Difference between revisions of "LibreOffice-Suite-Calc-6.3/C2/Working-with-Cells-in-Calc/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 6: Line 6:
 
|| 00:01
 
|| 00:01
 
|| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Working with Cells''' वरील पाठात आपले स्वागत.
 
|| स्पोकन ट्युटोरियलच्या ''' Working with Cells''' वरील पाठात आपले स्वागत.
 
 
|-
 
|-
 
|| 00:06
 
|| 00:06
Line 31: Line 30:
  
 
'''Ubuntu Linux OS''' वर्जन 18.04 आणि  '''LibreOffice Suite''' वर्जन 6.3.5
 
'''Ubuntu Linux OS''' वर्जन 18.04 आणि  '''LibreOffice Suite''' वर्जन 6.3.5
 
 
|-
 
|-
 
|| 00:41
 
|| 00:41
Line 46: Line 44:
 
|| 00:59
 
|| 00:59
 
||  कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
||  कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
 
  
 
|-
 
|-
 
|| 01:03
 
|| 01:03
 
||  त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
 
||  त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
 
  
 
|-
 
|-
Line 70: Line 66:
 
|-
 
|-
 
|| 01:33
 
|| 01:33
|| undo करण्यासाठी कीबोर्डवरील '''Ctrl+Z''' कीज दाबा.
+
|| undo करण्यासाठी कीबोर्डवरील '''Ctrl + Z''' कीज दाबा.
 
|-
 
|-
 
|| 01:39
 
|| 01:39
Line 77: Line 73:
 
|| 01:45
 
|| 01:45
 
|| '''Calc''' मधे आपण हेडिंग्जसाठी वेगळी '''style''' लागू करून ती इतर  '''data''' पेक्षा वेगळी दाखवू शकतो.
 
|| '''Calc''' मधे आपण हेडिंग्जसाठी वेगळी '''style''' लागू करून ती इतर  '''data''' पेक्षा वेगळी दाखवू शकतो.
 
 
|-
 
|-
 
|| 01:53
 
|| 01:53
 
|| त्यासाठी cell '''A1''' वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तो कर्सर cell '''G1''' पर्यंत ड्रॅग करा.
 
|| त्यासाठी cell '''A1''' वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तो कर्सर cell '''G1''' पर्यंत ड्रॅग करा.
 
 
|-
 
|-
 
|| 02:04
 
|| 02:04
Line 108: Line 102:
 
|| '''Items ''' या column मधे आपण एकाखाली एक काही घटकांची नावे टाईप करणार आहोत.  
 
|| '''Items ''' या column मधे आपण एकाखाली एक काही घटकांची नावे टाईप करणार आहोत.  
 
येथे दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करा.  
 
येथे दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करा.  
 
 
|-
 
|-
 
|| 02:47
 
|| 02:47
Line 185: Line 178:
 
|| 05:21
 
|| 05:21
 
|| '''Number''', '''Percent''', '''Currency''', '''Date''', '''Time''' आणि इतर अनेक.
 
|| '''Number''', '''Percent''', '''Currency''', '''Date''', '''Time''' आणि इतर अनेक.
 
 
|-
 
|-
 
|| 05:29
 
|| 05:29
Line 440: Line 432:
 
||12:38
 
||12:38
 
||सिलेक्ट केलेले '''cells''' हायलाईट झालेले दिसतील.
 
||सिलेक्ट केलेले '''cells''' हायलाईट झालेले दिसतील.
 
 
 
|-
 
|-
 
||12:42  
 
||12:42  
Line 474: Line 464:
 
|-
 
|-
 
|| 13:34
 
|| 13:34
|| कीबोर्डवरील '''Ctrl+S''' कीज दाबून फाईल सेव्ह करा.
+
|| कीबोर्डवरील '''Ctrl + S''' कीज दाबून फाईल सेव्ह करा.
  
 
|-
 
|-
Line 506: Line 496:
  
 
'''Spreadsheet-Practice.ods''' फाईल उघडा.  
 
'''Spreadsheet-Practice.ods''' फाईल उघडा.  
 
 
|-
 
|-
 
|| 14:19
 
|| 14:19
Line 530: Line 519:
 
|| 14:47
 
|| 14:47
 
||  फाईल सेव्ह करून बंद करा.
 
||  फाईल सेव्ह करून बंद करा.
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 17:07, 28 December 2020

TIME NARRATION
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Working with Cells वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोतः
00:09 spreadsheet मधे numbers, text, date आणि time समाविष्ट करणे.
00:15 Format Cells या डायलॉग बॉक्सचा वापर करणे.
00:19 cells मधे नेव्हिगेट करणे आणि
00:22 rows आणि columns मधील आयटम्स सिलेक्ट करणे.
00:27 या पाठासाठी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:41 प्रथम cells मधे data कसा भरायचा हे जाणून घेऊ.
00:46 Personal-Finance-Tracker.ods फाईल उघडा.
00:52 ही फाईल या पाठाच्या Code files लिंकमधे दिलेली आहे.
00:59 कृपया ही फाईल डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
01:03 त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
01:08 आता कुठल्याही रिकाम्या cell मधे टेक्स्ट टाईप करण्यासाठी त्यावर क्लिक करा. त्यात कीबोर्डच्या सहाय्याने टाईप करून

Enter दाबा.

01:18 डिफॉल्ट रूपात हे टेक्स्ट left-aligned आहे.
01:22 Formatting Bar वरील कोणत्याही एका Alignment आयकॉनवर क्लिक करून alignment बदलू शकतो.
01:30 आपण टाईप केलेले undo करूया.
01:33 undo करण्यासाठी कीबोर्डवरील Ctrl + Z कीज दाबा.
01:39 या spreadsheet मधे आपण column हेडिंग्ज आधीच टाईप केली होती.
01:45 Calc मधे आपण हेडिंग्जसाठी वेगळी style लागू करून ती इतर data पेक्षा वेगळी दाखवू शकतो.
01:53 त्यासाठी cell A1 वर क्लिक करा. माऊसचे डावे बटण दाबून ठेवून तो कर्सर cell G1 पर्यंत ड्रॅग करा.
02:04 आता माऊसचे डावे बटण सोडा.
02:07 आपल्याला सर्व हेडिंग्ज हायलाईट झालेली दिसतील.
02:12 आता menu bar मधील Styles मेनूवर क्लिक करा.
02:16 आपल्याला विविध heading styles दिसतील.

आपण Accent 2 पर्याय निवडू.

02:24 आता हेडिंग्ज अनसिलेक्ट करण्यासाठी रँडमली कोणत्याही cell वर क्लिक करा.
02:30 लक्षात घ्या की हेडिंग्जची बॅकग्राऊंड आता राखाडी रंगाने हायलाईट झाली आहे.
02:36 Items या column मधे आपण एकाखाली एक काही घटकांची नावे टाईप करणार आहोत.

येथे दाखवल्याप्रमाणे टेक्स्ट टाईप करा.

02:47 cell मधे संख्या टाईप करण्यासाठी cell वर क्लिक करून संख्या टाईप करा आणि

Enter दाबा.

02:57 प्रत्येक data-entry नंतर नेहमी Enter चे बटण दाबायचे लक्षात ठेवा.
03:03 ऋण संख्या टाईप करताना त्या संख्येआधी minus sign टाईप करा किंवा ती संख्या parentheses म्हणजे गोल कंसात लिहा.
03:13 डिफॉल्ट रूपात संख्या right-aligned असतात आणि ऋण संख्येच्या सुरूवातीला minus symbol असतो.
03:20 या एंट्रीज डिलिट करूया.
03:23 Shift की दाबून ठेऊन जे cells डिलिट करायचे आहेत त्या प्रत्येक cell वर क्लिक करून ते सिलेक्ट करा.

आता कीबोर्डवरील Delete चे बटण दाबा.

03:36 SN column मधे आपल्याला प्रत्येक आयटमसाठी एकाखाली एक अनुक्रमांक द्यायचे आहेत.
03:43 त्यासाठी cell A2 वर क्लिक करून 1, 2, 3 असे एकाखाली एक आकडे टाईप करा.
03:53 प्रत्येक आकडा टाईप करून झाल्यावर Enter की दाबायचे लक्षात ठेवा.
03:58 यानंतरच्या cells मधे अनुक्रमांक आपोआप भरले जाण्यासाठी cell A4 वर क्लिक करा.
04:06 त्या cell च्या उजव्या कोपऱ्यात खाली छोटा black box दिसेल त्यावर क्लिक करा.
04:13 cell A7 पर्यंत ड्रॅग करून माऊसचे बटण सोडा.
04:19 आपल्याला दिसेल की cells A5, A6 आणि A7 मधे पुढील अनुक्रमांक आपोआप टाईप झालेले आहेत.
04:28 आता Cost या हेडिंगखाली प्रत्येक आयटमची किंमत टाईप करणार आहोत.
04:35 cell C3 वर क्लिक करा आणि House rent चा खर्च म्हणून Rupees 6000.00 टाईप करा.
04:45 आता ही संख्या Rupee या चिन्हासहित हवी असल्यास काय करायचे?
04:51 Ctrl आणि Z कीज एकत्रित दाबून cell C3 मधे टाईप केलेली व्हॅल्यू काढून टाका.
04:59 cell C3 वर राईट क्लिक करून Format Cells हा पर्याय निवडा.
05:05 Format Cells चा डायलॉग बॉक्स उघडेल.
05:09 Numbers हा पहिला टॅब आहे. तो आधीच निवडलेला नसल्यास त्यावर क्लिक करा.
05:16 येथे Category खाली विविध पर्याय दिसतील.
05:21 Number, Percent, Currency, Date, Time आणि इतर अनेक.
05:29 Currency पर्याय निवडा.
05:31 Format च्या सूचीत जगभरातील विविध currency symbols दिसतील.
05:39 Format च्या ड्रॉपडाऊनमधे डिफॉल्टरूपात INR Rupee English (India) हा पर्याय निवडलेला आहे.
05:46 तसे नसल्यास ड्रॉपडाऊनवर क्लिक करून सूचीतून तो पर्याय निवडा.
05:51 Format ड्रॉप डाऊनच्या खाली आपल्या निवडीवर आधारित काही नमुने बघता येतील.
05:58 minus Rupee 1234 decimal zero zero हे INR Rupees English India साठी निवडलेले आहे.
06:10 आपण निवडलेल्या format चा छोटा प्रिव्ह्यू एरिया उजवीकडे पाहू शकतो.
06:16 Category या भागाखाली Options नावाचा आणखी एक भाग आहे.
06:22 याच्या सहाय्याने Decimal places आणि Leading zeroes ची संख्या कमी जास्त करता येते.
06:30 असे केल्यावर नमुन्यात आणि प्रिव्ह्यू एरियामधे हे बदल बघता येतील.
06:37 आपण डिफॉल्ट व्हॅल्यू तशाच ठेवणार आहोत.
06:41 व्हॅल्यूजमधे स्वल्पविराम समाविष्ट करण्यासाठी Thousands separator हा चेकबॉक्स चेक करा.
06:48 Font टॅबवर क्लिक करून font style देखील बदलू शकतो.
06:54 यामधे Family, Style आणि Size असे अनेक पर्याय आहेत.
06:59 Font Effects आणि इतर टॅब्ज तुम्ही स्वतः वापरून बघा आणि जाणून घ्या.
07:07 Alignment टॅबमधील पर्यायांबद्दल पुढील पाठांत जाणून घेणार आहोत.
07:13 उजव्या कोपऱ्यात खाली OK बटण क्लिक करा.
07:18 आता cell C3 मधे 6000 टाईप करून Enter दाबा.
07:24 लक्षात घ्या 6000 ही संख्या Rupees 6000 आणि पुढे 2 decimal places अशी दाखवली गेली आहे.
07:34 आता Shift की दाबून ठेवून माऊसने cells वर क्लिक करून C4 ते C7 हे cells सिलेक्ट करा.
07:43 CTRL की दाबून cell G2 देखील निवडा.
07:48 निवडलेले सर्व cells हायलाईट झालेले दिसतील.
07:52 हायलाईट केलेल्या कोणत्याही cells वर राईट क्लिक करून Format Cells वर क्लिक करा.
07:59 आपण या आधी निवडलेलेच पर्याय निवडा.
08:03 उजव्या कोपऱ्यात खाली असलेले OK बटण क्लिक करा.
08:07 cells डिसिलेक्ट करण्यासाठी spreadsheet मधील कुठल्याही cell वर क्लिक करा.
08:13 येथे दाखवल्याप्रमाणे सर्व आयटम्ससाठी एका खाली एक अशाप्रकारे रक्कम टाईप करा.
08:22 Account या हेडिंगखाली महिन्याचा पगार म्हणून 30,000 टाईप करू.
08:29 आता Date column वर जाऊ.

cell F2 वर क्लिक करा.

08:36 Calc मधे date लिहिण्यासाठी cell सिलेक्ट करा आणि येथे दाखवल्याप्रमाणे date टाईप करा.
08:42 येथे तारखेतील घटकांमधे forward slash वापरला आहे.
08:47 तसेच तारखेतील घटक hyphen च्या सहाय्याने वेगळे करू शकतो.
08:52 किंवा 05 June 2020 अशाप्रकारे टेक्स्ट देखील वापरू शकतो.
08:59 Calc विविध रूपातील तारीख ओळखू शकतो.
09:02 आपल्या आवश्यकतेनुसार तारखेचा फॉरमॅट कस्टमाईज सुध्दा करू शकतो.
09:09 त्यासाठी cell वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा.
09:16 Numbers टॅबवर क्लिक करा.

Category या भागात खाली Date हा पर्याय निवडा.

09:22 Format या भागात खाली तुमच्या गरजेनुसार तारखेचे स्वरूप निवडा.

आपण 31/12/1999 हा पर्याय निवडू.

09:36 preview area मधे याचा प्रिव्ह्यू बघा.
09:40 आपण निवडलेल्या पर्यायावर आधारित Format code अपडेट होईल.

येथे हा DD, MM आणि YYYY आहे.

09:52 एकदा फॉरमॅट अपडेट झाला की उजवीकडे खालील OK बटणावर क्लिक करा.
09:58 आता काही time चे पर्याय वापरून पाहू.
10:02 कोणत्याही एक cell वर क्लिक करा.

येथे दाखवल्याप्रमाणे time टाईप करा.

10:08 आपण वेळेतील घटक colons च्या सहाय्याने वेगळे केले आहेत.
10:12 वेळेचा फॉरमॅट कस्टमाईज करण्यासाठी सबंधित cell वर राईट क्लिक करून Format Cells पर्याय निवडा.
10:20 आता वरती Numbers टॅबवर क्लिक करा.
10:23 Category खाली Time हा पर्याय निवडा आणि Format मधून तुमच्या पसंतीचा फॉरमॅट निवडा.

आपण 13:37:46 निवडू.

10:35 preview area मधे ते कसे दिसते ते बघा.
10:39 तसेच Format code मधे हे HH:MM:SS असे दाखवत आहे.
10:48 आपणFormat code मधे थेट बदल देखील करू शकतो.
10:51 उजवीकडे खाली OK बटणावर क्लिक करा.
10:56 आपल्या spreadsheet वरील टाईमच्या सर्व एंट्रीज डिलिट करू.
11:01 spreadsheet मधील एका cell वरून दुसऱ्या cell वर कसे नेव्हिगेट करायचे हे जाणून घेऊ.
11:07 एखाद्या विशिष्ट cell वर केवळ cursor च्या सहाय्याने क्लिक करून त्यावर जाऊ शकतो.
11:13 यामुळे आपण new cell वर जातो.
11:17 दोन cells एकमेकांपासून दूर असतात तेव्हा ही पध्दत सर्वात उपयुक्त ठरते.
11:22 विशिष्ट cell वर जाण्यासाठीची दुसरी पध्दत म्हणजे cell reference चा वापर करणे.
11:28 Font Name च्या खालोखाल डाव्या कोपऱ्यात असलेल्या Name Box वर क्लिक करा.
11:35 सध्या तिथे असलेला cell reference काढून टाकून ज्या cell वर जायचे आहे तो cell reference टाईप करा.
11:42 B4 टाईप करून Enter दाबा.
11:47 cell B4 हायलाईट झालेला दिसेल.
11:52 आपण कीबोर्डच्या सहाय्याने cells मधे नेव्हिगेट देखील करू शकतो.
11:57 row मधे पुढील cell वर जाण्यासाठी Tab चे बटण दाबा.
12:02 row मधे मागील cell वर जाण्यासाठी Shift + Tab दाबा.
12:07 column मधे पुढील cell वर जाण्यासाठी Enter दाबा .
12:12 column मधे मागील cell वर जाण्यासाठी Shift + Enter दाबा.
12:17 आता cursor च्या सहाय्याने एकमेकांना लागून असलेल्या cells ची रेंज कशी सिलेक्ट करायची ते बघू.
12:24 प्रथम cell वर क्लिक करा आणि left mouse button दाबून ठेवा.
12:29 sheet वर cursor ड्रॅग करा.
12:32 आपल्याला हव्या असलेल्या cells चा संच हायलाईट झाला की माऊसचे डावे बटण सोडा.
12:38 सिलेक्ट केलेले cells हायलाईट झालेले दिसतील.
12:42 आता एकमेकांना लागून असलेले अनेक columns किंवा rows कसे सिलेक्ट करायचे हे जाणून घेऊ.
12:55 जो पहिला column किंवा row तुम्हाला निवडायचा आहे त्यावर क्लिक करा.
12:59 आता Shift की दाबून ठेवा आणि जो शेवटचा column किंवा row निवडायचा आहे त्यावर क्लिक करा.

निवडलेले cells हायलाईटेड दिसतील.

13:08 एकमेकांना लागून नसलेले अनेक columns किंवा rows कसे सिलेक्ट करायचे ते बघू.
13:14 जो पहिला column किंवा row निवडायचा आहे त्यावर क्लिक करा.
13:19 Control चे बटण दाबून ठेवा.
13:21 आता त्यानंतरचे जे columns किंवा rows निवडायचे आहेत त्यावर एकेक करून क्लिक करा.
13:29 आपण निवडलेले cells हायलाईट झालेले दिसतील.
13:34 कीबोर्डवरील Ctrl + S कीज दाबून फाईल सेव्ह करा.
13:40 आता उजव्या कोपऱ्यात वरती X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा.
13:46 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

13:52 या पाठात आपण शिकलोः

Calc मधे numbers, text , date आणि time समाविष्ट करणे.

14:01 Format Cells डायलॉग बॉक्स वापरणे.
14:05 cells मधे नेव्हिगेट करणे आणि
14:09 rows आणि columns मधील आयटम्स सिलेक्ट करणे.
14:13 असाईनमेंट म्हणून:

Spreadsheet-Practice.ods फाईल उघडा.

14:19 SN खाली 1 ते 5 अनुक्रमांक एकाखाली एक टाईप करा आणि Center Align करा.
14:27 सध्या आहे त्याच text format मधे Date आणि Time ही column हेडिंग्ज समाविष्ट करा.
14:33 त्या columns मधे काही व्हॅल्यूज भरा.
14:37 cells फॉरमॅट करण्यासाठी Format Cells च्या डायलॉग बॉक्समधील पर्याय वापरा.
14:43 data साठी Code files ही लिंक बघा.
14:47 फाईल सेव्ह करून बंद करा.
14:50 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

14:58 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

15:08 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
15:13 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:19 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.


ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali