Read more आणि Add new comment या लिंक्स येथे आहेत.
07:28 ड्रुपल शब्दाने टॅग केलेल्या सर्व नोडसची सूची मिळवण्यासाठी drupal लिंक क्लिक करा.
07:35 पुन्हा, नोडस हे प्रकाशित झालेल्या तारखांनुसार दाखवले आहेत.
07:40 ते Article Content type आहे.
07:43 Edit लिंक क्लिक करा.
07:45 आपण येथे काहीही समाविष्ट करू शकतो.
07:48 ड्रुपल डिफॉल्ट रूपात अनेक पर्याय देते.
07:52 Save and keep published वर क्लिक करा.
07:56 आपण Content types चा उपयोग कशासाठीही करू शकतो.
07:58 आता आणखी एक घटक समाविष्ट करू. Shortcuts वर क्लिक करून Add content क्लिक करा.
08:04 Basic page पर्याय निवडा. Basic पेजमधे Title आणि Body चा समावेश आहे.
08:10 तेथे कोणतेही टॅग्ज आणि इमेजेस नाहीत. हे डिफॉल्ट रूपात promoted to front page नाही.
08:17 तसेच येथे कॉमेंट करण्यासाठी कोणतीही तरतूद नाही कारण हे होम पेजवर प्रमोट केले जाणार नाही. नवा मेनू तयार करणे सोपे आहे.
08:27 येथे About Drupalville टाईप करा.
08:30 येथे तुमच्या पसंतीचे टेक्स्ट टाईप करा.
08:33 आता MENU SETTINGS खालील Provide a menu link हा पर्याय निवडा.
08:38 आपण बघू शकतो की Title बदलून ते Menu Title झालेले आहे.
08:43 हवे असल्यास हे छोटे करता येईल. या main navigation मधे चेक करा आणि आतासाठी Weight 0 ठेवा.
08:51 मेनू, सूची मधे कुठे दिसेल हे Weight वरून ठरते. कमी किंवा ऋण संख्या दिल्यास मेनू सूचीत वरती दाखवला जातो.
09:03 बाकी हे आहे तसेच ठेवा. menu link पर्याय निवडला असल्याची खात्री करा आणि Save and publish वर क्लिक करा.
09:11 आपल्याला About Drupalville ही लिंक मिळेल. ही आपल्याला About Drupalville अशा नोड शीर्षकाच्या बेसिक पेज कंटेंट टाईपवर घेऊन जाईल.
09:22 येथे 3 हा node ID दाखवत आहे. आधी इतर नोडस समाविष्ट केले असल्यास तुमचा node ID माझ्यापेक्षा वेगळा असेल.
09:32 डाव्या बाजूला खाली आपण node ID 3 पाहू शकतो. मात्र आपल्याला त्याची वारंवार गरज भासत नाही.
09:41 हे आर्टिकल, मेनू लिंक असलेले बेसिक पेज कंटेंट टाईप आहे. आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:50 थोडक्यात, आपण या पाठात जाणून घेतलेः कंटेंट टाईप्स, आर्टिकल बनवणे आणि बेसिक पेज तयार करणे.
10:05 हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी मुंबईच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे.
10:15 या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया व्हिडिओ डाऊनलोड करून बघा.
10:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
10:30 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, Ministry of Human Resource Development आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:44 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरिप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana