Difference between revisions of "OpenFOAM/C3/Unstructured-mesh-generation-using-Gmsh/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 10: | Line 10: | ||
| 00:06 | | 00:06 | ||
| या पाठात शिकणार आहोत: | | या पाठात शिकणार आहोत: | ||
− | + | '''GMSH''' मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे | |
प्लेन ''' surfaces''' बनवणे | प्लेन ''' surfaces''' बनवणे | ||
'.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. | '.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. |
Latest revision as of 12:34, 5 March 2018
Time | Narration |
00:01 | नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Unstructured Mesh generation using GMSH या पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात शिकणार आहोत:
GMSH मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे प्लेन surfaces बनवणे '.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. |
00:18 | या पाठासाठी मी:
उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04 GMSH वर्जन 2.8.5 OpenFOAM वर्जन 2.4.0 वापरत आहे. |
00:30 | हा पाठ Creation of sphere using GMSH या पाठाचा पुढील भाग आहे. |
00:35 | मागील पाठात GMSH च्या सहाय्याने गोलाकृती तयार करायला शिकलो. |
00:40 | तुम्हाला हे माहित नसल्यास वेबसाईटवरील OpenFOAM च्या पाठांच्या मालिकेमधील GMSH वरील पाठ बघा. |
00:48 | हे आपले प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे. हे चित्र फ्लो डायरेक्शन आणि बाऊंडरी फेसेस दाखवत आहे.
आता GMSH च्या सहाय्याने अन्स्ट्रक्चर्ड मेश कसे तयार करायचे ते बघू. |
01:01 | लक्षात ठेवा, 45 X 30 X 30 हा डोमेनचा आकार असून गोलाकृतीची त्रिज्या 1 आहे. तथापि प्रत्येक प्रॉब्लेमनुसार ही डायमेन्शन्स बदलू शकतात. येथे दाखवल्याप्रमाणे डोमेनचे बिंदू आहेत. |
01:18 | आता GMSH वर जाऊ. ही मागील पाठात तयार केलेली गोलाकृती आहे. |
01:24 | तसेच मी डोमेनचे सर्व बिंदू व रेषा तयार केल्या आहेत. डोमेनचे बिंदू तयार करण्यासाठी कृपया मागे नमूद केलेला पाठ पहा. |
01:36 | आता plane surface पर्याय निवडा. नंतर पृष्ठभागासाठी संबंधित बाजू निवडा. निवडलेल्या बाजू लाल रंगात दाखवल्या जातील. |
01:48 | सिलेक्शन कार्यान्वित करण्यासाठी कीबोर्डवरील E दाबा. असे केल्यावर तुटक रेषा दिसतील. |
01:57 | ही प्रक्रिया सर्व पृष्ठभाग तयार होईपर्यंत करा. |
02:02 | आता Physical Groups पर्याय निवडून Add आणि नंतर Surface वर क्लिक करा. |
02:10 | आता वॉलसाठी हे चारही पृष्ठभाग सिलेक्ट करून E बटण दाबा. |
02:17 | इनलेटसाठी पुढील पृष्ठभाग सिलेक्ट करून E दाबा. |
02:21 | आऊटलेटसाठी मागील पृष्ठभाग सिलेक्ट करून E दाबा. |
02:26 | GMSH बंद करा. |
02:29 | आता sphere1.geo ही फाईल gEdit या टेक्स्ट एडिटरमधे उघडा. लक्षात घ्या या फाईलमधे काही गोष्टी समाविष्ट करायच्या आहेत. तसेच एंटीटीजचे आयडेंटीफिकेशन नंबर्स हे मागील मालिकेचाच पुढील भाग असणार आहेत. |
02:47 | मागे केल्याप्रमाणे संख्यात्मक व्हॅल्यूज बदला. त्याजागी डोमेन मेश व्हेरिएबलसाठी d हे अक्षर वापरा. |
02:56 | नंतर फाईलच्या सुरूवातीला टाईप करा: "d = 0.5;" |
03:02 | बाऊंडरीजला नाव देण्यासाठी येथे दाखवल्याप्रमाणे संख्यात्मक व्हॅल्यू बदलून तुमच्या पसंतीचे नाव द्या. |
03:09 | इंटरफेसमधे बनवलेला पहिला भौतिक पृष्ठभाग म्हणजे wall. त्यामुळे येथे हे बदलून "wall" करू. |
03:18 | इंटरफेसमधे बनवलेला दुसरा भौतिक पृष्ठभाग म्हणजे इनलेट म्हणून येथे हे बदलून "inlet" करू. |
03:27 | इंटरफेसमधे बनवलेला तिसरा भौतिक पृष्ठभाग म्हणजे आऊटलेट म्हणून येथे हे बदलून "outlet" करू. |
03:36 | आता टाईप करा: "Surface Loop" नंतर कंसात ID जो पुढील पूर्णांक संख्या आहे. पुढे इक्वल टू महिरपी कंसात डोमेनच्या सर्व पृष्ठभागांचे ID जे 43, 45, 47, 49, 51 आणि 53 अशाप्रकारे आहेत. |
03:59 | घनफळ निश्चित करण्यासाठी टाईप करा "Volume" कंसात पुढील पूर्णांक संख्या पुढे इक्वल टू महिरपी कंसात दोन पृष्ठभागांचे ID जे 29 आणि 57 असे आहेत. |
04:20 | भौतिक घनफळ निश्चित करण्यासाठी टाईप करा "Physical Volume" कंसात पुढील पूर्णांक संख्या पुढे इक्वल टू महिरपी कंसात घनफळाचा ID जो 58 आहे. |
04:35 | ही फाईल सेव्ह करून बंद करा. आता टर्मिनलवर "gmsh sphere1.geo" टाईप करून एंटर दाबा व GMSH पुन्हा उघडा. |
04:48 | GMSH मधे खालून वर अशा दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे. म्हणजेच प्रथम 1D mesh तयार केला.
1D mesh वापरून 2D mesh तयार झाला. 2D mesh च्या सहाय्याने 3D mesh तयार झाला. |
05:02 | 1D mesh तयार करण्यासाठी F1 दाबा. |
05:06 | 2D mesh तयार करण्यासाठी F2 दाबा. |
05:10 | 3D mesh तयार करण्यासाठी F3 दाबा. |
05:14 | हे थोडा वेळ घेऊ शकते. स्टेटसबारमधे प्रोग्रेस बघा. हे पूर्ण झाल्याचे दाखवत आहे. |
05:22 | मेश तयार झाल्यावर फॉल्टी सेल्स काढून टाकण्यासाठी हे ऑप्टिमाईज करणे गरजेचे आहे. |
05:27 | ऑप्टिमायझेशनसाठी Modules वर क्लिक करा. नंतर Optimize 3d (Netgen) पर्यायावर क्लिक करा. |
05:36 | हे देखील थोडा वेळ घेऊ शकते. पुन्हा एकदा स्टेटस बारमधे प्रोग्रेस बघा. |
05:43 | मेश सेव्ह करण्यासाठी फाईलवर जाऊन सेव्ह मेश पर्याय निवडून टर्मिनल बंद करा. |
05:51 | constant फोल्डर नसलेली OpenFOAM केस डिरेक्टरी तयार करा. यामधे नवीन तयार केलेली sphere1.msh ही फाईल कॉपी करा. |
06:01 | टर्मिनल विंडोच्या सहाय्याने या प्रॉब्लेमच्या केस डिरेक्टरीमधे जा. |
06:06 | एकदा तुम्ही केस डिरेक्टरीमधे गेलात की मेश रूपांतरित करण्यासाठी "gmshToFoam sphere1.msh" टाईप करा. |
06:16 | पुढील टप्प्यात पुढे जाण्यापूर्वी 0 (झिरो) फोल्डरच्या फाईल्समधे बाऊंडरीजची तीच नावे असल्याची खात्री करा. |
06:24 | थोडक्यात,
या पाठात शिकलो: GMSH मधे अन्स्ट्रक्चर्ड मेश बनवणे प्लेन surfaces बनवणे '.geo' एक्सटेन्शनच्या फाईलद्वारे मूलभूत हाताळणी करणे. |
06:38 | असाईनमेंट म्हणून s आणि d च्या व्हॅल्यूज बदलून आणि Mesh.CharacteristicLengthFromCurvature यांच्या सहाय्याने मेश रिफाईन करा. |
06:49 | OpenFOAM मालिका ही FOSSEE Project, IIT Bombay यांनी तयार केली आहे. FOSSEE म्हणजे Free and Open Source Software for Education. |
06:58 | हे प्रोजेक्ट मुक्त आणि खुल्या सॉफ्टवेअर टुल्सच्या वापराला प्रोत्साहन देते. अधिक माहितीसाठी भेट द्या: |
07:07 | URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुम्ही व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
07:13 | प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते. अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
07:22 | या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.
|