Difference between revisions of "LibreOffice-Suite-Writer/C4/Using-track-changes/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Track Changes while editing a document''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Writer''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</ce…') |
Nancyvarkey (Talk | contribs) |
(No difference)
|
Revision as of 14:37, 17 December 2013
Title of script: Track Changes while editing a document
Author: Manali Ranade
Keywords: Writer
|
|
---|---|
00:00 | नमस्कार. |
00:03 | लिबर ऑफिस रायटरच्या Track changes while Editing a document वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | या ट्युटोरियलमध्ये आपण रायटरमधील डॉक्युमेंटचे peer review कसे करता येते ते शिकणार आहोत. |
00:15 | आपण उपलब्ध डॉक्युमेंट उघडू या. |
00:18 | Record Changes या पर्यायाच्या सहाय्याने डॉक्युमेंटमध्ये बदल आणि peer review कसा करायचा ते पाहू. |
00:25 | या फीचरचा फायदा म्हणजे रिव्ह्यूअर काही comments देऊ शकतो. टेक्स्ट समाविष्ट, डिलिट करू शकतो. उपलब्ध टेक्स्टमध्ये बदल करू शकतो. हे बदल आपल्याला त्याच डॉक्युमेंटमध्ये स्पष्टपणे दिसतात. |
00:40 | हे बदल ऑथर सहजपणे बघू शकत असल्यामुळे तो हे बदल मान्य किंवा अमान्य करू शकतो आणि या comments, डॉक्युमेंटमध्ये पुन्हा बदल करण्याचा त्रास न घेता त्यांचा समावेश करू शकतो. |
00:52 | फाईल सेव्ह केल्यावर त्या comments चा समावेश झालेला असतो. |
00:56 | हे सर्व कसे करायचे ते बघू या. |
01:01 | येथे आपणUbuntu Linux 10.04 ही operating system आणि LibreOffice Suite चे version 3.3.4 चा वापर करणार आहोत. |
01:09 | या ट्युटोरियलमध्ये आपण आधीच बनवलेल्या आणि सिस्टीमवर असलेल्या काही डॉक्युमेंटसचा वापर करणार आहोत. |
01:16 | Seven-reasons-to-adopt-FOSS.odt
आणि Government-support-for-FOSS-in-India.odt
|
01:24 | रायटर सुरू करण्यासाठी Applications, Office आणि नंतर LibreOffice Writer वर क्लिक करा. |
01:33 | Seven-reasons-to-adopt-FOSS.odt ही फाईल उघडा. |
01:40 | record changes हा पर्याय सुरू करण्यासाठी |
01:43 | Edit मेनूखाली Changes मधील Record हा पर्याय निवडा. |
01:52 | Show हा पर्याय सुध्दा निवडलेला असावा. यामुळे केलेले बदल वेगळ्या स्वरूपात दाखवले जातील. |
02:00 | डॉक्युमेंटमध्ये मुद्दा क्रमांक 2 समाविष्ट करा. |
02:05 | दुस-या क्रमांकाच्या मुद्यावर जाऊन टाईप करा. |
02:08 | Linux is a virus resistant operating system since each user has a distinct data space and cannot directly access the program files. |
02:35 | एंटर दाबा. |
02:36 | म्हणजे मुद्दा क्रमांक 2 हा आता क्रमांक 3 होईल. |
02:41 | समाविष्ट केलेले टेक्स्ट नव्या रंगात बदलल्याचे दिसेल. |
02:45 | टेक्स्टवरून कर्सर फिरवा. आपल्याला एक मेसेज दिसेल. |
02:50 | Inserted Sriranjani: आणि पुढे समाविष्ट केल्याची तारीख आणि वेळ . |
02:55 | अशा प्रकारे डॉक्युमेंटमध्ये comment करणारी व्यक्ती ओळखली जाऊ शकते. हे नाव संगणकावर लिबर ऑफिस इन्स्टॉलेशनच्या वेळी दिलेल्या user चे नाव असते. |
03:07 | पहिल्या ओळीतीलavalable हे स्पेलिंग दुरूस्त करा. आपल्याला केलेली दुरूस्ती दिसेल. |
03:16 | पहिला मुद्दा डिलिट करा:- |
03:18 | It can be installed on all computers without restriction or needing to pay license fees to vendors |
03:30 | आपल्याला दिसेल की डिलिटनंतर मूळ ओळ डिलिट न होता, डिलिट करण्यासाठी सुचवलेली ओळ म्हणून ती मार्क केली जाते. |
03:39 | त्यावरून कर्सर फिरवा. आपल्याला एक मेसेज दिसेल. |
03:43 | Deleted Sriranjani: आणि पुढे डिलिट केल्याची तारीख आणि वेळ दिसेल. |
03:48 | समाविष्ट करणे, डिलिट करणे, टेक्स्टमध्ये बदल करणे अशा काही सुधारणा डॉक्युमेंटमध्ये करता येतात. |
04:00 | एकापेक्षा अधिक व्यक्ती एकाच डॉक्युमेंटमध्ये बदल करू शकतात. |
04:03 | LO Writer प्रत्येक बदल वेगवेगळ्या रंगानी दाखवतो. ज्यामुळे प्रत्येक रिव्ह्यूअरचे काम वेगळे ओळखण्यास मदत होते. |
04:12 | तसेच बदल केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर ते आपल्याला रिव्ह्यूअरचे नाव दाखवते. |
04:18 | माझा सहकारी Guru याने आधीच काही बदल केलेले डॉक्युमेंट उघडून मी त्यावर प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे. |
04:26 | Government-support-for-FOSS-in-India.odt हे टेक्स्ट डॉक्युमेंट उघडा. |
04:34 | या डॉक्युमेंटमध्ये अनेक गोष्टी समाविष्ट आणि डिलिट झाल्याचे आपल्याला दिसत आहे. |
04:41 | समाविष्ट आणि डिलिट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर हे बदल Guru याने केला असल्याचा मेसेज दिसत आहे. |
04:51 | खाली CDAC, NIC, NRC-FOSS are institutions of Government of India which develop and promote FOSSहा मुद्दा समाविष्ट करा. |
05:17 | आपल्याला दिसेल की Guru याने बदल केलेल्या आणि आपण समाविष्ट केलेल्या टेक्स्टचा रंग वेगवेगळा आहे. |
05:23 | समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर कर्सर नेल्यावर Inserted: Sriranjani हा मेसेज दिसत आहे. |
05:28 | ऑथरकडे डॉक्युमेंट परत जाण्यापूर्वी एका डॉक्युमेंटमध्ये एकापेक्षा अधिक व्यक्ती बदल करू शकतात. |
05:34 | डॉक्युमेंट सेव्ह न करता ते बंद करा. |
05:44 | आता reviewer ने केलेले बदल author मान्य किंवा अमान्य कसे करू शकतो ते बघू . |
05:49 | Government-support-for-FOSS-in-Indiaया डॉक्युमेंटमध्ये आपण असे समजू या की मी author आहे आणि Guru ने केलेले बदल मी मान्य किंवा अमान्य करू शकतो. |
06:11 | दुस-या मुद्यावर जा. reasons या डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करा आणि Accept Change पर्याय निवडा. |
06:22 | आपल्याला टेक्स्ट डिलिट झालेले दिसेल, जो बदल reviewer ने सुचवला होता. |
06:27 | needsया समाविष्ट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून Accept Change सिलेक्ट करा. |
06:34 | reviewer ने सुचवलेला बदल स्वीकारला जाऊन, आपल्याला टेक्स्ट नेहमीच्या स्वरुपात दिसेल. |
06:39 | अशा प्रकारे reviewer ने सुचवलेले, समाविष्ट किंवा डिलिट करणे हे दोनही बदल आपण मान्य करू शकतो. |
06:48 | पहिल्या मुद्यावर जाऊन The OpenOffice document standard has been notified under this policyया डिलिट केलेल्या टेक्स्टवर राईट क्लिक करून Reject change निवडा. |
07:01 | टेक्स्ट पुन्हा नेहमीसारखे होईल. reviewer ची डिलिशनची सूचना author ने नाकारली आहे. |
07:08 | मुद्दा क्रमांक 5 मधील Government Schools in these states and in Orissa, Karnataka and Tamil Nadu learn Linuxवर राईट क्लिक करून Reject change निवडा. हे reviewer ने समाविष्ट केलेले टेक्स्ट डिलिट करेल. |
07:26 | अशा प्रकारे प्रत्येक समाविष्ट किंवा डिलिट केलेले टेक्स्ट author मान्य किंवा अमान्य करू शकतो. |
07:33 | शेवटी बदल मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर Edit मेनूमधील Changes या पर्यायामधील Record आणि Show हे पर्याय uncheck करा. |
07:55 | unchecked केल्यानंतर डॉक्युमेंटमध्ये केले जाणारे बदल मार्क केले जाणार नाहीत. |
08:00 | reviewer ने दिलेल्या सर्व comments मान्य किंवा अमान्य करून झाल्यावर त्यांचा फाईलमध्ये समावेश होण्यासाठी ती सेव्ह करायला विसरू नका. |
08:08 | आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. आता ASSIGNMENT करू. |
08:15 | डॉक्युमेंट उघडून त्यातील स्पेलिंगच्या चुका Record Changes mode मध्ये दुरूस्त करा. |
08:24 | येथे ही ASSIGNMENT आधीच करून ठेवली आहे. |
08:30 | *सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडीओ खालील लिंकवर उपलब्ध आहे ज्यामध्ये तुम्हाला ह्या प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता. |
08:40 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
08:44 | *जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा. |
08:53 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
09:02 | *यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे. |
09:13 | *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |