Difference between revisions of "PhET/C2/Energy-Skate-park/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
m |
|||
(2 intermediate revisions by one other user not shown) | |||
Line 69: | Line 69: | ||
|- | |- | ||
||01:34 | ||01:34 | ||
− | || | + | ||'''PE = mgh ''' जेथे '''m''' म्हणजे पदार्थाचे वस्तुमान , '''g''' हे गुरुत्वाकर्षणामुळे असलेले त्वरण आणि '''h''' ही उंची आहे. |
|- | |- | ||
Line 215: | Line 215: | ||
|- | |- | ||
||04:44 | ||04:44 | ||
− | || | + | ||'''Kinetic Energy''', |
|- | |- | ||
||04:46 | ||04:46 | ||
− | || | + | ||'''Potential Enrgy''', |
|- | |- | ||
||04:48 | ||04:48 | ||
− | || | + | ||'''Total Energy''', |
|- | |- | ||
||04:50 | ||04:50 | ||
− | || | + | ||'''Height''', |
|- | |- | ||
||04:52 | ||04:52 | ||
− | || | + | ||'''Speed''' of skater. |
|- | |- |
Latest revision as of 15:35, 7 February 2020
Time | Narration |
00:01 | Energy Skate Park सिम्युलेशनवरील पाठात आपले स्वागत.
|
00:06 | या पाठात आपण Energy Skate Park, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत. |
00:14 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, |
00:22 | जावा वर्जन 1.7, |
00:26 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
|
00:32 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:40 | हे सिम्युलेशन वापरून तुम्ही शिकणार आहात:
1. उर्जा अक्षय्यतेचा नियम. |
00:48 | 2. ऊर्जेतील बदलांसाठी पाय चार्ट आणि बार ग्राफ दाखवणे. |
00:53 | 3. ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर उर्जेचे मूल्य दर्शविण्यासाठी Energy vs Position आलेख काढणे. |
01:00 | 4. ट्रॅकच्या स्थानातील बदलानुसार उर्जेतील बदलांचे निरीक्षण करणे. |
01:04 | 5. वस्तुमान आणि घर्षणात बदल झाल्यामुळे उर्जेत होणारे बदल बघणे. |
01:09 | ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार उर्जा निर्माण केली जाऊ शकत नाही किंवा नष्टही केली जाऊ शकत नाही. |
01:17 | ती केवळ एका रूपातून दुसर्या रूपात रूपांतरित केली जाऊ शकते. |
01:22 | परिवर्तन होण्यापूर्वीची आणि नंतरची एकूण उर्जा तेवढीच राहते. |
01:27 | स्थितिज उर्जा म्हणजे पदार्थाच्या स्थानामुळे त्याला प्राप्त झालेली ऊर्जा. |
01:34 | PE = mgh जेथे m म्हणजे पदार्थाचे वस्तुमान , g हे गुरुत्वाकर्षणामुळे असलेले त्वरण आणि h ही उंची आहे. |
01:43 | पदार्थाला असलेल्या गतीमुळे त्याला गतिज उर्जा प्राप्त होते. |
01:49 | KE =1/2 mv2
येथे m हे पदार्थाचे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. |
01:57 | प्रात्यक्षिक सुरू करूया. |
02:00 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.
|
02:04 | मी Downloads फोल्डरमधे Energy skate park हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
|
02:11 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी टर्मिनल उघडा.
|
02:15 | प्रॉमप्टवर टाइप करा: cd Downloads आणि एंटर दाबा. |
02:23 | त्यानंतर टाईप करा: java space hyphen jar space energy hyphen skate hyphen park underscore en dot jar आणि एंटर दाबा. |
02:37 | Energy Skate Park सिम्युलेशन उघडेल. |
02:41 | हा Energy skate Park सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
02:46 | हे सिम्युलेशन वापरून वास्तविक जगात उर्जेचे रूपांतरण कसे होतात ते पाहू. |
02:54 | स्क्रीनच्या मेनूबारमधे हे मेनू आयटम्स आहेत- File, |
03:00 | Tracks, |
03:02 | Help. |
03:04 | स्क्रीनमधे एक PhET स्केटर डीफॉल्ट रूपात loop आंदोलने घेत आहे. |
03:09 | skater चा ट्रॅक बदलण्यासाठी Tracks मेनूवर क्लिक करा. |
03:14 | मेनू निवडण्यासाठी ट्रॅक्सची सूची दाखवेल. |
03:19 | उजवीकडे कंट्रोल्स असलेले पॅनेल आहे. |
03:24 | हे कंट्रोल्स सिम्युलेशनमधे attributes बदलण्यासाठी वापरले जातात. |
03:29 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset वर क्लिक करा. रिसेट या कृतीला पुष्टी देण्यासाठी Yes वर क्लिक करा. |
03:37 | पॅनेलवरील Choose Skater बटणावर क्लिक करा. |
03:41 | Choose Skater हे पॅनेल उघडेल. |
03:44 | हे पॅनेल विविध स्केटर्स त्यांच्या वस्तुमानासहित दाखवत आहे. |
03:49 | डीफॉल्ट रूपात, 75 किलो वस्तुमान असलेला PhET Skater निवडलेला आहे. |
03:55 | OK बटणावर क्लिक करा. |
03:58 | स्क्रीनच्या खालील भागात, ऍनिमेशनचा वेग नियंत्रित ठेवण्यासाठी Sim Speed हा स्लायडर, |
04:06 | Play/Pause आणि Step ही बटणे, |
04:10 | तसेच Zoom in आणि zoom out ही बटणे आहेत. |
04:13 | डीफॉल्ट रूपात, Sim Speed स्लायडर fast वर आहे. |
04:17 | Sim speed स्लायडर slow आणि fast या पर्यायांमधे ड्रॅग करा. |
04:22 | मार्ग दर्शवण्यासाठी पाथ या विभागातील Show Path बटणावर क्लिक करा. |
04:27 | मार्गावर जांभळ्या रंगाचे ठिपके दिसतील. |
04:30 | Stop बटणावर क्लिक करून नंतर सिम्युलेशन पॉज करा. |
04:36 | मार्गावरील कुठल्याही जांभळ्या ठिपक्यावर क्लिक करा. |
04:40 | पुढील माहिती दाखवली जाईल: |
04:44 | Kinetic Energy, |
04:46 | Potential Enrgy, |
04:48 | Total Energy, |
04:50 | Height, |
04:52 | Speed of skater. |
04:54 | मार्ग क्लियर करण्यासाठी Clear बटणावर क्लिक करा. |
04:58 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
05:02 | उजवीकडे पॅनेलमधे Energy Graphs या विभागाखालील Show Pie Chart या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
05:09 | with Thermal हा चेकबॉक्सदेखील सिलेक्ट झालेला दिसेल. |
05:14 | Pie chart तुम्हाला गतिज उर्जेचे स्थितिज उर्जेत व उलट रूपांतरण दाखवेल. |
05:20 | एनर्जी इंडीकेटर बॉक्स स्क्रीनच्या उजव्या वरच्या कोपऱ्यात दिसत आहे. |
05:26 | Pie Chart मधील उर्जा बदल दाखवण्यासाठी हा बॉक्स उपयोगी आहे. |
05:31 | या उदाहरणात स्थितिज उर्जा ही गुरूत्वीय स्थितिज उर्जा आहे. |
05:36 | हा बदल गुरुत्वाकर्षण क्षेत्रात स्केटरची उंची बदलण्यामुळे होत आहे. |
05:41 | जसजसा स्केटर खाली सरकतो तसतशी त्याची स्थितिज उर्जा कमी होते आणि गतिज उर्जा वाढते. |
05:49 | जसा स्केटर वर सरकेल तशी त्याची स्थितिज उर्जा वाढते आणि गतिज ऊर्जा कमी होते. |
05:56 | sim speed स्लायडर Slow कडे ड्रॅग करा. |
06:00 | ट्रॅकच्या तळाशीही तुम्हाला थोडी स्थितिज उर्जा असलेली दिसेल. |
06:06 | याचे कारण ट्रॅक हा जमिनीच्या पातळीपासून वर आहे. |
06:11 | ट्रॅक ड्रॅग करून जमिनीच्या पातळीवर न्या. |
06:15 | स्केटरमध्ये ट्रॅकच्या तळाशी शून्य स्थितिज उर्जा आणि सर्वात वर शून्य गतिज ऊर्जा आहे हे पहा. |
06:23 | आता मी ट्रॅक जमिनीपासून वर ड्रॅग करत आहे. |
06:27 | Potential Energy Reference चेकबॉक्सवर क्लिक करा. |
06:31 | स्क्रीनच्या खालील भागात P.E=0 at this dotted line असे दाखवले जाईल. |
06:37 | Potential Energy Reference रेषा वरच्या दिशेने ड्रॅग करून ट्रॅकच्या तळाला स्पर्श करा. |
06:43 | तुम्हाला आता दिसेल की, स्केटरमध्ये ट्रॅकच्या तळाशी शून्य स्थितिज उर्जा आहे. |
06:49 | आता Bar Graph बटणावर क्लिक करा. |
06:52 | या बार आलेखावर चार उर्जा दाखवलेल्या आहेत. |
06:56 | स्केटर ट्रॅकवर मागे व पुढे सरकत असताना उर्जा बदलांची नोंद घ्या. |
07:02 | स्केटरची एकूण उर्जा स्थिर आहे. |
07:06 | म्हणजेच येथे उर्जा अक्षय्यतेचा नियम पाळला जात आहे. |
07:10 | ट्रॅकचा आकार आणि उंची बदलू या. |
07:14 | कोणत्याही एखाद्या निळ्या बिंदूवर क्लिक करून ड्रॅग करा. |
07:17 | ट्रॅकची उंची वाढल्यामुळे एकूण उर्जेत वाढ झाली आहे याची नोंद घ्या. |
07:22 | Bar Graph बंद करा. |
07:24 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा. |
07:29 | नंतर Energy vs. Position बटणावर क्लिक करा. |
07:33 | Energy vs Position चा आलेख दिसेल. |
07:37 | आलेख आणि स्केटर एकाच वेळी दिसण्यासाठी ट्रॅक डावीकडे ड्रॅग करा. |
07:43 | स्केटरच्या स्थानानुसार उर्जेत कसे बदल होतात ते पहा. |
07:48 | येथे तुम्हाला dotted line हलताना दिसेल. |
07:52 | ही, ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर स्केटरची उर्जा दर्शवते. |
07:58 | आलेखाच्या तळाशी उर्जेसाठी चार चेकबॉक्सेस आहेत. |
08:02 | एखाद्या विशिष्ट प्रकारचा उर्जा आलेख बघण्यासाठी इतर चेकबॉक्सेस अनचेक करा. |
08:09 | सिम्युलेशन काही काळ थांबवण्यासाठी Pause बटणावर क्लिक करा. |
08:13 | Copy बटणावर क्लिक करा. |
08:16 | Copy बटणाद्वारे आपल्याला एखाद्या विशिष्ट स्थानासाठी उर्जेचे मूल्य आलेखावर दाखवता येते. |
08:22 | आलेख बंद करा. |
08:25 | Energy vs. Time बटणावर क्लिक करा. |
08:29 | Energy vs. Time चा आलेख उघडेल. |
08:33 | आलेखाच्या खालच्या भागात आपल्याकडे सिम स्पीड स्लायडर, |
08:38 | स्टॉप/गो, प्लेबॅक, |
08:42 | स्टेप, रिवाईंड, क्लियर ही बटणे आहेत. |
08:49 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
08:56 | Stop बटणावर क्लिक करा. |
08:59 | सिम स्पीड स्लायडर स्लो आणि फास्ट यांच्या दरम्यान ड्रॅग करा. |
09:04 | नंतर प्लेबॅक बटण दाबा. |
09:07 | एक जांभळी उभी रेषा मार्गावर आडवी जाताना दिसेल. |
09:12 | दिलेल्या वेळेत गतिज, स्थितिज आणि एकूण उर्जेच्या व्हॅल्यूजचे निरीक्षण करा. |
09:20 | लक्षात घ्या एकूण उर्जा स्थिर आहे. |
09:24 | परंतु गतिज उर्जेचे स्थितिज ऊर्जेत आणि उलट असे बदल होत आहेत. |
09:29 | येथे घर्षण नसल्यामुळे औष्णिक उर्जा शून्य आहे. |
09:33 | Energy vs. Time आलेख बंद करा. |
09:36 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा. |
09:40 | स्केटरच्या वस्तुमानानुसार एकूण उर्जेत होणारा बदल पाहू. |
09:45 | पॅनेलच्या तळाशी स्क्रॉल करा. |
09:48 | Edit skater बटणावर क्लिक करा. |
09:51 | Mass टेक्स्ट बॉक्स आणि Mass स्लायडर दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा. |
09:57 | डीफॉल्ट रूपात, Mass 75 किलो आहे. |
10:01 | आलेख उघडण्यासाठी Energy Vs. Time बटणावर क्लिक करा. |
10:06 | Mass स्लायडर हळूहळू 200 च्या दिशेने ड्रॅग करा. |
10:10 | आपण स्केटरचे वस्तुमान बदलत असता उर्जेत होणारे बदल आलेखावर पहा. |
10:16 | Energy Vs. Time हा आलेख बंद करा. |
10:19 | आता आपण स्केटरला विविध ग्रहांवर घेऊन जाऊ. |
10:24 | पॅनेलमधे वरच्या दिशेने स्क्रॉल करा. |
10:27 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा. |
10:31 | Location भागात, डीफॉल्ट रूपात, Earth निवडलेली आहे. |
10:35 | Energy vs. Time बटणावर क्लिक करा. |
10:39 | Location विभागात, Moon रेडिओ बटण निवडा. |
10:44 | चंद्रावरील कमी गुरूत्वामुळे स्केटर उडून जाताना दिसेल. |
10:50 | Return Skater बटणावर क्लिक करा. |
10:53 | येथे Gravity चे मूल्य 1.62 N/kg आहे जे पृथ्वीवरील मूल्यापेक्षा कमी आहे. |
11:00 | ज्यामुळे स्केटरचा वेग कमी होईल. |
11:04 | पृथ्वीपेक्षा चंद्रावरील गुरूत्व कमी असल्याने येथे एकूण उर्जा कमी होईल. |
11:10 | अशाच प्रकारे गुरू (Jupiter) आणि अवकाश ( Space) या स्थानांसाठी उर्जा बदलांची तुलना करा. |
11:17 | Energy Vs. Time हा आलेख बंद करा.
|
11:21 | आता आपण घर्षणासहित आणि घर्षणाशिवायच्या ट्रॅकवर उर्जेचे विभाजन पाहू. |
11:26 | सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा. |
11:30 | पॅनेलवर खाली स्क्रॉल करा आणि Track Friction बटणावर क्लिक करा. |
11:35 | Coefficient of Friction स्लायडर दिसेपर्यंत खाली स्क्रॉल करा. |
11:40 | Energy vs.Time बटणावर क्लिक करा. |
11:44 | Coefficient of Friction स्लायडर हळूहळू None पासून Lots पर्यंत ड्रॅग करा. |
11:50 | उर्जेतील बदलांचे निरीक्षण करा. |
11:53 | येथे काही उर्जेचे घर्षणामुळे औष्णिक उर्जेत रूपांतर झाले आहे. |
11:59 | याचे कारण म्हणजे घर्षणामुळे गतीला झालेला विरोध. |
12:04 | स्केटरच्या गतीस घर्षण विरोध करते. |
12:08 | त्यामुळे त्याचा वेग कमी होऊन ऊर्जा कमी होते. |
12:12 | Energy Vs. Time हा आलेख बंद करा.
|
12:15 | असाईनमेंट म्हणून:
Tracks मेनूमधून Double Well ट्रॅक निवडा आणि ऊर्जेतील बदलांचे निरीक्षण करा. |
12:24 | Double well ट्रॅक आणि Double Well Roller Coaster मोड यांच्यातील ऊर्जा बदलांची तुलना करा. |
12:30 | औष्णिक उर्जेत झालेले बदल पहा, |
12:34 | आणि स्पष्ट करा. (टीप- त्यासाठी ट्रॅकवर राईट क्लिक करून Roller Coaster Mode निवडा). |
12:43 | Tracks बॉक्स वापरून ट्रॅक्स तयार करा आणि ऊर्जेतील बदल बघा. |
12:49 | थोडक्यात,
|
12:52 | या पाठात आपण शिकलो Energy Skate Park, हे PhET सिम्युलेशन कसे वापरावे. |
13:01 | हे सिम्युलेशन वापरून आपण,
1. ऊर्जा अक्षय्यतेचा नियम. |
13:08 | 2. ऊर्जेतील बदलांसाठी पाय चार्ट आणि बार ग्राफ दाखवणे. |
13:13 | 3. ट्रॅकवरील विशिष्ट स्थानावर उर्जेचे मूल्य दर्शविण्यासाठी Energy vs Position आलेख काढणे.
|
13:20 | 4. ट्रॅकच्या स्थानातील बदलानुसार उर्जेतील बदलांचे निरीक्षण करणे.
|
13:24 | 5. वस्तुमान आणि घर्षणात बदल झाल्यामुळे उर्जेत होणारे बदल बघणे.
|
13:29 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
13:38 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
13:47 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
13:51 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
13:55 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे. |
14:03 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
14:11 | अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
14:16 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |