Difference between revisions of "Scilab/C2/Conditional-Branching/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Conditional Branching''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Scilab''' @-timing 3.11 to 3.20 original video is blur. {| style="border-spacing:0…') |
|||
Line 1: | Line 1: | ||
− | + | {| border=1 | |
− | + | !Time | |
− | + | !Narration | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | {| | + | |
− | ! | + | |
− | ! | + | |
|- | |- |
Revision as of 11:48, 16 April 2014
Time | Narration |
---|---|
00.01 | सायलॅब मधील कंडिशनल ब्रॅंचिंग वरील पाठात स्वागत. |
00.04 | ह्या पाठाचा सराव करण्यासाठी सायलॅब कन्सोल विंडो उघडा. |
00.09 | येथे सायलॅब मधील "if-then-else" आणि "select-case conditional" या रचनांबद्दल जाणून घेऊ. |
00.19 | कंडिशनची पूर्ती झाल्यास if स्टेटमेंट दिलेल्या स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करते. |
00.24 | उदाहरणार्थ, |
00.27 | n is equal 42 if n is equal to equal to 42 then disp the number is 42 end |
00.37 | येथे 'is equal to' हा असाईनमेंट ऑपरेटर व्हेरिएबल n ला 42 ही व्हॅल्यू देतो. |
00.43 | 'is equal to is equal to' हा equality ऑपरेटर उजव्या आणि डाव्या बाजूच्या ऑपरँडसची समानता तपासतो. |
00.51 | ह्या केसमधे ते n आणि 42 आहेत. रिझल्ट बुलियनमधे मिळेल. |
00.57 | येथे पहिल्या ओळीवरील कॉमा ऐच्छिक आहे, |
01.01 | तसेच then की वर्ड सुध्दा ऐच्छिक आहे. |
01.04 | त्याऐवजी कॉमा किंवा रीटर्न की वापरता येते. |
01.08 | end की वर्डने "if" स्टेटमेंट संपवले जाते. |
01.11 | स्क्रिप्ट कार्यान्वित केल्यावर अशाप्रकारे आऊटपुट दिसेल. |
01.20 | आत्तापर्यंत कंडिशन true असेल तर स्टेटमेंटसचा संच कसा कार्यान्वित करायचा ते पाहिले. |
01.26 | कंडिशन false असल्यास दुसरा स्टेटमेंटसचा संच कार्यान्वित करता येते किंवा इतर कंडिशन पूर्ण होत आहे का ते तपासता येते. |
01.36 | ते अनुक्रमे 'else' किंवा 'elseif' द्वारे करू शकतो. |
01.40 | हे कसे करायचे ते पाहू. |
01.41 | ह्या उदाहरणात व्हेरिएबल n ची व्हॅल्यू 54 आहे. येथे दाखवल्याप्रमाणे 'if' द्वारे true आणि 'else' द्वारे false ह्या कंडिशन तपासणार आहोत. |
01.55 | हे कट करून सायलॅब कन्सोल वर पेस्ट करून एंटर दाबा. |
02.03 | आऊटपुट पाहा. |
02.05 | वर पाहिलेल्या उदाहरणात अनेक ओळी आहेत. |
02.09 | योग्य ठिकाणी सेमीकोलन आणि कॉमा देऊन हे सर्व एका ओळीत लिहिता येते. |
02.19 | सायलॅब मधे कार्यान्वित करण्यासाठी कट पेस्ट करा. एंटर दाबा. |
02.27 | सिलेक्ट स्टेटमेंटद्वारे अनेक शाखा सोप्या पध्दतीने एकत्र करता येतात. |
02.31 | case की वर्ड वापरून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूनुसार विविध स्टेटमेंट्स कार्यान्वित करता येतात. |
02.38 | गरजेनुसार शाखांची संख्या घेता येते. |
02.41 | उदाहरण बघू या. |
02.44 | व्हेरिएबल 'n' ला 100 ही व्हॅल्यू दिली आहे. आपण case 42, 54 आणि else द्वारे दाखवली जाणारी डिफॉल्ट केस तपासणार आहोत. |
02.59 | कट पेस्ट करा. एंटर दाबा. |
03.06 | आऊटपुट पाहा. |
03.09 | आपण कंडिशनल ब्रॅंचिंग पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
03.14 | ह्या पाठात if - elseif - else स्टेटमेंट आणि select स्टेटमेंट बद्दल शिकलो. |
03.20 | सायलॅब मधील अनेक फंक्शन्सबद्दल इतर भागात जाणून घेणार आहोत. |
03.25 | सायलॅब लिंक्स पाहात रहा. |
03.27 | स्पोकन ट्युटोरियल्स हा टॉक टू टीचर प्रॉजेक्टचा भाग असून यासाठी National Mission on Education through ICT कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
03.35 | यासंबंधी अधिक माहिती पुढील link वर उपलब्ध आहे. |
03.38 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी----- आपला निरोप घेते. धन्यवाद. |