Difference between revisions of "PhET/C3/Gene-Machine-The-Lac-Operon/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
m |
m |
||
Line 404: | Line 404: | ||
|| 10:04 | || 10:04 | ||
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
− | ऑनलाईन परीक्षा | + | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
Latest revision as of 15:38, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Gene Machine - The Lac Operon सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
|
00:08 | या पाठात, Gene Machine - The Lac Operon या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघू.
|
00:16 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.
|
00:23 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7.0, |
00:34 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
|
00:40 | सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकू: |
00:44 | लॅक्टोज रेग्युलेशन |
00:46 | लॅक्टोज रेग्युलेशनमधे सहभागी असलेली जनुके |
00:50 | LacZ जनुकाच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक. |
00:55 | lac operon हा जनुकांचा एक संच असून तो इ.कोलाय बॅक्टेरियांतील लॅक्टोजचे चयापचय नियंत्रित करतो. |
01:05 | एक ओपेरॉन हा तीन प्राथमिक DNA घटकांनी बनलेला असतो: Promoter, Operator आणि Structural gene. |
01:17 | Promoter ट्रान्सक्रिप्शनची सुरूवात करतो. |
01:20 | Operator: हा DNA घटक असून ज्याला रिप्रेसर जोडला जातो. |
01:26 | Structural gene: हे प्रथिन कोड करणारे जनुक आहे. |
01:31 | lac ओपेरॉनमधे lacZ, lacY आणि lacA ही तीन स्ट्रक्चरल जनुके आहेत. |
01:40 | ही जनुके एकल mRNA म्हणून एका प्रमोटरच्या नियंत्रणाखाली ट्रान्सक्राइब झाली आहेत. |
01:47 | जीन्समधील lac operon अशी प्रथिने दाखवतात जी सेलला लॅक्टोज वापरण्यास मदत करतात |
01:55 | Lac Operon ची जनुके व्यक्त होऊ शकतात आणि प्रथिने भाषांतरित केली जाऊ शकतात. |
02:01 | lacZ चे जनुक उत्पादन, β-galactosidase जे लॅक्टोजची फोड करते. |
02:08 | lacY हे Beta-galactoside permease एनकोड करते. हे पेशींमधे लॅक्टोज घेऊन येण्यास मदत करते. |
02:17 | lacA हे β-galactoside transacetylase साठी एनकोड करते. |
02:23 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
|
02:28 | मी डाउनलोड्स फोल्डरमधे Gene Machine-The Lac Operon सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे. |
02:36 | सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा. |
02:40 | प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा. |
02:47 | नंतर java space hyphen jar space gene hyphen machine hyphen lac hyphen operon underscore en dot jar टाईप करून एंटर दाबा. |
03:04 | Gene-Machine-The Lac Operon हे सिम्युलेशन उघडेल. |
03:09 | सिम्युलेशन स्क्रीनच्या वरील भागात दोन टॅब्ज आहेत-
Lactose Regulation आणि Lactose Transport. |
03:19 | लॅक्टोज रेग्युलेशनच्या स्क्रीनवर निळ्या रंगाचे दोन तरंगणारे RNA polymerase दिसतील. |
03:27 | एक अपूर्ण ओपेरॉन दिसेल ज्याची जोडणी करायची आहे. |
03:32 | येथे तळाशी दिलेला प्रत्येक घटक जनुकातील त्याच्या योग्य जागेशी जोडायचा आहे. |
03:39 | उजव्या कोपऱ्यात खाली Show Legend च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
03:44 | स्क्रीनच्या उजवीकडे Legend हे पॅनेल उघडेल. |
03:49 | Legend पॅनेल आपल्याला स्क्रीनवरील उपस्थित रेणू ओळखण्यास मदत करते. |
03:56 | स्क्रीनच्या खालील भागात ऍनिमेशनचा वेग सेट करण्यासाठी स्लाइडर आहे.
Play/Pause, step आणि Reset All ही बटणे आहेत. |
04:10 | आता जनुक जुळवण्यास सुरूवात करू. |
04:14 | lacI promoter वर क्लिक करा. |
04:17 | जनुकावरील विशिष्ट भाग पिवळ्या रंगाने हायलाईट केलेला दिसेल. |
04:23 | lacI promoter ड्रॅग करून ते ओपेरॉनवर ठेवा. |
04:28 | तसेच lacI gene ड्रॅग करून ते ओपेरॉनवर ठेवा. |
04:33 | तरंगणारा RNA Polymerase रेणू चटकन lacI प्रमोटरला जोडला जातो. |
04:39 | mRNA तयार करण्यासाठी हे lacI जनुक सक्रिय करेल. |
04:44 | mRNA आता LacI प्रथिनामधे भाषांतरित झाला आहे जो स्क्रीनमधे तरंगत आहे. |
04:51 | LacI हे lac repressor प्रथिन आहे. |
04:55 | हे ओपेरॉनच्या Lac ऑपरेटर भागाशी जोडले जाते. |
05:00 | LacI प्रथिने तयार होताच, स्क्रीनच्या डाव्या कोपऱ्यात वरती Lactose injector आलेला दिसेल. |
05:10 | डाव्या कोपऱ्यात खाली असलेल्या Show Lactose Meter च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
05:16 | हा मीटर आतील लॅक्टोजच्या लेव्हलची कल्पना देईल. |
05:21 | पुढे LacZ जनुक एकत्र करूया. |
05:24 | ओपेरॉनवरील हायलाईट केलेल्या पिवळ्या रंगाच्या भागाद्वारे दाखवलेल्या जागी
Lac promoter आणि Lac Operator ड्रॅग करून ठेवा. |
05:34 | तरंगत असलेले LacI प्रथिन आता ओपेरॉनच्या ऑपरेटर भागाशी जोडले जाईल. |
05:41 | आता ओपेरॉनवर LacZ हे जनुक ठेवा. |
05:45 | लॅक्टोजच्या अनुपस्थितीत LacI ऑपरेटर भागाशी जोडला जातो आणि RNA polymerase ला ओपेरॉन ट्रान्सक्राईब करण्यापासून रोखतो. |
05:55 | म्हणून कोणतेही LacZ एंझाइम तयार केले जात नाही. |
05:59 | स्क्रीनवर Lactose injector च्या सहाय्याने लॅक्टोजचे काही रेणू सोडा. |
06:06 | येथे Manual आणि Auto हे पंपिंगचे दोन पर्याय आहेत. |
06:12 | Manual हा पर्याय निवडा. |
06:15 | injector वरील लाल बटण दाबा. |
06:19 | लॅक्टोज मीटरमधे लॅक्टोज लेव्हलचे निरीक्षण करा. |
06:23 | ऑपरेटरला जोडलेले LacI लॅक्टोज सेन्सरसारखे कार्य करते. |
06:28 | लॅक्टोजचे रेणू LacI ला जोडले जातात आणि ऑपरेटरचा भाग सोडून देतात. |
06:34 | आता RNA Polymerase जनुकाला ट्रान्सक्राईब करू शकतो. |
06:39 | हा mRNA आता LacZ प्रथिनात भाषांतरित झाला आहे. |
06:45 | LacZ हे Beta-galactosidase एंझाइम आहे. |
06:49 | हे लॅक्टोजला ग्लुकोज आणि ग्लॅक्टोजमधे विभाजित करते. |
06:54 | लॅक्टोजचे रेणू LacZ प्रथिनाशी जोडले जातील. |
06:58 | LacZ प्रथिन स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे लॅक्टोजचे रेणू विभाजित करेल. |
07:04 | Interior Lactose लेव्हल मीटरचे निरीक्षण करा. लॅक्टोज लेव्हल कमी झाली आहे. |
07:10 | Lactose Transport स्क्रीनवर क्लिक करा. |
07:14 | Lactose regulation स्क्रीनमधील सर्व फीचर्स व्यतिरिक्त Lactose Transport स्क्रीनमधे Cell Membrane आणि LacY gene ही फीचर्स आहेत. |
07:24 | मागे दाखवल्याप्रमाणे ओपेरॉनची जोडणी करू. |
07:29 | ओपेरॉनचे सर्व संबंधित घटक त्याच्या संबंधित जागी ड्रॅग करून ठेवा. |
07:45 | Show Legend आणि Show Lactose Meter या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
07:51 | लॅक्टोज इंजेक्टर वापरून लॅक्टोजचे काही रेणू आत सोडा. |
07:56 | लॅक्टोज इंजेक्टरवरील Auto रेडिओ बटणावर क्लिक करा. |
08:01 | LacI, LacZ आणि LacY प्रथिने तयार होतील. |
08:07 | LacY हे Beta-galactoside permease एंझाइम आहे. |
08:12 | हे पेशीत लॅक्टोज येण्यास मदत करते. |
08:17 | पेशी पटलामधे LacY प्रथिन समाविष्ट झाल्याचे निरीक्षण करा. |
08:23 | LacY प्रथिने लॅक्टोज रेणू पेशीत झिरपण्यास मदत करते. |
08:30 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे LacZ एंझाइम, पेशीमधे लॅक्टोज रेणूंचे चयापचय करतात. |
08:40 | LacZ जनुकांच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक. |
08:45 | lac repressor हे लॅक्टोज सेन्सरप्रमाणे कार्य करतात. |
08:49 | पेशीमधे लॅक्टोज उपस्थित नसताना हे Lac operon चे ट्रान्सक्रिप्शन थांबवतात. |
08:56 | लॅक्टोजच्या उपस्थितीत lac रिप्रेसर DNA ला जोडून घेण्याची क्षमता गमावतात. |
09:03 | हे ऑपरेटरला तरंगत ठेवतात व ओपेरॉन ट्रान्सक्राईब करण्यासाठी RNA polymerase ला मार्ग मोकळा करून देतात. |
09:11 | थोडक्यात,
या पाठात, Gene Machine-The Lac Operon या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले. |
09:23 | तसेच आपण शिकलो,
लॅक्टोज रेग्युलेशन, |
09:29 | लॅक्टोज रेग्युलेशनमधे सहभागी असलेली जनुके आणि |
09:33 | LacZ जनुकाच्या रेग्युलेशनवर परिणाम करणारे घटक. |
09:38 | असाईनमेंट म्हणून : Operon मधील काही घटक जसे की, ऑपरेटर, प्रमोटर, जनुके काढून टाका. |
09:48 | सिम्युलेशन कार्यान्वित करा. निकालाचे निरीक्षण करून स्पष्टीकरण द्या. |
09:55 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
10:04 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
|
10:15 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
10:19 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
10:24 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
10:33 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
10:47 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |