Difference between revisions of "PHP-and-MySQL/C4/Cookies-Part-1/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 21: | Line 21: | ||
|- | |- | ||
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:11 | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 0:11 | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| cookieम्हणजे वेब | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| cookieम्हणजे वेब सरर्व्हरद्वारे तुमच्या किंवा युजरच्या संगणकावर संचित होणारा डेटाचा संच. |
|- | |- |
Revision as of 11:16, 18 November 2013
Title of script: Cookies-Part-1
Author: Manali Ranade
Keywords: PHP-and-MySQL
|
|
---|---|
0:00 | php cookies वरील ट्युटोरियलमधे स्वागत. |
0:04 | विशेष वेबसाईट बनवताना त्यात युजरची माहिती साठवण्यासाठी Cookies महत्त्वाच्या असतात. |
0:11 | cookieम्हणजे वेब सरर्व्हरद्वारे तुमच्या किंवा युजरच्या संगणकावर संचित होणारा डेटाचा संच. |
0:18 | वेबसाईटवर जाताना 'Remember me' पर्याय निवडलेला असल्यास आपली माहिती संचित होते आणि पुन्हा त्या वेबसाईटला भेट दिल्यास वापरली जाते. |
0:30 | त्यामुळे प्रत्येक वेळी login ची गरज नसते. |
0:32 | परंतु हा पर्याय निवडलेला नसल्यास sessions मध्ये कार्य करावे लागेल जे ब्राऊजर बंद केल्यावर बंद होईल. |
0:42 | म्हणजे sessions बंद होतात मात्र cookies पुढील वापरासाठी संचित केल्या जातात. |
0:50 | आता cookie बनवायला शिकू. |
0:53 | हे काम setcookieफंक्शन करते. |
0:55 | हे फंक्शन 5 parameters घेते. पण आपण 3 वापरू. |
1:00 | एक म्हणजे cookieचे नाव जे मी 'name' म्हणून सेट करत आहे. |
1:05 | दुसरे म्हणजे ह्या cookieमधे जो डेटा संचित करायचा आहे. मी येथे Alex लिहिते. |
1:12 | आता पुढचे थोडे गुंतागुंतीचे आहे. |
1:15 | ही cookie ची मुदत संपण्याची वेळ आहे . |
1:18 | ही सेकंदात सेट करावी लागते. |
1:21 | त्यासाठी 'exp' हे व्हेरिएबल बनवत आहे ज्याची व्हॅल्यू time च्या समान असेल. |
1:28 | येथे काही व्हॅल्यू मिळवू. |
1:31 | आत्ता मी शून्य मिळवत आहे. |
1:33 | आता हे एको करू आणि cookieफंक्शनला आत्तापुरते कमेंट करू. |
1:39 | केवळ काय मिळते हे बघण्यासाठी येथे time एको करू. |
1:43 | रिफ्रेश करा. येथे काही आकडे दिसत आहेत. |
1:47 | हा unique time-stamp आहे. |
1:50 | आणि हे 1 जानेवारी 1970 पासूनचे सेकंद आहेत. |
1:56 | 1970सालच्या 1जानेवारी 12 amपासून मोजले जातात. |
2:02 | आपल्याला दिसेल की हे सेकंद या तारखे नंतरची वेळ दाखवतात. |
2:10 | उदाहरणार्थ, येथे 88 आणि आता 89 दिसत आहेत. रिफ्रेश करत राहिल्यास हे सेकंदाने वाढत जाईल. |
2:20 | ही विशिष्ट व्हॅल्यू समाविष्ट करण्याची उपयोगी पध्दत आहे. |
2:28 | आता एका दिवसातील सेकंद काढू. ही cookie एका दिवसात expireकरायची आहे. |
2:34 | म्हणून दिवसातील मिनिटे काढण्यासाठी 60ला 24 ने गुणा. |
2:39 | आलेल्या उत्तराला 60ने पुन्हा गुणल्यावर 86,400 मिळेल जे दिवसाचे सेकंद आहेत. |
2:47 | आता शून्याच्या ठिकाणी 86400 लिहू. "expire" हा व्हेरिएबल एक दिवसानंतरची वेळ संचित करेल. |
2:56 | वेळ वाचविण्यासाठी मी expire व्हेरिएबल कॉपी करून येथे समाविष्ट करत आहे. |
3:02 | अशा प्रकारे हे फंक्शन 'name' नावाची 'Alex' व्हॅल्यू असलेली cookie सेट करेल. ती एका दिवसाने expire होईल. त्यासाठी time फंक्शन सेकंदात वाचेल. |
3:13 | हे रिफ्रेश करू. आपल्याला कुठलीही एरर मिळाली नाही. म्हणजे हे कार्य करत आहे. |
3:19 | block commenting वापरून हे सर्व कमेंट करू. |
3:23 | आणि खाली ही cookieएको करू. |
3:26 | कमेंट केले कारण युजर ह्या पेजवर आला की प्रत्येक वेळी cookie सेट करण्याची गरज नाही. |
3:33 | तुम्ही log in scriptवापरत असल्यास, युजर वेबसाईटला एकदाच log in झाल्यावर cookie संचित होईल. |
3:41 | आणि या वेळेला ती सेट केली जाईल. |
3:46 | येथे टाईप करा echo dollar sign underscore cookie |
3:52 | स्क्वेअर ब्रॅकेटमधे cookieचे नाव म्हणजेच डबल कोटसमधे name टाईप करा. रिफ्रेश केल्यावर 'Alex' दिसेल. |
3:59 | जर ब्राऊजर बंद केला. संगणक पुन्हा सुरू करून पुन्हा ह्या पेजवर आलो तरी ते Alexवाचेल. कारण ते संगणकामधे संचित आहे. |
4:11 | समजा मला ageनावाची आणखी एक cookieसेट करायची आहे आणि माझे वय 19आहे. |
4:24 | आणि expiry time तोच ठेवू. |
4:29 | हे येथे वरती ठेवू. |
4:31 | हे नीट दिसण्यासाठी ही block कमेंट lineकमेंटमधे बदलू. |
4:36 | आता expiry timeसाठी येथे वेगळी cookie सेट करू. |
4:41 | आणि तिचा expiry time तोच असेल. हे तपासून पाहू. |
4:46 | हे काढून टाकू. |
4:48 | आपण तोच expiry timeघेऊन दुसरी cookie सेट केली आहे. |
4:51 | रिफ्रेश करा. हे नीट सेट झाले आहे. |
4:55 | आता हे कमेंट करू. आणि एको करू. |
5:01 | अशाप्रकारे एका पेजवर एकापेक्षा जास्त cookie सेट करू शकतो. रिफ्रेश करू. 19 मिळाले. |
5:07 | आपण एका वाक्यातही cookie सेट करू शकतो. |
5:11 | त्यासाठी टाईप करा echo underscore cookie, name आणि नंतर concatenate "is" आणि concatenate माझे age. |
5:27 | संचित केलेल्या cookieनुसार Alex is 19 हे वाक्य आऊटपुट मधे दिसेल. |
5:34 | जर आपण ब्राऊजर बंद केला, संगणक पुन्हा सुरू केला किंवा दोन तासांनी परत आलो तरी वापरण्यासाठी ती माहिती संचित असेल. |
5:44 | अशाप्रकारे हे वापरण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. बनवायला आणि एको करायला सोपे आहे. |
5:53 | आता 'print r' किंवा 'print underscore r' या फंक्शनचा उपयोग करू . |
5:58 | आणि येथे 'dollar underscore cookie' एको करू शकतो. आपण हे नीट अलाईन करू. |
6:05 | हे रिफ्रेश करा. येथे एक arrayआहे आणि एक वेगळी व्हॅल्यू मिळाली आहे. |
6:12 | आपल्याला name equal to Alex आणि age equal to 19 मिळाले आहे. |
6:22 | अशाप्रकारे ह्या सेट केलेल्या cookiesआहेत. आणि ह्या त्याच्या व्हॅल्यूज आहेत. |
6:27 | हे एको करण्यासाठी तुम्हाला उपयोगी आहे. |
6:31 | पुढील भागात आणखी एक फंक्शन जाणून घेऊ. cookieसेट आहेत की नाही ते शोधण्यासाठी 'if' स्टेटमेंट वापरू. |
6:41 | तसेच cookie अनसेट कशी करायची ते पाहू. |
6:45 | part 2 मधे भेटू. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे ह्यांचा आहे.सहभागाबद्दल धन्यवाद. |