Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Users-in-Moodle/Marathi"
(Created page with "{| border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | '''Users in Moodle''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्...") |
|||
Line 15: | Line 15: | ||
''' XAMPP 5.6.30''' माध्यमातून प्राप्त '''Apache, MariaDB '''आणि '''PHP''' | ''' XAMPP 5.6.30''' माध्यमातून प्राप्त '''Apache, MariaDB '''आणि '''PHP''' | ||
'''Moodle 3.3''' आणि | '''Moodle 3.3''' आणि | ||
− | + | '''Firefox '''वेब ब्राउजर | |
तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता. | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता. | ||
|- | |- |
Latest revision as of 15:09, 10 March 2019
Time | Narration |
00:01 | Users in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : user कसे जोडणे, user’s profile एडिट कसे करणे, बल्कमध्ये users कसे अपलोड करणे. |
00:17 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे :
Ubuntu Linux OS 16.04 XAMPP 5.6.30 माध्यमातून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता. |
00:43 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिसप्ले विसंगती उद्भवतात. |
00:51 | हे ट्युटोरिअल शिकणाऱ्यांकडे त्यांच्याMoodle वेबसाईटवर तयार केलेले काही courses असावेत.
नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील मागील Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:05 | ब्राउजरवर जा आणि तुमचे admin username आणिpassword वापरून, तुमच्या Moodle वेबसाईटवर लॉगइन करा, |
01:14 | आता आपण Moodle मध्ये नवीन user कसा तयार करावा ते शिकू. |
01:19 | Navigation block मध्ये, Site Administration वर आणि नंतर Users टॅबवर क्लिक करा. |
01:28 | Add a new user पर्यायावर क्लिक करा. |
01:32 | मी username म्हणून adminuser2 प्रविष्ट करेन. |
01:37 | New Password फिल्डच्या खाली स्क्रोल करा.
Click to enter text लिंकवर क्लिक करा. |
01:45 | कृपया लक्षात घ्या - password ने येथे दर्शविल्याप्रमाणे नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. |
01:51 | मी password म्हणून Spokentutorial1@ प्रविष्ट करेन. |
01:57 | Force password change चेकबॉक्सवर क्लिक करा. |
02:02 | तो/ती पहिल्यांदा लॉगइन करतेवेळी नवीन user ला त्याचा/तिचाpassword बदलण्यासाठी हा सक्ती करतो. |
02:10 | येथे दर्शविल्याप्रमाणे, उर्वरित तपशील आपल्या प्राधान्यानुसार प्रविष्ट करा. |
02:16 | Email display मध्ये, लक्षात घ्या की, मी Allow everyone to see my email address निवडले आहे.
हे असे आहे कारण मी नंतर यूजरला ऍडमिन यूजर म्हणून बनवणार आहे. |
02:30 | परंतु हे teachers आणि studentsसारख्या इतर usersसाठी सर्वोत्तम टाळणारे आहे. |
02:37 | आपणCity/Town फिल्ड आतासाठी रिक्त सोडू. जेव्हा आपण ते user एडिट करू तेव्हा आपण हे नंतर अपडेट करू. |
02:47 | नंतर येथे दर्शविल्याप्रमाणे कन्ट्री आणि टाईमझोन निवडा. |
02:52 | उर्वरित सर्व फिल्ड्स डीफॉल्टवर सेट करू. |
02:56 | मग खाली स्क्रोल करा आणि Create user बटणावर क्लिक करा. |
03:01 | आता आपल्याकडे 2 usersआहेत. System Admin2 user वर क्लिक करा, जे आपण नुकतेच तयार केले आहे. |
03:10 | उजवीकडे Edit Pr ofile लिंकवर क्लिक करून आपण हे user’s profile एडिट करू शकतो. City/Town टेक्स्टबॉक्समध्ये Mumbai प्रविष्ट करू. |
03:22 | मग खाली स्क्रोल करा आणि Update profile बटणावर क्लिक करा. अशाचप्रकारे, आपण कोणत्याही युजरसाठी कोणताही तपशील एडिट करू शकतो. |
03:33 | ह्या नवीन user च्या उजवीकडे 3 आयकॉन्स पहा. त्यांच्यापैकी प्रत्येकजण काय करतो ते पहाण्यासाठी त्यांवर हालचाल करा. |
03:43 | delete आयकॉन हा user डिलीट करेन.
कृपया लक्षात ठेवाः युजर डिलीट केल्यास, त्याच्या / तिच्या कोर्स नोंदणी(रजिस्ट्रेशन), ग्रेड इत्यादीसह सर्व user डेटा डिलीट होईल. म्हणून, हा पर्याय अत्यंत सावधगिरीने वापरला पाहिजे. |
04:03 | eye आयकॉन user निलंबित (सस्पेंड) करेल. user निलंबित करणे म्हणजे त्याचे/तिचे अकाऊंट निष्क्रिय(डिएक्टिव्हेट) करणे. |
04:13 | तर, user आता लॉगइन करू शकणार नाही, परंतू त्याची/तिची नोंदणी(रजिस्ट्रेशन्स), ग्रेड इत्यादी सर्व शाबूत ठेवली गेली आहे. |
04:24 | userडिलीट करण्याऐवजी हे करणे चांगली गोष्ट आहे. |
04:29 | हे भविष्यातील उद्देश्यांसाठी रेकॉर्ड्स सेव्ह करते आणि हवे तेव्हा तुम्हीuserपरत सक्रिय(एक्टिव्हेट) करू शकता. |
04:37 | पुढील आहे gear आयकॉन. हे आपल्यालाEdit profileपेजवर घेऊन जाईल. |
04:43 | लक्षात ठेवा deleteआणि suspend हे आयकॉन्स Admin Userच्या पुढे दर्शविले जात नाहीत. |
04:51 | हे असे आहे कारण main system administrator कधीही डिलीट किंवा निष्क्रिय(डिएक्टिव्ह) केला जाऊ शकत नाही. |
04:59 | आता, users ना बल्कमध्ये जोडण्यास शिकू. |
05:05 | त्यासाठी आपल्याला निश्चित डेटासह, विशिष्ट फॉरमॅटमध्ये फाईल अपलोड करावी लागेल. स्वीकृत फाईल प्रकार आहे CSV. |
05:16 | मी user-details-upoad.csv फाईल उघडेन, जी मी आधीच सादरणीकरणासाठी तयार केली आहे. |
05:25 | मी LibreOfficeCalc वापरत आहे - जो LibreOffice Suiteचा स्प्रेडशीट घटक आहे. |
05:32 | या फाईलमध्ये खालील कॉलम्स आहेत:
username 'password' firstname lastname email हे 5 फिल्ड्स अनिवार्य फिल्ड्स आहेत. |
05:47 | येथे काही अधिक फिल्ड्स आहेत जे वैकल्पिक(ऑप्शनल) आहेत:
institution department phone1 address course1 role1 |
05:58 | लक्षात घ्या की field titles हे अगदी स्प्रेडशीटमध्ये लिहिल्याप्रमाणेच म्हणजेच लोअरकेसमध्ये असावेत. अन्यथा अपलोडमध्ये एरर येईल. |
06:11 | जर आपल्याकडे फक्त एक course असेल ज्यात user साठी नावनोंदणी(इनरोल) करायचे असेल तर आपण fields title मध्ये पुढे 1 जोडू. |
06:19 | जर तिथे अधिक courses असतील ज्यात तुम्हांला user साठी नावनोंदणी(इनरोल) करायची असल्यास, course2, role2, इत्यादीसह आणखी कॉलम्स जोडा. |
06:29 | कृपया लक्षात ठेवाः
आपण course1 फिल्डमध्ये Course short name आणि role1 फिल्डमध्ये Role short name भरले पाहिजे. |
06:39 | विद्यार्थ्यांसाठी Role short name आहे student आणि शिक्षकांसाठी आहे editingteacher. |
06:47 | आपल्याकडे ह्या CSV फाईलमध्ये 3 users असतील :
System Admin2 युजर जो आधीपासूनच स्वतःहून तयार केलेले आहेत. इतर फिल्ड्स वैकल्पिक(ऑप्शनल) दाखवण्यासाठी एक युजर फक्त 5 अनिवार्य फिल्ड्ससह दर्शवितो आणि एक युजर सर्व तपशीलासह आहे. |
07:08 | ही CSV फाईल ह्या ट्युटोरिअलच्या Code files सेक्शनमध्ये उपलब्ध आहे. आपण डाऊनलोड करून वापरू शकता. |
07:17 | ह्या ट्युटोरिअलकडे Additional Reading Material च्या CSV फाईल निर्मितीबद्दल अधिक माहिती आहे. |
07:25 | आता पुन्हा ब्राऊजर विंडोवर जाऊ. |
07:29 | Navigation block मध्ये Site Administration वर क्लिक करा. |
07:34 | नंतर Users टॅबवर क्लिक करा. Accounts सेक्शनमध्ये, Upload Users वर क्लिक करा. |
07:43 | Choose a file बटणावर क्लिक करा. File picker शीर्षकासह नवीन पॉप-अप विंडो उघडते. |
07:51 | डाव्या मेनूमध्ये Upload a file लिंकवर क्लिक करा, जर पॉप-अप विंडो आधीपासूनच त्या लिंकवर नसेल तर. |
07:59 | Browse / Choose a file बटणावर क्लिक करा, जे तुमच्या इंटरफेसवर दिसते. सेव्ह फोल्डरवर ब्राउज करा आणि CSV फाईल निवडा. |
08:11 | आपण इतर सर्व फिल्ड्स डिफॉल्ट म्हणून राहू देऊ. |
08:15 | पेजच्या तळाशी Upload this file बटणावर क्लिक करा. |
08:21 | टेक्स्ट एरियामध्ये आता लिहिलेल्या फाईलनावासह तिच स्क्रीन रीफ्रेश होते. |
08:27 | तळाशी असलेले बटण आता Upload users मध्ये बदलले आहे. ह्या Upload users बटणावर क्लिक करा. |
08:35 | पुढील पेज, युजर्सचे पूर्वावलोकन(प्रिव्ह्यूव) दर्शवते जे आपण अपलोड करीत आहोत. व्हॅल्यूज योग्य आहेत हे सत्यापित(व्हेरिफाय) करा. आता Settings सेक्शन तपासा. |
08:48 | Upload type ड्रॉपडाऊनकडे 4 पर्याय आहेत. |
08:53 | ह्या 3 पर्यायांचा वापर विद्यमान(एक्झिस्टिंग)युजर्सच्या नोंदी अपडेट करण्यासाठी केला जाऊ शकतो. आपण Add new only, skip existing users निवडू. |
09:05 | ह्याचा अर्थ जर username आधीपासूनच विद्यमान(एक्झिस्ट) असेल तर ते जोडले जाणार नाही. |
09:11 | New user password ड्रॉपडाऊनमध्ये, Field required in file निवडा. |
09:17 | Force password changeअंतर्गत All निवडा. हे सर्व users ना पहिल्यांदा लॉगइन करताना त्यांचे passwords बदलण्यासाठी सूचित करेल. |
09:27 | आपण ह्या सेक्शनमधील इतर फिल्ड्स डीफॉल्ट राहू देऊ. |
09:32 | आता आपण Default values सेक्शन पाहू. |
09:36 | Email display अंतर्गत, Allow only other course members to see my email addressनिवडा. |
09:44 | सर्व users साठी तेच असल्यास आपण डीफॉल्ट फिल्ड्स भरू शकता. हे फिल्ड्स सर्व अपलोड केलेल्या users साठीवापरले जातील. |
09:55 | मी City/Town मध्ये Mumbai टाईप करेन, |
09:59 | पुढे, Show more… वर क्लिक करा. तेथे असे बरेच फिल्ड्स आहेत ज्यात आपण डेटा प्रविष्ट करू शकतो. |
10:07 | परंतु लक्षात ठेवा की, त्यांच्यापैकी कोणताही अनिवार्य नाही. म्हणून मी हे आतासाठी रिक्त ठेवेन. |
10:15 | पेजच्या तळाशी Upload users बटणावर क्लिक करा. |
10:20 | येथे प्रदर्शित केलेल्या Upload users results टेबलचा स्टेटस कॉलम पहा. |
10:27 | पहिल्या(1st)userसाठी, स्टेटस मेसेज आहे : User not added - already registered. |
10:35 | हा user आधीपासूनच सिस्टममध्ये विद्यमान(एक्सिस्ट) आहे, म्हणून ते वगळले गेले. |
10:40 | उर्वरित users New users म्हणून जोडले गेले आहेत. |
10:45 | येथे प्रदर्शित केलेला स्टेटस पहाच |
10:49 | Weak passwords ते आहेत जे password नियमांचे पालन करीत नाहीत. |
10:54 | जरी ते सिस्टममध्ये अपलोड केले असले तरी,स्ट्राँग passwords असणे नेहमीच चांगले असते. |
11:01 | Continue बटणावर क्लिक करा. आपण तयार केलेले सर्व usersपाहू. |
11:08 | Site Administration वर क्लिक करा. नंतर Users टॅबवर क्लिक करा. Accounts सेक्शन अंतर्गत Browse list of users वर क्लिक करा. |
11:20 | आता आपल्याकडे 4 users आहेत. |
11:23 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
11:29 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो :
user जोडणे user’s profile एडिट करणे बल्कमध्ये users अपलोड करणे. |
11:39 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देते.
कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
11:47 | Spoken Tutorial टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्र देते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा. |
11:55 | कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
12:00 | Spoken Tutorial Project ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:11 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. |
12:15 | सहभागासाठी धन्यवाद. |