Difference between revisions of "PhET/C2/Bending-Light/Marathi"
(First Upload) |
m |
||
Line 442: | Line 442: | ||
|- | |- | ||
| 12:36 | | 12:36 | ||
− | |स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा | + | |स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
|- | |- |
Latest revision as of 15:13, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या बेंडिंग लाईट या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात, बेंडिंग लाईट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वापरायला शिकणार आहोत. |
00:14 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:21 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7, फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:37 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत:
1. प्रकाशाचे परावर्तन 2. प्रकाशाचे अपवर्तन 3. प्रकाशाचे अपस्करण 4. विविध माध्यमांमुळे परावर्तन आणि अपवर्तनात होणारे बदल. |
00:52 | तसेच शिकणार आहोत,
1. प्रिझम आणि लेन्ससारखी ऑप्टिकल उपकरणे वापरणे 2. प्रकाशाची तीव्रता मोजणे |
01:02 | 3. प्रकाशाचा वेग मोजणे आणि तरंगांचे विविध नमुने बघणे. |
01:08 | परावर्तन, अपवर्तन, अपस्करण या बद्दल जाणून घेऊ. |
01:14 | परावर्तन म्हणजे प्रकाशकिरण एखाद्या पृष्ठभागावर आपटून परत फिरणे
उदाहरणार्थ- आरसा बघणाऱ्याची प्रतिमा परावर्तित करतो. |
01:26 | अपवर्तन म्हणजे प्रकाशकिरण माध्यमात शिरताना वक्रीभूत होतात. |
01:32 | वेगळ्या माध्यमात शिरताना प्रकाशाचा वेग आणि कोन बदलतो.
उदाहरणार्थ: पाण्यात बुडवलेल्या पेन्सिलची प्रतिमा पृष्ठभागाशी वाकलेली दिसते. |
01:45 | अपस्करण म्हणजे पांढऱ्या प्रकाशाचे सात रंगात होणारे विभाजन. |
01:51 | उदाहरणार्थ- ढगाळ वातावरणात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य. |
01:57 | चला, सुरूवात करूया. |
01:59 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू . |
02:03 | मी Downloads फोल्डरमधे बेंडिंग लाईट हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड करून घेतले आहे. |
02:09 | सिम्युलेशन उघडण्यासाठी bending-light_en.html या फाईलवर राईट क्लिक करा. |
02:14 | Open With Firefox Web Browser हा पर्याय निवडा.
ब्राउजरमधे फाईल उघडेल. |
02:23 | हा बेंडिंग लाईट या सिम्युलेशनसाठीचा इंटरफेस आहे. |
02:28 | इंटरफेसचे तीन स्क्रीन्स आहेत- Intro, Prisms आणि More tools. |
02:35 | Intro स्क्रीनने सिम्युलेशन सुरू करू.
Intro स्क्रीनवर क्लिक करून ते उघडू. |
02:42 | या स्क्रीनवर डावीकडे कोपऱ्यात वरती Ray आणि Wave रेडिओ बटणे आहेत,
लेसर लाईट सुरू करण्यासाठी हलणारा लेसर पॉईंटर आहे. |
02:53 | लेसरवर माऊस पॉईंटर नेल्यावर हिरव्या रंगाचे बाण दिसतील.
हे बाण लेसर ज्या दिशेने हलवता येईल ती दिशा दाखवतात. |
03:06 | लेसरवर क्लिक करून तो शून्य ते 90 अंशापर्यंत हलवण्यासाठी ड्रॅग करा.
लेसर पुन्हा त्याच्या मूळ जागेवर आणून ठेवा. |
03:16 | आता डावीकडे खाली असलेल्या टूल्सवर जाऊ. |
03:21 | येथे टूल बॉक्स दिसेल.
त्यामधे कोनाचे माप मोजण्यासाठी कोनमापक आणि प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी Intensity टूल आहे. |
03:32 | टूल बॉक्सच्या खाली Normal पर्याय असलेला चेकबॉक्स आहे.
सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी उजव्या बाजूच्या कोपऱ्यात खाली Reset बटण आहे. |
03:44 | सिम्युलेशन सुरू करू. |
03:47 | आपल्या इच्छेनुसार प्रकाश Ray (किरण), किंवा Wave (तरंग) स्वरूपात आपण दाखवू शकतो. |
03:54 | डिफॉल्ट रूपात Ray हा पर्याय निवडलेला आहे.
लेसर सुरू करण्यासाठी laser पॉईंटरवरील लाल बटणावर क्लिक करा. |
04:03 | लेसर लाईट परावर्तित आणि अपवर्तित झालेला दिसेल. |
04:09 | लेसर पॉईंटर ड्रॅग केल्यावर, परावर्तन आणि अपवर्तन कोन बदलताना दिसतील. |
04:17 | आपाती, परावर्तन आणि अपवर्तन कोन मोजण्यासाठी protractor टूल वापरू. |
04:25 | आपाती, अपवर्तित आणि परावर्तित किरण व लंब जेथे छेदतात त्या बिंदूशी कोनमापक ठेवू. |
04:35 | आपल्याला दिसेल की आपाती कोन परावर्तन कोनाइतकाच आहे.
कोनमापक पुन्हा जागेवर नेऊन ठेवा. |
04:44 | पुढे Intro स्क्रीनच्या उजवीकडे जाऊ. |
04:50 | येथे दोन्ही माध्यमांमधे refractive index मोजण्यासाठी आपल्याकडे नियंत्रक आहेत. |
04:56 | आपल्याकडे माध्यमाचा पदार्थ बदलण्यासाठी slider किंवा क्लिक करण्यासाठी बटणे आहेत. सुरूवातीला स्लाईडर Air च्या जवळ आहे. |
05:07 | आपण स्लाईडर ड्रॅग केल्यास, माध्यम Air ते Water आणि नंतर Glass मधे बदलते. |
05:15 | जसे माध्यम बदलते तसा अपवर्तन कोनही बदलतो. त्याचबरोबर Index of Refraction(n) सुध्दा बदलतो. |
05:24 | बॉक्समधे बदलती व्हॅल्यू दिसते. वरच्या मिडीयममधे स्लाईडर परत Air कडे ड्रॅग करा. |
05:32 | डिफॉल्ट रूपात, खालील मिडीयममधे स्लाईडर Water वर आहे.
खालील मिडीयममधे स्लाईडर ड्रॅग करून तो Water आणि Glass च्या मधे ठेवा. |
05:44 | आता Intensity टूलद्वारे प्रकाशाची तीव्रता मोजू. |
05:49 | Intensity टूल क्लिक आणि ड्रॅग करून मिडीयमवर नेऊ. |
05:53 | Intensity टूलमधे एक magnifier आणि एक meter आहे जे प्रकाशाची तीव्रता मोजते. |
06:00 | मी magnifier आपाती प्रकाशकिरणावर नेत आहे. Meter 100% तीव्रता दाखवते. |
06:08 | आता magnifier ड्रॅग करून अपवर्तित किरणावर नेऊ. Meter 86.08% अशी तीव्रता दाखवते.
माध्यमावर अवलंबून असल्यामुळे तीव्रता कमी होते. |
06:24 | आपण मिडीयम स्लाईडर वर ड्रॅग केल्यास, मीटरमधील तीव्रतेची किंमत बदलते.
याचे कारण अपवर्तन कोनातील बदल. |
06:34 | यातप्रकारे magnifier परावर्तित किरणावर न्या. Meter 13.55% अशी किंमत दाखवते. |
06:44 | तुम्ही स्लाईडर ड्रॅग केल्यास तीव्रतेची वेगळी किंमत दिसेल. |
06:51 | आता Ray वरून Wave वर जाऊ आणि प्रकाशाचे वक्रीभवन पाहू. |
06:56 | आता आपण Prisms स्क्रीनवर जाऊ. |
07:00 | इंटरफेसच्या खालील भागात असलेल्या Prisms स्क्रीनवर क्लिक करा. |
07:06 | या स्क्रीनवर पुढील टूल्स आहेत-
environment बदलण्यासाठी स्लाईडर, मोनोक्रोमॅटिक रे, |
07:15 | मोनोक्रोमॅटिक बीम, व्हाईट लाईट, प्रकाशाची वेवलेंथ बदलणारा स्लाईडर. |
07:22 | स्क्रीनच्या खालच्या भागात आपल्याकडे-
प्रिझम्स आणि लेन्सेस आहेत, |
07:29 | Objects बदलण्यासाठी स्लाईडर,
Reflections, Normal आणि Protractor साठीचे चेकबॉक्सेस, तसेच उजवीकडील कोपऱ्यात खाली Reset चे बटण आहे. |
07:43 | लेसरच्या टोकाशी एक स्क्रू दिला आहे. हा स्क्रू वापरून लेसरची दिशा बदलता येऊ शकते. |
07:52 | येथे बाण हलण्याची दिशा दाखवतात. लेसर वर आणि खाली हलवता येऊ शकतो. |
08:00 | आता सिम्युलेशन सुरू करू. |
08:03 | monochromatic beam वर क्लिक करा. लेसर लाईटवर क्लिक करा. |
08:09 | अनेक परावर्तने बघण्यासाठी Reflections चेकबॉक्सवर क्लिक करा. |
08:14 | प्रकाशाच्या मार्गात प्रिझम ठेवा. प्रकाश वक्रीभूत झालेला दिसेल. |
08:21 | wavelength slider हळूहळू लाल रंगावरून जांभळ्या रंगाकडे हलवा.
वेवलेंथ बदलत असताना प्रकाशाच्या वक्रतेकडे लक्ष द्या. |
08:32 | प्रिझमच्या एका कोपऱ्यात एक स्क्रू दिलेला आहे. |
08:38 | प्रिझमची दिशा बदलण्यासाठी स्क्रू ड्रॅग करा.
दिशा बदलल्यावर प्रकाशाच्या वक्रतेत होणाऱ्या बदलाकडे लक्ष द्या. |
08:47 | असाईनमेट म्हणून प्रिझमच्या जागी काचेची स्लॅब वापरा आणि प्रकाशाची वक्रता बघा. |
08:54 | आता पांढऱ्या लाईटचा उपयोग करून प्रकाशाचे अपस्करण बघू. |
08:59 | White light tool वर क्लिक करा. प्रकाशाच्या अपस्करणाकडे लक्ष द्या. |
09:05 | Objects मिडीयम स्लाईडर ड्रॅग करा आणि प्रकाशाच्या अपस्करणाकडे लक्ष द्या. |
09:11 | अपस्करण झालेल्या प्रकाशकिरणांच्या मार्गात भिंग ठेवा.
अपस्करण झालेला प्रकाशकिरण अनेकदा परावर्तित झालेला दिसेल. |
09:26 | असाईनमेंट म्हणून:
विविध भिंग वापरून बघा आणि अपस्करण बघा. |
09:32 | Environments मधे विविध बदल करून अपस्करण बघा. |
09:37 | आता More Tools स्क्रीनवर जाऊ. |
09:41 | More Tools स्क्रीनवर क्लिक करा.
More Tools स्क्रीनमधे Intro आणि Prisms स्क्रीनमधील टूल्स एकत्रितपणे दिली आहेत. |
09:51 | खालील भागात असलेल्या टूल बॉक्समधे Speed आणि Time अशी टूल्स आहेत.
खालील भागात Angles चा चेकबॉक्स देखील आहे. Angles च्या चेकबॉक्सवर क्लिक करा. |
10:04 | आता लेसर लाईटला Wave मधे बदलू.
Normal आणि Slow Motion ही अतिरिक्त रेडिओ बटणे दिसतील. तसेच, Play/Pause आणि Forward बटणे दिसतील. |
10:18 | सिम्युलेशन सुरू करू. |
10:21 | लेसर लाईट सुरू करू.
|
10:23 | लाल बटणावर क्लिक करून लेसर पॉईंटर सुरू करा. आता Time टूलचा उपयोग करू. |
10:31 | Time टूल ड्रॅग करून ते माध्यमावर ठेवा. Time टूलमधे दोन भिंग आणि एक Meter आहे. |
10:39 | एक भिंग आपाती तरंगावर ठेवा आणि तरंगांच्या नमुन्याचे निरीक्षण करा.
दुसरे भिंग अपवर्तित तरंगांवर ठेवा. |
10:51 | तरंगांच्या नमुन्याचे निरीक्षण करा. हे phase shift दाखवतात. |
10:56 | परावर्तित तरंगांवर भिंग ठेवा.
आपल्याला कमी अँप्लीट्युडसह(आयामांसह) नवा तरंगांचा नमुना बघायला मिळेल. |
11:06 | कारण परावर्तित तरंगांची तीव्रता खूप कमी असते. |
11:12 | Speed टूल ड्रॅग करून अपवर्तित तरंगांवर ठेवा.
वेग 0.67 c आहे. येथे c म्हणजे प्रकाशाचा वेग जो 3x10^8 m/s इतका आहे. वेग कमी होतो. |
11:33 | कारण माध्यमांमधे प्रकाशाचा वेग कमी असतो. |
11:39 | असाईनमेंट म्हणून:
माध्यम बदला आणि वेग तसेच तरंगांचे नमुने यांमधील बदलांकडे लक्ष द्या. |
11:48 | या पाठात बेंडिंग लाईट हे इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन कसे वापरायचे ते जाणून घेतले. |
11:57 | सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकलो:
1. प्रकाशाचे परावर्तन 2. प्रकाशाचे अपवर्तन 3. प्रकाशाचे अपस्करण 4. विविध माध्यमांमुळे परावर्तन आणि अपवर्तनात होणारे बदल. |
12:12 | तसेच आपण शिकलो:
1. प्रिझम आणि लेन्ससारख्या ऑप्टिकल उपकरणांचा वापर.
|
12:19 | 2. प्रकाशाची तीव्रता, प्रकाशाचा वेग मोजणे आणि तरंगांचे विविध नमुने बघणे. |
12:29 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
12:36 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
12:46 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
12:54 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
13:03 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
13:17 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |