Difference between revisions of "LibreOffice-Suite-Draw/C2/Basics-of-working-with-objects/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Kavita salve (Talk | contribs) (Created page with '{| border=1 || Time || Narration |- ||00.02 || LibreOffice Draw मधील ''मुलभूत ऑब्जेक्ट्स सह कार्य'' या स्पोक…') |
Kavita salve (Talk | contribs) |
||
Line 142: | Line 142: | ||
|- | |- | ||
||03.14 | ||03.14 | ||
− | || कीबोर्ड वरील " Shift” कि दाबा. डावे माउस बटण पकडा आणि | + | || कीबोर्ड वरील " Shift” कि दाबा. डावे माउस बटण पकडा आणि बाणास हैन्ड्ल वापरून खाली drag करा. |
|- | |- | ||
||03.25 | ||03.25 |
Revision as of 15:46, 3 June 2013
Time | Narration |
00.02 | LibreOffice Draw मधील मुलभूत ऑब्जेक्ट्स सह कार्य या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत. |
00.08 | या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही, |
00.11 | ऑब्जेक्ट्स कट, कॉपी, पेस्ट, |
00.14 | हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे. |
00.17 | ऑब्जेक्ट्स मांडणी, |
00.19 | ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत, |
00.21 | समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित, |
00.24 | समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकू. |
00.28 | येथे आपण Ubuntu Linux Verson 10.04 आणि LibreOffice Suit Verson 3.3.4. वापरत आहोत. |
00.37 | डेस्कटॉंप वर सेव असलेली “WaterCycle” फ़ाइल उघडू. |
00.42 | या चित्रा मध्ये आणखीन तीन ढग कॉपी आणि पेस्ट करू. |
00.47 | प्रथम ढग निवडा. Context मेन्यु पाहण्यास right-click करून “Copy” वर क्लिक करा. |
00.54 | नंतर, पेज वर कर्सर ठेवा पुन्हा Context मेन्यु साठी right-click करून “Paste” वर क्लिक करा. |
01.02 | आपण फक्त एक ढग पाहू शकतो. |
01.05 | कॉपी आणि पेस्ट केलेले ढग कुठे आहेत? |
01.08 | कॉपी केलेला ढग वरील मूळ ढगावर पेस्ट झाला आहे. |
01.13 | ढग निवडून डावीकडे स्थानांतरीत करू. |
01.17 | अशाप्रकारे आणखीन एक ढग तयार करू. |
01.21 | ढग निवडा. Context मेन्यु पाहण्यास right-click करून “Copy” वर क्लिक करा. |
01.26 | पुन्हा Context मेन्यु साठी right-click करून “Paste” वर क्लिक करा. |
01.30 | कॉपी केलेला ढग निवडा आणि डावीकडे स्थानांतरीत करा. |
01.37 | ऑब्जेक्ट्स प्रती बनविण्यास शॉर्ट कट कीज वापरू शकता. |
01.41 | ऑब्जेक्ट्स कॉपी करण्यास CTRL+C |
01.44 | पेस्ट करण्यास CTRL+V |
01.47 | कट करण्यास CTRL+X |
01.50 | ढग निवडा आणि CTRL आणि C किज एकत्र दाबा. |
01.55 | ढग कॉपी झाला आहे. |
01.57 | पेस्ट साठी cntrl आणि v किज एकत्र दाबा. |
02.02 | ढग निवडून हव्या त्या जागेवर स्थानांतरीत करा. |
02.08 | हे ट्यूटोरियल थांबवून Assignment करा. |
02.11 | draw फ़ाइल ला दोन पेज जोडा. |
02.14 | पहिल्या पेज वर दोन ऑबजेक्ट काढा. |
02.18 | ऑब्जेक्ट ,पेज वन वरून पेज टू वर कॉपी करा. |
02.22 | कॉपी केलेला ऑब्जेक्ट्स कुठे आहे तपासा. |
02.25 | ऑब्जेक्ट कट आणि पेस्ट करा. या साठी शॉर्ट-कट कीज वापरू शकता.
|
02.31 | कट करताना ऑब्जेक्ट ची प्रत बनली आहे का ते तपासा. |
02.36 | ढगाचा आकार कमी करू. |
02.38 | प्रथम, त्यास निवडा. |
02.40 | आता हैन्ड्ल्स दिसत आहे. |
02.43 | नंतर एका हैन्ड्ल वर बाणाचे टोक दिसेपर्यंत कर्सर ठेवा. |
02.50 | माउस चे डावे बटण पकडा आणि ढग लहान करण्यास बाण आतल्या बाजूने drag करा. |
02.57 | यास मोठे करण्यास बाण बाहेरच्या बाजूने drag करा. |
03.00 | हा बाण अधिक लांब करण्यास त्यास निवडा. |
03.04 | आता, एखाद्या हैन्ड्ल वर कर्सर आणा. |
03.07 | लहान पारदर्शक बाण चौकोन सोबत कर्सर च्या टोका खाली दिसत आहे. |
03.14 | कीबोर्ड वरील " Shift” कि दाबा. डावे माउस बटण पकडा आणि बाणास हैन्ड्ल वापरून खाली drag करा. |
03.25 | Shift कि दाबून ऑब्जेक्ट्स चा आकार बदलणे फार सोपे आहे. हो ना? |
03.32 | हैंडल्स वापरून ऑब्जेक्ट चा आकार बदलण्यास “Dynamic Resizing” म्हणतात. |
03.38 | याचा अर्थ आपण खरे माप नाही वापरत आहोत. |
03.42 | ऑब्जेक्ट्स चा अचूक आकार बदलणे आपण पुढच्या ट्यूटोरियल मध्ये शिकू. |
03.47 | अशाप्रकारे या आयताची रुंदी वाढवू. |
03.52 | आयत निवडा . कीबोर्ड वरील Shift कि दाबा आणि वरच्या बाजूस drag करा. |
03.59 | खाली Draw विंडो वरील “Status” बार कडे पहा. |
04.03 | लक्ष द्या आयताचा आकार पुन्हा बदलल्यास त्याचा विस्थार सुद्धा बदलतो. |
04.09 | “Status” बार बदललेल्या ऑब्जेक्ट्स चे स्थान आणि विस्तार दर्शवितो. |
04.16 | येथे दाखविल्या प्रमाणे ढग आणि सूर्य क्रमाने लावू. |
04.20 | ढगांना ओळखण्यास, सुरवातीपासून डावीकडून उजवीकडे त्यांना 1, 2, 3, 4, असे क्रमांक देऊ. |
04.29 | क्रमांक देण्यास ढग निवडून त्यावर डबल क्लिक करा आणि 1 टाईप करा. |
04.36 | अशाप्रकारे इतर ढगांना हि क्रमांक द्या. |
04.44 | चौथा ढग निवडून सूर्यावर ठेवू. |
04.49 | याला सूर्याच्या मागे टाकण्यास context मेन्यु साठी ढगावर right-click करा. |
04.55 | “Arrange” वर क्लिक करून “Send Backward” निवडा. |
04.58 | चौथा ढग आता सूर्याच्या मागे आहे. |
05.02 | “Send Backward” एका लेयर ऑब्जेक्ट्स ला उपस्थित ऑबजेक्ट च्या मागे टाकते. |
05.07 | तीन नंबर ढग निवडून सूर्याच्या वर ठेवू. |
05.12 | context मेन्यु साठी Right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Send to Back” पर्याय निवडा. |
05.18 | तिसरा ढग सूर्याच्या आणि चौथ्या ढगाच्या मागे गेला आहे. |
05.23 | “Send to Back” ऑबजेक्ट ला शेवटच्या लेयर मध्ये पाठवितो. |
05.28 | स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढगांना अरेंज करणे सोपे आहे. |
05.32 | चार नंबर ढग निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Bring to Front” निवडा. |
05.40 | “Bring to Front” ऑब्जेक्ट्स, पहिल्या लेयर मध्ये घेतो. |
05.44 | तिसरा ढग निवडा. context मेन्यु साठी right-click करून “Arrange” वर क्लिक करा आणि “Bring Forward” निवडा. |
05.52 | “Bring Forward” ऑब्जेक्ट्स ला पहिल्या लेयर पुढे घेतो. |
05.57 | आता, दुसऱ्या ढगाला निवडून पहिल्या ढगावर ठेवा. |
06.01 | स्लाईड मध्ये दाखविल्या प्रमाणे ढग रचले आहेत. |
06.07 | ढगावरील अंक डिलीट करू. |
06.10 | असे करण्यास, ढग निवडून डबल क्लिक करा. नंतर अंक निवडा आणि किबोर्ड वरील Delete कि दाबा. |
06.23 | या Assignment साठी ट्यूटोरियल थांबवा. |
06.26 | वर्तुळ, चौकोन, आणि चांदणी काढून खाली दाखविल्या प्रमाणे त्यास ठेवा. |
06.32 | प्रत्येक ऑब्जेक्ट निवडून arrange मेन्यु मधील सर्व पर्याय लागू करा. |
06.38 | प्रत्येक पर्याय साठी चित्राचे स्थान कसे बदलते ते पहा. |
06.44 | या स्लाईड वर दाखविल्या प्रमाणे ऑब्जेक्ट ठेवा आणि “bring to front" आणि “sent to back" पर्याय तपासा. |
06.53 | चला, जसे या स्लाईड मध्ये दर्शित असल्याप्रमाणे, Water Cycle diagram मध्ये झाड जोडू. |
06.59 | आपण ब्लॉक एरो आणि एक्सप्लोजन वापरून झाड काढू. |
07.05 | Insert नंतर Slideवर क्लिक करून या Draw file मध्ये नवीन पेज जोडू. |
07.11 | हे आपल्या फाइल मध्ये नवीन पेज जोडेल. |
07.15 | झाडाचे खोड काढण्यास Drawing टूलबार वरून “Block Arrows” निवडा. |
07.21 | उपलब्ध आकार पाहण्यास लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा आणि “Split Arrow” निवडा. |
07.28 | कर्सर पेज वर ठेवा आणि माउस चे डावे बटण पकडून खाली आणि बाजूला drag करा. |
07.35 | झाडाचे खोड दोन फांदी सह काढले आहे. |
07.39 | फांन्दयाना पाने जोडू. |
07.42 | Drawing टूलबार वरून Stars निवडा. |
07.45 | लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून “Explosion” निवडा. |
07.51 | आता, draw पेज वर जाऊ, कर्सर बाणाच्या च्या डाव्या फांदी वर ठेवा. आकार काढण्यास माउस चे डावे बटन पकडून डाव्या बाजूला drag करा. |
08.01 | आपण झाडाला पाने जोडली आहे. |
08.04 | आपण या आकाराला झाडाच्या उजव्या फांदी वर हि कॉपी करू शकतो. |
08.09 | आकार निवडा. |
08.11 | कॉपी साठी कीबोर्ड वरील CTRL+C key दाबा. |
08.15 | पेस्ट साठी CTRL+V key दाबा. |
08.19 | आता, आकाराला झाडाच्या फांदीच्या उजव्या बाजूला घ्या. |
08.22 | आपण झाड काढले आहे. |
08.25 | झाडाला निवडून खाली घेऊ. |
08.28 | फक्त झाडाचे खोड खाली येते, पाने नाही. |
08.32 | येथे "झाडाचे खोड" आणि दोन "पाने" भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे. |
08.38 | आता झाडाचे खोड जिथे होते तिथे हलवू. |
08.41 | "झाडाचे खोड" आणि दोन "पानांना" एक घटक मध्ये एकत्र कसे करतात ते शिकू. |
08.47 | गटातील कोणताही बदल त्या गटातील सर्व ऑब्जेक्टस ला लागू होईल. |
08.53 | प्रथम, पेज वर क्लिक करा, ज्यामुळे कोणताही ऑब्जेक्ट निवडल्या जाणार नाही. |
08.58 | नंतर Drawing टूलबार वरून "Select" वर क्लिक करा. |
09.02 | कर्सर पेज वर आणून page वर क्लिक करा. |
09.05 | माउस चे डावे बटण दाबून drag केल्यास सर्व ऑब्जेक्ट निवडले जातील. |
09.11 | तुम्हाला बिन्दुकित आयत दिसेल. |
09.14 | खात्री करा झाडाचे सर्व ऑब्जेक्ट या आयतामध्ये निवडले आहेत. |
09.20 | एकांतरित, तुम्ही Shift बटण दाबून आणि नंतर प्रत्येक ऑब्जेक्ट वर क्लिक करून दोन किंवा अधिक ऑब्जेक्ट निवडू शकता. |
09.28 | context मेन्यु साठी Right-click करून “Group” निवडा. |
09.32 | झाडातील कोणत्याही ऑब्जेक्ट वर क्लिक करा. |
09.36 | एक ऑब्जेक्ट चा भाग असल्यास हैंडल्स दिसतील. |
09.40 | हे ऑब्जेक्ट एका घटका प्रमाणे हाताळले आहे. |
09.45 | त्यांना अवर्गीकृत जसे भिन्न ऑब्जेक्ट करण्यास, झाड निवडा, Right-click करा आणि “Ungroup” निवडा. |
09.52 | ऑब्जेक्ट अवर्गीकृत होऊन, तीन भिन्न ऑब्जेक्ट प्रमाणे हाताळले आहे. |
09.56 | त्यांचे पुन्हा गट करू. |
09.58 | Shift कि दाबा आणि एका नंतर एक ऑब्जेक्ट निवडा. |
10.03 | Right click क्लिक करून 'group" निवडा. |
10.06 | झाडाला आपल्या मुख्य पेज वर कॉपी करू. |
10.10 | पेज एक वर कॉपी करण्यास CTRL+C, आणि पेस्ट करण्यास CTRL+V. |
10.17 | समजा गटातील एक ऑब्जेक्ट संपादित करायचा असल्यास आपण काय करू? |
10.23 | चला मी ऑब्जेकट्स अवर्गीकृत आणि पुन्हा वर्गीकृत करण्या शिवाय, असे करण्याचा सोपा मार्ग दाखवितो. |
10.30 | group निवडून context मेन्यु साठी Right-Click करा. |
10.33 | “Enter Group” निवडा. |
10.35 | लक्ष द्या गटाच्या बाहेरील सर्व ऑब्जेकट्स निर्योग्य झालेत. |
10.39 | फक्त गटातील ऑब्जेक्ट संपादित करू शकता. |
10.43 | उदाहरणार्थ, झाडाच्या उजव्या बाजूवरील पाने निवडून त्यांचा आकार कमी करू. |
10.51 | यास अन्डू करण्यास Ctrl + 'Z' दाबा आणि पुढे जा. |
10.56 | झाडाचा आकार कमी करायला हवा, म्हणजे Water Cycle drawing मध्ये ते योग्य बसेल. |
11.02 | आपल्याला गटाच्या 'Edit' मोड बाहेर यायला हवे. |
11.05 | गटाच्या बाहेर येण्यास पेज वर कर्सर ठेवा right-click करून “Exit group” निवडा. |
11.13 | आता आपण गटाच्या Edit मोड बाहेर आहोत. |
11.16 | झाड निवडा आणि कर्सर ला खाली उजव्या हैंडल वर आणा. |
11.21 | कर्सर बाणाचा आकार बदलण्यास वळेल. |
11.24 | बाणास आतल्या बाजूस drag करा. |
11.26 | आपण झाडाचा आकार कमी केला आहे. |
11.29 | या चित्रात आणखीन तीन झाड जोडू. |
11.32 | झाड निवडा, कॉपी साठी CTRL+C आणि पेस्ट साठी तीन वेळा CTRL+V. |
11.39 | हे झाडाच्या तीन प्रती बनवेल. |
11.41 | आपण त्यास हव्या त्या स्थानी घेवू. |
11.45 | सर्व झाडा साठी हि पायरी पुन्हा करा. |
11.51 | लक्षात घ्या प्रत्येक झाड तीन ऑब्जेक्ट ने बनले आहे. |
11.55 | प्रत्येक झाड स्वतः एक गट आहे. |
11.58 | आपण ऑब्जेक्ट चे गट बनविले आहे. |
12.01 | चित्रात पाण्याचा भाग जोडू. |
12.04 | पाण्याला परिणाम देण्यास, आयत च्या पुढे त्रिकोण जोडू आणि नंतर वक्र जोडू. |
12.12 | त्रिकोण काढण्यास “Drawing” टूलबार वरून “Basic shapes” निवडा. |
12.18 | लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करून “Right Triangle” निवडा. |
12.24 | त्यास काढून आयत च्या पुढे ठेवू. |
12.28 | पाण्याच्या हालचाली दाखविण्यास वक्र रंगाने भरलेला काढू. |
12.34 | “Drawing” टूलबार वरून “Curve” निवडा. “Freeform Line, Filled” निवडा. |
12.42 | त्रिकोणाच्या वरच्या टोकावर कर्सर ठेवा. माउस चे डावे बटण दाबून खाली drag करा. |
12.49 | वक्र ला थोडेसे जुळवून घेवू, म्हणजे पाणी वाहते दिसेल. |
12.56 | त्रिकोण आणि वक्र एकत्र पाणी बनवितात, त्यांचा एक ऑब्जेक्ट चा गट बनवू. |
13.03 | “Drawing” टूलबार वरून Select वर क्लिक करा. |
13.07 | कर्सर ला पेज वर आणा, माउस चे डावे बटण दाबून त्रिकोण आणि वक्र समावेश करा. |
13.16 | Right-click आणि Group निवडा. |
13.18 | आपणWater Cycle ची मूळ रूपरेषा काढली आहे. |
13.23 | तुमच्या साठी Assignment आहे. |
13.26 | हे चित्र स्वतःहून काढा. |
13.30 | हे ट्यूटोरियल येथे संपत आहे. |
13.33 | या मध्ये तुम्ही, ऑब्जेक्ट सह मुलभूत कार्य करणे शिकलात. तसेच तुम्ही, |
13.39 | ऑब्जेक्ट्स कट, कॉपी, पेस्ट, |
13.42 | हैन्ड्ल्स वापरून ऑब्जेक्ट्स चा आकार प्रभावीपणे बदलणे. |
13.46 | ऑब्जेक्ट्स क्रमबद्ध, |
13.48 | ऑब्जेक्ट्स समुहित असमुहीत, |
13.50 | समूहातील विशिष्ट ऑब्जेक्ट्स संपादित, |
13.53 | समूहात ऑब्जेक्ट्स स्थानांतरीत करणे शिकलात. |
13.57 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
14.01 | ज्या मध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल. |
14.04 | जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तर व्हिडीओ download करूनही पाहू शकता . |
14.08 | स्पोकन टयटोरियल प्रोजेक्ट टीम. |
14.11 | स्पोकन टयूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14.14 | परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. |
14.18 | अधिक माहिती साठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
14.24 | स्पोकन टयूटोरियल प्रोजेक्ट हे 'talk to teacher ' चा भाग आहे. |
14.28 | यासाठी अर्थसहाय्य the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळाले आहे. |
14.36 | या संबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. spoken-tutorial.org/NMEICT-intro. |
14.47 | या टयूटोरियल चे भाषांतर कविता साळवे यांनी केलेले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |