Difference between revisions of "Ruby/C2/Control-Statements/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 246: Line 246:
 
|-
 
|-
 
| 03:27  
 
| 03:27  
| '''The value of my_num is lesser than 0” असे आऊटपुट दिसेल.'''
+
| '''“The value of my_num is lesser than 0”''' असे आऊटपुट दिसेल.
  
 
|-
 
|-

Latest revision as of 14:46, 15 July 2014

Title of script: Control-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबी मधील कंट्रोल स्टेटमेंटस वरील पाठात आपले स्वागत.
00:06 यात शिकणार आहोत,
00:08 if स्टेटमेंट
00:09 elsif स्टेटमेंट
00:11 else आणि
00:12 case स्टेटमेंटस.
00:14 त्यासाठी वापरणार आहोत,
00:15 उबंटु वर्जन 12.04
00:18 रुबी 1.9.3
00:21 या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असावे.
00:24 तुम्हाला लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:30 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 सुरूवात करण्यापूर्वी, मागे आपण “ttt” नामक डिरेक्टरी बनवली होती.
00:38 त्या डिरेक्टरीवर जाऊ.
00:41 आणि त्यानंतर ruby hyphen tutorial, control hyphen statements
00:47 आता त्या फोल्डरमधे आहोत. पुढे जाऊ.
00:52 रुबीमधे इफ स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे:
00:56 if " कंडिशन"
00:58 रुबी कोड
00:59 end
01:01 त्याचे उदाहरण पाहू.
01:03 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
01:08 if hyphen statement dot rb असे नाव द्या.
01:12 माझ्याकडे हे if स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
01:15 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
01:19 ह्या पाठात if स्टेटमेंट घोषित केले आहे.
01:23 प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्याला 2345 ही व्हॅल्यू दिली.
01:31 नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे.
01:34 if स्टेटमेंट मधे puts मेथड समाविष्ट केली आहे जी आऊटपुट दाखवेल.
01:39 if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
01:43 असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल.
01:47 टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
01:51 ruby space if hyphen statement dot rb
01:57 The value of my_num is greater than 0”. असे आऊटपुट दिसेल.
02:02 हे आऊटपुट if कंडिशन true असल्याचे सिध्द करते.
02:07 आता रुबीमधे तुमचे if स्टेटमेंट लिहू शकता.
02:12 पुढे if-else स्टेटमेंट पाहू.
02:16 else वापरण्याचा सिंटॅक्स असा आहे:
02:18 if कंडिशन
02:19 रुबी कोड
02:20 else
02:21 रुबी कोड
02:22 end
02:24 आता उदाहरण पाहू.
02:26 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
02:30 त्याला if hyphen else hyphen statement dot rb नाव द्या.
02:37 माझ्याकडे if-else स्टेटमेंटचे उदाहरण आहे .
02:40 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
02:44 ह्या उदाहरणात if-else स्टेटमेंट घोषित केले आहे.
02:48 प्रथम my_num हे लोकल व्हेरिएबल घोषित करून त्यास -1 ही व्हॅल्यू दिली आहे.
02:55 नंतर if स्टेटमेंट घोषित केले.
02:58 if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त आहे का ते तपासेल.
03:03 असेल तर दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवली जाईल.
03:06 नसेल तर हे else स्टेटमेंटवर जाईल.
03:10 आणि त्यात दिलेली स्ट्रिंग आपल्याला दाखवेल.
03:13 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा.
03:18 ruby space if hyphen else hyphen statement dot rb
03:26 आणि आऊटपुट बघा.
03:27 “The value of my_num is lesser than 0” असे आऊटपुट दिसेल.
03:32 हे else स्टेटमेंट कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे.
03:35 आता तुम्ही if-else स्टेटमेंट रुबीमधे लिहू शकता.
03:41 आता if-elsif स्टेटमेंट पाहू.
03:45 elsifचा सिंटॅक्स असा आहे:
03:48 if कंडिशन रुबी कोड
03:50 elsif कंडिशन रुबी कोड
03:52 else रुबी कोड
03:54 end
03:55 त्याचे उदाहरण पाहू.
03:58 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
04:01 त्याला if hyphen elsif hyphen statement dot rb असे नाव द्या.
04:07 माझ्याकडे हे if-elsif- स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
04:10 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
04:14 ह्या उदाहरणात if-elsif- स्टेटमेंट घोषित केले आहे.
04:19 येथे सुद्धा my_num हे व्हेरिएबल घोषित करून त्याला -1 ही व्हॅल्यू दिली आहे.
04:25 नंतर if स्टेटमेंट घोषित केले आहे.
04:28 हे if स्टेटमेंट my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे का ते तपासेल.
04:32 असल्यास दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल.
04:35 हे true नसल्यास ते elsif भागा मधे जाईल.
04:39 आता हे my_num ची व्हॅल्यू -1 आहे का ते तपासेल.
04:43 true असल्यास येथे दिलेली स्ट्रिंग आऊटपुट म्हणून दाखवेल.
04:46 my_num ची व्हॅल्यू 0 पेक्षा जास्त किंवा -1 नसेल तर ते else वर जाईल.
04:54 पण my_num = -1 असल्यामुळे हे else ब्लॉकवर जाणार नाही.
05:00 आणि हे कंडिशनल स्टेटमेंटमधून बाहेर पडेल.
05:03 आता टर्मिनलवर जाऊन टाईप करा
05:07 ruby space if hyphen elsif hyphen statement dot rb
05:15 आणि आऊटपुट बघा.
05:17 “The value of my_num is -1 and is lesser than 0” आऊटपुट असे दिसेल .
05:23 आता आपल्या फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू 5 करा.
05:29 कोड सेव्ह करून तो टर्मिनलवर कार्यान्वित करा.
05:35 येथे if कंडिशनची पूर्तता झाल्यामुळे तेथील स्ट्रिंग आऊटपुट म्हणून प्रिंट होईल.
05:42 “The value of my_num is greater than 0”
05:45 फाईलमधे जाऊन my_num ची व्हॅल्यू -5 करा.
05:50 कोड सेव्ह करून टर्मिनलवर कार्यान्वित करा.
05:55 येथे else कंडिशनची पूर्तता झाली आणि else ब्लॉक मधील puts स्टेटमेंट कार्यान्वित झाले.
06:03 आता रुबीमधे तुमचे if- elsif स्टेटमेंट बनवू शकता.
06:08 यानंतर आता आपण केस स्टेटमेंट पाहू.
06:12 केस स्टेटमेंट हे एखाद्या विशिष्ट निवडीसाठी कंट्रोल फ्लो स्टेटमेंट आहे.
06:17 हे स्टेटमेंट समजून घेण्यासाठी case स्टेटमेंटचा सिंटॅक्स पाहू.
06:22 case स्टेटमेंटचा सिंटॅक्स असा आहे:
06:24 case व्हेरिएबल
06:26 when "व्हॅल्यू 1"
06:28 रुबी कोड
06:29 when "व्हॅल्यू 2”
06:30 रुबी कोड
06:31 else
06:32 रुबी कोड
06:34 end
06:35 त्याचे उदाहरण पाहू.
06:37 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवीन फाईल बनवा.
06:41 case hyphen statement dot rb असे नाव द्या.
06:44 माझ्याकडे हे केस स्टेटमेंटचे उदाहरण आहे.
06:48 पाठ थांबवून हा कोड तुम्ही टाईप करू शकता.
06:52 ह्या उदाहरणात मी केस स्टेटमेंट घोषित केले आहे.
06:55 येथे हे प्रिंट स्टेटमेंट आहे जे टर्मिनलवर एक प्रश्न प्रिंट करेल.
07:01 नंतर मी gets, कॉल करीन जे standard input मधून एक ओळीचा डेटा स्वीकारेल.
07:09 घेतलेला input data मी new line characters वापरून chomp करीन.
07:15 त्याचा रिझल्ट domain नामक व्हेरिएबलमधे संचित होईल.
07:18 नंतर येथे case स्टेटमेंट घोषित केले आहे.
07:22 त्यामधे when स्टेटमेंट घोषित केले आहे.
07:25 हे येथे दिलेली स्ट्रिंग आणि domain ची व्हॅल्यू सारखी आहे का ते तपासेल.
07:30 प्रथम हे domain ची व्हॅल्यू “UP” आहे का ते तपासेल.
07:34 असल्यास “Uttar Pradesh” प्रिंट करेल आणि केस स्टेटमेंट मधून बाहेर पडेल.
07:39 domain जर “UP” नसेल तर त्याची व्हॅल्यू “MP” आहे का ते तपासेल.
07:44 असल्यास “Madhya Pradesh” असे प्रिंट करेल आणि हे असे चालू राहिल.
07:48 domain ची व्हॅल्यू जुळेपर्यंत त्याचे तपासणे चालू राहिल.
07:53 असे करताना else स्टेटमेंट आढळल्यास,
07:56 वरील कुठलीही कंडिशन true न झाल्याने,
07:59 else पुढील रुबी कोड कार्यान्वित करेल.
08:03 आपल्या उदाहरणात हे “Unknown” असे प्रिंट करेल.
08:07 फाईल सेव्ह करा. टर्मिनलवर जाऊन टाईप करा
08:11 ruby space case hyphen statement dot rb.
08:18 टर्मिनलवर असे दिसेल “Enter the state you live in:” .
08:22 “UP” टाईप करून आऊटपुट बघा.
08:25 “Uttar Pradesh” असे आऊटपुट दिसेल .
08:28 पुन्हा त्याच पध्दतीने रुबी फाईल कार्यान्वित करा.
08:31 ह्यावेळी प्रॉम्प्ट वर “KL” टाईप करून आऊटपुट बघा.
08:36 “Kerala” असे आऊटपुट दिसेल.
08:38 पुन्हा एकदा फाईल कार्यान्वित करा.
08:41 ह्यावेळी “TN” टाईप करून आऊटपुट बघा.
08:47 “Unknown” असे आऊटपुट दिसेल .
08:50 कारण कुठल्याही caseची पूर्तता झाली नाही. त्यामुळे डिफॉल्ट else स्टेटमेंट कार्यान्वित झाले.
08:58 आता रुबीमधे तुमचे case स्टेटेमेंट लिहू शकता.
09:03 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
09:07 थोडक्यात.
09:08 पाठात शिकलो,
09:10 if स्टेटमेंट
09:12 elseचा वापर
09:13 if-elsif आणि
09:15 case स्टेटमेंटस
09:17 असाईनमेंट:
09:18 रुबी प्रोग्रॅम लिहा,
09:20 जो युजरला एक नंबर टाईप करण्यास सांगेल.
09:23 नंतर योग्य कंट्रोल-स्टेटमेंट वापरून
09:26 दिलेल्या संख्येचा 2हा अवयव आहे का ते तपासा.
09:29 असल्यास “The number entered is a multiple of 2” असे प्रिंट करा.
09:35 नसल्यास संख्येचा 3हा अवयव आहे का ते तपासा.
09:38 असल्यास “The number entered is a multiple of 3” असे प्रिंट करा.
09:43 नसल्यास 4 हा अवयव आहे का ते तपासा.
09:47 असल्यास “The number entered is a multiple of 4” असे प्रिंट करा.
09:51 नसल्यास “The number is not a multple of 2, 3 or 4” असे प्रिंट करेल.
09:56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:07 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:09 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:13 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:16 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:21 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:32 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana