Difference between revisions of "GeoGebra-5.04/C2/Introduction-to-GeoGebra/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 546: | Line 546: | ||
|- | |- | ||
| 12:15 | | 12:15 | ||
− | | असाईनमेंट एक्सप्लोर करा,1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब | + | | असाईनमेंट म्हणून एक्सप्लोर करा, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब |
|- | |- |
Revision as of 14:26, 10 October 2019
Time | Marathi Narration |
00:01 | Introduction to GeoGebra च्या ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे |
00:05 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकणार आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय टूल्सविषयी, |
00:12 | समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी |
00:16 | रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि Graphics view च्या गुणधर्मा विषयी. |
00:22 | येथे मी वापरत आहे Ubuntu Linux OS, version 14.04 |
00:28 | GeoGebra version 5.0.438.0-d |
00:33 | या ट्यूटोरियलचे अनुसरण करण्यासाठी, शिकणार्याला मूलभूत गणिताची माहिती असावी. |
00:40 | Ubuntu Linux OS मध्ये GeoGebra अँप्लिकेशन उघडण्यासाठी, Dash Home वर क्लिक करा. |
00:46 | search bar मध्ये geogebra टाइप करा.GeoGebra आयकॉन दिसेल. |
00:52 | GeoGebra उघडण्यासाठी icon वर डबल-क्लिक करा. |
00:57 | Windows 10 OS मध्ये GeoGebra application उघडू |
01:04 | Search the web आणि Windows बॉक्समध्ये, geogebra टाइप करा. |
01:09 | GeoGebra यादीमध्ये दिसते. |
01:12 | GeoGebra application उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
01:17 | हा GeoGebra इंटरफेस आहे |
01:20 | त्यात मेनू आयटमसह स्टॅंडर्ड मेनू बार आहे.त्यात File, Edit, View, Options, Tools, Window आणि Help मेनू आहे. |
01:37 | menu bar च्या खाली, विविध भूमितीय tools सह एक टूल बार आहे. |
01:43 | tool bar च्या उजवीकडे Undo, Redo, Help आणि Preferences options आहेत. |
01:53 | tool bar च्या खाली Algebra view आणि Graphics view आहे. |
01:58 | जिओजेब्रामध्ये, भूमिती आणि बीजगणित एकमेकांच्या बाजूला काम करतात. |
02:03 | toolbar वरील tools वापरून भूमितीच्या आकृती तयार करण्यासाठी Graphics view चा वापर केला जातो. |
02:09 | Algebra view काढलेल्या आकृत्यांचे संबंधित बैजिकराशी दर्शवितात. |
02:15 | View menu वापरुन आपण आपल्या गरजेनुसार कोणतेही view उघडू किंवा बंद करू शकतो. |
02:25 | window च्या तळाशी input bar आहे. |
02:29 | Input bar वापरुन आपण थेट बीजगणिताची कमांड आणि फंक्शन्स एंटर करू शकतो. |
02:36 | ग्राफिक व्यू वर grid आणि axes चे पर्याय आधीपासूनच enable असतात. |
02:42 | आपण context menu वापरून axes किंवा grid disable करू शकता. |
02:47 | Graphics व्यू वर राईट क्लिक करा. Graphics मेनू उघडेल. |
02:53 | या मेनूमध्ये Axes आणि Grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय आहेत. |
03:00 | axes आणि grid enable किंवा disable करण्यासाठी मी तुम्हाला आणखी एक पद्धत दाखवते. |
03:05 | ग्राफिक्सच्या जवळ टॉगल स्टाईल बार नावाचा एक छोटा त्रिकोण एरो पहा. |
03:12 | ड्रॉप-डाउन मेनू उघडण्यासाठी त्रिकोणी एर्रोवर क्लिक करा. |
03:16 | येथे आपल्याला axes आणि grid निवडण्याचे आणि निवड रद्द करण्याचे पर्याय दिसतील. |
03:22 | पुढे आपण tool bar बद्दल तपशीलवार जाणून घेऊ. |
03:26 | toolbar च्या उजव्या टोकावरील Move Graphics View टूलवर क्लिक करा. |
03:31 | लक्षात घ्या की टूलभोवती एक गडद निळा border दिसून येईल. हे सूचित करते की हे tool निवडलेले आहे. |
03:38 | टूलवर कर्सर फिरवा.त्याचे नाव आणि function टूल टीप बॉक्समध्ये दिसते. |
03:45 | हे निवडलेले टूल वापरुन आपण ग्राफिक्स व्यू हलवू शकतो. आवश्यकतेनुसार ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
03:53 | प्रत्येक tool च्या कोपऱ्यावर एक लहान काळा त्रिकोण आहे. |
03:58 | जेव्हा कर्सर त्रिकोणावर ठेवला जातो तेव्हा ते लाल होते. |
04:03 | टूलबारवरील मूव्ह टूल वर क्लिक करा.संबंधित tools ची एक ड्रॉप-डाऊन यादी दिसते. |
04:10 | ग्राफिक्स व्यू मध्ये पॉईंट्स काढू. |
04:13 | Point टूल वर क्लिक करा आणि नंतर Graphics view वर क्लिक करा.बिंदू A काढला आहे. |
04:20 | पुन्हा एकदा दुसरा B बिंदू काढण्यासाठी क्लिक करा. |
04:24 | लक्षात घ्या की बिंदूचे संबंधित निर्देशांक Algebra view मध्ये दिसत आहेत. |
04:29 | आता रेषा काढायला शिकू. Line टूलच्या कोपऱ्यात असलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. |
04:36 | येथे आपण विविध प्रकारच्या रेषा काढण्यासाठी Line टूल्सची सूची पाहू शकता. |
04:42 | Line टूल वापरुन आपण बिंदू A आणि B मधून रेषा काढू. |
04:47 | Line टूल वर क्लिक करा आणि बिंदू A आणि B वर क्लिक करा. |
04:53 | रेषा f A आणि B मधून जाते. |
04:57 | Graphics view वरील सर्व objects डिलिट करू. |
05:01 | सर्व ऑब्जेक्ट्स निवडण्यासाठी Ctrl + A दाबा.कीबोर्ड वरील Delete key दाबा. |
05:08 | आता AB ही रेषा पुन्हा काढा.Line टूलवर क्लिक करा आणि ग्राफिक्स व्यू वर क्लिक करा. |
05:17 | रेषा AB काढण्यासाठी वेगळ्या ठिकाणी पुन्हा क्लिक करा. |
05:22 | पुढे मी रेषा AB ला लंब रेषा काढेन. |
05:27 | त्यासाठी Perpendicular Line tool वर क्लिक करा. |
05:31 | बिंदू C काढण्यासाठी AB रेषेच्या वरील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा. |
05:38 | C ला ओलांडत जाणारी रेषा g रेषा AB ला लंब आहे. |
05:43 | आता रेषा AB ला समांतर रेषा काढू. |
05:47 | Parallel Line टूलवर क्लिक करा. |
05:50 | बिंदू D काढण्यासाठी AB च्या खालील भागावर क्लिक करा, नंतर रेषा AB वर क्लिक करा. |
05:57 | ABच्या समांतर आणि बिंदू D मधून जाणारी एक रेषा h काढली जाईल. |
06:02 | आता आपण दोन रेषेसाठी छेदनबिंदू चिन्हांकित करू. |
06:06 | पॉइंट टूल ड्रॉप-डाउन मध्ये, इंटरसेक्ट टूल निवडा. |
06:10 | F आणि g रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा. |
06:15 | नंतर g आणि h या रेषेच्या छेदनबिंदूवर क्लिक करा. |
06:20 | आता आपण आपले रेखांकन थोडे interactive बनवू . |
06:24 | मूव्ह टूल वर क्लिक करा. |
06:27 | बिंदू A वर क्लिक करा आणि ड्रॅग करा. |
06:30 | लक्षात घ्या की बिंदू E आणि F आणि सर्व रेषा बिंदू A बरोबर हलतात. |
06:36 | त्याचप्रमाणे आपण बिंदू बी आणि डी हलवू. |
06:40 | बिंदू E, F आणि रेषा, बिंदू B बरोबर हलतात. |
06:45 | बिंदू डी बरोबर फक्त बिंदू एफ आणि रेषा h हलते. |
06:50 | बिंदू A, B आणि D स्वतंत्र ऑब्जेक्ट्स आहेत. |
06:56 | आता मी बिंदू E किंवा F हलविण्याचा प्रयत्न करेन. आपल्याला कोणतीही हालचाल दिसत नाही. |
07:03 | हे सूचित करते की, बिंदू E किंवा F हे एकमेकांवर अवलंबून असलेले objects आहेत. |
07:09 | आता रेषेचे गुणधर्म बदलू. |
07:13 | रेषा AB वर राईट क्लिक करा. रेषेच्या सर्व गुणधर्मासह एक context menu उघडेल. |
07:21 | Object Properties निवडा. Preferences विंडो उघडते. |
07:27 | Graphics view वरील बदल पाहण्यासाठी Preferences विंडोचा आकार बदला. |
07:33 | मी Preferences विंडो मधील काही मूलभूत गुणधर्म समजावून सांगते. |
07:38 | नेम बॉक्समध्ये, आपण लाइन एबी असे नाव बदलू शकता. |
07:43 | आणि Caption म्हणून Original line लिहू शकता. |
07:46 | line दर्शविण्यासाठी किंवा न दर्शविण्यासाठी Show Object चा चेक बॉक्स क्लिक करा. |
07:51 | शो लेबल चेक बॉक्समध्ये निवडण्यासाठी ड्रॉप डाऊन आहे. |
07:55 | मी Name आणि value निवडेन.लक्षात घ्या की name आणि value रेषेच्या खाली दिसेल. |
08:03 | नंतर कलर टॅब वर क्लिक करा.येथे रेषेला रंग देण्यासाठी कलर बॉक्स आहे. |
08:10 | कलर बॉक्सच्या खाली बदललेला रंग पाहण्यासाठी प्रीव्ह्यू बॉक्स आहे. |
08:15 | मी ग्रीन बॉक्स वर क्लिक करेन.रेषा एबीचा रंग हिरवा झाला आहे. |
08:22 | स्टाईल टॅबवर क्लिक करा. |
08:25 | येथे आपण Line Thickness, Line Opacity आणि Line Style बदलू शकता. |
08:33 | Preferences विंडो बंद करा. |
08:36 | बदललेल्या ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सह रेषा एबी पहा. |
08:41 | मी रेषा h चे ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदलेन. |
08:45 | ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज सिलेक्ट करण्यासाठी रेषा h वर राईट क्लिक करा. Preferences विंडो उघडते. |
08:53 | येथे मी कलर बदलून गुलाबी आणि स्टाईल डॅश लाइनमध्ये बदलेन. |
09:00 | Preferences विंडो बंद करा. |
09:03 | आता फाईल सेव्ह करू. फाईल मेनूवर क्लिक करा आणि सेव्ह निवडा. |
09:10 | सेव्ह डायलॉग बॉक्स उघडेल. |
09:13 | मी माझ्या मशीनवर डॉक्युमेंट्स फोल्डर निवडेन. |
09:17 | आपण आपल्या मशीनवर आपल्या आवडीचे कोणतेही फोल्डर निवडू शकता. |
09:22 | फाईलचे नाव लाईन्स म्हणून टाइप करा.त्यानंतर तळाशी असलेल्या सेव्ह बटणावर क्लिक करा |
09:29 | आपली फाईल .ggb extension ने सेव्ह झाली आहे. |
09:34 | ट्यूटोरियल थांबवा आणि असाईनमेंट करा.एक नवीन GeoGebra विंडो उघडा. |
09:40 | सेगमेंट टूल वापरुन एक रेषाखंड एबी काढा. |
09:44 | रेषाखंड एबी ला लंब दुभाजक काढा. |
09:48 | रेषेचे नाव बदला आणि ऑब्जेक्ट प्रॉपर्टीज बदला |
09:52 | आपली पूर्ण झालेली असाईनमेंट यासारखी दिसावी. |
09:57 | आता नवीन विंडो उघडू. |
10:00 | File menu वर क्लिक करा आणि New Window निवडा. |
10:05 | आता मी Graphics विंडो प्रॉपर्टीज बद्दल स्पष्टीकरण देईन. येथे मी Algebra व्यू बंद करेन. |
10:13 | Graphics विंडो वर राइट क्लिक करा. |
10:16 | कॉन्टेक्स्ट मेनू विविध पर्यायांसह उघडेल. |
10:20 | Graphics पर्याय निवडा. |
10:23 | Preferences विंडो उघडते. |
10:26 | Preferences विंडोमध्ये आपण Basic, xAxis, yAxis आणि Grid टॅब पाहू. |
10:36 | Preferences विंडोचा आकार बदला आणि Graphics पहा आणि त्यास एकमेकांच्या बाजूला ठेवा. |
10:43 | आपण बेसिक टॅबमधील Axes ची basic properties बदलू. |
10:48 | bold चेक बॉक्स वर क्लिक करा.हे अॅक्सेस बोल्ड करते. |
10:54 | Color बटणावर क्लिक करा.एक color बॉक्स निवडा. |
11:00 | आपण कोणताही गडद रंग निवडू शकता आणि ओके बटणावर क्लिक करू शकता. |
11:05 | त्यानुसार axes चा रंग बदलतो |
11:09 | पुढे लाइन स्टाईल ड्रॉप डाऊन निवडा.मी दुतर्फा एरो पर्याय निवडेन. |
11:17 | आता आपण Miscellaneous properties कडे जाऊ. |
11:21 | चला ग्राफिक्स व्यूचा बॅकग्राउंड कलर बदलू. |
11:25 | बॅकग्राउंड कलर बटणावर क्लिक करा. कलर बॉक्स मधील एक कलर निवडा. |
11:31 | मी हलका हिरवा निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन. |
11:36 | लक्षात घ्या की बॅकग्राउंड कलर हलका हिरव्या रंगात बदलला आहे. |
11:40 | आता ग्रिड टॅब वर क्लिक करा. डीफॉल्टनुसार, शो ग्रीड चेक बॉक्स चेक केला गेला. |
11:47 | ग्रीडचा रंग बदलू. कलर बटणावर क्लिक करा. |
11:53 | कलर बॉक्स मधील एक कलर निवडा. |
11:56 | मी डार्क ग्रीन निवडेन आणि ओके बटणावर क्लिक करेन. |
12:02 | ग्रिडचा रंग गडद हिरव्या रंगात बदलल्याचे पहा. |
12:07 | Preferences विंडो बंद करा |
12:10 | बदललेल्या propertiesसह जिओजेबरा इंटरफेस पहा. |
12:15 | असाईनमेंट म्हणून एक्सप्लोर करा, 1. ग्रिड टाईप options 2. xAxis आणि yAxis टॅब |
12:25 | आपण काय शिकलो ते थोडक्यात पाहू. |
12:28 | या ट्यूटोरियल मध्ये आपण शिकलो आहोत GeoGebra इंटरफेस आणि भूमितीय tools विषयी, |
12:35 | समातंर रेषा आणि लंब रेषा काढण्याविषयी रेषेचे गुणधर्म बदलण्याविषयी आणि |
12:41 | ग्राफिक्स व्ह्यूच्या गुणधर्मा विषयी |
12:44 | पुढील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्टचा सारांश देते.कृपया डाउनलोड करुन पहा. |
12:52 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा घेते आणि प्रमाणपत्र देते.अधिक माहितीसाठी, कृपया आम्हाला लिहा. |
13:01 | या स्पोकन ट्यूटोरियलविषयी आपल्याकडे काही प्रश्न आहेत का?असल्यास कृपया या साइटला भेट द्या. |
13:07 | आपल्याला प्रश्न आहे तो मिनिट आणि सेकंद निवडा. आपला प्रश्न थोडक्यात सांगा. |
13:14 | आमच्या टीममधील कोणीतरी त्यांना उत्तर देईल. |
13:18 | स्पोकन ट्यूटोरियल फोरम या ट्यूटोरियलच्या विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
13:23 | कृपया त्यांच्याशी असंबंधित आणि सामान्य प्रश्न पोस्ट करू नका.यामुळे गोंधळ कमी होण्यास मदत होईल. |
13:31 | कमी गोंधळ सह, आपण या चर्चा सूचनात्मक माहिती म्हणून वापरु शकतो. |
13:36 | स्पोकन ट्यूटोरियल प्रोजेक्टला एनएमईआयसीटी, एमएचआरडी, भारत सरकारकडून अर्थसहाय्य दिले जाते.यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:47 | मी राधिका आपला निरोप घेते.धन्यवाद. |