Difference between revisions of "Java-Business-Application/C2/Creating-and-viewing-inventories/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 7: Line 7:
  
  
{| border=1
+
{| border = 1
!Time
+
|'''Time'''
!Narration
+
|'''Narration'''
 
+
  
 
|-
 
|-
Line 534: Line 533:
 
|-
 
|-
 
| 09:53  
 
| 09:53  
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .  
+
| ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .  
  
 
|-
 
|-

Latest revision as of 12:01, 19 April 2017

Title of script: Creating-and-viewing-inventories

Author: Manali Ranade

Keywords: Java-Business-Application


Time Narration
00:01 Creating आणि viewing inventories वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:09 लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे.
00:14 सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे.
00:17 दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे.
00:20 आणि लॉगिन झालेल्या युजरने नेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे.
00:25 आपण वापरणार आहोत,
00:27 उबंटु वर्जन 12.04
00:29 नेटबीन्स IDE 7.3
00:32 JDK 1.7
00:34 फायरफॉक्स वेब ब्राऊजर 21.0
00:38 .तुम्ही तुमच्या पसंतीचा वेब ब्राऊजर वापरू शकता
00:42 ह्या पाठासाठी तुम्हाला
00:45 जावा Servlets, JSPs ,
00:50 डेटाबेस आणि फिल्डस व्हॅलिडेट करण्याचे प्राथमिक ज्ञान असावे.
00:53 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:57 आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
01:01 मी Books टेबल बनवले आहे.
01:04 तुम्ही टेबलमधे विविध फिल्डस बघू शकता.
01:08 मी ह्या टेबलमधे 10 पुस्तके समाविष्ट केली आहेत.
01:12 दिली गेलेली पुस्तके संचित करण्यासाठी Checkout टेबल बनवले आहे.
01:18 मी Checkout टेबलमधे पाच नावे संचित केली आहेत.
01:24 मी Book आणि Checkout साठी मॉडेल देखील बनवले आहे.
01:29 Book.java हे Book मॉडेल आहे.
01:32 Checkout.java हे checkout मॉडेल आहे.
01:37 ब्राऊजरवर जाऊ.
01:40 admin म्हणून लॉगिन करू .
01:43 त्यासाठी युजरनेम आणि पासवर्ड म्हणून admin टाईप करा. Sign In वर क्लिक करा .
01:51 आपण Admin Section Page वर आलो आहोत.
01:55 आपण या पेजवर परत येणार आहोत. आता नेटबीन्स IDE वर जाऊ.
02:02 Admin Page वर रिडायरेक्ट करण्यासाठी GreetingServlet कसे बदलायचे ते पाहू.
02:08 GreetingServlet.java पाहू.
02:13 येथे युजरनेम आणि पासवर्डची व्हॅल्यू admin आहे का हे तपासणार आहोत.
02:19 असल्यास adminsection.jsp वर रिडायरेक्ट करणार आहोत.
02:25 RequestDispatcher वापरून दुस-या पेजला कसे फॉरवर्ड करायचे हे आधीच पाहिले आहे.
02:32 ब्राऊजरवर परत जाऊ.
02:35 आपल्याकडे दोन पर्याय आहेत.
02:37 List Books रेडिओ बटणावर क्लिक करा .
02:41 सबमिट बटणावर क्लिक करा .
02:44 येथे सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.
02:49 त्यामधे Book Id, BookName,Author Name, ISBN, Publisher, Total Copies आणि Available copies अशी सर्व माहिती आहे.
02:59 आता हे कसे केले ते पाहू.
03:03 IDE वर परत जाऊ.
03:05 adminsectiondot jsp वर जा.
03:10 येथे दोन रेडिओ बटणे आहेत.
03:14 पहिले बटण सर्व पुस्तकांची यादी दाखवण्यासाठी आहे.
03:19 आपल्याकडे adminsection dot jsp मधे form action = AdminSection आहे.
03:28 आता AdminSection dot java उघडा.
03:32 येथे क्लिक केलेला पर्याय कोणता हे तपासले जाईल .
03:36 आपण List Books वर क्लिक केले होते.
03:39 त्यामुळे क्वेरीचा हा भाग कार्यान्वित होईल.
03:44 Books टेबल मधून पुस्तके मिळवण्याकरता क्वेरी कार्यान्वित करू.
03:49 पुढे पुस्तकांची माहिती संचित करण्यासाठी ArrayList बनवू.
03:55 नंतर result set मधून आयटरेट करू.
03:59 आपण Book ऑब्जेक्ट बनवत आहोत.
04:03 Bookऑब्जेक्टमधे BookId सेट करत आहोत.
04:08 तसेच पुस्तकांचे इतर अॅट्रीब्यूट्स Book ऑब्जेक्टमधे सेट करत आहोत.
04:16 नंतर book च्या सूचीत bookऑब्जेक्ट समाविष्ट करू.
04:21 नंतर Request मधे ArrayList books सेट करू.
04:26 नंतर RequestDispatcher द्वारे ही रिक्वेस्ट listBooks.jsp कडे पाठवू.
04:33 आता listBooks.jsp वर जाऊ.
04:38 ह्या पेजवर admin पुस्तकांची यादी बघू शकतो.
04:43 येथे प्रथम Request मधून पुस्तके मिळवणार आहोत.
04:48 HTML टेबल पुस्तकांची माहिती दाखवेल.
04:54 आता आपण book list मधून आयटरेट करू.
04:58 येथे पुस्तकांचे BookId दाखवणार आहोत.
05:02 तसेच पुस्तकांचे अॅट्रीब्यूट्स दाखवणार आहोत.
05:07 अशाप्रकारे पुस्तकांची यादी दाखवू.
05:11 ब्राऊजरवर परत जाऊ.
05:14 List Borrowed Books वर क्लिक करा .
05:17 सबमिट बटणावर क्लिक करा .
05:20 दिल्या गेलेल्या सर्व पुस्तकांची यादी बघू शकतो.
05:24 त्यामधे Transaction Id, Book Id आणि युजरनेम ही माहिती आहे.
05:29 आता IDE वर परत जाऊ .
05:32 त्यासाठी कोड बघू.
05:35 AdminSection.java वर जा.
05:38 आपण List Borrowed Books वर क्लिक केले आहे.
05:42 त्यामुळे menuSelection = List Borrowed books झाले आहे.
05:47 List Books साठी केलेल्या स्टेप्स येथे करू.
05:53 Checkout टेबल मधून घेतलेल्या पुस्तकांची माहिती मिळवण्यासाठी क्वेरी कार्यान्वित करू.
05:59 आता आपण borrowed books मधून आयटरेट करू.
06:02 आणि हे request मधे checkout अॅट्रीब्यूट म्हणून सेट करा.
06:07 आता listBorrowedBooks.jsp वर आलो आहोत.
06:12 request मधून आपण checkout मिळवणार आहोत.
06:17 Checkout list मधून आयटरेट करू.
06:20 आणि येथे Checkout अॅट्रीब्यूट्स दाखवत आहोत.
06:25 अशाप्रकारे Borrowed Books दाखवत आहोत.
06:28 आता ब्राऊजरवर परत जाऊ.
06:30 Borrowed Books च्या पेजवर आपल्याकडे आणखी एक सूची आहे.
06:36 अशा दिल्या गेलेल्या पुस्तकांची सूची, जिथे करंट डेट ही त्यांच्या रिटर्न डेटपेक्षा मोठी आहे.
06:43 कोड बघण्यासाठी IDE वर परत जाऊ.
06:46 आपण Borrowed Books साठी केल्याप्रमाणेच हे केले आहे.
06:50 फरक केवळ SQL क्वेरी मधे आहे.
06:56 क्वेरी मधे return_date less than now() order by transaction_Id ही कंडिशन देऊ.
07:05 आता सामान्य युजरसाठीचा इंटरफेस पाहू.
07:10 त्यासाठी ब्राऊजरवर जाऊ.
07:12 लॉगिन पेजवर परत जा.
07:15 मी mdhusein म्हणून लॉगिन करत आहे.
07:20 welcome हा पासवर्ड टाईप करा.
07:22 Sign In वर क्लिक करा.
07:25 आपल्याला Success Greeting Page मिळेल.
07:28 त्यामधे युजरने सध्या घेतलेली पुस्तके आहेत.
07:32 त्यामधे Transaction Id, युजर नेम, Book Id आणि परतीचा दिनांक अशी माहिती आहे.
07:39 आता IDE वर परत जाऊ.
07:43 GreetingServlet.java वर जाऊ.
07:47 adminसाठी केल्याप्रमाणेच आपण दिलेली पुस्तके दाखवू .
07:53 इथे एवढाच फरक असेल की ही पुस्तके लॉगिन केलेल्या युजरने घेतलेली असतील.
08:02 या ओळीद्वारे युजरनेम मिळेल.
08:05 नंतर borrowed पुस्तकांची माहिती मिळवू.
08:10 ज्यात युजरनेम बरोबर लॉगिन केलेला युजर ही कंडिशन असेल.
08:14 त्यामुळे आपल्याला संबंधित युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळेल.
08:20 नंतर successGreeting dot jsp मधे सूची दाखवू.
08:27 अशाप्रकारे successGreeting dot jsp दिसेल.
08:32 पाठात आपण शिकलो:
08:35 लॉगिन पेज मधे बदल करून ते अॅडमिन पेजवर रिडायरेक्ट करणे.
08:39 सर्व पुस्तकांची माहिती मिळवणे.
08:42 दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी मिळवणे
08:45 आणि लॉगिन केलेल्या युजरला दिल्या गेलेल्या पुस्तकांची यादी दाखवणे.
08:50 प्रॉजेक्टची माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
08:56 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
08:59 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:04 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
09:06 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:09 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:13 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
09:20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
09:24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
09:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
09:40 ग्रंथालय मॅनेजमेंट सिस्टीमसाठी एका प्रख्यात बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीने त्यांच्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीतून योगदान दिले आहे.
09:49 त्यांनी ह्या स्पोकन ट्युटोरियलचे प्रमाणिकरणही केले आहे.
09:53 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
09:57 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana