Difference between revisions of "Linux/C2/Ubuntu-Desktop-16.04/Marathi"
(Created page with "{| border=1 |- || '''Time''' || '''Narration''' |- || 00:01 || नमस्कार '''Ubuntu Linux Desktop 16.04''' वरील स्पोकन ट्युटोर...") |
|||
(One intermediate revision by the same user not shown) | |||
Line 221: | Line 221: | ||
|- | |- | ||
|| 05:14 | || 05:14 | ||
− | || इंटरनेट वर '''gedit Text Editor'' बद्दल भरपूर माहिती आहे. | + | || इंटरनेट वर '''gedit Text Editor''' बद्दल भरपूर माहिती आहे. |
|- | |- | ||
Line 427: | Line 427: | ||
|| आता परत येऊ. | || आता परत येऊ. | ||
− | + | '''Home folder''' मध्ये, आपण इतर '''folders''' पाहू शकतो जसे की, '''Desktop, Documents, Downloads,''' इत्यादी. | |
|- | |- | ||
Line 491: | Line 491: | ||
|- | |- | ||
|| 12:11 | || 12:11 | ||
− | || आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा | + | || आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |
|- | |- | ||
|} | |} |
Latest revision as of 14:08, 31 December 2018
Time | Narration |
00:01 | नमस्कार Ubuntu Linux Desktop 16.04 वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:09 | या ट्युटोरिअलमध्ये आपण gnome एन्व्हायरन्मेंटवर उबंटू लिनक्स डेस्कटॉप बद्दल शिकणार आहोत . |
00:17 | आणि उबंटू डेस्कटॉप वर काही सामान्य एप्लिकेशन्स (अनुप्रयोग) |
00:22 | हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 16.04 O S (ऑपरेटिंग सिस्टिम) वापरत आहे. |
00:29 | उबंटू डेस्कटॉप असे दिसते. |
00:33 | स्क्रीनच्या डाव्या बाजूला तुम्हाला 'लाँचर' दिसेल. |
00:37 | आपण 'लाँचर' कसा लपवू शकतो? |
00:40 | असे करण्यासाठी डाव्या बाजूला 'लाँचर' वर जा.
System Settings icon वर क्लिक करा. |
00:47 | System Settings विंडोमध्ये, Appearance वर क्लिक करा. |
00:51 | Appearance विंडोमध्ये, Behavior टॅबवर क्लिक करा. |
00:56 | येथे, Auto-hide the Launcher ची स्थिती ON करा. |
01:01 | आता, 'लाँचर' लपविला जाईल. |
01:04 | येथे दर्शविल्याप्रमाणे, 'लाँचर' लपवले असल्यास, नंतर आपण ते पुन्हा दृश्यमान करु शकतो. |
01:10 | असे करण्यासाठी, कर्सर स्क्रीनच्याअगदी डावीकडे हलवा. |
01:15 | 'लाँचर' दृश्यमान होईल. |
01:18 | कर्सर लांब न्या आणि लाँचर पुन्हा लपविला जाईल. |
01:23 | Appearance विंडोवर परत जा आणि Auto-hide the Launcher ची स्थिती OFF करा. |
01:30 | विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला लहानश्या X icon वर क्लिक करून ही विंडो बंद करा. |
01:37 | लक्ष द्या, डिफॉल्ट रूपात लाँचरवर काही आयकॉन्स आहेत. |
01:42 | लाँचरच्या वर तुम्ही Dash home icon पाहू शकता. |
01:47 | Dash home हा एक इंटरफेस आहे जो स्क्रीनमध्ये 'उबंटू लिनक्स' मधील सर्व applications मध्ये प्रवेश देतो. |
01:55 | Dash home उघडण्यासाठी त्यावर क्लिक करा. |
01:59 | मुख्य रूपात वरती तुम्हाला search bar फील्ड दिसेल. |
02:04 | आता आपण एक विशिष्ट एप्लिकेशन कसे शोधू? तुम्ही ज्या एप्लिकेशनला शोधत आहात त्याचे फक्त नाव टाइप करा आणि तुम्हाला ते लगेच सापडेल.
हे इतके सोपे आहे. |
02:16 | आपण Calculator एप्लिकेशन शोधण्याचा प्रयत्न करूया. |
02:20 | तर search bar फील्डमध्ये टाईप करा C a l c. |
02:26 | c a l c नावाचे सर्व applications सूचीबद्ध होतील. |
02:32 | येथे पहा - LibreOffice Calc आणि Calculator दोन्ही सूचीबद्ध आहेत. |
02:37 | Calculator आयकॉनवर क्लिक करा.
Calculator application आता स्क्रीनवर उघडेल. |
02:45 | Calculator अंकगणित, वैज्ञानिक किंवा आर्थिक गणना करण्यास मदत करते. |
02:52 | आता काही सोप्या गणनेचा प्रयत्न करूया. |
02:55 | 5 asterix 8 टाइप करा आणि equal to चिन्हावर क्लिक करा. |
03:02 | equal to चिन्हावर क्लिक करण्याऐवजी, तुम्ही कीबोर्डवरील Enter की देखील दाबू शकता. |
03:09 | उत्तर Calculator वर प्रदर्शित केले आहे. |
03:13 | त्याचप्रमाणे, आपण Calculator एप्लिकेशन वापरून सर्व प्रकारच्या गणना करू शकतो. |
03:20 | आता विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला लहानश्या X icon वर क्लिक करून या Calculator मधून बाहेर या. |
03:28 | उबंटू लिनक्स OS मधील काही इतर महत्वाच्या एप्लिकेशन्सबद्दल परिचित होऊया. |
03:34 | त्यासाठी आपण Dash home वर परत जाऊ. |
03:38 | Search bar मध्ये, gedit टाईप करू . उबंटू लिनक्स OS मध्ये gedit हा डिफॉल्ट Text Editor आहे. |
03:48 | Text Editor आयकॉन खाली दिसेल. हे उघडण्यासाठी त्यावर क्लिक करूया. |
03:55 | सध्या आपण स्क्रीनवर जे पहाता ते gedit Text Editor विंडो आहे. |
04:00 | मी येथे काही टेक्स्ट टाईप करते.
उदाहरणार्थ, '"Hello World"' टाइप करा. |
04:07 | फाइल सेव्ह करण्यासाठी, कीबोर्डवरील Ctrl आणि S कीज एकाचवेळी दाबा. |
04:14 | अन्यथा आपण File वर आणि नंतर Save वर क्लिक करू शकता. |
04:20 | आता, “Save as” नावाचा एक डायलॉग बॉक्स उघडतो.
जिथे फाईल सेव्ह करायची आहे त्यासाठी ते filename आणि त्याचे स्थान विचारते. |
04:31 | तर '"Hello.txt"' म्हणून नेम टाईप करा. |
04:36 | .txt हे text file चे डिफॉल्ट एक्सटेंशन आहे. |
04:41 | आणि स्थानासाठी Desktop निवडू.
आणि खाली Save बटणावर क्लिक करा. |
04:49 | विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला लहानश्या X icon वर क्लिक करून आता ही gedit विंडो बंद करू. |
04:57 | डेस्कटॉप वर, आपण Hello.txt फाईल पाहू शकतो.
याचा अर्थ आपली text file यशस्वीरीत्या सेव्ह झाली आहे. |
05:05 | मी फाईलवर डबल क्लिक करून ती उघडते. |
05:09 | पहा आपली text file आपल्या लिखित मजकूरासह उघडली आहे. |
05:14 | इंटरनेट वर gedit Text Editor बद्दल भरपूर माहिती आहे. |
05:19 | या वेबसाईटवर या विषयावर काही स्पोकन ट्यूटोरियल देखील उपलब्ध आहेत. |
05:25 | हा text editor बंद करू आणि दुसरा एप्लिकेशन म्हणजेच Terminal पहा. |
05:32 | तर पुन्हा एकदा Dash home वर जाऊ.
आता search bar field मध्ये terminal शब्द टाईप करा. |
05:41 | Terminal आयकॉनवर क्लिक करा, जे खाली दिसत आहे. |
05:45 | terminal विंडो स्क्रीनवर उघडेल.
कृपया लक्षात घ्या: Terminal उघडण्यासाठी शॉर्टकट Ctrl + Alt + T कीज आहे. |
05:55 | terminal ला command line देखील म्हणतात.
हे असे आहे कारण कि आपण येथून कॉम्प्युटरला कमांड करू शकता. |
06:02 | प्रत्यक्षात ते GUI पेक्षा अधिक प्रभावी आहे. |
06:06 | मी Terminal विंडोवर परत जाते. |
06:09 | टर्मिनलचा अनुभव घेण्यासाठी आता एक कमांड टाइप करूया.
टाईप करा ls आणि Enter दाबा. |
06:18 | वर्तमान directory मधील सर्व files आणि folders ची यादी तुम्ही पाहू शकता. |
06:23 | येथे Home folder मधून files आणि folders प्रदर्शित होत आहेत. |
06:28 | Home folder म्हणजे काय हे आपण नंतरच्या ट्युटोरिअल मध्ये पाहू. |
06:33 | आता आपण टर्मिनल वर जास्त वेळ घालवू शकणार नाही. |
06:37 | विंडोच्या वरच्या डाव्या बाजूला लहानश्या X icon वर क्लिक करून terminal बंद करा. |
06:43 | Terminal कमांड्स या वेबसाइटवरील Linux स्पोकन ट्युटोरियल शृंखलामध्ये स्पष्टपणे समजावून सांगितले आहे. |
06:49 | आता आपण दुसरे एप्लिकेशन म्हणजे Firefox Web Browser वर जाऊ. |
06:55 | पुन्हा एकदा, Dash home उघडा. search bar मध्ये Firefox टाईप करा. |
07:01 | Firefox Web Browser आयकॉन वर क्लिक करा. |
07:05 | Firefox Web Browser हा world wide web मध्ये प्रवेश करण्यासाठी वापरला जातो.
आता आपण हे पाहू शकतो की Firefox browser विंडो उघडली आहे. |
07:15 | spoken tutorial वेबसाईटवर जाऊ.
त्यासाठी, address bar वर क्लिक करा किंवा कीबोर्डवरील F6 दाबा. |
07:24 | आता '"spoken-tutorial.org टाईप करा आणि एंटर दाबा. |
07:31 | जर तुमच्याकडे Internet कनेक्टिव्हिटी असेल, तर Firefox दिलेल्या वेबसाइटशी कनेक्ट होईल. |
07:37 | Spoken Tutorial Homepage ब्राऊजरवर उघडेल. |
07:41 | आधी सांगितल्याप्रमाणे हे बंद करा आणि पुढच्या एप्लिकेशनवर जाऊया. |
07:47 | तर पुन्हा एकदा Dash home वर जाऊ आणि search bar मध्ये office टाईप करा. |
07:53 | तुम्हाला विविध LibreOffice घटक दिसतील जसे कि Calc, Impress, Writer आणि Draw. |
08:01 | LibreOffice हा उबंटू लिनक्स OS मध्ये डिफॉल्ट office application आहे. |
08:07 | या सर्व घटकांसाठी उत्कृष्ट ट्यूटोरियल स्पोकन ट्यूटोरियल वेबसाइटवर उपलब्ध आहेत. |
08:13 | आता आपण Video पर्यायाचा शोध घेऊ. |
08:17 | search bar मध्ये video टाईप करा. |
08:20 | प्रदर्शित सूचीमध्ये, आपल्याकडे Videos नावाचा एक एप्लिकेशन आहे. |
08:25 | Videos हे विडिओ आणि गाणी प्ले करण्यासाठी वापरले जाते. डीफॉल्टनुसार, ते केवळ open format व्हिडिओ फायली प्ले करते. |
08:34 | तर मी माझ्या pen-drive मधून एक नमुना (सॅम्पल) फाईल प्ले करते. |
08:38 | आता मी माझ्या मशीनवर usb slot मध्ये माझे pen-drive समाविष्ट करते.
pen-drive folder स्वयंचलितपणे उघडले आहे. |
08:47 | जर ते उघडत नसेल तर, आपण त्यास launcher वरुन ऍक्सेस करू शकतो. |
08:52 | launcher वर pen-drive icon शोधा. |
08:56 | जर आपण त्यावर क्लिक केले तर, ते आपल्याला pen-drive वरील उपलब्ध files आणि folders दर्शविते. |
09:02 | आता मी प्ले करण्यासाठी big buck bunny.ogv मूव्ही फाईल निवडेल. |
09:08 | येथे माझी फाईल आहे. उघडण्यासाठी मी त्यावर डबल क्लिक करेल. |
09:14 | हे डिफॉल्टनुसार Videos मध्ये उघडते. |
09:17 | मूव्ही प्ले करणे थांबवू. |
09:20 | आता Desktop वर जाण्यासाठी Ctrl, Windows आणि D कीज दाबा. |
09:26 | आता या डेस्कटॉपवरील काही महत्त्वाच्या गोष्टी पाहू या. |
09:31 | launcher मध्ये उपस्थित folder icon वर लक्ष द्या. त्यावर क्लिक करूया. |
09:37 | Home folder उघडेल. |
09:39 | प्रत्येक वापरकर्त्याकडे उबंटू लिनक्समध्ये एक विशिष्ट Home folder असते. |
09:44 | आपण असे म्हणू शकतो की Home folder हे "आमचे घर" आहे, जिथे आपण आपली files आणि folders संचयित करू शकतो.
जोपर्यंत आपण परवानगी देत नाही तोपर्यंत इतर त्यांना पाहू शकत नाहीत. |
09:56 | file permissions वरील अधिक माहिती लिनक्स स्पोकन ट्युटोरिअल शृंखलामध्ये उपलब्ध आहे. |
10:03 | आता परत येऊ.
Home folder मध्ये, आपण इतर folders पाहू शकतो जसे की, Desktop, Documents, Downloads, इत्यादी. |
10:14 | Linux मध्ये सर्वकाही एक file आहे.
Desktop folder वर डबल क्लिक करून ते उघडूया. |
10:21 | येथे आपण पाहु शकतो की "hello.txt" ही फाईल आपण टेक्स्ट एडिटरमधून सेव्ह केली आहे. |
10:28 | तर हा 'फोल्डर' आणि 'डेस्कटॉप' सारखेच आहे. |
10:32 | आता मी हा फोल्डर बंद करते.
या ट्युटोरिअलसाठी बस एवढेच. थोडक्यात. |
10:39 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो, उबंटू डेस्कटॉप, लाँचर आणि त्यावर उपलब्ध काही आयकॉन्स बद्दल. |
10:49 | काही सामान्य एपिकेशन्स जसे कि Calculator, Text Editor, Terminal, Firefox Web Browser, Videos आणि LibreOffice Suite घटक आणि Home folder . |
11:04 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
11:12 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:25 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
11:30 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.
तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
11:40 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
11:50 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
11:59 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:11 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |