Difference between revisions of "PhET/C3/Neuron/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
m |
||
Line 167: | Line 167: | ||
|- | |- | ||
|| 03:50 | || 03:50 | ||
− | || | + | ||उत्तेजकास प्रतिसाद म्हणून '''Gated Channels''' ची उघडझाप होते. |
|- | |- | ||
Line 288: | Line 288: | ||
|- | |- | ||
|| 06:49 | || 06:49 | ||
− | || आता तंतु प्रतिसादात्मक | + | || आता तंतु प्रतिसादात्मक उत्तेजना प्राप्त करण्यास तयार झाला आहे. |
Revision as of 15:18, 14 December 2019
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Neuron PhET सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.
|
00:07 | या पाठात, Neuron या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
|
00:14 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 |
00:20 | जावा वर्जन 1.7.0 |
00:25 | फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे. |
00:31 | हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील जीवशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे. |
00:39 | सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकू, न्यूरॉन उत्तेजित होताना किंवा विश्रांत अवस्थेत असताना पटलाच्या विरूध्द बाजूंना होणारी आयनांची हालचाल.
|
00:51 | लीक आणि गेटेड चॅनेल्सचे(मार्गिका) कार्य. |
00:54 | पटलाची प्रवेशक्षमता (Membrane permeability) |
00:58 | ऍक्शन पोटोन्शियलच्या निर्मितीसाठी घडणारा घटनाक्रम |
01:03 | सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा. |
01:08 | मी डाउनलोड्स फोल्डरमधे Neuron सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
|
01:14 | सिम्युलेशन उघडण्यासाठी Neuron_en.html फाईलवर राईट क्लिक करा. |
01:19 | Open With Firefox Web Browser पर्याय निवडा. |
01:24 | ब्राउजरमधे सिम्युलेशन उघडेल. |
01:27 | simulation विंडो ऍक्झॉनचा (अक्षतंतु) छेद दर्शवत आहे. |
01:32 | अक्षतंतु किंवा ऍक्झॉन दंडगोलाकृती असतो. |
01:36 | ऍक्झॉनचा आतील भाग हा अक्षतंतुद्रव्याने (axoplasm) भरलेला असतो. |
01:41 | बाहेरील भाग पातळ ऍक्झॉन पटलाने आच्छादलेला असतो. |
01:45 | ऍक्झॉन पटलावर विविध प्रकारचे आयन चॅनेल असतात. |
01:50 | स्क्रीनच्या वरील डाव्या कोपर्यात आपल्याकडे झूम स्लायडर आहे. |
01:55 | हा पटलाचे दृश्य जवळून पाहण्यास मदत करतो. |
02:00 | इंटरफेसच्या उजव्या बाजूला, Legend बॉक्स आणि Show बॉक्स दिसेल. |
02:06 | Legend बॉक्स आयन्स आणि channels दर्शवितो. |
02:12 | Show बॉक्समध्ये, All Ions ,Charges ,Concentrations Potential chart चेक बॉक्स दिसत आहेत. |
02:23 | स्क्रीनच्या तळाशी Fast Forward, Normal आणि Slow Motion ही रेडिओ बटणे असलेला बॉक्स आहे. |
02:33 | तसेच Rewind, Play/Pause आणि Step बटणे, |
02:39 | Stimulate Neuron आणि Reset बटणे आहेत. |
02:45 | या सिम्युलेशनमधे पाहणार आहोत सोडियम आणि पोटॅशियम आयनांची ऍक्झॉन पटलातून होणारी हालचाल. |
02:55 | न्युरॉन म्हणजे मज्जासंस्थेतील अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण पेशी होत. |
03:02 | ते विविध प्रकारच्या उत्तेजना शोधू शकतात, प्राप्त आणि प्रसारित करू शकतात. |
03:09 | अॅक्सॉन पटल मोठे करण्यासाठी दिसण्यासाठी झूम स्लायडर ड्रॅग करा. |
03:14 | आयन चॅनेल्स विविध आयन्सना निवडकपणे प्रवेश करू देतात. |
03:20 | येथे दोन भिन्न प्रकारचे आयन चॅनेल्स दाखवले आहेत. |
03:25 | Leak Channel आणि Gated Channel. |
03:29 | संदर्भासाठी कृपया स्क्रीनच्या उजवीकडील Legend पॅनेल बघा. |
03:35 | Legend पॅनेलमधे sodium आणि potassium, Gated आणि Leak channels आहेत. |
03:42 | लीक आयन चॅनेल्स नेहमीच उघडे असतात. |
03:46 | पटलाचा पोटेन्शियल विश्रांत करण्यासाठी हे जबाबदार असतात. |
03:50 | उत्तेजकास प्रतिसाद म्हणून Gated Channels ची उघडझाप होते. |
03:57 | आयनची देवाणघेवाण नीट दिसण्यासाठी, सिम्युलेशनचा वेग कमी ठेवा. |
04:03 | स्क्रीनच्या तळाशी असलेल्या Slow Motion रेडिओ बटणावर क्लिक करा. |
04:08 | सोडियम आणि पोटॅशियम आयन हे सतत पटलाच्या आत आणि बाहेर फिरताना दिसत आहेत. |
04:15 | ते संबंधित लीक चॅनेलमधून हालचाल करत आहेत. |
04:19 | Show बॉक्समधल्या Charges आणि Concentrations चेकबॉक्सेस निवडा. |
04:28 | पटलाच्या आतील आणि बाहेरील पोटॅशियम आणि सोडियमच्या आयन्सची सांद्रता (concentration) लक्षात घ्या. |
04:36 | अक्षतंतुद्रव्यात(Axoplasm) पोटॅशियम आयनांची सांद्रता जास्त आणि सोडियम आयनाची सांद्रता कमी असेल. |
04:45 | अक्षतंतुच्या(axon) बाहेरील द्रव पदार्थात पोटेशियम आयनांची सांद्रता कमी आणि सोडियम आयनांची सांद्रता जास्त असते. |
04:55 | यामुळे पटलाच्या दोन्ही बाजूंमधे सांद्रता ग्रॅडियंट तयार होते. |
05:00 | परिणामी, पटलाच्या बाह्य पृष्ठभागावर धन विद्युतभार निर्माण होतो.
|
05:06 | त्याच्या अंतर्गत पृष्ठभागावर ऋण विद्युतभार निर्माण होतो. |
05:11 | म्हणून पटलाचे ध्रुवीकरण होते. |
05:16 | रेस्टिंग (विश्रांत) पोटेन्शियल |
05:19 | ऍक्झॉन पटलाच्या दोन्ही बाजूंमधे असलेल्या विद्युत विभवांतराला रेस्टिंग पोटेन्शियल म्हणतात. |
05:28 | Show बॉक्समध्ये Potential Chart साठी चेक बॉक्स निवडा. |
05:33 | न्युरॉनला उत्तेजन देण्यासाठी Stimulate Neuron बटणावर क्लिक करा. |
05:40 | लक्षात घ्या सोडियम आयन आत जात आहेत आणि पोटॅशियम आयन बाहेर येत आहेत. |
05:46 | आयनांच्या आदान प्रदानाच्या वेळी प्रभाराची देवाणघेवाण होते. |
05:51 | ऍक्झॉन पटलाच्या पोलॅरिटीमधे झालेला बदल लक्षात घ्या. |
05:56 | या अवस्थेत मज्जातंतु action potential किंवा depolarized असतात. |
06:03 | आयनांची ही हालचाल गेटेड चॅनेल्सच्या माध्यमातून होते. |
06:09 | सिम्युलेशन थोडा वेळ थांबवा. |
06:13 | पोटेन्शियशियल चार्टमधील membrane potential मधे होणारी वाढ पहा. |
06:18 | न्युरॉनमधील ऍक्शन पोटेन्शियल्सना चेता आवेग(nerve impulses) म्हणतात. |
06:23 | सिम्युलेशन सुरू करण्यासाठी Play बटणावर क्लिक करा. |
06:27 | ऍक्शन पोटेन्शियलच्या काही काळानंतर उलट क्रिया घडू लागते. |
06:34 | या प्रक्रियेत सोडियम आणि पोटॅशियम आयन आत आणि बाहेर जातात. |
06:41 | यामुळे पटलाची विश्रांत पोटेन्शियल अवस्था पुन्हा तयार होते. |
06:45 | या प्रक्रियेला रिपोलरायझेशन म्हणतात. |
06:49 | आता तंतु प्रतिसादात्मक उत्तेजना प्राप्त करण्यास तयार झाला आहे.
|
06:58 | थोडक्यात, |
07:01 | या पाठात, Neuron या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.
|
07:09 | सिम्युलेशनच्या सहाय्याने आपण शिकलो, न्युरॉन उत्तेजित होताना किंवा विश्रांत अवस्थेत असताना पटलाच्या विरूध्द बाजूंना होणारी आयनांची हालचाल.
|
07:20 | लीक आणि गेटेड चॅनेल्सचे कार्य. |
07:24 | पटलाची प्रवेशक्षमता.
|
07:27 | ऍक्शन पोटोन्शियलच्या निर्मितीसाठी घडणारा घटनाक्रम |
07:32 | असाईनमेंट म्हणून : गेटेड चॅनेल आणि लीक चॅनेलमधील फरक पहा. |
07:41 | ऍक्शन पोटेन्शियल पुढे पाठवण्यासाठी आयन चॅनेल उघडझाप करण्याचा क्रम पहा. |
07:50 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
|
07:56 | हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
|
07:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.
ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
|
08:09 | अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.
|
08:13 | कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा. |
08:17 | या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
|
08:26 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
08:34 | अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
|
08:39 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.
|
08:46 | सहभागासाठी धन्यवाद.
|