Difference between revisions of "PhET/C2/Equation-Grapher/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
m
 
Line 276: Line 276:
 
|| 07:24
 
|| 07:24
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.  
 
|| स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.  
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.  
+
ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.  
 
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
 
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
  

Latest revision as of 15:09, 9 January 2020

Time Narration
00:01 Equation Grapher वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात, Equation Grapher या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:13 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04,

00:21 जावा वर्जन 1.8,


00:25 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 60.0.2 वापरत आहे.


00:31 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील गणिताचे ज्ञान असावे.


00:36 हे सिम्युलेशन वापरून आपण बघणार आहोत-

y = bx + c आणि y = c या प्रकारातल्या रेषा

00:47 Quadratic बहुपदी y बरोबर a x चा वर्ग अधिक bx अधिक c
00:53 Binomial म्हणजे द्विपदी प्रमेय

a आणि b ह्या वास्तव संख्या असून index n हा धन पूर्णांक आहे.

01:02 r हा शून्य आणि n च्या मधे असतो. Binomial प्रमेय सांगते की a अधिक b चा n वा घात दाखवल्याप्रमाणे विस्तारित करता येतो.
01:14 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.


01:19 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Equation Grapher हे सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.


01:26 jar फाईल उघडण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:30 टर्मिनल प्रॉम्प्टवर cd Downloads टाईप करून एंटर दाबा.
01:37 java space hyphen jar space equation-grapher_en.jar टाईप करून

एंटर दाबा.

01:50 ब्राऊजरमधे html फॉरमॅटमधे फाईल उघडेल.
01:55 हा Equation Grapher सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
02:00 हा इंटरफेस x आणि y अक्षांची कार्टेशियन को-ऑर्डिनेट सिस्टीम दर्शवेल.
02:07 पहिल्या क्वाड्रंटमधे लाल रंगात y बरोबर ax चा वर्ग अधिक bx अधिक c हे वर्ग समीकरण आहे.
02:16 तीन स्लायडर्स आणि ax2, bx आणि c खाली डिस्प्ले बॉक्सेस आहेत.
02:24 स्लायडर्सद्वारे, a, b आणि c ह्या सहगुणकांच्या व्हॅल्यूज बदलता येतात.
02:32 डिस्प्ले बॉक्सेस ह्या व्हॅल्यूज दाखवतात तसेच त्यामधे आपण व्हॅल्यूज भरू शकतो.
02:39 लाल रंगाचे Zero हे बटण सर्व स्लायडर्स शून्यावर सेट करते.
02:44 समीकरण सेव्ह करण्यासाठी हिरव्या रंगाचे Save बटण आहे.
02:48 स्लायडर्सखाली लाल रंगात नवे तयार झालेले समीकरण दिसेल.
02:53 चौथ्या क्वाड्रंटमधे y = ax2+bx+c हे वर्ग समीकरण आहे.
03:01 ax2, bx आणि c खाली तीन चेकबॉक्स आहेत.
03:07 लक्षात घ्या, a x चा वर्ग हे पद जांभळ्या रंगात, bx हिरव्या आणि c हे निळ्या रंगात आहे.
03:15 पहिल्या क्वाड्रंटमधे, a x चा वर्ग या पदाखालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा.
03:21 a x चा वर्ग या पदाखालचा स्लायडर कसा 1 वर सरकला याचे निरीक्षण करा.
03:27 शून्य कॉमा शून्य या आरंभबिंदूवर शिरोबिंदू असलेला एक लाल रंगाचा पॅराबोला विंडोमधे दिसेल.

हा वरती उघडत आहे.

03:37 पहिल्या क्वाड्रंटमधे bx खालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा.
03:43 पॅराबोला डाव्या बाजूला खाली सरकलेला दिसेल.
03:49 पहिल्या क्वाड्रंटमधे c खालील डिस्प्ले बॉक्समधे 1 टाईप करा.
03:55 पॅराबोला वरच्या बाजूला सरकलेला दिसेल.
03:59 चौथ्या क्वाड्रंटमधे जांभळ्या रंगात असलेल्या a x चा वर्ग या पदाखालील बॉक्सवर क्लिक करा.
04:06 लाल रंगाच्या पॅराबोलापुढे जांभळ्या रंगाचा पॅराबोला दिसेल.
04:11 हा जांभळा पॅराबोला, लाल रंगाच्या y बरोबर ax चा वर्ग या समीकरणाच्या भागाशी संबंधित आहे.
04:20 जांभळ्या रंगाच्या पॅराबोलाचे y बरोबर x वर्ग हे समीकरण आहे.


04:26 आता चौथ्या क्वाड्रंटमधे हिरव्या रंगाच्या bx या पदाखालील चेकबॉक्सवर क्लिक करा.


04:32 कार्टेशियन प्रतलात हिरव्या रंगाची रेष आपल्याला दिसेल.
04:38 ही आरंभबिंदू शून्य कॉमा शून्य मधून जात आहे.

तिचा संबंध y बरोबर x समीकरणातील x पदाशी आहे.

04:50 आता चौथ्या क्वाड्रंटमधे निळ्या रंगातील c या पदाखालील चेकबॉक्सवर क्लिक करा.
04:56 कार्टेशियन प्रतलात निळ्या रंगाची रेष आपल्याला दिसेल.


05:01 तिचे समीकरण y बरोबर c आहे आणि तिचा संबंध समीकरणातील स्थिर पदाशी आहे.
05:12 हिरव्या Save बटणावर क्लिक करा.
05:15 हे y बरोबर x चा वर्ग अधिक x अधिक 1 हे समीकरण सेव्ह करेल.
05:22 a, b आणि c च्या व्हॅल्यूज बदला.
05:30 तुम्ही स्लायडर्स वापरू शकता किंवा पदांखाली दिलेल्या डिस्प्ले बॉक्सेसमधे टाईप करू शकता.
05:36 या बदलांचे परिणाम आलेखांवर पहा.
05:41 लक्षात घ्या, जरी a, b आणि c च्या व्हॅल्यूजमधे बदल केला तरी तुम्ही अजूनही y बरोबर x चा वर्ग अधिक x अधिक 1 हा पॅराबोला बघू शकता.

कारण आपण हे समीकरण सेव्ह केले होते.

05:58 a, b आणि c च्या परिणामांची तुलना बघण्यासाठी इतर आलेख सेव्ह करा.

आपण एकावेळी केवळ एक समीकरण सेव्ह करू शकतो.

06:09 समीकरण सेव्ह केल्यानंतर निळ्या रंगाचे Erase बटण दिसेल.

हे सेव्ह केलेले समीकरण पुसेल.

06:19 लाल रंगाच्या Zero बटणावर क्लिक करा.

हे a, b आणि c हे सर्व सहगुणक शून्यावर रिसेट करेल.

06:30 असाईनमेंट म्हणून, वेगवेगळी काँबिनेशन्स वापरून पॅराबोलाची तुलना करा:

a <0 आणि a >0

b <0 आणि b >0

c <0 आणि c >0

06:51 या पाठात, Equation Grapher या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक पाहिले.
06:58 सिम्युलेशन वापरून आपण पाहिले,

y = bx + c आणि y = c या प्रकारातल्या रेषा

07:08 y = ax2+ bx + c ही Quadratic बहुपदी
07:15 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

07:24 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


07:37 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
07:41 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
07:49 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


08:02 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali