Difference between revisions of "Netbeans/C3/Connecting-to-a-MySQL-Database/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
(One intermediate revision by one other user not shown)
Line 1: Line 1:
 
{| border=1  
 
{| border=1  
!Time  
+
|'''Time'''
!Narration  
+
|'''Narration'''
  
 
|-  
 
|-  
Line 585: Line 585:
 
|-  
 
|-  
 
|  14:10  
 
|  14:10  
|  असाईनमेंट म्हणून,  
+
|  असाईनमेंट म्हणून,टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा.  
 
+
|-
+
|  14:11
+
टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा.  
+
  
 
|-  
 
|-  

Latest revision as of 12:17, 20 April 2017

Time Narration
00:00 नमस्कार.
00:02 MySQL डेटाबेसला जोडणी करण्याच्या पाठात स्वागत.
00:07 या पाठात पाहू,
00:09 MySQL सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे.
00:14 MySQL सर्व्हर सुरू करणे.
00:17 डेटाबेस तयार करून त्याच्याशी जोडणी करणे.
00:20 डेटाबेस टेबल्स बनवणे. ज्याच्या दोन पध्दती पाहू.
00:26 sql एडिटरद्वारे आणि,
00:29 क्रीएट टेबल डायलॉग बॉक्सद्वारे.
00:33 आणि शेवटी, SQL स्क्रिप्ट कार्यान्वित करणे.
00:37 ह्या पाठासाठी लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम उबंटु v12.04,
00:44 आणि नेटबीन्स IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:48 तसेच आपल्याला जावा डेव्हलपमेंट कीट (JDK) v6
00:54 आणि MySQL डेटाबेस सर्व्हरची गरज आहे.
00:57 हा पाठ जाणून घेण्यासाठी डेटाबेस मॅनेजमेंटचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
01:03 अधिक जाणून घेण्यासाठी दाखवलेल्या लिंकवरील PHP आणि MySQL वरील स्पोकन ट्युटोरियल बघा.
01:10 या पाठात सर्वमान्य प्रोग्रॅमिंग परिभाषा वापरली आहे.
01:16 नेटबीन्स IDE मधून MySQL डेटाबेसला जोडणी करण्याची पध्दत येथे दाखवली जाईल.
01:24 एकदा जोडणी झाली की IDE च्या डेटाबेस एक्सप्लोरर द्वारे MySQL सोबत कार्य करू.
01:31 आता IDE वर जाऊ.
01:36 नेटबीन्स IDE मधे MySQL RDBMS चा आधार अंतर्भूत आहे.
01:42 नेटबीन्स मधे MySQL डेटाबेस सर्व्हर ऍक्सेस करण्यापूर्वी त्याच्या सर्व्हर प्रॉपर्टीज कॉनफिगर करणे गरजेचे आहे.
01:51 Services(सेर्वीसेस) विंडोमधे डेटाबेसेस नोडवर राईट क्लिक करा.
01:56 MySQL सर्व्हर प्रॉपर्टीजचा डायलॉग बॉक्स उघडण्यासाठी Register MySQL Server(रिजिस्टर MySQL सर्वर) निवडा.
02:05 सर्व्हरच्या होस्ट नेम आणि पोर्ट योग्य असल्याची खात्री करा.
02:10 IDE ने डिफॉल्ट रूपात सर्व्हरचे होस्ट नेम localhost(लोकलहोस्ट ) असे दिले आहे.
02:18 3306 हा सर्व्हरचा डिफॉल्ट पोर्ट नंबर आहे.
02:23 ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम दिलेले नसल्यास ते टाईप करा.
02:27 आपल्या सिस्टीमवर ऍडमिनीस्ट्रेटर युजरनेम root(रूट) आहे.
02:33 ऍडमिनीस्ट्रेटर पासवर्ड द्या.
02:36 सिस्टीमवर पासवर्ड ब्लँक आहे.
02:40 डायलॉग बॉक्सच्या वरती असलेल्या Admin Properties(एडमिन प्रॉपर्टीस) टॅबवर क्लिक करा.
02:45 हे MySQL सर्व्हर नियंत्रित करण्यासाठी माहिती भरण्याची परवानगी देते.
02:51 Path/URL to admin tool फिल्डमधे,
02:56 टाईप करा किंवा MySQL ऍडमिनीस्ट्रेशन ऍप्लिकेशनचे लोकेशन ब्राऊज करा.
03:02 आपल्या सिस्टीमवर टूलचे लोकेशन /usr/bin/mysqladmin आहे.
03:12 Arguments(आर्ग्युमेंट्स) फिल्डमधे admin((एडमिन) टूलसाठी कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करा .
03:18 हे रिकामे देखील ठेवता येते.
03:22 Path to start command(पाथ टू स्टार्ट कमांड ) फिल्डमधे
03:25 टाईप करा किंवा MySQL स्टार्ट कमांडचे लोकशन ब्राऊज करा.
03:29 आपल्या सिस्टीमवर /usr/bin/mysqld_safe आहे.
03:38 स्टार्ट कमांडच्या Arguments(आर्ग्युमेंट्स) फिल्डमधे कोणतेही अर्ग्युमेंट टाईप करू शकता.
03:42 येथे आपण -u space root space start टाईप करत आहोत.
03:51 Path to stop command(पाथ टू स्टॉप कमांड) फिल्डमधे
03:54 टाईप करा किंवा MySQL स्टॉप कमांडचे लोकेशन ब्राऊज करा.
03:58 हा mysqladmin वर जाण्याचा पाथ ब-याचदा MySQL इन्स्टॉलेशनच्या bin( बीन) फोल्डरमधे असतो.
04:06 आपल्या सिस्टीमवर ते /usr/bin/mysqladmin आहे.
04:14 mysqladmin ही कमांड असल्यास Arguments(आर्ग्युमेंट्स) फिल्डमधे टाईप करा -u space root space stop.
04:27 हे पूर्ण झाल्यावर Admin Properties(एडमिन प्रॉपर्टीस) टॅब स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे दिसला पाहिजे.
04:33 OK क्लिक करा.
04:36 प्रथम आपल्या मशीनवर MySQL डेटाबेस सर्व्हर सुरू असल्याची खात्री करू.
04:42 सर्व्हिस विंडोतील MySQL सर्व्हर नोड, MySQL डेटाबेस सर्व्हर कनेक्ट झाला आहे की नाही ते दर्शवते.
04:52 तो कार्यान्वित होत असल्याची खात्री झाल्यावर Databases(डेटाबेसेस) खाली MySQL सर्व्हर नोड वर राईट क्लिक करून Connect(कनेक्ट) निवडा.
05:05 MySQL सर्व्हर नोड एक्सपांड केल्यावर सर्व उपलब्ध MySQL डेटाबेसेस दिसतील.
05:13 डेटाबेसेस बरोबर देवाण-घेवाण करण्याची सर्वसामान्य पध्दत म्हणजे SQL एडिटर.
05:19 त्यासाठी नेटबीन्स कडे बिल्ट इन SQL एडिटर आहे.
05:23 कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून हे ऍक्सेस करू शकतो.
05:29 SQL एडिटर द्वारे नवा डेटाबेस इन्स्टन्स बनवू .
05:34 Services(सेर्वीसेस ) विंडोमधे MySQL सर्व्हर नोडवर राईट क्लिक करून Create Database(क्रियेट डेटबेस) निवडा.
05:44 Create Database डायलॉग(क्रियेट डेटबेस) बॉक्समधे नव्या डेटाबेसचे नाव टाईप करा.
05:50 mynewdatabase नाव देऊ.
05:56 दिलेल्या युजरला पूर्ण ऍक्सेस तुम्ही प्रदान करू शकता.
06:01 डिफॉल्ट रूपात केवळ ऍडमिन युजरला विशिष्ट कमांडस कार्यान्वित करण्याची परवानगी असते.
06:08 ड्रॉप डाऊन लिस्टद्वारे तुम्ही या परवानगी विशिष्ट युजरला देऊ शकता.
06:13 drop tables या शिवाय बहुतांश परवानगी युजरला देणे योग्य ठरते.
06:18 फक्त त्यांच्या ऍप्लिकेशन्सने बनवलेले डेटाबेसस मॉडिफाय करण्याची परवानगी युजरला मिळेल.
06:25 आपण हा चेकबॉक्स सिलेक्ट करणार नाही.
06:30 OK क्लिक करा.
06:34 आता टेबल्स बनवून त्यात डेटा भरू. डेटामधे थोडे बदल करू.
06:41 आत्ता mynewdatabase रिकामा आहे.
06:44 टेबल्समधे डेटा भरण्याची पहिली पध्दत बघू.
06:48 डेटाबेस एक्सप्लोररमधे mynewdatabase कनेक्शन नोड एक्सपांड करा.
06:58 त्यामधे तीन सब फोल्डर्स आहेत.
07:00 Tables,(टेबल्स) Views(व्यूस) आणि Procedures. (प्रोसीजर्स)
07:04 Tables(टेबल्स) फोल्डरवर राईट क्लिक करून Execute Command( एक्सेक्यूट कमांड) निवडा.
07:11 मुख्य विंडोच्या SQL एडिटर मधे एक रिकामा कॅन्व्हास उघडेल.
07:16 आता SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप करू.
07:30 आपण SQL एडिटरमधे एक साधी क्वेरी टाईप केली आहे.
07:36 ही आपण बनवत असलेल्या Counselor(काउनसिलर) टेबलची टेबल डेफिनेशन आहे.
07:42 ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी वरील टास्कबार मधीलRun SQL आयकॉनवर राईट क्लिक करा.
07:51 किंवा SQL एडिटर मधे राईट क्लिक करून Run Statement(रन स्टेट्मेंट ) निवडा.
08:00 IDE डेटाबेसमधे Counselor(काउनसिलर) नामक टेबल बनवेल.
08:04 आऊटपुट विंडोमधे हा मेसेज बघू शकतो.
08:12 जे आपल्याला कमांड यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याचे दाखवत आहे.
08:17 केलेले बदल तपासण्यासाठी डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables(टेबल्स) नोडवर राईट क्लिक करा.
08:25 Refresh(रिफ्रेश) निवडा.
08:28 हे दिलेल्या डेटाबेसची चालू स्थिती अपडेट करेल.
08:32 आता Counselor(काउनसिलर) हे नवे टेबल Tables(टेबल्स) पर्यायाखाली दिसेल.
08:40 टेबल नोड एक्सपांड केल्यास आपण बनवलेले कॉलम्स दिसतील.
08:46 आता टेबल्समधे डेटा भरण्याची पुढील पध्दत पाहू,
08:51 म्हणजेच क्रीएट टेबल डायलॉग बॉक्स वापरू.
08:54 डेटाबेस एक्सप्लोरर मधे Tables(टेबल्स) नोडवर राईट क्लिक करून Create Table(क्रियेट टेबल) निवडा.
09:03 Create Table डायलॉग(क्रियेट टेबल) बॉक्स उघडेल.
09:06 Table(टेबल) नेमच्या टेक्स्ट फिल्डमधे Subject(सब्जेक्ट) असे टाईप करा.
09:13 Add Column(एड कॉलम ) क्लिक करा.
09:16 Add Column डायलॉग(एड कॉलम ) बॉक्समधील नेम फिल्डमधे id असे टाईप करा.
09:22 टाईपच्या ड्रॉप डाऊन मेनूतून SMALLINT हा डेटा टाईप निवडा.
09:30 Add Column डायलॉग(एड कॉलम ) बॉक्समधील Primary Key(प्राइमरी की) चा चेकबॉक्स सिलेक्ट करा.
09:35 हे टेबलची प्रायमरी की घोषित करण्यासाठी आहे.
09:39 तुम्ही की चा चेकबॉक्स सिलेक्ट केल्यावर Index(इंडेक्स) आणि Unique(यूनीक) चे चेकबॉक्स आपोआप सिलेक्ट झालेले आहेत.
09:49 तसेच Null(नल) चेकबॉक्स डिसिलेक्ट झालेला आहे.
09:53 कारण प्रायमरी की चा उपयोग डेटाबेसमधील युनिक रो शोधण्यासाठी होतो.
09:59 OK क्लिक करा.
10:03 हीच कृती करून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे उरलेले कॉलम्स समाविष्ट करा.
10:09 आता Name(नेम), Description(डिस्क्रिप्षन), आणि Counselor ID(काउनसिलर ID) चा डेटा ठेवण्यासाठी Subject(सब्जेक्ट) नावाचे टेबल बनवले आहे.
10:20 OK क्लिक करा.
10:23 डेटाबेसवर SQL क्वेरीज कार्यान्वित करून त्यात डेटा समाविष्ट करू शकतो तसेच ते मॉडिफाय आणि डिलिट करू शकतो.
10:32 आता Counselor(काउनसिलर) टेबलमधे नवे रेकॉर्ड समाविष्ट करू.
10:35 Tables(टेबल्स) नोडच्या कॉन्टेक्स्ट मेनूतून Execute कमांड(एक्सेक्यूट) निवडा.
10:43 मुख्य विंडोमधे नवे SQL एडिटर उघडेल.
10:47 SQL एडिटर मधे ही क्वेरी टाईप करा.
11:00 ही क्वेरी कार्यान्वित करण्यासाठी सोर्स एडिटर मधे राईट क्लिक करून Run स्टेटमेंट(रन) निवडा.
11:07 आता नवे रेकॉर्ड टेबलमधे समाविष्ट झाले की नाही ते तपासू.
11:12 Counselor(काउनसिलर) टेबलवर राईट क्लिक करून View Data( व्यू डेटा) निवडा.
11:18 नवा SQL एडिटर मुख्य विंडोमधे उघडेल.
11:21 टेबलमधील सर्व डेटा सिलेक्ट करण्यासाठीची क्वेरी आपोआप लिहिलेली दिसेल.
11:27 ह्या स्टेटमेंटचे आऊटपुट वर्कस्पेसच्या खाली टेबल व्ह्यू मधे दाखवले जाईल.
11:41 आत्ता दिलेल्या डेटासहित नवीन रो समाविष्ट झालेली दिसेल.
11:46 तसेच बाहेरील SQL स्क्रिप्ट थेट IDE मधून कार्यान्वित करू शकतो.
11:52 येथे दाखवण्यासाठी आपल्याकडे SQL क्वेरी आहे.
11:59 ही स्क्रिप्ट आधी पाहिल्याप्रमाणे दोन टेबल्स बनवेल.
12:04 म्हणजेच Counselor(काउनसिलर) आणि Subject(सब्जेक्ट)
12:09 स्क्रिप्ट ही टेबल्स ओव्हराईट करेल त्यामुळे,
12:12 आधीपासून उपलब्ध असल्यास दोन्ही टेबल डिलिट करू.
12:16 टेबल्स डिलिट करण्यासाठी Counselor(काउनसिलर) टेबलवर राईट क्लिक करा.
12:21 Delete( डेलीट) निवडा.
12:24 Confirm Object table Deletion(कन्फर्म ऑब्जेक्ट टेबल डिलिशन) डायलॉग बॉक्समधे Yes(एस) क्लिक करा .
12:31 हेच Subject(सब्जेक्ट) टेबलसाठीही करा.
12:38 तुमच्या सिस्टीमवरील उपलब्ध असलेली SQL क्वेरीची फाईल उघडा.
12:43 File(फाइल) मेनूतील Open File( ओपन फाइल) निवडा.
12:48 फाईल असलेले लोकेशन ब्राऊज करा.
12:54 स्क्रिप्ट आपोआप SQL एडिटरमधे उघडेल.
12:59 mynewdatabase साठी कनेक्शन सिलेक्ट केल्याची खात्री करा.
13:03 हे एडिटरच्या वरच्या भागात असलेल्या टूलबारमधील कनेक्शनच्या ड्रॉपडाऊनमधे तपासा.
13:13 टास्कबारमधील Run SQL बटण दाबा.
13:17 आणि सिलेक्ट केलेल्या डेटाबेसवर स्क्रिप्ट कार्यान्वित झाले आहे.
13:22 mynewdatabase कनेक्शन नोडवर राईट क्लिक करून Refresh(रिफ्रेश) दाबा.
13:28 हे दिलेल्या डेटाबेस घटकाची चालू स्थिती अपडेट करेल.
13:34 आता ह्यापैकी कुठल्याही टेबलवर राईट क्लिक करून View Data( व्यू डेटा ) निवडा.
13:41 आणि वर्कस्पेसमधे खाली नव्या टेबल्समधे असलेला डेटा दिसेल.
13:52 या पाठात शिकलो,
13:54 संगणकावर MySQL कॉनफिगर करणे.
13:57 IDE मधून डेटाबेस सर्व्हरशी कनेक्शन सेट अप करणे.
14:02 डेटा बनवणे, डिलिट आणि मॉडिफाय करणे.
14:06 SQL क्वेरीज कार्यान्वित करणे.
14:10 असाईनमेंट म्हणून,टेबल्स असलेला आणखी एक डेटाबेस इन्स्टन्स बनवा.
14:15 तुमच्या पुस्तकांच्या लायब्ररीची देखभाल करण्यासाठी टेबल्समधे आवश्यक डेटा समाविष्ट करा.
14:21 डेटा बघण्यासाठी SQL स्टेटमेंटस कार्यान्वित करा.
14:29 आपण अशाचप्रकारचा डेटाबेस बनवला आहे. ज्यात मुव्ही लायब्ररीची माहिती संचित केली आहे.
14:37 तुमची असाईनमेंट अशी दिसायला हवी.
14:44 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14:48 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:51 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
15:01 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
15:04 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
15:10 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
15:15 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15:20 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:27 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15:30 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana