Difference between revisions of "PhET/C2/Trig-tour/Marathi"
(First Upload) |
m |
||
Line 419: | Line 419: | ||
||11:17 | ||11:17 | ||
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | || स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. | ||
− | ऑनलाईन परीक्षा | + | ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. |
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. | ||
Latest revision as of 15:11, 9 January 2020
Time | Narration |
00:01 | Trig Tour या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशन वरील पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात, Trig Tour या इंटरऍक्टिव्ह PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:15 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04, |
00:22 | जावा वर्जन 1.8.0 |
00:26 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे. |
00:32 | हा पाठ समजण्यासाठी त्रिकोणमितीचे ज्ञान असावे. |
00:36 | हे सिम्युलेशन वापरून आपण शिकणार आहोत-
युनिट वर्तुळावर फिरणार्या बिंदूसाठी काटकोन त्रिकोण तयार करणे, |
00:47 | theta या कोनासाठी cos, sin आणि tan ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे, |
00:54 | ’‘‘x’’’ अक्षावर ‘‘‘theta’’’ घेऊन ‘‘‘theta’’’ विरूध्द ‘‘‘cos’’’, ‘‘‘sin’’’ आणि ‘‘‘tan’’’ फंक्शन्स यांचा ‘‘‘y ‘‘‘अक्षावर आलेख काढणे. |
01:01 | सुरूवात करूया. |
01:03 | दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू. |
01:08 | मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Trig Tour हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे. |
01:14 | सिम्युलेशन उघडण्यासाठी trig-tour html या फाईलवर राईट क्लिक करा. |
01:20 | Open With Firefox Web Browser पर्याय निवडा.
|
01:29 | हा Trig Tour सिम्युलेशनचा इंटरफेस आहे. |
01:34 | या इंटरफेसवर चार बॉक्सेस आहेत-
Values Unit circle |
01:41 | Functions, Special angles, labels आणि grid
Graph |
01:48 | रीसेट बटण तुम्हाला परत सुरूवातीस घेऊन जाते. |
01:53 | फंक्शन्स बॉक्समधे, Special angles, Labels, Grid चेक करा आणि cos वर क्लिक करा. |
02:05 | Cosine फंक्शन
एखाद्या कोनाचा Cosine म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण हे गुणोत्तर. |
02:15 | युनिट वर्तुळावर फिरणार्या बिंदूसाठी Cosine म्हणजे त्याचा x co-ordinate.
|
02:23 | युनिट वर्तुळाचा केंद्रबिंदू म्हणजे 0 comma 0 हा आरंभबिंदू.
cosine theta म्हणजे x भागिले त्रिज्या. म्हणजेच युनिट त्रिज्येच्या वर्तुळासाठी x होय. |
02:38 | Unit Circle बॉक्समधे एक युनिट वर्तुळ काढून त्यात x आणि y अक्ष असलेली कार्टेशियन को-ऑर्डिनेट सिस्टीम काढलेली आहे. |
02:49 | वर्तुळाच्या परिघावर x अक्षावर एक तांबडा बिंदू आहे. |
02:55 | x अक्षावर तांबड्या बिंदूपर्यंत पोचणारा निळ्या रंगाचा बाण दिसत आहे.
युनिट वर्तुळासाठी ही त्रिज्येची लांबी 1 आहे. |
03:07 | Values बॉक्समधे महत्त्वाच्या व्हॅल्यूज दिसत आहेत. |
03:12 | कोन ϴ (theta) हा degrees किंवा radians मधे देता येतो. |
03:17 | degrees रेडिओ बटणावर क्लिक करा. |
03:20 | कोन theta शून्य डिग्रीज असताना तांबड्या बिंदूचे x comma y हे को-ऑर्डिनेटस 1 comma 0 आहेत. |
03:30 | कोन theta बरोबर 0 डिग्रीज असताना तांबड्या बिंदूचा x को-ऑर्डिनेट 1 आहे. |
03:38 | आलेखाचा x अक्ष कोन theta दाखवत आहे. |
03:43 | आलेखाचा y अक्ष cos theta फंक्शनची किंमत दाखवत आहे. |
03:49 | कोन theta 0 डिग्रीज इसताना cos theta 1 आहे. |
03:54 | तांबड्या बिंदूची सर्वाधिक किंमत 1 असते. |
03:59 | Values बॉक्समधे radians रेडिओ बटण क्लिक करा. |
04:04 | theta विरूध्द cos theta आलेखाचा x अक्ष radians मधे बदलला आहे. |
04:11 | लक्षात घ्या pi radians बरोबर 180 degrees. |
04:17 | 360 अंशातील पूर्ण फेरी ही 2 pi radians असते.
degrees रेडिओ बटणावर पुन्हा क्लिक करा. |
04:29 | तुम्हाला युनिट वर्तुळावर रिक्त वर्तुळे दिसतील.
Functions बॉक्समधील Special Angles अनचेक करा. |
04:39 | रिक्त वर्तुळे गायब होताना दिसतील. |
04:43 | Special Angles परत चेक करा. |
04:47 | ही वर्तुळे तांबडा बिंदू युनिट वर्तुळावर फिरताना त्याने x अक्षाशी केलेला कोन दाखवतात. |
04:56 | महत्त्वाचे कोन हे Special angles म्हणून निवडले आहेत. |
05:01 | युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने पुढील special angle पर्यंत ड्रॅग करा. |
05:09 | तांबडा बिंदू युनिट वर्तुळावर घड्याळाच्या उलट दिशेने 30 डिग्री फिरला आहे. |
05:16 | Values बॉक्समधे, x comma y हा वर्गमूळात 3 भागिले 2 comma ½ आहे. |
05:25 | युनिट वर्तुळावर पायथागोरसच्या प्रमेयानुसार x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 1 आहे. |
05:34 | युनिट वर्तुळाची त्रिज्या 1 असल्याने कार्टेशियन प्रतलातील दोन चौरस चौकटींची लांबी 1 आहे. |
05:44 | y फक्त 1 चौकट लांबीचा असल्यामुळे त्याची किंमत ½ आहे. |
05:50 | x ची लांबी 1 पूर्ण आणि दुसरी जवळपास पाऊण चौकट एवढी आहे. |
05:57 | 3 चे वर्गमूळ भागिले 2 बरोबर 0.866 असते.
ही x ची व्हॅल्यू आहे. |
06:07 | आलेख पहा.
cos function सोबत तांबडा बिंदू 30 डिग्रींनी सरकला आहे. |
06:15 | Values बॉक्समधे radians रेडिओ बटणावर क्लिक करा. |
06:20 | यामुळे Values बॉक्समधील theta ची किंमत 30 डिग्रीजवरून बदलून pi भागिले 6 रेडियन्स होईल. |
06:29 | Sine फंक्शन
एखाद्या कोनाची Sine म्हणजे समोरच्या बाजूची लांबी आणि कर्ण यांचे गुणोत्तर. |
06:39 | Sine ची व्हॅल्यू ही युनिट वर्तुळावर फिरणाऱ्या बिंदूचा y को-ऑर्डिनेट असते. |
06:47 | Sine theta ही y भागिले त्रिज्या म्हणजेच युनिट वर्तुळासाठी y असते. |
06:56 | तांबडा बिंदू परत x अक्षावर ड्रॅग करा. |
07:00 | Functions बॉक्समधे sin वर क्लिक करा. |
07:04 | degrees रेडिओ बटणावर क्लिक करा. |
07:07 | आधी पाहिल्याप्रमाणे x comma y हे 1 comma 0 असतील. |
07:13 | आधी दिलेल्या sine theta च्या व्याख्या पहा. |
07:18 | जेव्हा कोन theta शून्य डिग्रीज असतो, तांबड्या बिंदूचा y को-ऑर्डिनेट शून्य असतो. |
07:25 | आलेखात कोन theta x अक्षावर आहे आणि sine theta फंक्शनची किंमत y अक्षावर आहे. |
07:34 | कोन theta शून्य डिग्रीज असताना, तांबड्या बिंदूची उंची शून्य असल्याने sine theta शून्य असतो. |
07:43 | युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने पुढील special angle 30 डिग्रीजवर ड्रॅग करा. |
07:51 | Values बॉक्समधे x comma y हा वर्गमूळात 3 भागिले 2 comma ½ झालेला दिसेल.
ही किंमत कशी काढता येईल ते लक्षात घ्या. |
08:04 | आलेखावर तांबडा बिंदू sine फंक्शनबरोबर 30 डिग्रीजनी फिरला आहे.
त्याची किंमत 0.5 किंवा ½ आहे. |
08:17 | Tangent फंक्शन
कोनाचा Tangent म्हणजे समोरच्या बाजूची लांबी व लगतच्या बाजूची लांबी यांचे गुणोत्तर. |
08:27 | Tan theta म्हणजे sin theta आणि cos theta यांचे गुणोत्तर किंवा y भागिले x. |
08:35 | तांबडा बिंदू परत x अक्ष म्हणजेच 1 comma 0 वर ड्रॅग करा. |
08:44 | Functions बॉक्समधे tan वर क्लिक करा. |
08:48 | जेव्हा कोन theta 0 असतो, tan theta हे y को-ऑर्डिनेट 0 आणि x को-ऑर्डिनेट 1 यांचे गुणोत्तर म्हणजेच 0 आहे. |
09:00 | आलेखात कोन theta x अक्षावर आहे आणि tan theta फंक्शनची किंमत y अक्षावर आहे. |
09:09 | कोन theta शून्य डिग्रीज असताना, तांबड्या बिंदूची उंची शून्य असल्याने tan theta शून्य असतो.
|
09:17 | युनिट वर्तुळावर तांबडा बिंदू घड्याळाच्या उलट दिशेने y अक्षावरील special angle 90 डिग्रीजवर ड्रॅग करा.
|
09:27 | Values बॉक्समधे x comma y हा 0 comma 1 झाला आहे. |
09:33 | लक्षात घ्या Values बॉक्समधे tan theta ची किंमत अधिक किंवा वजा अनंत (Infinity) झाली आहे. |
09:40 | आता आलेखाकडे पहा. |
09:43 | तांबडा बिंदू 90 डिग्रीवर गेला आहे आणि tan theta आता उभ्या तुटक रेषेवर दाखवला जात आहे. |
09:53 | ही तुटक रेषा म्हणजे फंक्शनची vertical asymptote आहे. |
09:58 | हे x चे मूल्य दर्शवते. जे फंक्शनच्या जवळ येते परंतु कधीही स्पर्श करत नाही. |
10:05 | येथे फंक्शन अमर्यादपणे दोन्ही दिशांना infinity पर्यंत वाढत जाते. |
10:13 | थोडक्यात, |
10:16 | या पाठात, Trig Tour या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले. |
10:23 | सिम्युलेशन वापरून आपण पाहिले:
युनिट वर्तुळावर फिरणार्या बिंदूसाठी काटकोन त्रिकोण तयार करणे |
10:33 | theta या कोनासाठी cos, sin आणि tan ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढणे |
10:39 | x अक्षावर theta घेऊन theta विरूध्द cos, sin आणि tan फंक्शन्स यांचा y अक्षावर आलेख काढणे. |
10:46 | असाईनमेंट म्हणून, सर्व special angles ना Cosine, sine आणि tangent च्या व्हॅल्यूज बघा. |
10:53 | Cosine, sin आणि tangent चे आलेख पहा. |
10:57 | पूरक कोनांसाठी वरील गुणोत्तरातील संबंध पहा.
पूरक कोनांची बेरीज 180 डिग्रीज असते. |
11:08 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
11:17 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
11:29 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
|
11:33 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
11:42 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:55 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |