Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Courses-in-Moodle/Marathi"
Line 251: | Line 251: | ||
|- | |- | ||
| 10:01 | | 10:01 | ||
− | | तेच सूचित करण्यासाठी लपविलेल्या '''course''' कडे | + | | तेच सूचित करण्यासाठी लपविलेल्या '''course''' कडे आय क्रॉस्ड असेल. |
|- | |- | ||
|10:07 | |10:07 |
Revision as of 11:49, 10 March 2019
Time | Narration |
00:01 | Courses in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:06 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : course कसा तयार करावा आणि course वर क्रिया कशा कराव्यात. |
00:16 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे : Ubuntu Linux OS 16.04 |
00:24 | XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP
Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर |
00:38 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता. |
00:42 | तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात. |
00:50 | Moodle मध्ये categories कशा तयार कराव्या , ह्या ट्युटोरिअलच्या विद्यार्थ्यांना माहित असावे. |
00:56 | नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा. |
01:03 | ब्राउजरवर जा आणि तुमचा Moodle होमपेज उघडा.
खात्री करून घ्या की XAMPP service चालू आहे. |
01:11 | आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा. |
01:16 | आपण आता admin dashboard मध्ये आहोत. |
01:19 | डाव्या बाजूला नेव्हिगेशन मेनू उघडण्यासाठी ड्रॉव्हर मेनूवर क्लिक करा. |
01:25 | डाव्या बाजूला,Site Administration वर क्लिक करा. |
01:29 | Courses टॅबवर आणि नंतरManage courses and categories वर क्लिक करा. |
01:36 | लक्षात घ्या की, आपल्याकडे येथे फक्त एक category आहे, जीआहे Mathematics |
01:41 | आणि दोन subcategories : 1st Year Maths आणि 2nd Year Maths , जे आपण आधी तयार केले होते. |
01:50 | आता, "Mathematics अंतर्गत नवीन course तयार करू. |
01:55 | तर Create new course वर क्लिक करा. |
01:59 | आणि Add a new course स्क्रीनमध्ये, सर्व फिल्ड्स पाहण्यासाठी, वरील उजवीकडे Expand All वर क्लिक करा. |
02:12 | Course full name टेक्स्टबॉक्समध्ये आपण Calculus टाईप करू. |
02:18 | Course short name मध्ये, आपण पुन्हा टाईप करू Calculus. |
02:24 | Course short name हे breadcrumbs आणि course संबंधित ईमेलमध्ये वापरले जाईल. |
02:31 | हे course full name पेक्षादेखील भिन्न असू शकते. |
02:35 | Course Category हे Mathematics आहे, जसे आपण पाहू शकतो. |
02:40 | पुढील पर्याय आहे Course visibility. डिफॉल्टपणे Show निवडले आहे. |
02:48 | Visible सेटिंग हे,course इतर courses, सोबत दिसावा की नाही हे निर्धारित करते. |
02:56 | हिडन course हा केवळ त्यांच्यासाठी दृश्यमान आहे,ज्यांना course साठी असाइन केले आहे
जसे -Admin, Course creator, Teacher, Manager |
03:08 | आपण आत्तासाठी हे सेटिंग आहे तसे सोडून देऊ. |
03:12 | पुढे येते Course start date |
03:16 | जर course एखाद्या सेमिस्टरच्या सुरुवातीच्या तारखेप्रमाणे, एखाद्या विशिष्ट तारखेपासून सुरू झाला तर ते start date मध्ये निवडा. |
03:25 | ह्याचा अर्थ course start dateपर्यंत विद्यार्थ्यांना दिसणार नाही. |
03:32 | Course end date डीफॉल्टपणे, सक्षम केली आहे आणि कोर्स जेव्हा तयार केला गेला आहे त्याच तारखेस सेट केली जाते. |
03:42 | चेकबॉक्सवर क्लिक करून मी ते डिसेबल(अक्षम ) करते.
ह्याचा अर्थ असा होईल की course कधीच संपणार नाही. |
03:51 | तथापि, जर तिथे course साठी शेवटची तारीख असेल तर तुम्ही येथे चेकबॉक्स सक्षम करू शकता. मग तुमच्या गरजेनुसार तारीख निवडा. |
04:02 | महत्त्वपूर्ण टीप: 'end date निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना course दिसणार नाही.
मी त्यास डिसेबल्ड (अक्षम)सोडेन. |
04:13 | Course ID number हा Category ID number च्या समान आहे.
Course ID number हा एक पर्यायी(ऑप्शनल) फिल्ड आहे. |
04:22 | ऑफलाईन courses सह admin users ना courseओळखण्यासाठी हे आहे. |
04:28 | जर तुमचे महाविद्यालय(कॉलेज)courses साठी IDs वापरत असेल तर आपण त्या course ID इथे वापरू शकता. हे फिल्ड इतर Moodle users ना दृश्यमान नाही. |
04:40 | हे फिल्ड पर्यायी(ऑप्शनल) आहे आणि वेबसाईटवर ते कुठेही प्रदर्शित झाले नाही.
मी हे रिक्त सोडत आहे. |
04:49 | पुढे Description च्या अंतर्गत आपण दोन फिल्ड्स पाहू शकता: Course Summary आणि Summary files. |
04:59 | Course summary हा एक पर्यायी परंतु महत्त्वपूर्ण फिल्ड आहे.
कारण जेव्हा user शोध घेतो तेव्हा Course summary टेक्स्टदेखील स्कॅन केली जाते. |
05:13 | येथे टॉपिकची नावे सूचीबद्ध करणे ही एक चांगली कल्पना आहे.
खालील टाईप करा: Topics covered in this Calculus course are: Limits,Graph of a function, Factorial |
05:29 | courses च्या सूचीसह Course summary देखील प्रदर्शित केली आहे. |
05:35 | कोर्स समरी फाईल्स ह्या Course summary files फिल्डमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. |
05:42 | डीफॉल्टपणे,course summary files म्हणून फक्त jpg, gif आणि png file types ह्यांना अनुमती आहे.
मी हे वगळेन, कारण मी कोणतीही फाईल अपलोड करू इच्छित नाही. |
05:57 | Course format म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संसाधने आणि क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी मार्ग संदर्भित करते. |
06:06 | तिथे Format ड्रॉपडाऊ नमध्ये 4 पर्याय आहेत -
Single Activity Format, Social Format, Topics Format आणि Weekly Format. |
06:20 | तिथे courses आहेत जे आठवड्या आठवड्यातून चालतात. |
06:24 | जर तुमचा course' अशा प्रकारचा असेल तर Weekly'format निवडा. |
06:30 | Moodle हे course प्रत्येक आठवड्यासाठी एका स्पष्ट प्रारंभ तारीख(स्टार्ट डेट) आणि समाप्तीच्या तारीखेसह(एंड डेटसह)सेक्शन तयार करेल. |
06:39 | तिथे courses आहेत जे घटकानुसार (टॉपिकनुसार) चालतात.
जर तुमचा course ह्यासारखा असेल तर Topics format निवडा. |
06:49 | Moodle हे course च्या प्रत्येक topic साठी एक सेक्शन तयार करेल. |
06:55 | ह्या फिल्डसाठी डीफॉल्ट आहे Topics format.
आपण ते आहे तसे राहू देऊ. |
07:03 | डिफॉल्टपणे सेक्शनची संख्या 4 आहे. |
07:07 | जर तुमच्याकडे 4 घटकांपेक्षा कमी किंवा जास्तमध्ये विभागलेला course असेल तर आवश्यकतेनुसार हे फिल्ड बदला.
मी हा नंबर 5 निवडेन. |
07:20 | आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये इतर formats वर चर्चा करू. |
07:25 | बाकीचे पर्याय जसे आहेत तसे सोडून देऊ.
पृष्ठाच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा. |
07:36 | आपण Enrolled Users पेजवर पुनर्निर्देशित केले आहे.
आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये user enrollment बद्दल शिकू. |
07:46 | आता आपण category Mathematicsअंतर्गत आपला पहिला course Calculus यशस्वीरित्या तयार केला आहे. |
07:56 | आपण ह्या course page वर असताना, लक्षात घ्या की, डावीकडील मेनू बदलला आहे. |
08:03 | डावीकडील नेव्हिगेशन मेनूमध्ये आपण तयार केलेल्या course शी संबंधित मेनूज आहेत.
ह्यात Participants, Grades इत्यादींचा समावेश आहे. |
08:15 | डाव्या बाजूला असलेल्या Calculus नावाच्या कोर्सवर(कोर्स नेम) क्लिक करा. |
08:20 | आपण पाहू शकतो की येथे 5टॉपिक्स(घटक)दृश्यमान आहेत. त्यांना Topic 1, Topic 2 अशी नावे देण्यात आली आहेत. पुन्हा लक्षात घ्या की आपण ह्यांना आधी 5 नंबर दिला होता. |
08:34 | पेजच्या वरील उजवीकडे असलेल्या गीयर (gear) आयकॉनवर क्लिक करा. |
08:39 | नंतर Edit settings वर क्लिक करा.
जेव्हा आपण हा course तयार केला तेव्हा आपण ज्या पेजवर होतो त्या पेजसारखे पेज हे उघडेल. |
08:51 | आपण ह्या पेजवरील आधीच्या सेटिंग्जमध्ये बदल करू शकतो.
मी Course start date 15 ऑक्टोबर 2017मध्ये बदलेन. |
09:04 | पेजच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा. |
09:11 | नंतर आपण गीयर(gear) मेनू अंतर्गत इतर submenus एक्सप्लोर करू. |
09:17 | आता आपण आपल्या course ची संरचना थोडी बदलू. |
09:22 | Site administration वर क्लिक करा.
Courses वर क्लिक करा आणि नंतर Manage courses and categories. |
09:31 | आपण तयार केलेले course पाहण्यासाठी Mathematics category वर क्लिक करा.
course च्या उजवीकडे 3 आयकॉन्सकडे लक्ष द्या. |
09:42 | ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर हालचाल करा. |
09:46 | गीयर आयकॉन हे course एडिट करण्यासाठी आहे. delete किंवा trash आयकॉन हेcourse डिलीट करण्यासाठी आहे. |
09:55 | आणि आय(eye) आयकॉन course लपविण्यासाठी आहे. |
10:01 | तेच सूचित करण्यासाठी लपविलेल्या course कडे आय क्रॉस्ड असेल. |
10:07 | आपण course settingsएडिट करण्यासाठी, कोर्सच्या नावाच्या उजवीकडील गियर(gear) आयकॉनवर क्लिक करू शकतो. |
10:14 | मी Course Summary सुधारित करू इच्छित आहे आणि विद्यमान टॉपिक्स Binomials जोडू इच्छित आहे. उर्वरित सेटिंग्ज तसेच राहू शकतात. |
10:25 | पेजच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि ह्यावेळी Save and return बटणावर क्लिक करा. |
10:34 | येथे तुमच्यासाठी एक छोटीशी असाईनमेंट आहे:category Mathematics अंतर्गत Linear Algebra एक नवीन कोर्स तयार करा. |
10:44 | आत्तासाठी course लपवा (हाईड करा). |
10:47 | खालील घटकांचा course summary: Linear equations, Matrices आणि Vectors मध्ये उल्लेख करा. Save and Return वर क्लिक करा. |
11:00 | ट्युटोरिअल थांबवा आणि असाईनमेंट पूर्ण झाल्यावर चालू ठेवा. |
11:06 | आता आपल्याकडे Mathematics अंतर्गत 2 courses आहेत : Calculus आणि Linear Algebra. |
11:14 | लक्षात घ्या की, आता courses च्या पुढे एक नवीन आयकॉन दिसत आहे. |
11:20 | courses च्या ऑर्डरची पुन्हा व्यवस्था करण्यासाठी अप आणि डाऊन एरोज आहेत. |
11:26 | ड्रॅग आणि ड्रॉप फिचरचा वापर करून आपण ऑर्डर बदलू शकतो.
Calculus course हलवून Linear Algebra course च्या वर ठेवू. |
11:36 | हे दोन्ही courses पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.
म्हणून ते 1st Year Maths subcategory अंतर्गत हलवू. |
11:47 | ते निवडण्यासाठी 2 courses च्या डावीकडील चेकबॉक्स तपासा. |
11:53 | मग Move selected courses toमध्ये Mathematics / 1st year Mathsनिवडा. |
12:02 | आणि Move बटणावर क्लिक करा. |
12:04 | आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो - Successfully moved 2 courses into 1st year Maths. |
12:14 | लक्षात घ्या की, Mathematics अंतर्गत courses ची संख्या 0 झाली आहे आणि 1st year Maths अंतर्गत 2 आहे. |
12:24 | 1st year Maths sub-category वर क्लिक करा. |
12:28 | आपण ह्या subcategory अंतर्गत आपले courses पाहू शकतो. |
12:33 | ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात. |
12:38 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो : course कसा तयार करावा
courses वर एडिट, मुव्ह इ. सारख्या क्रिया कशा कराव्यात? |
12:50 | तुमच्यासाठी येथे असाईनमेंट आहे:
subcategory 2nd Year Maths अंतर्गत subcategory 2nd Year Maths मध्ये 2 courses जोडा, ते म्हणजे |
13:00 | Multivariable calculus आणि Advanced Algebra. |
13:06 | अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Code files लिंकचा संदर्भ घ्या. |
13:12 | 15 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होणारे courses एडिट करा. |
13:18 | खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया ते डाऊनलोड करून पहा. |
13:26 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
13:36 | कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
13:40 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
13:53 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |