Difference between revisions of "Xfig/C2/Feedback-control-diagram/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 250: | Line 250: | ||
|- | |- | ||
| 8:25 | | 8:25 | ||
− | | माउस ला“Logic library” घेऊन जा आणि सोडा. | + | | माउस ला“Logic library” वर घेऊन जा आणि सोडा. |
|- | |- | ||
|8:31 | |8:31 |
Revision as of 16:45, 14 November 2013
Time | Narration |
---|---|
0:00 | एक्सफिग वापरून फीडबॅक डाईग्राम तयार करणे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
0:07 | ब्लॉक डाईग्राम क्रियेशन वरील स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आम्ही खालील डाईग्राम बनवीलेला आहे. |
0:14 | आपण यास ब्लॉक ट्यूटोरियल म्हणूया. |
0:18 | कृपया या ट्यूटोरियल ची सुरवात करण्यापूर्वी ब्लॉक्स ट्यूटोरियल व्यवस्तीत समजून घ्या. |
0:22 | या ट्यूटोरियल मध्ये, आम्ही या पेज वर दाखविल्या प्रमाणे ब्लॉक डाईग्राम कसा तयार करायचा हे समजावु. |
0:31 | मी एक्सफिग वर्जन 3.2, पॅच लेवल 5वापरेल. |
0:37 | आपण block.fig ने सुरवात करू जे ब्लॉक्स ट्यूटोरियल मध्ये बनविले होते. |
0:43 | चला एक्सफिग वर जाऊ. |
0:47 | file नंतर openनिवडू. |
0:52 | entry बॉक्स मध्ये, block एंटर करा आणि open दाबा किंवा “block.fig” वर डबल क्लिक करा. |
1:04 | “file”, वरील “save as” पर्याय वापरुन आपण हे फिगर feedback नावाने सेव करू. |
1:24 | आपल्याकडे आता feedback.figफाइल आहे. |
1:28 | “grids” वर क्लिक करून ग्रिड्स टाकु. |
1:34 | कॅन्वस, वर किंवा खाली करण्यास उजव्या बाजूचा स्क्रोल बार वापरु शकता. |
1:41 | प्रत्येक माउस बटन ना चे कार्य वर उजव्या बाजूला दाखविले आहे. |
1:46 | हि भूमिका तुमच्या क्रियेवर अवलंबुन आहे. |
1:49 | यास उदाहरणासह स्पष्ट करण्यास मी माउस उभ्या “स्क्रोल बार वर घेते. |
1:55 | डाव्या बटना पुढील टिप पहा. |
1:59 | मी हे दाखविण्यास माउस हलवू शकत नाही कारण, जर मी स्क्रोल बार वरुन कर्सर हालवेल तर बटना ची भूमिका बदलेले. |
2:08 | “left button” कॅन्वस ला वर घेते आणि “right button” खाली. |
2:17 | डावे किंवा उजवे बटन क्लिक करण्याशिवाय, आपण“centre button”, बटनावर क्लिक करून कॅन्वस वर किंवा खाली ड्रग करू शकतो. |
2:31 | याप्रमाणे, तुम्ही वरील स्क्रोल बार वापरुन कॅन्वस ला उजव्या किंवा डाव्या बाजूला हलवू शकता. |
2:44 | आता मी middle button” वर क्लिक करेल, कॅन्वस पकडून आणि ड्रॅग करून बॉक्स ला मध्यभागी आणेल. |
2:57 | जसे मी माउस सोडते, बॉक्स मध्य भागी येतो. |
3:03 | चला आता या बॉक्स ने सुरवात करून फीडबॅक डाइग्राम तयार करू. |
3:08 | हा बॉक्स कॉपी करू. |
3:13 | बॉक्स वर क्लिक करून त्यास निवडा. |
3:16 | माउस ला नवीन जागेवर घेऊन क्लिक करा |
3:27 | आता काही टेक्स्ट टाकु. |
3:29 | आता “Text box”, वर क्लिक करू, जे डाव्या बाजूच्या पॅनल वरुन 'T' द्वारे निर्देशित आहे. |
3:37 | टेक्स्ट चा आकार निवडू. |
3:43 | माउस ला वॅल्यू बॉक्स वर घ्या आणि 16 एंटर करा. |
3:51 | “Set” वर क्लिक करा. |
3:53 | आट्रिब्यूट्स पॅनल, मधील “Text Just” बटनावर क्लिक करू. |
4:02 | सेंटर अलाइनमेंट निवडू. |
4:05 | पहिल्या बॉक्स च्या मध्य भागी क्लिक करू. |
4:11 | ओहो, मी बरोबर स्थान निवडलेले नाही. |
4:15 | कर्सर काढून टाकण्यासाठी मी वेगळ्या स्थानावर क्लिक करेल. |
4:19 | त्या नंतर मी बरोबर स्थानावर क्लिक करेल. |
4:27 | “Control” हा टेक्स्ट टाइप करून माउस क्लिक करा. |
4:35 | आता आपल्याला बाणा सह काही ओळी एंटर करायच्या आहेत. |
4:40 | “polyline button” बटन निवडू. |
4:43 | आट्रिब्यूट्स पॅनल वरुन “Arrow Mode” बटन निवडून दुसरा पर्याय निवडू. |
4:53 | “Arrow Type” बटन आणि arrow head वर क्लिक करू. |
5.00 | अशा एका पॉइण्ट वर क्लिक करा जेथून तुम्हाला ओळीची सुरवात करायची आहे. |
5:08 | हव्या असलेल्या ओळी च्या अंतिम भागावर माउस आणा. |
5:14 | आता मधल्या माउस बटना सह तेथे क्लिक करू. |
5:20 | ओळ बाणा सह तयार झाली आहे. |
5:25 | मला एक वर्तुळ (circle) ठेवायचा आहे. |
5:27 | डाव्या बाजूच्या पॅनल वरुन “circle on the left” निवडू. |
5:33 | आपण यास पहिल्या बॉक्स च्या डाव्या बाजूस ठेऊ. |
5:37 | माउस क्लिक करा. जसे मी माउस सरकवेल वर्तुळ मोठा होईल. |
5:47 | जेव्हा आपल्याला बरोबर आकार मिळेल तेव्हा माउस चे बटन सोडू. |
5:54 | ओहो... मला हवा असलेल्या वर्तुळा पेक्षा हा वर्तुळ मोठा आहे. |
5:57 | मी या क्रियेला वरील एडिट बटन वापरुन अंडू (undo) करू शकते. |
6:02 | आपण डाव्या बाजूच्या पॅनल वरील Delete बटन वापरुन हा ऑब्जेक्ट डिलीट ही करू शकतो. |
6:10 | हे आता करूया. |
6:14 | क्रॉस हेयर्स सह हाडांचा सापळा दिसेल. |
6:18 | सर्व आब्जेक्ट्स चे की पॉइण्ट्स ही दिसतील. |
6:22 | क्रॉस हेयर्स ला की पॉइण्ट्स वर घेऊन जा, जे वर्तुळ दर्शित करते आणि क्लिक करा. |
6:32 | समजा चुकीचा ऑब्जेक्ट डिलीट झाल्यास चिंता करण्याची गरज नाही. |
6:35 | तुम्ही यास अंडू करू शकता: “edit”, बटना वर क्लिक करा. माउस पकडा, “Undo” वर जा आणि माउस सोडा. |
6:44 | काही ऑब्जेक्ट्स जवळ ठेवल्यास त्यांना निवडण्यास त्रास होऊ शकतो. |
6:49 | तुम्ही ही समस्या “zoom” फीचर द्वारे सोडवू शकता. |
6:55 | डाव्या बाजूला वरील “View” बटना वर क्लिक करा. त्यास पकडून एखादा ज़ूम पर्याय निवडा. |
7:00 | मी “Zoom to fit the canvas” वर येऊन माउस सोडते. |
7:04 | आता ऑब्जेक्ट्स मध्ये फरक करणे सोपे आहे. |
7:08 | आता मी वर्तुळ डिलीट करते. |
7:12 | unzoom करू. |
7:20 | स्क्रोल बटन्स चा वापर करून मी डाइग्राम मध्य भागी घेणार आहे. |
7:35 | मला डिलीट सिंबल ऑन ठेवणे आवडत नाही, कारण, चुकीने माझ्याकडून काही डिलीट होऊ शकते. |
7:41 | मी कोणतेही दुसरे बटन निवडून यास बदलू शकते. |
7:44 | मी डावे वर्तुळ निवडते. |
7:47 | मी पुन्हा वर्तुळ काढते. |
8:00 | मला या ओळीवरुन आणखीन एक ओळ टाकायची आहे. |
8:04 | या साठी अगोदर आपण ओळी वर डॉट (“dot”) टाकु. |
8:07 | डाव्या बाजूच्या पॅनल वरील “library” वर क्लिक करू. |
8:11 | लाइब्ररी पुस्तकांच्या ढिगा द्वारे दर्शविलेली आहे. |
8:15 | एक डायलॉग विंडो उघडेल. |
8:17 | लाइब्ररी च्या बाजूला “None Loaded” सांगत आहे. |
8:20 | त्यावर क्लिक करून पकडून ठेवा. |
8:22 | उपलब्ध लाइब्ररी ची सूची दिसेल. |
8:25 | माउस ला“Logic library” वर घेऊन जा आणि सोडा. |
8:31 | “small dot” वर डबल क्लिक करून त्यास निवडा. |
8:36 | डायलॉग विंडो बंद होईल. |
8:38 | आपण लहान डॉट सोबत क्रॉस हेअर पाहत आहोत. |
8:42 | क्लिक करून डॉट ला ओळी वर ठेऊ. |
8:51 | कर्सर आणि लहान डॉट पुन्हा दिसत आहे आणि सुचवत आहे की, आपण यास इतर स्थानावर ही ठेऊ शकतो. |
8:57 | आपल्याला तो डॉट इतर स्थानावर ठेवायचा नाही. |
9:00 | माउस चे उजवे बटन क्लिक करून यास बंद करू. |
9:05 | उजवे बटन अंडू (“undo”) चे कार्य करते. |
9:08 | या मध्ये, डॉट ची निवड काढून टाकली आहे. |
9:10 | चला या डॉट पासून वर्तुळ पर्यंत ओळ कढूया. |
9:15 | polyline निवडू. |
9:18 | अगोदरच्या निवडी जसे की, “arrow mode” आणि “arrow type” लक्षात ठेवल्या आहेत. |
9:24 | एक्सफिग एक सेशन मध्ये पॅरमीटर वॅल्यूस लक्षात ठेवतो. |
9:28 | डॉट वर क्लिक करा. |
9:34 | माउस ला खाली घ्या आणि क्लिक करा. |
9:41 | माउस ला डाव्या बाजूला , वर्तुळाच्या खाली पोहेचेपर्यंत वळवा, क्लिक करा. |
9:47 | माउस ला वर्तुळा वर घ्या आणि माउस च्या मधल्या बटना वर क्लिक करा. |
9:54 | वर्तुळाच्या डाव्या बाजूला, कॉपी द्वारे आणखीन एक ओळ काढू. |
10:08 | एक्सफिग च्या डाव्या बाजूला वर कोपऱ्यात असलेले “file button” वापरुन ही आकृती“save” निवडून सेव करू. |
10:19 | आता फाइल ला एक्सपोर्ट करू. |
10:22 | पुन्हा एकदा file बटना वर क्लिक करू आणि “export” निवडू. |
10:30 | आता“language” निवडू आणि नंतर “PDF”. |
10:36 | आपल्याला “feedback.pdf” फाइल मिळेल. |
10:43 | “open feedback.pdf” या कमांड द्वारे फाइल उघडू. |
10:56 | आपल्याकडे आपल्याला हवा असलेला ब्लॉक डाइग्राम आहे. |
11:00 | आपण आपला उद्देश पूर्ण केला आहे. |
11:04 | तुमच्या साठी एक असाइनमेंट आहे. |
11:08 | ब्लॉक मध्ये वेग वेगळे ऑब्जेक्ट ठेवा. |
11:13 | रोटेट आणि फ्लिप या क्रिया करण्याचा प्रयत्न करा. |
11:19 | एडिटर मधील feedback.fig ,फाइल पहा आणि विविध घटक ओळखा. |
11:25 | लाइब्ररी चा वापर करून , संपूर्ण वेगळा ब्लॉक डाइग्राम तयार करा. |
11:32 | "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे. |
11:44 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:53 | आम्ही तुमची प्रतिक्रिया आणि तुमच्या सहभागाचे स्वागत करतो. |
11:57 | या ट्यूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यानी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |