Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Breastfeeding-latching/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with " {| border =1 | <center>''' Time '''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:02 | स्तनावर पकड कशी करावी ह्या व...") |
|||
Line 423: | Line 423: | ||
|- | |- | ||
− | | 11: | + | | 11:35 |
| आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
|- | |- | ||
− | | 11: | + | | 11:39 |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
| आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. | ||
+ | |- | ||
|} | |} |
Latest revision as of 12:53, 14 August 2020
|
|
00:02 | स्तनावर पकड कशी करावी ह्या वरील स्पोकन ट्युटोरिअल मध्ये आपले स्वागत. |
00:07 | ह्या ट्युटोरिअल मध्ये स्तनावर बाळाने घट्ट पकड करण्यासाठी योग्य पद्धत आणि वारंवार स्तनपान करण्याबद्दल शिकणार आहोत. |
00:20 | सुरुवात करण्यापूर्वी, कृपया लक्षात घ्या योग्य स्तनपान करण्याकरिता, स्तनावर योग्य पकड खूप महत्वाचे आहे. |
00:29 | बाळाची स्तनावर योग्य पकड नसल्यामुळे फक्त निप्पल मधून दूध मिळेल. |
00:36 | यामुळे बाळाला खूप कमी दूध मिळेल. |
00:40 | तर स्तनाच्या एरीओलाचा खालचा भाग बाळाने व्यवस्थित पकडला असल्यास, बाळाला पुरेसे दूध मिळेल. |
00:50 | कृपया लक्षात घ्या - एरीओला हा निप्पलभोवतीचा गडद भाग आहे. |
00:56 | आता सुरुवात करूया, सुरुवातीस आईने आपल्या बाळाला स्तनपान करण्यासाठी योग्य पद्धतीने पकडले पाहिजे. |
01:05 | हे पकड ह्याच मालिकेतील इतर व्हिडिओंमध्ये तपशिलात स्पष्ट केले आहेत. |
01:11 | हे ट्युटोरिअल क्रॉस क्रेडल स्थितीचा उपयोग करून समजावले जाईल. |
01:16 | लक्षात ठेवा, स्तनपानासाठी बाळाला योग्य स्थितीत ठेवणे आणि योग्य पकड गरजेजे आहे. |
01:24 | या चित्रात, आई बाळाला योग्यरित्या क्रॉस क्रेडल स्थिती मध्ये पकडत आहे. |
01:31 | आणि बाळ स्तनपान करण्यासाठी तयार आहे. |
01:35 | पकड करण्यापूर्वी हे महत्वाचे आहे की बाळाने त्याच तोंड मोठं उघडावं. |
01:42 | का? तर कोणालातरी वडा पाव किंवा बर्गर खातांना पाहून हे समजून घेऊ. |
01:49 | आपण वडा पाव किंवा बर्गरचा मोठा घास घेण्यासाठी आपलं तोंड मोठं उघडतो. |
01:56 | त्याचप्रमाणे जर बाळ मोठं तोंड उघडतो तर स्तनाचा जास्त भाग तोंडात घेऊ शकतो. |
02:04 | बाळ मोठं तोंड उघडेल ह्यासाठी आईने तिच्या निप्पलशी बाळाच्या वरच्या ओठावर हलकेच स्पर्श केले पाहिजे. |
02:16 | धीर धरा, कधीकधी बाळाला मोठं तोंड उघडण्यात काही सेकंद ते 2 मिनिटे लागू शकतात. |
02:25 | लक्षात ठेवा, स्तनपानाच्या कोणत्याही स्थितीसाठी - स्तनाशी पकड करतांना नेहमी आईची बोटे आणि अंगठा बाळाच्या ओठाच्या समांतर असले पाहिजे. |
02:36 | जेव्हा बाळ मोठं तोंड उघडतो तेव्हा त्याचे खालचे ओठ एरीओलाच्या खालील भागात असले पाहिजे. |
02:43 | आणि निप्पल तिच्या तोंडाच्या वर असले पाहिजे न कि तिच्या तोंडाच्या मधोमध. |
02:50 | आता, आईने तिचे स्तन लगेचच बाळाच्या तोंडात ठेवले पाहिजे. |
02:55 | आईने पहिले बाळाच्या डोक्याला, हलकेच बाहेरच्या बाजूस वाकवून बाळाची हनुवटी तिच्या स्तनामध्ये दाबावे. |
03:02 | आईने तिची पाठ वाकवू नये किंवा स्तनाला बाळाच्या तोंडापर्यंत आणू नये. |
03:08 | बाळाच्या खांद्याच्या मागून हलक्या हाताने आधार देऊन बाळाला स्तनाजवळ आणणे. |
03:15 | स्तनावर पकड करण्याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आईच्या एरीओलाचा खालचा भाग बाळाच्या तोंडात असला पाहिजे. |
03:25 | यामुळे निप्पलचा मोठा भाग बाळाच्या तोंडात पोहोचण्यात मदत करेल. |
03:31 | बाळाने खालच्या ओठाने एरीओला जवळच्या खालच्या भागाला जिभीने दाबले पाहिजे. |
03:37 | यामुळे दुधाच्या नलिकांवर दाब पडेल आणि जास्त दूध बाहेर येईल. |
03:42 | पुढील पायरी म्हणजे बाळाने स्तनाशी घट्ट पकड केली आहे का ते तपासावे. |
03:48 | घट्ट पकड केली आहे कि नाही ह्याची खात्री करण्यास, आईने खालील गोष्टींची काळजी घेतली पाहिजे: |
03:54 | बाळाने तोंड मोठं उघडलेलं असावा, |
03:57 | बाळाच्या वरच्या ओठां जवळचा एरीओलाचा भाग खालच्या भागा पेक्षा जास्त दिसला पाहिजे. |
04:06 | बाळाची हनुवटी आईच्या स्तनामध्ये पूर्णपणे घुसली पाहिजे. |
04:11 | दूध गिळताना बाळाच्या जबड्याने पूर्णपणे हालचाल केली पाहिजे. |
04:16 | आणि बाळाचा खालचा ओठ बाहेरच्या बाजूस मुडपलेला पाहिजे. |
04:22 | स्तनाशी व्यवस्थित जुडलेला बाळ बरेचदा आईच्या स्तनामध्ये लपलेला असतो. |
04:28 | अशा परिस्थितीत, बाळाच्या खालच्या ओठाजवळ स्तनाला हळूच दाबा आणि बाळाचा खालचा ओठ बाहेरच्या बाजूस मुडपलेला आहे कि नाही ते तपासा. |
04:41 | पुढे, बाळाच्या नाका कडे पाहू. जर बाळाचे नाक आईच्या स्तनामध्ये दबले असेल तर - |
04:49 | आई बाळाचं डोकं बाहेरच्या बाजूस हलकेच मुडपू शकते जेणेकरून बाळाची हनुवटी आईच्या स्तनामध्ये अजून दबेल. |
04:58 | आणि बाळाचे नाक व कपाळ स्तनाजवळून दूर होते. |
05:04 | असे केल्यामुळे, बाळाचा स्तनाशी घट्ट पकड होईल. |
05:09 | बाळाचा पूर्ण चेहरा स्तनाजवळून दूर नेऊ नका. |
05:13 | यामुळे केवळ निप्पल मधून दूध मिळेल. |
05:16 | लक्षात ठेवा - दूध पाजणे हे आईसाठी आरामदायक असले पाहिजे. |
05:21 | तिला तिच्या निप्पल वर चिमटे काढणे, खेचणे, किंवा रगडणे असे जाणवले नाही पाहिजे. |
05:27 | जर दूध पाजणे आईसाठी त्रासदायक असेल तर बाळाने स्तनाशी व्यवस्थित पकड केली नसेल. |
05:35 | आता आपण योग्य पकड नसल्याचे सामान्य करणे पाहूया. |
05:40 | बऱ्याच आई आपल्या एरीओलाला दाबून केवळ निप्पल बाळाच्या तोंडात मधूमध ठेवतात. |
05:48 | येथे, बाळाचं तोंड मोठं उघडलेलं नाही. |
05:52 | बाळ फक्त निप्पलशी पकड करतो. |
05:56 | येथे, बाळाच्या वरच्या आणि खालच्या ओठांच्या जवळचा एरीओलाचा सामान भाग दिसतो. |
06:04 | बाळाची हनुवटी स्तनाशी दूर आहे. |
06:07 | बाळाची दूध पिण्याची पद्धत जलद आहे. |
06:14 | चोखतांना, बाळाच्या गालात खळी पडते. |
06:17 | बाळाचा जबडा पूर्णपणे हालचाल करत नाही जेव्हा बाळ दूध पीतो. |
06:23 | आणि बाळाच्या तोंडातल्या कडक भागामुळे निप्पलला चिमटी भरते आणि दबते. |
06:31 | हे आईसाठी वेदनादायक असू शकते आणि निप्पलला जखम होऊ शकते. |
06:37 | तसेच, निप्पल मधून स्तनपान केल्यामुळे, बाळाला एरीओलाच्या खालच्या मोठ्या दुग्ध नलिकांमधून दूध मिळणार नाही. |
06:45 | त्यामुळे बाळाला पुरेसे दूध मिळत नाही. |
06:50 | जर बाळ फक्त निप्पल मधून दूध पीत असेल तर, |
06:54 | आईने तिची स्वच करंगळी, बाळाच्या तोंडात कोपऱ्यातून टाकावी. |
06:59 | तिने ह्याचा वापर निप्पलवर बाळाचं चोखणं सोडवण्यास करावे. |
07:04 | नंतर तिने योग्य पकड खात्री करून, बाळाला पुन्हा त्याच स्तनाशी पकड करावी. |
07:11 | योग्य पकड नंतर - आईने खात्री करून घ्यावी कि बाळाला पुरेशा प्रमाणात पहिले दूध आणि मागील दूध दोन्हीपैकी मिळते. |
07:19 | पहिले दूध पाण्यासारखे असते, जे स्तनाच्या पुढील भागात साठवलेले असते. |
07:25 | हे पाणी आणि प्रोटीनशी बनले असते. |
07:29 | हे बाळाच्या विकासासाठी गरजेचे आहे. |
07:36 | मागील दूध घट्ट असते, जे स्तनाच्या मागील भागात साठवलेले असते. |
07:42 | हे मुख्यत्वे चरबीने बनलेले असते. |
07:46 | हे बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी आणि वजन वाढविण्यासाठी गरजेचे आहे. |
07:53 | हे जाणून घेण्यासाठी कि बाळाला पहिले दूध आणि मागील दूध मिळत आहे का- आईने दुसऱ्या स्तनामधून दूध पाजण्याआधी, पहिल्या स्तनातून पूर्णपणे दूध पाजले पाहिजे. |
08:05 | खात्री करण्यासाठी आईने एका स्तनातून पूर्णपणे दूध पाजले आहे का - आईने हाताने दाबून स्तनातून दूध काढले पाहिजे. |
08:15 | जर स्तनातून पाण्यासारखे दूध बाहेर आले तर, |
08:19 | किंवा घट्ट दुधाचा चांगला प्रवाह आला, |
08:24 | तर आईने आपल्या बाळाला पुन्हा त्याच स्तनाशी दूध पाजावे. |
08:29 | जेव्हा हाताने दाबल्याने घट्ट दुधाचा प्रवाह कमी होऊन थेंब थेंब येते तेव्हा, |
08:35 | ह्याचा अर्थ आईने आपल्या बाळाला त्या स्तनातून पूर्णपणे दूध पाजले आहे. |
08:41 | परंतु, दुसऱ्या स्तनातून दूध पाजण्याआधी, आईने बाळाला तिच्या मांडीवर बसवून त्याच्या धडाचा भाग हलकेच पुढे ढकलून त्याच्या जबड्याला आपल्या हातात घेऊन ढेकर द्यायला प्रोत्साहित करावे. |
09:00 | बाळाने २ ते ३ मिनटात ढेकर दिले पाहिजे. |
09:04 | जर पुढच्या ५ मिनिटांत ढेकर नाही दिला तर, |
09:08 | याचा अर्थ असा होतो की बाळाने स्तनाशी खूप चांगली पकड केली होती. |
09:14 | बाळाने दूध पिताना तिच्या पोटात जास्त हवा घेतली नाही. |
09:21 | आता, आईने तिचे दुसरे स्तन बाळाला दिले पाहिजे. |
09:26 | जर बाळाचे पोट भरलेले असेल, तर बाळ दुस-या स्तनातून दूध पिणार नाही. |
09:32 | पण आईने दोन्ही स्तनातून बाळाला दूध पाजले पाहिजे. |
09:39 | तिने अंतिम निर्णय बळावर सोडले पाहिजे. |
09:45 | जर स्तनपान करतांना बाळ झोपी गेले, तर आईने बाळाच्या तळपायावर हलकेच थापटून, |
09:55 | किंवा बाळाच्या पाठीवर हलकेच गुदगुल्या करून, |
09:59 | किंवा ढेकर साठी दाखवलेल्या स्थितीत बाळाला बसवून उठवले पाहिजे. |
10:04 | योग्य पद्धतीसह, स्तनपान वारंवार करणे देखील महत्वाचे आहे. |
10:12 | आईने 24 तासांत किमान 12 वेळा आपल्या बाळाला स्तनपान दिले पाहिजे. |
10:17 | त्यापैकी रात्रीच्या वेळी किमान 2 ते 3 वेळा दूध पाजले पाहिजे. |
10:24 | बाळाला स्तनपान देण्यापूर्वी, आईने बाळाची भुकेची लक्षणे पहिली पाहिजे जसे कि – बैचैनी |
10:32 | तोंड उघडणे
डोकं फिरवणे आपले हात तोंडात टाकणे, |
10:37 | बोटांना चोखणे आणि शरीर ताणणे. |
10:42 | जर बाळ दुधासाठी रडत असेल, तर त्याचा अर्थ असा की बराच उशीर झालेला आहे. |
10:49 | कृपया लक्षात घ्या – 2 आठवड्यात, 6 आठवड्यात आणि वयाच्या 3 महिन्यात बाळाच्या विकासात जलद गतीने वाढ होते. |
10:59 | आणि बाळाला जास्त दुधाची गरज लागेल. |
11:05 | तसेच, आईच्या दुधात वाढ होईल जर बाळ वारंवार दूध पियेल. |
11:12 | त्यामुळे, अश्या विकासाच्या वेळेत आईने वारंवार दूध पाजले पाहिजे. |
11:19 | लक्षात ठेवा – बाळाच्या जीवनाच्या पहिल्या ६ महिन्यांसाठी आईचे दूध सर्वोत्तम पोषण आहे. |
11:30 | आणि योग्य पकड, यशस्वीरीत्या स्तनपानासाठी गरजेची आहे. |
11:35 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:39 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रंजना ऊके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |