Difference between revisions of "Drupal/C4/Solr-Search-and-Facets-Implementation/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border = 1 | <center>Time</center> | <center>Narration</center> |- | 00:01 | नमस्कार ''' Solr Search and Facets Implementation''' वरील स्पो...")
 
Line 289: Line 289:
 
|-
 
|-
 
| 05:57
 
| 05:57
| '''Step No. 5''', पुढे आपण '''Drupal8''' मध्ये  '''Solr search API''' implement karu
+
| '''Step No. 5''', पुढे आपण '''Drupal8''' मध्ये  '''Solr search API''' इम्पलिमेन्ट करू.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:50, 22 January 2019

Time
Narration
00:01 नमस्कार Solr Search and Facets Implementation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत-
00:09 Solr search चे परिचय
00:12 Solr search ची प्रमुख वैशिष्ट्ये
00:15 Solr search चे इंस्टॉलेशन आणि
00:17 Facets ची निर्मिती
00:19 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04
00:25 Drupal 8 आणि Firefox web browser
00:29 तुम्ही तुमच्या पसंतीनुसार कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
00:33 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्हाला Drupal चे मूलभूत ज्ञान असावे.
00:38 नसल्यास, संबंधित Drupal ट्युटोरिअल्ससाठी, दर्शविलेल्या लिंकला भेट द्या.
00:43 तुमच्याकडे कार्यरत इंटरनेट कनेक्शन देखील असावे.
00:47 प्रथम आपण शिकू API म्हणजे काय?
00:50 API चे पूर्ण नाव आहे Application Programming Interface.
00:54 यात नियमांचा एक सेट आहे (नियमांचा संच) जे सॉफ्टवेअर प्रोग्राम एकमेकांशी संवाद साधण्यासाठी अनुसरण करू शकतात.
01:00 API वरील अधिक माहिती या ट्यूटोरियलच्या Additional reading material लिंकमध्ये दिले आहे.
01:07 Solr Search API काय आहे?
01:10 Solr हे मुक्त स्रोत search platform आहे ज्याचा वापर Search Application तयार करण्यासाठी केला जातो.
01:16 हे आपल्याला डेटाबेस, फायली आणि वेबसाइट्सची अनुक्रमणित करणारी कस्टम search engines तयार करण्यात मदत करते.
01:23 आपल्याला Solr Search API ची आवश्यकता का आहे?
01:27 Drupal सह आलेला मूलभूत search ते database search करते.
01:32 यामुळे प्रक्रिया हळू होते आणि MySQL वर अतिरिक्त भार येतो.
01:37 परंतु Solr हे शोधण्याकरिता एक वेगळा server प्रदान करते. हे search ऑपरेशनची गती वाढवेल.
01:44 Solr ची काही वैशिष्ट्ये येथे सूचीबद्ध आहेत.
01:47 ते स्केलेबल (मापनीय) आहे.
01:49 यात संपूर्ण टेक्स्ट शोध क्षमता आहेत.
01:52 हे फ्लेक्सिबल(लवचिक) आणि विस्तारणीय आहे.
01:55 त्याचे इंटरफेस वापरण्यास वापरकर्त्याला मैत्रीपूर्ण आहे.
01:58 हे fault टॉलरन्स (चूक सहनशीलता) आहे.
02:01 पुढे आपण Solr core बद्दल जाणून घेऊ.
02:04 Solr core चा वापर इंडेक्सिंग आणि एन्लायजिंग (अनुक्रमणिका आणि विश्लेषण) सारख्या ऑपरेशन्स करण्यासाठी केला जातो.
02:10 हे एक एकल अनुक्रमणिका आणि संबंधित कॉन्फिगरेशन फाइल्स आहे.
02:16 आपण वेगवेगळ्या संरचनेसह डेटा इंडेक्स करू शकतो.
02:20 Solr server मध्ये एक किंवा अधिक कोर असू शकतात.
02:23 जेव्हा aple एकाधिक व्हर्जन्स, लँग्वेजेस किंवा कॉन्फिगरेशनची आवश्यकता असते तेव्हा एकाधिक cores वापरली जातात.
02:31 या उदाहरणात एकल Solr Server इन्स्टन्समध्ये Articles आणि Weblogs साठी प्रत्येकी एक कोर आहे.
02:39 पुढे आपण Solr implementation process क्रमाक्रमाने शिकू.
02:44 Bitnami Drupal Stack वर खालील पायऱ्या लागू आहेत.
02:49 परंतु बहुतांश पायऱ्या अन्य कोणत्याही Drupal च्या इंस्टॉलेशनवर देखील लागू केले जाऊ शकतात.
02:54 Step No. 1 - तुमचे terminal उघडा आणि तुमच्या मशीनला update आणि upgrade करण्यासाठी दिलेले commands रन करा.
03:02 लक्षात ठेवा हा command तुम्ही root user म्हणून रन करावा.
03:06 Step No. 2 - जरी Solr Java वर आधारित असले, तरी आपल्या सिस्टममध्ये JRE किंवा JDK इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
03:16 त्यासाठी प्रथम आपल्याला, python software properties इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
03:21 तर खालील command रन करा.
03:24 लक्षात ठेवा येणाऱ्या कमांड तुम्ही सामान्य वापरकर्त्यासारख्या रन केल्या पाहिजेत.
03:29 पुढे JRE सेट करण्यासाठी आपण ही command रन करू.
03:34 त्यानंतर सिस्टिमला असमर्थित packages सह अपडेट करण्यासाठी, टाईप करा sudo स्पेस add hyphen apt स्पेस update. Enter दाबा.
03:47 अखेरीस oracle Java8 च्या नवीनतम व्हर्जन इन्स्टॉल करण्यासाठी खालील command रन करा.
03:54 आता आपण java space hyphen version टाईप करून इन्स्टॉल केलेले Java व्हर्जन तपासू शकतो. Enter दाबा.
04:03 पुढे आपल्याला मूलभूत Java environment variable सेट अप करावे लागेल.
04:08 तर खालील command रन करा.
04:12 Step No. 3. पुढे आपण आपल्या स्थानिक मशीनमध्ये Solr इन्स्टॉल करणे शिकू.
04:18 प्रथम आपल्याला डिरेक्टरी tmp मध्ये बदलावे लागेल.
04:22 आता आपण त्यांच्या वेब पेजवरून Solr version 6.6.3 डाउनलोड करू.
04:28 खालील कमांड टाईप करा.
04:31 लक्षात ठेवा की तुम्ही त्यांच्या वेबसाइटवरील कोणतीही नवीनतम व्हर्जन डाउनलोड करू शकता.
04:36 पुढे आपण खालील command वापरून tar फाईल एक्सट्रॅक्ट करू.
04:40 आता आपण आपल्या सिस्टिममध्ये service म्हणून इन्स्टॉल केले पाहिजे.
04:45 तर खालील कमांड टाईप करा.
04:48 नंतर service space Solr space status टाइप करून Solr ची स्थिती तपासू.

Enter दाबा.

04:58 आपण पाहू शकतो कि service Solr आपल्या सिस्टममध्ये इन्स्टॉल आहे आणि तसेच सक्रिय आहे.
05:03 Step No. 4

आता आपण आपल्या Drupal कन्टेन्टला इंडेक्स करण्यासाठी Solr मध्ये एक नवीन solr core तयार करू.

05:11 काळजीपूर्वक खालील कमांड टाइप करा.
05:14 येथे मी नवनिर्मित core चे नाव testcollection म्हणून दिले आहे.
05:19 डिफॉल्ट रूपात solr application हे TCP port 8983 वर ऐकतो.
05:25 तर आपण port 8983 द्वारे Solr admin user interface ऍक्सेस करू शकतो.
05:31 URL bar मध्ये, टाईप करा http://localhost:8983/Solr/
05:42 Core Selector फील्डमध्ये, आपण सर्व उपलब्ध core ची सूची पाहू शकता.
05:47 कोणत्याही विशिष्ट core वर क्लिक करणे, आपल्याला संबंधित तपशील मिळेल.
05:53 आपल्या स्थानिक सिस्टिममध्ये Solr इंस्टॉलेशनबद्दल हे सर्व आहे.
05:57 Step No. 5, पुढे आपण Drupal8 मध्ये Solr search API इम्पलिमेन्ट करू.
06:04 यासाठी, आपल्या मशीनमध्ये PHP चा mbstring extension आणि composer इन्स्टॉल असले पाहिजे.
06:11 वरील सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठीच्या पायऱ्या या ट्यूटोरियलच्या Additional reading material लिंकमध्ये दिले आहेत.
06:18 एकदा आवश्यक इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, Drupal च्या htdocs मध्ये डिरेक्टरी बदला.
06:24 यानंतर, आपल्याला Drupal8 मध्ये solarium library इन्स्टॉल करणे आवश्यक आहे.
06:30 Solarium हे PHP साठी Solr client library आहे.
06:34 ते इन्स्टॉल करण्यासाठी खालील command कार्यान्वित करा.
06:38 पुढे आपण composer द्वारे search API Solr module ते Drupal8 इन्स्टॉल कराल.
06:44 खालील command टाईप करा.
06:47 नंतर वापरण्यासाठी आपण Drupal8 मध्ये Facets module देखील डाउनलोड करू.
06:53 खालील command टाईप करा. या वेळी, आपण सर्व आवश्यक modules डाउनलोड केले आहेत.
07:01 Step No. 6 - पुढे Drupal8 site वर जा आणि आपण इन्स्टॉल केलेले modules सक्षम करा.
07:09 Extend टॅबवर जा.
07:11 modules Facets, Search API, Solr search आणि Solr Search Defaults वर चेक मार्क करा.
07:20 त्यांना सक्षम करण्यासाठी खाली Install बटणवर क्लिक करा.
07:24 आपण हे पाहू शकतो की सर्व चार modules इन्स्टॉल केले गेले आहे.
07:28 आता आपल्याला Search नावाच्या Drupal8 च्या मूलभूत Search module ला अक्षम karave लागेल.
07:34 असे करण्यासाठी, Extend पेजवरील Uninstall टॅबवर क्लिक करा.
07:39 Search module वर चेक मार्क द्या आणि तळाशी Uninstall बटणवर क्लिक करा.
07:44 पुन्हा पुष्टी करण्यासाठी Uninstall बटणावर क्लिक करा.
07:48 पुढे aplyala आपल्या ड्रूपलला Solr शी संपर्क साधण्याची परवानगी द्यावी लागेल.
07:53 त्यासाठी टर्मिनलवर परत जा आणि काळजीपूर्वक खालील command रन करा.
07:58 हे configuration files ला Solr च्या core मधून Drupal8 च्या modules फोल्डरमध्ये कॉपी करेल.
08:05 configuration files कॉपी केल्यानंतर, Solr service रिस्टार्ट करण्यासाठी, टाईप करा sudo space service space solr space restart.

Enter दाबा.

08:17 Step No. 7

पुढे आपण Solr server कॉन्फिगर करू आणि मूलभूत search index मध्ये उपलब्ध कन्टेन्टला इंडेक्स करा.

08:27 असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा.
08:30 SEARCH AND METADATA अंतर्गत Search API वर क्लिक करा.
08:34 सध्या आपण पाहु शकतो की Solr server वर पोहोचू शकत नाही.
08:38 Solr Server च्या Edit वर क्लिक करा.
08:41 खाली स्क्रोल करा. Solr core ' फील्डमध्ये, तुमचे कोरनेम टाईप करा.
08:46 मी testcollection टाईप करेल.
08:48 इतर सेटिंग्जना डिफॉल्ट(मूलभूत) म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी, खाली Save' बटणावर क्लिक करा.
08:55 आता आपण पाहु शकतो की server connection वर पोहोचू शकतो आणि कोर कनेक्शन ऍक्सेस केला जाऊ शकतो.
09:01 Step No. 8

पुढे आपण Solr server मधील उपलब्ध कन्टेन्ट इंडेक्स करू.

09:08 Default Solr content index च्या Edit बटणावर क्लिक करा.
09:12 आपण आपल्या गरजेनुसार सेटिंग्ज बदलू शकतो.
09:16 आतासाठी मी ते तसेच ठेवेन आणि तळाशी असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
09:21 आता आपण पाहू शकतो की 0 आयटम्स (वस्तू) Solr server मध्ये इंडेक्स आहेत.
09:27 सर्व कन्टेन्ट इंडेक्स करण्यासाठी, तळाशी Index now बटणावर क्लिक करा.
09:31 आपण पाहू शकतो की सर्व 20 कंटेंट्स Solr server मध्ये इंडेक्स केल्या आहेत.
09:36 यासह आपण Solr server आणि index दोन्ही यशस्वीपणे सक्षम केले आहेत.
09:41 Step No. 9 . पुढे आपण Solr search वापरुन आपले कंटेन्ट शोधणे शिकू.
09:48 त्यासाठी, प्रथम Structure वर जा, नंतर Views वर जा.
09:52 येथे आपण Solr search content view पाहू शकतो.
09:55 Solr search content च्या Edit बटणावर क्लिक करा.
09:59 लक्षात घ्या की Solr search content हे एक पृष्ठ आहे ज्याला path /Solr-search/content वर ऍक्सेस केला जाऊ शकतो.
10:09 तसेच आपण दृश्याचे प्रीव्यू पाहू शकतो.
10:12 आता आपण Solr search content पृष्ठ ऍक्सेस करू.
10:16 URL बारमध्ये, टाईप करा http://localhost:8080/drupal/solr-search/content
10:30 जर तुम्ही Bitnami Drupal Stack वापरत नाही तर localhost:8080 च्या ऐवजी localhost वापरा.
10:39 Solr शोध कंटेन्ट पृष्ठ आता दिसत आहे. Search फील्डमध्ये, टाईप करा Drupal. एंटर दाबा.
10:47 हे काही परिणाम दर्शविते ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे.
10:53 Step No. 10 पुढे आपण शोध निकालांचे वर्गीकरण करण्यासाठी Facets तयार करणे शिकू.
11:00 असे करण्यासाठी, Configuration टॅबवर जा. SEARCH AND METADATA अंतर्गत Facets वर क्लिक करा.
11:07 Add facet बटणावर क्लिक करा.
11:10 Facet source ड्रॉप डाउनमध्ये, स्त्रोत निवडा.
11:15 Field ड्रॉप डाउनमध्ये, facet फील्ड म्हणून आपण Title निवडू.
11:20 Name फील्डमध्ये, या Facet च्या नावाने मी Title टाईप करेल.
11:25 शेवटी कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा.
11:29 येथे आपण उपलब्ध प्रकारांमधून widget निवडू शकता.
11:34 मी आतासाठी List of links निवडत आहे.
11:37 उर्वरित सेटिंग्ज डीफॉल्ट म्हणून सोडा आणि कॉन्फिगरेशन सेव्ह करण्यासाठी Save बटणावर क्लिक करा.
11:44 Step No. 11

पुढे आपण Facet ला (समायोजित) सेट करण्यास शिकू जे आपण कॉन्फिगर केले आहे.

11:50 त्यासाठी Structure → Block layout वर जा.
11:54 Sidebar second region मध्ये ब्लॉकला ठेवण्यासाठी, Place block बटणावर क्लिक करा.
12:00 दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समध्ये, Title नावाचे Facet निवडा.
12:05 आपल्या गरजेनुसार ब्लॉक कॉन्फिगर करा. Save block बटणावर क्लिक करा.
12:11 Sidebar second region मध्ये Facet जोडले गेले आहे.
12:15 Step No. 12

पुढे आपण आपल्या Solr search content पृष्ठवर परत जाऊ आणि Facet कसे कार्य करते ते पाहू.

12:23 Search field मध्ये, टाईप करा Drupal. एंटर दाबा.
12:28 हे काही परिणाम दर्शविते ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे.
12:34 आपण शीर्षक दर्शवणारा Facet देखील पाहू शकतो ज्यामध्ये त्यांच्या कंटेन्ट अंतर्गत “Drupal” हा शब्द आहे.
12:41 हे सर्व Drupal8 मध्ये Solr search आणि Facets च्या इम्पलेमेंटेशनबद्दल (अंमलबजावणीबद्दल) आहे.
12:47 यासह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
12:51 थोडक्यात. या ट्युटोरिअलयामध्ये, आपण शिकलो- Solr एप्लिकेशन इन्स्टॉल करणे
12:57 composer द्वारे आवश्यक modules इन्स्टॉल करणे
13:00 Solr search API आणि Facets कॉन्फिगर करणे.
13:05 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
13:13 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

13:22 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD आणि NVLI , Ministry of Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13:33 या ट्यूटोरियलचे योगदान प्राची शर्मा यांनी केले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana